स्पर्शाला पारखा... पुरुष
स्पर्श ही सुद्धा एक संवादाची भाषा आहे असं म्हंटलं जातं.
चित्रपट, मालिका यांतली पात्र अनेकदा एकमेकांना स्पर्श करताना दाखवतात, अनेकविध नात्यातले (मैत्री) स्त्रीपुरुष हातात हात घेतात , कधी आलिंगन देतात , कधी स्नेहाने, प्रेमाने, कधी सांत्वन करण्यासाठी , तर कधी धीर देण्यासाठी..काही वेळा तर रोज 'गुड मॉर्निंग/नाईट' म्हणत 'हग करणे' ही दाखवतात. आणि यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी हे तर आलेच पण त्याशिवाय आई-वडील आणि मुलगा/गी, मैत्रमैत्रिणी, आजी आजोबा आणि नातवंड इतकेच काय तर कधी दीर-वहिनी वगैरे वगैरे असे अनेक नात्यात होणारा स्पर्श अगदी सहज दाखवतात. मला त्यावर अजिबात टीका करायची नाही. पण मला ते बघताना नेहमी आश्चर्य वाटते. त्यामुळे स्पर्श याविषयावर लिहावसं वाटलं ...
वास्तवात आयुष्यात आपल्या इतके स्पर्श होतात का ?
त्यातही पुढे जावून मला वाटते की एक पुरुषाच्या जीवनात स्त्रीच्या तुलनेत खूप कमी स्पर्श असतात. लहानपणी होणारा आई वडील, भावंड ,काही प्रमाणात इतर नातेवाईक यांचा स्पर्श थोडे मोठे झाल्यावर (म्हणजे वय वर्षे १०-१२ नंतर) हळूहळू कमी होत , जवळपास पुर्णतः बंद होतो. मित्रांशी काही प्रमाणात स्पर्श असतो (पाठीवर थाप मारणे, गळाभेट घेणे ई) पण तरी सगळ्याच पुरुषांच्याबाबत ते होत नाही. मी तरी कधी अगदी जवळच्या मित्रांचीही गळाभेट घेतल्याचे मला आठवत नाही. कॉलेजजीवनात काही प्रमाणात मुला मुलींचा मस्ती करताना एकमेकांचा स्पर्श होतो हे मी पाहिले आहे. पण फार कमी मुलांच्या बाबतच हे घडते. बाकी अनेक मुलांना मैत्रिणी नसताता किंवा असल्यातरी त्यांच्याशी औपचारिक हँडशेक सोडल्यास कोणताही प्रकरचा स्पर्श नसतो. म्हणजे बालपण सरल्यानंतर पहिली प्रेयसी भेटेपर्यंत वा विवाह होईपर्यंत अनेक मुलांच्या जीवनात कोणताही स्पर्श जवळपास नसतोच. पुढे प्रेयसी , पत्नी, अपत्ये यांचा स्पर्श पुरुषाच्या जीवनात असतो पण मुले मोठी होतात तसे पुन्हा मुलांचा स्पर्श आयुष्यातून कमी होतो. मग फक्त पत्नीचाच काय तो स्पर्श आयुष्यभर कमी अधिक प्रमाणात रहातो. त्यानंतर दोघांतले भावबंध, आकर्षण , मतभेद यानुसार तो कमी अधिक असतो. पण एकंदरीतच आयुष्यात पुरुष हा कमी अधिक प्रमाणात स्पर्शाला पारखा असतो.
याउलट स्त्रियांच्या जीवनात विविध स्पर्शाचे प्रमाण खूप जास्त असते. मुलगी मोठी झाली तरी आईशी, बहिणीशी तिचा स्पर्श बर्याच प्रमाणात असतो असे मला वाटते. [तर दोन भावांत ,किंवा बहीण भावात स्पर्श फारसा नसतो असे माझे निरिक्षण आहे ], दोन मैत्रिणीसुद्धा बराच स्पर्श करतात. इतर स्त्री नातेवाईकांशीही मुलींचा सहज स्पर्श मी पाहिला आहे. माझी पत्नी माझ्या मावशीची आणि आत्येचीही गळाभेट घेते याचे मला खूप अप्रुप वाटते (या नातेवाईकांचा स्पर्श मी कधी अनुभवला नाही !!).
तसेच स्त्रीचा आपल्या अपत्याशी होणारा स्पर्श तिच्या पतीच्या तुलनेत खूप जास्त असतो. इतकेच काय तर आसपासच्या (नात्यातील , शेजारचया) इतर अनेक लहान मुलांना स्त्री सहज जवळ घेते, खेळवते ; पण पुरुष सहसा असं करत नाहीत.
स्त्री आणि पुरुषांच्या मानसिकतेत फरक असल्याने दोघांची स्पर्शाची भावनिक गरज भिन्न असते की हा केवळ संस्कारांचा भाग आहे ? इतर मिपाकरांच काय मत आहे ?इतर देशांत राहणार्या / राहिलेल्या मिपाकरांची तिथली निरिक्षणं काय आहेत हे जाणूण घ्यायला आवडेल.
आयुष्यातील स्पर्शाच्या कमी अधिक असण्याने (वा नसण्याने) व्यक्तीमत्वावर, मानसिकतेवर काय परिणाम होतात ?
याद्या
7863
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
चांगला विषय आहे
स्पर्श व भारतीय पुरुष,
खरंय. तुम्ही म्हणता आहात तसं
स्पर्शाची भाषा ही व्यक्तीच्या
विषय पटला.
अजून एक
आणि इतके विविध मानवी स्पर्श
In reply to अजून एक by मराठी कथालेखक
एखाद्या लेखकाच्या एका लेखावर
In reply to आणि इतके विविध मानवी स्पर्श by पगला गजोधर
खरय. स्त्रियांच्या आयुष्यात
या विषयाला लेखनस्पर्ष फारसा
रेवती, निरीक्षण आवडले. नवी
In reply to या विषयाला लेखनस्पर्ष फारसा by रेवती
केवळ जिज्ञासा
In reply to या विषयाला लेखनस्पर्ष फारसा by रेवती
आमच्या मुंबईत येऊन राहा आणि
कॉलेज ला जात असताना बस मध्ये
आणि सलूनवाल्याने चेहर्या
In reply to कॉलेज ला जात असताना बस मध्ये by वकील साहेब
चांगल्या विषयाला स्पर्श केला.
तुमचा अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद
In reply to चांगल्या विषयाला स्पर्श केला. by अमरेंद्र बाहुबली
अवांतर : तिचा पहिला स्पर्श ....
स्पर्शाला असलेला गंड (taboo
तुमच्या प्रतिसादाबद्दल
In reply to स्पर्शाला असलेला गंड (taboo by सुबोध खरे
हा जास्त करून गंडच आहे.
In reply to तुमच्या प्रतिसादाबद्दल by मराठी कथालेखक
एका अत्यंत अवघड प्रसंगातून
तात्पर्य काय तर...
धन्यवाद
चित्रपट /मालिकांत हाच समाज दाखवला जातो. खरंच?
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
हे अजिबात सिरिअसली घेऊ नका.
In reply to चित्रपट /मालिकांत हाच समाज दाखवला जातो. खरंच? by रविकिरण फडके
स्पर्शाचं प्रमाण -
प्रतिसाद आवडला , धन्यवाद.
In reply to स्पर्शाचं प्रमाण - by arunjoshi123
नै मला नै कळलं !
In reply to प्रतिसाद आवडला , धन्यवाद. by मराठी कथालेखक
अति लोकसंख्या = आजची
In reply to नै मला नै कळलं ! by पगला गजोधर
नुकताच सुरु झालाय का ?
In reply to नै मला नै कळलं ! by पगला गजोधर
अतिलोकसंख्या भारताला जर नवी
In reply to नुकताच सुरु झालाय का ? by arunjoshi123
स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा
In reply to अतिलोकसंख्या भारताला जर नवी by पगला गजोधर
१४. अति लोकसंख्येमुळे लोकांचा
In reply to स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा by सुबोध खरे
अतिलोकसंख्या भारताला जर नवी
In reply to अतिलोकसंख्या भारताला जर नवी by पगला गजोधर