✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !

स
संजय क्षीरसागर यांनी
Sun, 05/07/2017 - 00:54  ·  लेख
लेख
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते. ३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं. ४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं ! ५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. ६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल. ७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे . ८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या. ९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला. १०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको ! ___________________________________ स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे : Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
40412 वाचन

💬 प्रतिसाद (151)

प्रतिक्रिया

जर वेगळा काही विचार करावासा वाटला तर

संजय क्षीरसागर
Wed, 05/10/2017 - 15:58 नवीन
ढेरेंना दिलेला प्रतिसाद वाचावा. शक्यतो मुद्याला धरुन बोललात तर चर्चेतून काही तरी निष्पन्न होईल. भाषा आणि चित्रकला यातला किमान फरकच समजत नसेल तर पुढे काही बोलणंच संपलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक आगाऊ प्रश्न "तुम्हाला समजत

दशानन
Wed, 05/10/2017 - 16:20 नवीन
एक आगाऊ प्रश्न "तुम्हाला समजत नाही असा विषय कुठला?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हाहाहा ! हा प्रश्न वाचुन Big

कुटस्थ
गुरुवार, 05/11/2017 - 20:45 नवीन
हाहाहा ! हा प्रश्न वाचुन Big Bang Theory मधल्या Sheldon Cooper ची आठवण झाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

संक्षी किती हसवणार आता ?! पोट

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/10/2017 - 20:54 नवीन
संक्षी किती हसवणार आता ?! पोट दुखायला लागलं =)) =)) =)) आता तुम्ही काहीएक म्हटले म्हणजे तुम्ही इतर काही मानणार नाहीच. तरीही समजतंय का ते पहा... मुद्दा असा आहे : जसे, तुमच्या मते, इथे भाषांतरावर टीका करण्यासाठी भाषांतराचे कौशल्य आवश्यक आहे, त्याच नियमाने तिथे चित्रावर टीका करायला चित्रकलेचे प्राविण्य असणे जरूर असायला हवे, नाही का ? मात्र, "या जगात, तुम्हाला वेगळे नियम असतात आणि बाकी सर्व ब्रम्हांडाला वेगळे नियम असतात", असे काही तुम्हाला वाटत असेल तर मात्र गोष्ट वेगळी... आणि उपायही वेगळे असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

.

मूकवाचक
Sun, 05/07/2017 - 21:33 नवीन
Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun स्पष्टपणे वाभाडे काढताना ज्याने ना माणसाला मोकळे सोडले ना ईश्वराला, तो आज इथे मृत्युच्या कुशीत विसावला आहे तुमच्या अमूल्य आसवांची त्याच्यासाठी नासाडी करू नका, तो सगळ्यांना अप्रिय असण्यातच धन्यता मानणारा महाभाग होता प्रक्षोभक गोष्टी लिहीणे ही त्याच्या लेखी एक भन्नाट मौजेची बाब होती अशा भंपक कलंदराला शेवटी मृत्युने गाठले याबद्दल ईश्वराला मनोमन धन्यवाद द्या ...
  • Log in or register to post comments

सुरेख जमला आहे भावानुवाद !!

सतिश गावडे
Sun, 05/07/2017 - 21:41 नवीन
सुरेख जमला आहे भावानुवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

यातला "भंपक" या एका शब्दाचा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/07/2017 - 21:49 नवीन
यातला "भंपक" या एका शब्दाचा अपवाद सोडता भावानुवाद उत्तम जमला आहे. Son of a gun हा वाक्प्रचार कमीपणा दाखविण्यासाठी किंवा अपमानास्पद पद्धतिने न वापरता काहिश्या कौतुकानेच वापरला जातो. Son of a gun is an exclamation or a noun in American and British English. It can be used encouragingly or to compliment, as in "You son of a gun, you did it!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

जम्या जम्या..

मोदक
Sun, 05/07/2017 - 22:17 नवीन
जम्या जम्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

हे मस्त जमलंय !!! खुशवंत

मितान
Sun, 05/07/2017 - 22:22 नवीन
हे मस्त जमलंय !!! खुशवंत सिंग मराठी बोलणारे असते तर ते असंच काहीसं बोलले असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

वा !!! याला म्हणायचा अनुवाद.

अभिजीत अवलिया
Mon, 05/08/2017 - 06:25 नवीन
वा !!! याला म्हणायचा अनुवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

एक वेगळा विचार

सुबोध खरे
Sun, 05/07/2017 - 22:29 नवीन
एक वेगळा विचार खुशवंत सिंह यांनी लिहिलेल्या पहिल्या चारहि मुद्द्यांची तुमचे नशीब अतिशय चांगले असणे आवश्यक आहे. याबद्दल त्यांचे स्वतःचे नशीब चांगले होते म्हणून ठीक आहे. गणपत वाणी बिडी बापुडा पिता पिताना मरून गेला असेच बहुसंख्य व्यक्तींचे होते. बाकी सहा गोष्टी त्यांनी स्वतः किती पाळल्या याबद्दल शंकाच आहे. अवांतर -- त्यांचे लेखन चांगले होते. आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये श्री व्यंकटेश माडगूळकर (१९४६)
  • Log in or register to post comments

Here lies one who spared

संदीप डांगे
Sun, 05/07/2017 - 22:31 नवीन
Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun इथं पहुडलाय तो, ज्याने ना माणसाला सोडले ना देवाला; तुमची आसवं ह्याच्यासाठी नका गाळू, हा एक हरामी साला. त्रासदायक लिहिणं ह्याला वाटे लय भारीच मजेचं; उपकार माना देवाचे, मेलंय आता हे कार्टं शिंदळीचं (थोडासा यमकहरामीपणा)
  • Log in or register to post comments

हेच बरोबर.

कंजूस
Mon, 05/08/2017 - 09:30 नवीन
हेच बरोबर. sod चा अनुवाद शक्य नाही तो शिंदळमधून बराचसा जमलाय. मुळात लैंगिकतेचे निरनिराळे उटपटांग प्रकार भूमध्य समुद्राच्या आसपास फारच प्रचलित होते ते तिकडच्या लोकांकडून इकडे भरतवर्षा माहित झाले. एवढंच काय ते प्रकार इतके वाढलेले की मोझेसच्या दहा आज्ञांपैकी एक असं करू नका ही आहे. खुशवंतला इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक गटात टाकता येणार नाही कारण ती भाषा पिऊन शिकलाय वाचून लिहून नाही.
  • Log in or register to post comments

हम्म. हे सगळं वाचताना छान

रातराणी
Mon, 05/08/2017 - 12:25 नवीन
हम्म. हे सगळं वाचताना छान वाटतं, जेव्हा वागायचं असतं तेव्हा विसरतं.
  • Log in or register to post comments

एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी

संजय क्षीरसागर
Mon, 05/08/2017 - 12:43 नवीन
सदस्यांनी (नेहेमीप्रमाणे), एपिटाफकडे चर्चा वळवली आहे ! तरीही असो, एकेक वाक्य घेऊन अनुवाद पाहू : १) Here lies one who spared neither man nor God; या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, (हा अनुवाद तर निर्विवाद आहे कारण खुशवंत नास्तिक तर होतेच पण कधीही आणि कुणाही विरुद्ध रोखठोक लिहायचे) २) Waste not your tears on him, he was a sod; याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. (Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots) त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे. तो जमीनीशी इमान (डाऊन टू अर्थनेस) आणि हिरवेपणा (खुशवंत सिंगांचा रोमँटिसिझम) दर्शवतो). ३) Writing nasty things he regarded as great fun; प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. (nasty चा शब्दशः अर्थ Very bad or unpleasant असला तरी तो इथे अभिप्रेत नाही). त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे. ४) Thank the Lord he is dead, this son of a gun हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस बंदुकीची औलाद होता ! इथे मला मूळ शब्द रचनाच इतकी आवडली की मी शब्दश : भाषांतर केलं ! अर्थात त्या शब्दरचनेचा अर्थ असा आहे : usually used as a mild or euphemistic alternative to son of a bitch ; sometimes used interjectionally to express surprise or disappointment. कुणाला फारच अणखर वाटत असेल तर माझ्याच शैलीत थोडा बदल करतो : हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता ! मला वाटतं एका शब्दानं फारसा गहजब झालेला नाही किंवा जगण्याच्या सूत्रांना तर कदापीही धक्का पोहोचलेला नाही.
  • Log in or register to post comments

(मीमीमी सोडून) अख्ख्या होल

गब्रिएल
Mon, 05/08/2017 - 13:30 नवीन
(मीमीमी सोडून) अख्ख्या होल दुनिया, तूच्च बेशर्त चूक हाईस. गपचीप चूप्प र्‍हा. मीच्च न्हेमीच्च ब्ररोब्रच्च आस्तोच्च, म्हाय्त नाय्का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आधी मराठी तर नीट लिहीयला शिका !

संजय क्षीरसागर
Mon, 05/08/2017 - 14:24 नवीन
तुम्हाला लिहीता येत नसेल तर त्याचा राग माझ्यावर काढून, तुम्ही स्वतःचच हसं करुन घेतायं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

आस कस आस कस ?

गब्रिएल
Tue, 05/09/2017 - 22:09 नवीन
लिवलेल्य 'तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे' यापरिस (मूळ आर्थाला धक्का न मार्ता) त्येचा आर्थ वाचकान्पर्यंत प्ररभावीपणे पोच्चतो की नाय आन आर्थ काय काय बयाँ कर्तो की नाय हे निकष लै म्हत्वाच्ये हाहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गिरे तो भी टांग उपर...

अमेरिकन त्रिशंकू
Mon, 05/08/2017 - 16:34 नवीन
गिरे तो भी टांग उपर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्रिशंकू,

संजय क्षीरसागर
Mon, 05/08/2017 - 18:28 नवीन
मुद्दा तुम्ही काढलायं, मी माझ्याबाजूनं स्पष्टीकरण दिलंय. ते गिरे वगैरे नेहेमीचंय.... तुम्ही (किंवा त्या हास्यास्पदवाल्या विदुषी) अनुवाद करु शकतील का ? दोघांपैकी कुणीही एकदा अनुवाद करुन तर पाहा अनुवाद, फार मजा येईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू

प्रतिसादाचे सार...

सतिश गावडे
Mon, 05/08/2017 - 17:35 नवीन
हा अनुवाद तर निर्विवाद आहे त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे रच्याकने अणखर आणि आचपेच म्हणजे काय? हे शब्द कधी ऐकले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संजयजी, मी तुमच्याइतका

संदीप डांगे
Mon, 05/08/2017 - 13:27 नवीन
संजयजी, मी तुमच्याइतका व्यासंगी नाही, ज्ञानी तर अजिबात नाही. पण माझ्या कवडीमूल्य आकलनानुसार एपिटाफ हा फार विचारपूर्वक लिहिलेला असतो, त्याच्यातला शब्द आणि शब्द चपखल असतो. त्यात संदर्भ सोडून काहीही नसते. संबंधित माणसाचे सर्व आयुष्य त्या दोन चार ओळीत बसवणे फारच कौशल्याचे व हुशारीचे काम असते. तेव्हा अनुवाद करतांना आपल्या मनाला वाटेल तो संदर्भ आणि तो पर्यायी शब्द घेता येत नसतो. ते मग लॉस्ट इन ट्रान्सलेशन होऊन जातं. सॉड चा तुमचा अर्थ हिरवळ, जमिनीसे जुडा हुआ आदमी वगैरे म्हणजे एकदम कैच्याकै आहे. उदा: उद्या माझ्या एपिटाफवर "ह्या माणसाने सगळ्यांची वाट लावली" असा वाक्यप्रयोग असेल तर त्याचा अर्थ "ह्या माणसाने सगळ्यांना योग्य मार्गदर्शन केले, योग्य वाटेवर आणले" असा काढल्यासारखे होईल. रोमॅण्टीसिझम, हिरवटपणा म्हणजे अगदी कैच्याकै. साक्षात सिंगसाब वरुन उतरुन खाली आले तरी तुम्ही त्यांनाही हाच अनुवाद बरोबर आहे असे ठणकावून सांगायला कमी करणार नाहीत याची खात्री आहे. सॉड चा योग्य अर्थ हा त्याच्या आधी कोणते शब्दप्रयोग केले आहेत त्यावरुन सहज कळतो. तो नक्कीच सन्मानदर्शक नाही. शिवाय स्वतःची स्तुती स्वतःच खुशवंतसिंग करत नाहीयेत हे संपूर्ण एपिटाफमध्ये दिसतंय. "याच्यावर अश्रू गाळू नका कारण हा माणूस मातीशी जुळलेला आहे" हा अनुवाद पाहून डोक्यावर हात मारुन घेत असतील सिंगसाहेब. एखाद्या नालायक, हरामी, बदमाश माणसावरच अश्रू गाळू नका असे म्हटले जाते. डाउन टू अर्थ माणसाला सन्मान दिला जातो हे तर अगदी बेसिक आहे. तुमच्यासारख्या परमज्ञानी व्यक्तीस काय सांगावे? ------------------------- सन ऑफ अ बिच म्हणण्याऐवजी सन ऑफ अ गन हे अंमळ मैत्रीपूर्ण पद्धतीने, आपण मित्राला शिव्या घालतो (आमच्याकडे मित्राला 'काबे भोसडीच्या' - सन ऑफ अ गन सारखेच- असे उद्देशले जाते) तसे म्हटले जाते. त्याला बंदुकीची औलाद वगैरे म्हणणे तर टूमच आहे. प्रत्येक भाषेचे सांस्कृतिक संदर्भ असतात, ते आपल्याला समजतीलच असे नसते. त्यामुळे असे गुगल ट्रान्सलेशन हमखास फसते. ------------------------- आपली चूक खरोखर झाली असेल तर मान्य करण्यापेक्षा दुसरा मोठेपणा जगात नाही. पहिल्याच फटक्यात समजून उमजून चूक मान्य केली असती तर एवढं कोणी ताणले नसते. पण आता तुम्ही इतके इरेला पेटलात. सगळं हास्यास्पद झालेलं आहे. तुमची चूक उघड झाली आहे. आता प्रतिसादांमधून वेळ वाया घालवू नका अशी माझी मैत्रीपूर्ण विनंती आहे. एखाद्यावेळेस चुकतो माणूस, त्यात काय एवढे मनाला लावून घ्यायचे. इट्स ओके. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

+१

अनुप ढेरे
Mon, 05/08/2017 - 13:42 नवीन
'सॉड'ला प्रतिशब्द हवा असल्यास गांडु/हरामी हा शब्द वापरावा. मित्राला अशी प्रेमळ हाक अनेकदा मारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

@ संदीप,

संजय क्षीरसागर
Mon, 05/08/2017 - 14:17 नवीन
प्रश्न चूक आणि बरोबर असा कुठेय ? काँटेक्स्टचा प्रश्न आहे. एक शब्द जसाच्या तसा अनुवादित केला तो सुद्धा दुरुस्त केलायं इतकंच ! अत्रे हे जवळजवळ खुशवंतजींच्यासारखं मराठी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा हा मृत्यूलेख पाहा : "उद्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मूर्ख असेल,याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कृतघ्न मात्र कधीही नव्हता!” - प्रल्हाद केशव अत्रे याचा अर्थ अत्रे स्वतःला `मूर्ख आणि बावळट' म्हणतात असा अर्थ इथल्या सदस्यांनी काढला (कारण तसेच अनुवाद तुम्ही आणि इतरांनी केलेत!).... तर तो ज्योक होईल. कारण सगळा फोकस कृतघ्न मात्र कधीही नव्हता वर आहे. त्यामुळे जसे अत्रे स्वतःला कमी लेखत नाहीत तर `कृतज्ञता' ही वॅल्यू `मूर्ख आणि बावळटाच्या' वर आहे हे सांगतायंत. तद्वत खुशवंत सिंगांनी स्वतःला कमी लेखलेलं नाही (जे तुम्ही आणि इतर सदस्य डोक्यात धरुन अनुवाद करण्याचा प्रयत्न करतायं), फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातले (समाजाला वाटलेले न्यूनत्व) त्यांना स्वतःच्या `आचपेच न ठेवता बोलणं आणि अक्करमाशेपणापेक्षा' प्रिय होते असंच दर्शवतात. तस्मात, अनुवाद ती मूळ विचारधारा गृहित धरुन केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बर्र काय ठरला मंग ?

