Skip to main content

ताणे-बाणे स्थल-कालाचे..

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 28/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे(*) क्षणजीवी वर्तमान घडवी स्फटिक अहर्निश अतिताचे (**) उत्पत्ती अन स्थिती,लयाचे रहाट अविरत चालतसे स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे पोहोरे माळुनी फिरत असे ताणे-बाणे स्थल-कालाचे तोलुनी धरिती विश्वाला जटिल,चतुर्मित रूप तयांचे गोचर केवळ गणिताला =============================== (*) अधुनाचे = वर्तमान कालाचे (**) अतिताचे = भूत काळाचे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1671
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

उत्कृष्ठ!
स्फटिक अहर्निश अतिताचे
फार आवडले.

सौरा, पद्मावति धन्यवाद!