adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आबा साहेब
या विधानाला काही पुरावा का अशीच पुडी सोडली आहे.
तुम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या एक दोन संघ नेत्यांचे मत पुराण मतवादी असले म्हणजे सगळी संघटना पुराण मतवादी आहे असे म्हणण्यासारखे आहे. सध्या जालावर श्री अशोक गेहलोत या काँग्रेसच्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य फिरत आहे कि धरणाच्या पाण्यातून वीज निर्मिती केली ( पाण्यातील वीज काढून घेतली) तर उरलेल्या निर्जीव पाण्यावर शेती कशी चांगली होणार? हे वक्तव्य पाहून कोणी असे म्हणू लागले कि काँग्रेसचे सगळेच नेते मूर्ख आहेत आणि काँग्रेस हा पुराण मतवादी पक्ष आहे तर त्याला तुम्ही काय म्हणाल? बाकी प्रतिगामीपणा किंवा मूर्ख वक्तव्ये हि कोणत्याच एका पक्षाची मक्तेदारी नाही असे नम्र पणे नमूद करू इच्छितो.श्री अशोक गेहलोत यांच्या
अक्षदा यांचा प्रतिसाद आवडला.
अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी
काळाप्रमाणे मुली बदलल्या
<<<पण हे होत असताना मुलांना
विशुमित
आताची पिढी हळूहळू याला
आमचं फादर अजून पण आईला
तुमचं फादर ग्रेट हैत, पण इथे
<<<मी एक भीक न घालणारी असेन,
प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे
अहो ते नवऱ्याचं डोकं खाणं
तुमचं लग्न टिकवलं कोणी ....
मग मी काय करते असं वाटतं
तुम्हीच सांगा ........
शिकलेल्या पोरी असल्या दबावाला
https://maharashtratimes
हेच म्हणते मी
नसते केले सहकार्य तरी ह्या
अगदी खरं साहेब..
प्रचंड अडचणी प्रत्येकाच्या
प्रश्न काय उत्तर काय ....
मुली दुसऱ्यांकडून अपेक्षा खूप
तेच तर म्हणतेय मी! कुणी तरी
<<<ते ही अनेकांना नको असतं
हायला
मा-ऑ,, इथे संसार बसवायचं चालय
सोप्प आहे
माझ्या पाहण्यात दोन्ही बाजूची
ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या
झी मराठीची जाहिरात पाहिली का?
आईच्या पदराड जगलेली लग्नाऊ
प्रतिसाद आवडला.
वीणा ताई वंटास प्रतिसाद...
लाटून== लटकून
बिशुमित यांना प्रतिसाद
अपर्णाबाईंच्या भाषणाचा परत
आधुनिक मुलींची व्यूहरचना
मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ
ही बघा आळशी 'नोकरदार'
.
हा धागा अमरपट्टा घेऊन आलाय
And he lived happily ever after....
And they both lived happily