उपेक्षित
Mon, 05/08/2017 - 14:06 नवीन
बर्र काय ठरला मंग ?
  • Log in or register to post comments

मिस लवंगलतिका - बंदुक की आवाज

मोदक
Mon, 05/08/2017 - 16:45 नवीन
मिस लवंगलतिका - बंदुक की आवाज फेम आणि मिस्टर खुशवंत सिंग - बंदुक की औलाद फेम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

साला ये प्रतिसाद मैने बघ्याच नय :P :) :P

उपेक्षित
गुरुवार, 05/11/2017 - 21:20 नवीन
साला ये प्रतिसाद मैने बघ्याच नय :P :) :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बरं ते जावुद्या....

इरसाल
Mon, 05/08/2017 - 17:39 नवीन
सॉड च्या ऐवजी सांड (खुला) असं म्हटलं तर चालुन जावं.
  • Log in or register to post comments

जो मझा, पंच आणि चुरचुरीतपणा

अभ्या..
Mon, 05/08/2017 - 20:06 नवीन
जो मझा, पंच आणि चुरचुरीतपणा "बंदुकीची औलाद" ह्या युनिक कन्सेप्टमध्ये होता त्याचा एक शतांशही "अक्करमाश्या" हा शब्द पेलू शकत नाही हे नमूद करु इच्छितो.
  • Log in or register to post comments

लै वेळा सहमत..!!

मोदक
Mon, 05/08/2017 - 20:22 नवीन
लै वेळा सहमत..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सहमत आहे

संजय क्षीरसागर
Mon, 05/08/2017 - 20:26 नवीन
पण जनरेट्यापुढे, केवळ त्या एका शब्दापायी वाद नको म्हणून, पर्यायवाची शब्द दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुढे चला अन खुशवंतचं बोला.

कंजूस
Mon, 05/08/2017 - 20:12 नवीन
पुढे चला अन खुशवंतचं बोला.
  • Log in or register to post comments

दोन दिवस झाले .....

संजय क्षीरसागर
Mon, 05/08/2017 - 20:28 नवीन
हेच सांगतोयं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लेख परत एकदा वाचला ! मजा आली

प्रसाद गोडबोले
Tue, 05/09/2017 - 16:07 नवीन
लेख परत एकदा वाचला ! मजा आली !! ७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे . >>> हे एकदम सत्य आहे , आजवर आमच्या ट्रेकच्या छंदाने आयुष्यत अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत ते आठवले :) अवांतर : ह्यावरुन मला ओशो च्या १० कमांडमेन्ट्स ची आठवण झाली : १.Never obey anyone's command unless it is coming from within you also. २.There is no God other than life itself. ३.Truth is within you, do not search for it elsewhere. ४.Love is prayer. ५.To become a nothingness is the door to truth. Nothingness itself is the means, the goal and attainment. ६.Life is now and here. ७.Live wakefully. ८.Do not swim—float. ९.Die each moment so that you can be new each moment. १०.Do not search. That which is, is. Stop and see. ह्यातील आठ नंबर तर एकदम अफाट आहे !!
  • Log in or register to post comments

तुफ्फान !!

अर्धवटराव
गुरुवार, 05/11/2017 - 13:26 नवीन
ह्यातील आठ नंबर तर एकदम अफाट आहे !!
मला तर सगळेच भन्नाट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कशाला रे उगाच खुस्पटं काढताय

ट्रेड मार्क
Tue, 05/09/2017 - 20:58 नवीन
एवढी महान व्यक्ती इथे मिपावर येऊन आपल्याला फुकट ज्ञानामृत पाजत आहे आणि तुम्ही उगाच एक शब्द घेऊन बसलात. नंतर हेच ज्ञान तुम्हाला सरांच्या वेबसाईट वर पैसे भरून घ्यायला लागेल. सरांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य म्हणजे ब्रम्हवाक्य असतं. त्यातून नसते अर्थ काढायचे नसतात. जरी ते आपल्या धाग्यांचा आशय लक्षात न घेता आपल्या धाग्याचं काश्मीर करत असले तरी ते आपलं भाग्य आहे. त्यांच्या धाग्यांवर येऊन तिथला स्कोअर सेटल करायचा प्रयत्न करू नये. सर स्थलकालातीत आहेत, त्यामुळे हा अनुवाद सरांना प्रत्यक्ष खुशवंतसिंगांनीच सांगितलेला असू शकतो. जो सांगायला त्यांना १ तास लागला असेल तो सरांनी आपल्याला ५ मिनटात समजावून सांगितला आहे, उगाच फाटे फोडून काला(?)पव्यय करू नये. नाहीतर नंतर सरांनी अपमान केल्यावर कांगावा करू नये.
  • Log in or register to post comments

हाहाहा..

अभिदेश
Tue, 05/09/2017 - 23:24 नवीन
काहीही हा ट्रे. मा. ... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

एका लेखात, छ. शिवाजी

मराठी_माणूस
Wed, 05/10/2017 - 12:05 नवीन
एका लेखात, छ. शिवाजी महारांजा बद्दल लिहलेले विसरु शकत नाही.
  • Log in or register to post comments

@ अढे

संजय क्षीरसागर
Wed, 05/10/2017 - 15:52 नवीन
तुम्ही सर्व प्रतिसाद वाचलेत का ते आधी बघा ! १) sod आणि son of a gun या दोन शब्दांवर आक्षेप होता अ) पैकी sod चा अर्थ असा आहे : Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots or another piece of thin material. जर sod हा शब्द स्लँग म्हणून वापरला तर त्याचा अर्थ : something or someone considered unpleasant or difficult: ( तो डायरेक्ट `शिवी' म्हणून गणला जात नाही) मी तो शब्द स्लँग न धरता आहे तसा धरला. त्यामुळे "हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता." हा अनुवाद योग्य आहे. तस्मात, तो विषय संपला. बाय द वे, सदस्यांनी केलेले `छान अनुवाद' पाहा ! (१) "गवतपट्टा" (२) "तो शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतात. सोडोमाइट वरून आलेला असावी ही शिवी." (हा तुमचा स्वतःचा ज्योक !) ब) son of a gun हा तिथला स्लँग आहे आणि त्याचा अर्थ असा आहे : Son of a gun is an exclamation or a noun in American and British English. It can be used encouragingly or to compliment, as in "You son of a gun, you did it!" Or may be used sarcastically, as in "You son of a gun, that's not how you do it!" बोली भाषेतल्या अनौपचारिक शब्दाचा अनुवाद संस्कृतीपरत्वे बदलतो. मी सुरुवातीला केलेली शब्दयोजना जरी खुशवंतसिंगांच्या व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ वर्णन करणारी होती तरी ती अपेक्षित स्लँगला तितकीशी मिळती जुळती नव्हती (त्यात सुमार, धादांत-चूक किंवा हास्यास्पद असं काही वाटणं म्हणजे अनाकलनाची पातळी आहे). तरीही मी ते मान्य करुन लेखात योग्य तो बदल केला. सदस्य जो अहं चा (नेहेमीचा) उद्घोष लावतायंत तो विनोदी आहे. मी फक्त इतकंच म्हणतोयं की ज्यांना Live चा साधा उच्चार सुद्धा माहिती नाही त्यांनी तो इथे ऐकावा त्यामुळे त्यांना कशाचंही हसू येईल, त्यात काही नवल नाही. पण वर गॅब्रियल यांचा प्रतिसाद आणि इतर सदस्यांचे प्रतिसाद (जे स्वतःला मराठीचा अभिमान आहे वगैरे समजतात) त्यात थोडा तरी फरक असावा. थोडक्यात, प्रश्न सही अनुवादाचा आहे, अहं चा नाही इतपत समज येईल तो सुदीन ! आणि त्याही पुढे जाऊन, लेखातल्या कंटेंटवर चर्चा होऊ शकली तर तो मिपाचा भाग्योदय !
  • Log in or register to post comments

