✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक अधिक एक...

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 07/05/2017 - 19:24
एक अधिक एक=दोन! डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन! नेटवर्क बिझी असू शकतं. रेंज नसू शकते. कदाचित स्वीच अॉफ असू शकतो समोरच्याचा फोन! या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन. कारण,एक अधिक एक=दोन! गणितात आयुष्य पहायचं. पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही! पहिल्या एक आणी दुसय्रा एकच्या किं~मती मधली तफावत..मूल्यांचं वेगळेपण? त्यांचं मूळ १ असणं,नसणं? त्यांची भूक तहान तर अमान्य, अस्विकार्यच! कारण एक अधिक एक=दोन! यापेक्षा वेगळी जीवननिष्ठा कोण??? ह्हूं!!! लागलाच्च पाहिजे फोन! कारण,एक अधिक एक=दोन! एक अधिक एक=पाच! एक अधिक एक=दहा! कधी कधी मायनस दहा देखील! अशी उत्तरं सुद्धा असू शकतात, याच उत्तरांच्या गणितात. मानवी आयुष्य असच असतं..याच गणितात.. शांत पहुडलेलं! पण नाही... एक अधिक एक=दोन! डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन! शब्दांचे शुद्ध-लेखन.. त्यातले व्याकरण. भाषिक अर्थप्राप्तीचा खटाटोपच सारा हा. पण अर्थप्रचितीसाठी पुन्हा लागतं ते बोलीभाषेचंच गणित. वरिल नियमांच्याही आधीचं! त्याचं काय????? पण नाही. एक अधिक एक=दोन! डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन! ================== अत्रुप्त..

प्रतिक्रिया द्या
2451 वाचन

💬 प्रतिसाद (8)

गुर्जि मला कळलं नाहि नक्कि

जेनी...
Wed, 07/05/2017 - 19:37 नवीन
गुर्जि मला कळलं नाहि नक्कि काय म्हणायच तुम्हाला ते ...
  • Log in or register to post comments

जे लोक आयुष्यातल्या प्रत्येक

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/06/2017 - 09:15 नवीन
जे लोक आयुष्यातल्या प्रत्येक घटना,गोष्टी गणीतातल्या सारख्या ग्रुहीत धरतात.. त्यांची तसं काहीही नसतं, हे न कळल्यानी वारंवार फसगत होते. परंतू ते त्यांचा आडमुठेपणा सोडत नाहीत. असं केल्यावर तसच झालं पाहिजे. हा त्यांचा दुराग्रह कायम राहतो. त्यासंदर्भात वरील मुक्तक वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ह्म्म ...

जेनी...
गुरुवार, 07/06/2017 - 17:12 नवीन
ह्म्म ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जि खाकि गोलि द्या ताइना

सिद्धेश्वर विल…
Wed, 07/05/2017 - 19:41 नवीन
गुर्जि खाकि गोलि द्या ताइना
  • Log in or register to post comments

(No subject)

जेनी...
Wed, 07/05/2017 - 21:08 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर

चांगलं लिहिलयं....

मुक्त विहारि
Wed, 07/05/2017 - 21:08 नवीन
आवडले... (आजकाल आम्ही स्पांडूरंगाच्या प्रतिसादाची वाट न बघायचे ठरवले आहे.)
  • Log in or register to post comments

काहीशी कळली...

ज्योति अळवणी
Wed, 07/05/2017 - 22:44 नवीन
काहीशी कळली... गणितात आयुष्य पहायचं. पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही! अगदी खरं
  • Log in or register to post comments

वावा!!

कंजूस
गुरुवार, 07/06/2017 - 07:23 नवीन
वावा!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा