Skip to main content

बाळा, उरले तुजपुरती......

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 16/04/2017 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद मृत्यूचे दु:ख अन भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , हृदय पिळवटणारी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय... सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या कवि आल्फ्रेड टेनिसन याने. मात्र या कवितेचे वेगळेपण असे की त्याने ही कविता त्या अनाम सैनिकाच्या पत्नीच्या - गोठलेपणाची परिसीमा गाठलेल्या - अवस्थेवर लिहिली . ती मूळ कविता (HOME they brought her warrior dead ) व तिच्या भावानुवादाचा मी केलेला प्रयत्न: HOME they brought her warrior dead: She nor swooned, nor uttered cry: All her maidens, watching, said, ‘She must weep or she will die.’ Then they praised him, soft and low, Called him worthy to be loved, Truest friend and noblest foe; Yet she neither spoke nor moved. Stole a maiden from her place, Lightly to the warrior stepped, Took the face-cloth from the face; Yet she neither moved nor wept. Rose a nurse of ninety years, Set his child upon her knee— Like summer tempest came her tears— ‘Sweet my child, I live for thee.’ भावानुवाद: मृत्युंजय रणवीराचे कफनात कलेवर बघुनी विमनस्क वीरपत्नीच्या डोळ्यात गोठले पाणी ... कुणि अनुपमेय शौर्याच्या तडिताघाताने दिपले कुणि असह्य मित्रवियोगे हेलावून आतून गेले…. पण नजर "तिची" थिजलेली शून्यात जणू खिळलेली धगधगत्या वैशाखाने कोवळी पालवी जळली.. "अश्रूंना कोंडिल जर ही उरी फुटेल पोर बिचारी झेलील कसा मग असला नियतीचा घाव जिव्हारी" सारिले कुणी मग मागे वीराचे कफन जरासे पतिमुख पाहूनही तिजला ना मूर्च्छा, नाही उसासे अश्राप तान्हुले त्याचे ठेविले कुणि तिज पुढती कोसळता वळिव म्हणाली, 'बाळा, उरले तुजपुरती, बाळा, केवळ तुजपुरती"... (उदय - अनंत-यात्री)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8015
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

कुणी सैन्यात भर्तीच होऊ नका ! मग कोण कुणाशी खेळणार युद्ध-युद्ध ? सगळा बावळटपणा एका झटक्यात संपेल. देन नो कविता अँड नो हृदय पिळवटींग.

In reply to by संजय क्षीरसागर

-"सुलभ तेच योग्य" असा रुले ? कोणी बनवला हा रूल ? की तो "स्वय॑-सिद्ध" वगैरे आहे? -खर॑च हा वैश्विक रूल असता तर सापेक्षता सिद्धान्ताचा उदय होण्यापूर्वी "सुलभ" व म्हणूनच "योग्य" ठरविले गेलेले ईथर पुढे प्रयोगा॑ती "योग्य" ठरले असते ना भाऊ? - यावर आता अधिक शब्दच्छल न केलेला बरा !

इंग्रजी कविता शिकताना फार वाईट वाटायचे. सुरेख रूपांतर केले आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

-मुळात माझा प्रतिसाद रेवती ताईंच्या प्रतिसादावर होता. त्यात तुम्ही पडून प्रश्न कळला असे प्रमाणपत्र व उत्तर बघण्याचा अनाहूत सल्ला का दिलात हे एक कोडे आहे. -जरा समजून घ्या की तुमचं रूल-बुक व वावदूक प्रश्नोत्तरांचं गाईड या दोन्हीच्याही मी पलीकडे आहे.

In reply to by अनन्त्_यात्री

मी : "सुलभ तेच योग्य" असा रुले ? तुम्ही : कोणी बनवला हा रूल ? आता बघा, ज्यावर सगळं अवलंबूने तो श्वासोत्छ्वास सहजे, हे तो बंद पडेल तेव्हाच कळेल. अठरा कोटी किमी दूर असलेल्या सूर्याभोवती पृथ्वी अहोरात्र फिरते, आहे का काही पत्ता ? आकाशात इतके ग्रह-तारे एकमेकांना न धडकता फिरतायंय आहे की नाही सहज ? पण माणूस बाँब काय टाकतो, युद्ध काय खेळतो, नुसता गोंगाट ! सो , सुलभ तेच योग्य असा रुले.

In reply to by अनन्त्_यात्री

ते दैवी आहेत, सगळे त्यांनाच माहिती आहे आपण कोण त्यांच्याबद्दल लिहिणारे, त्यांना बाजूला ठेऊन लेखनावर आपला वेळ घालवा. अप्रतिम भाषातंर झाले खूप आवडले.

मूळ कविता तर सुंदर आहेच. अनुवादही उत्कृष्ट. मुळात युद्ध ही संकल्पना फक्त रणभूमीपुरती मर्यादित नाही. आजच्या काळातल्या माणसाला अनेक लढे आणि युद्धं लढावी लागताहेत. त्या दृष्टीने विचार केला तर ही कविता केवळ सैनिकाच्या पत्नीला उद्देशून नाही.

अतिशय प्रभावी अनुवाद. ह्यावरून "सुनील" यांचा एक लेख आठवला. "Home they brought" आणि "तरुण आहे रात्र अजुनी" ह्यांची तुलना करणारा.

In reply to by सुमीत भातखंडे

कशी केली असावी हे लक्षात येत नाही, पण औत्सुक्य आहे ... "Home they brought" आणि "तरुण आहे रात्र अजुनी" ह्यांची तुलना करणारा लेख कुठे मिळेल? लिन्क पाठवाल ?

In reply to by अनन्त्_यात्री

एक प्रसंग, दोन कवी आणि दोन कलाकॄती हा तो धागा. वाचल्यावर तरुण आहे ह्याचे परस्पेक्टीव्हच बदलले गेलेले माझे. अप्रतिम लिहिलेले सुनीलरावांनी.