Son of a gun

दशानन
Wed, 05/10/2017 - 16:24 नवीन
आयला तुम्ही पण विकी पंडित का? मग चालू द्या! अगदी निवांत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आणि सॉडचा तुम्ही काढलेला अर्थ पाहा !

संजय क्षीरसागर
Wed, 05/10/2017 - 16:28 नवीन
सॉड'ला प्रतिशब्द हवा असल्यास गांडु/हरामी हा शब्द वापरावा याला म्हणतात सुपर ज्योक ! आता वर कमेंटस मारणारे हसणार का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ठीक आहे. तुम्ही बरोबर.

अनुप ढेरे
Wed, 05/10/2017 - 17:10 नवीन
ठीक आहे. तुम्ही बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

का थोडं

नवशिक्या
Wed, 05/10/2017 - 17:56 नवीन
ती बाई तुम्ही दिलेल्या लिंक वर घसा ताणून "लिव्ह " " लिव्ह " म्हणतीये ...अन .....तुम्हाला "लीव लीव " ऐकू येतंय .... आता असं म्हणू नका कि "हाऊ टू लीव अँड डाय" म्हणजे मला " How to LEAVE and die" म्हणायचं होतं .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

....

नवशिक्या
Wed, 05/10/2017 - 17:56 नवीन
ती बाई तुम्ही दिलेल्या लिंक वर घसा ताणून "लिव्ह " " लिव्ह " म्हणतीये ...अन .....तुम्हाला "लीव लीव " ऐकू येतंय .... आता असं म्हणू नका कि "हाऊ टू लीव अँड डाय" म्हणजे मला " How to LEAVE and die" म्हणायचं होतं .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नीट ऐका

संजय क्षीरसागर
Wed, 05/10/2017 - 18:21 नवीन
कदाचित तुम्ही घसा ताणून ऐकतायं त्यामुळे तसं ऐकू येतंय :) इथे बघा शब्दाचं फोनेटिक्स लिहीलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नवशिक्या

सर, कान... कान ताणून!

खेडूत
Wed, 05/10/2017 - 18:30 नवीन
सर, कान... कान ताणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

उगा काहितरी काय ?... स्वामी

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/10/2017 - 23:44 नवीन
उगा काहितरी काय ?... स्वामी म्हणाले "घसा ताणून ऐकलं" तर ते ऐकून खुद्द जगन्निर्माताही उद्यापासून सर्व प्राणीमात्रांचा (ऐकण्याचे संदेश वहन करणारा) ऑडिटरी नर्व्ह कानापासून तोडून घश्याला चिकटवेल... काय समजलात काय ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

खेडूतजी !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/11/2017 - 12:11 नवीन
सर, कान... कान ताणून! इतक्या कल्लोळात सुद्धा हे खरंच मार्मिक आणि भारीये ! धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

अनुवाद गंडला आहे

उदय
Wed, 05/10/2017 - 19:36 नवीन
Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun son of a gun ला अक्करमाश्या (= अनौरस) हा शब्द अजिबात सुयोग्य नाही. son of a gun ला जवळचा शब्द म्हणजे धूर्त, ठग किंवा तुच्छ. लीव हे पण चुकले आहे. ते लिव्ह किंवा लीव्ह असे हवे होते. लिव्ह म्हणजे live (जगणे) आणि लीव्ह = लीsssव्ह म्हणजे सोडून जाणे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

साहेब

सुबोध खरे
Wed, 05/10/2017 - 20:17 नवीन
साहेब son of a gun ला -- डांबरट शब्द चालेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा