✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अ
अत्रे यांनी
Mon, 03/27/2017 - 11:04  ·  लेख
लेख
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
94896 वाचन

💬 प्रतिसाद (592)

प्रतिक्रिया

क्रांतिकारक सल्ला आहे

गामा पैलवान
Mon, 04/03/2017 - 01:57 नवीन
श्रीगुरुजी, तुमचा हा सल्ला अतीव क्रांतिकारक आहे :
उदाहरणार्थ, ते मुंबईहून ब्रिटिश एअरवेज च्या विमानाने लंडनला जाऊन तिथून ब्रिटीश एअरवेजची लंडन-दिल्ली ही फ्लाईट घेऊन दिल्लीला येऊ शकतात.
यामुळे भरपूर वेळ वाचेल, नाहीका! पण याहून अधिक वेळ वाचवायचा असेल तर एअर इंडियाने बैलगाडीसेवा सुरू करावी म्हणतो मी. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गायकवाडांकडे भरपूर वेळ आहे.

श्रीगुरुजी
Mon, 04/03/2017 - 13:54 नवीन
गायकवाडांकडे भरपूर वेळ आहे. म्हणून तर दिल्लीला पोहोचल्यानंतर सुद्धा विमानात तासभर बसून होते. तिकीट फुकट असल्याने पैशाचीही चिंता नाही. उद्या एअर इंडियाने बैलगाडी सेवा सुरू केली तर हे त्यात बसून मुक्कामापर्यंत पोहोचल्यावर विचारतील की बैलगाडीला अरबी घोडे का जोडले नव्हते आणि ते कारण दाखवून धिंगाणा घालतील.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अरबी घोडे

गामा पैलवान
Mon, 04/03/2017 - 18:25 नवीन
श्रीगुरुजी, बरोबर आहे. जर जाहिरात करूनही ऐन वेळेस अरबी घोडे लावले नाहीत तर दाद मागणे क्रमप्राप्त आहे. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

'शिव'हट्ट धरला तर

आजानुकर्ण
Mon, 04/03/2017 - 21:45 नवीन
'शिव'हट्ट धरला तर
लोलियत. तुफान हसलो. गुरुजींचे या धाग्यावरचे प्रतिसाद आवडले.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तवलीन सिंह यांचा या विषयावर

श्रीगुरुजी
Sun, 04/02/2017 - 21:17 नवीन
तवलीन सिंह यांचा या विषयावर हा लेख वाचनीय आहे.

एक विधान मननीय आहे

गामा पैलवान
Mon, 04/03/2017 - 01:57 नवीन
श्रीगुरुजी, लेखातलं एक विधान मननीय आहे :
For Lok Sabha MPs, living in the tree-lined, salubrious Lutyens cocoon is especially dangerous because it takes them away from the problems that ordinary Indians face daily.
प्रा. गायकवाडांनी सर्वसामान्यांना तोड द्याव्या लागणाऱ्या समस्येचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

फक्त जनता वर्ग असणार्‍या

श्रीगुरुजी
Mon, 04/03/2017 - 13:57 नवीन
फक्त जनता वर्ग असणार्‍या विमानात व्यवसाय वर्ग का नाही हा प्रश्न फक्त गायकवाडांनाच पडला, इतरांना नाही. इतरांना सारासार विवेकबुद्धी, पाचपोच, मॅच्युरिटी असते. त्यामुळे त्यांना असले प्रश्न पडले नाहीत. गायकवाडांकडे त्याचा अभाव आहे.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वेळच्या वेळी माहिती पुरवणे

गामा पैलवान
Mon, 04/03/2017 - 18:26 नवीन
श्रीगुरुजी, वेळच्या वेळी माहिती पुरवणे का जमले नाही हा मूळ प्रश्न आहे. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एक वर्षापासून या उड्डाणावर

श्रीगुरुजी
Mon, 04/03/2017 - 20:58 नवीन
एक वर्षापासून या उड्डाणावर फक्त जनता वर्गाची आसने असलेलेच विमान आहे. गायकवाडा वर्षभर या विमानाने जात आहेत व याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

कधीही विमानप्रवास न केल्याने

पुंबा
Mon, 04/03/2017 - 11:59 नवीन
कधीही विमानप्रवास न केल्याने मला माहित नाही पण कोणी सांगेल का की नक्की जनता वर्ग आणि व्यवसाय वर्ग या दोहोंत काय फरक असतो? जनता वर्गात बसून प्रवास केल्याने गायकवाडांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं असतं? गापै,
प्रा. गायकवाडांनी सर्वसामान्यांना तोड द्याव्या लागणाऱ्या समस्येचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला.
जनता वर्गात प्रवास केल्याने जनतेच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजल्या नसत्या का? आता मारामारीवर माझे मतः कुणाही कर्मचार्‍याने कितीही उद्दामपणा केला तरीही त्याची विधीवत तक्रार करणे, चौकशीला सहकार्य करणे, तपासाचा पाठपुरावा करणे, लोकांना संघटीत करून अहिंसक प्रकारे निषेध प्रकट करणे हाच मार्ग संस्थागत बदल शाश्वत स्वरूपात घडवून आणू शकतात. मारामारी हा उपाय नाही आणि सर्वसामान्य लोकांसाठी तर नाहीच नाही.

काय ठरले मग..?

मोदक
Tue, 04/04/2017 - 10:18 नवीन
काय ठरले मग..? अशी प्रकरणे बॅट्समन आणि बॉलरमधील भांडणासारखी असतात. बॅट्समनने (पक्षी:एअर इंडीया) कितीही वेळा बॉलरला धुतले (पक्षी:उद्धवसेना) तरी जेंव्हा बॅट्समन दुसर्‍या बॉलरला किंवा अगदी रन आऊट जरी झाला तरी मूळ बॉलर "ठासून (विकेट) घेतली" म्हणून दंगा करण्यास मोकळा असतो. म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील.

म्हणजेच, आज ना उद्या एअर

श्रीगुरुजी
Tue, 04/04/2017 - 12:16 नवीन
म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील. त्या अग्रलेखात "वाघाला डिवचलं की तो पंजा मारणारच", "जो शिवसेनेला आडवा गेला, तो संपला", "एअर इंडियाच्या छाताडावर नाचून आम्ही बंदी मागे घ्यायला लावली" अशी टाळीखेचक वाक्ये असतील. बादवे, शूर मर्द मावळा गायकवाड लपून का बसला आहे? पानपताची लढाई जिंकून आल्यासारखा भीमपराक्रम गाजविल्यानंतर तर त्याचे कोपर्‍याकोपर्‍यावर सत्कार व्हायला हवेत.
↩ प्रतिसाद: मोदक

लपून का बसला आहे?

अत्रे
Tue, 04/04/2017 - 12:51 नवीन
लपून का बसला आहे?
बहुधा पेटाऱ्यात बसून एअर इंडिया च्या स्टोरेज कंपार्टमेन्टमधून प्रवास करायच्या योजना आखत असावेत. #आग्र्याहून-सुटका
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .

श्रीगुरुजी
Tue, 04/04/2017 - 12:57 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .
↩ प्रतिसाद: अत्रे

तुम्ही, गायकवाड कोठे आहेत

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 04/04/2017 - 20:59 नवीन
तुम्ही, गायकवाड कोठे आहेत याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला का? केला तर कसा केला? नाही केला तर मग हे वाक्य का टाकावे तुम्ही? पुण्याचे खासदार कुठे आहेत माहिती आहे/असते का तुम्हाला? किती तो आकस, कसलेही बिनबुडाचे मुद्दे पुरतात. खेद वाटतो.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गायकवाड कोठे का जाईनात,

श्रीगुरुजी
Tue, 04/04/2017 - 21:11 नवीन
गायकवाड कोठे का जाईनात, त्यांना आपल्या माजाची व गुन्ह्याची शिक्षा मिळतेय याचा आनंद होतोय. केलेल्या कृत्याबद्दल जराही खेद न बाळगता त्यांना त्याबद्दल अभिमान वाटतोय. अशा माणसाची विमान कंपन्यांनी योग्य ती नाकेबंदी केली आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

ते आनंद बिनंद सोडा हो, ते

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 04/04/2017 - 21:31 नवीन
ते आनंद बिनंद सोडा हो, ते सगळं वैयक्तीक आहे. काहीतरी मुजोरगिरी करून बंदी लादली म्हणजे नाकेबंदी झाली असे तुम्हाला वैयक्तिरित्या वाटते. बाकी तुम्हाला ते कुठे आहेत याची माहितीच नाही किंवा तशी माहिती घेण्याचा तुम्ही प्रयत्नही केला नाहीत तरीही वरून ते कुठे लपून बसले आहेत असे विचारने म्हणजे आकसच! चार दिवस का होईना लावली कि नाही बंदी म्हणून आनंद साजरा करणे ही जशी एक बाजू आहे तशी हि मुजोरगिरी कायदेशीररित्या उलथवल्यावर आनंद साजरा करणे दुसरी बाजू असू शकते का मान्य नसावे बरे? आणि मी म्हणतो शिवसेनेने न्यावेच हे तडीस कायदेशीररित्या. हा असला माजुरडेपणा परत होता काम नये. आपला आवडता पक्ष नाही म्हणून वाट्टेल त्याचे समर्थन करण्यात काय कौतुक?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गायकवाडांच्या मुजोरगिरीला

श्रीगुरुजी
Tue, 04/04/2017 - 22:57 नवीन
गायकवाडांच्या मुजोरगिरीला कायदेशीर चाप लावण्यात आला आहे. ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर येत नाहीत. आपण समोर आलो तर माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देताना तोंडाला फेस येईल एवढं त्यांना नक्की समजतं. गायकवाडांची कायदेशीर बाजू लंगडी आहे. त्यामुळे शिवसेना न्यायालयात जाऊ शकत नाही. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याची बिनशर्त क्षमा मागणे हा एकच मार्ग गायकवाडांसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी हे वाचा. https://www.google.co.in/amp/www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-mp-ravindra-gaikwad-assaults-air-india-employee-1445638/lite/
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 04/05/2017 - 12:25 नवीन
ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर येत नाहीत.
हे वरच विचारले ना मी! तुमच्याकडे कुठलीच माहिती नसताना हे असे वैयक्तिक कोणीही सहजच मांडू शकतो, काही विशेष नाही त्यात. माध्यमाच्या तोंडाला फेस आणणाऱ्या प्रश्नांचं काय कौतुक? त्यांचे प्रश्न किती गैरलागू आणि कुठल्या लेवलचे असतात हे वेगळे सांगावे लागेल काय? गायकवाडांना हार्ट अटॅक आला आहे म्हणून ते दिसत नाहीत अशी बातमी काहीही कारण नसताना चालवणारे लोक आहेत. असली बातमी बघून खासदारांच्या घरचेही हवालदिल झाले. त्यामुळे अशा लोकांना उत्तर द्यायला अव्हेलेबल नसणे म्हणजे लपून बसने असते होय? तसे तर देशाच्या सर्वोच्च नेत्याला पण बरेच प्रश्न विचारायचे असतात माध्यमांना, पण ते वेळ आणि उत्तरे देत नाहीत असा काही माध्यमांचा सूर आहे, तो खरा मानून तेही लपून बसले आहेत असे म्हणता येऊ शकते का? शिवसेनेची लंगडी बाजू असण्याचा काय संबंध? शिवसेनेने खासदार वि. कंपनी ह्या भांडणात न पडणे कौतुकास्पदच आहे की. शिवसेना मध्ये येतेय ती कायद्यातील छोट्या तरतुदींचा फायदा घेऊन असा बॅन लावणे आणि तोही खासदारासारख्या लोकप्रतिनिधीला हे अजिबात पटण्यासारखे नाही म्हणून त्यांना लोकसभेतून जे करायचे ते करण्यासाठी. खासदारांनी वैयक्तिकरित्या केस दाखल केलीच आहे. कोर्ट दोन्ही बाजुंना योग्य तो न्याय देईलच. बाकी तुमच्या माहितीसाठी खासदार एक दोन दिवसात आपली बाजू लोकसभेतच मांडतील असे दिसतेय.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

याच्यात वैयक्तिक काहीच नाही

श्रीगुरुजी
Wed, 04/05/2017 - 14:50 नवीन
याच्यात वैयक्तिक काहीच नाही हो. सर्व गोष्टी सार्वजनिक आहेत. जिथून तुम्हाला गायकवाडांचं सर्व प्रकरण समजलं तिथूनच इतरांनाही इतर गोष्टी समजतात. गायकवाड माध्यमांना टाळण्यासाठीच लपून आहेत. मी याआधीच्या प्रतिसादात एका वॄत्ताची लिंक दिली आहे ती वाचा. शिवसेनेची बाजू लंगडीच आहे. म्हणून तर गायकवाडांच्या मारहाणीचं उघड समर्थन करता येत नाहीय्ये. अन्यथा इतक्या दिवसात मुंबई किंवा पुणे विमानतळावर खळखट्याक झालं असतं. शिवसेना या भांडणात पडू शकत नाही कारण इतक्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं अवघड आहे. तसा प्रयत्न ५-६ खासदारांनी लोकसभेच्या वेल मध्ये घुसून केला होता. परंतु सुमित्रा महाजनांनी खडसावल्यावर गुपचुप माघारी येऊन आपल्या आसनावर जाऊन बसले. गायकवाडांना विमानप्रवासाला बंदी घालणे योग्यच आहे. किंबहुना ही अत्यंत सौम्य शिक्षा आहे. असल्या खासदारांना सक्तमजुरीची शिक्षा योग्य ठरेल.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

गायकवाड माध्यमांना

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 04/05/2017 - 15:40 नवीन
गायकवाड माध्यमांना टाळण्यासाठीच लपून आहेत.
वरचा प्रतिसाद नीट वाचा.
म्हणून तर गायकवाडांच्या मारहाणीचं उघड समर्थन करता येत नाहीय्ये.
म्हणजे सगळ्यांनी (शिवसेनेसकट) या मारहाणीचा समर्थन करावं अशी अपेक्षा होती कि काय? अहो मारहाणीचा समर्थन करण्याचा प्रश्नच कुठे येतो, तो गुन्हा आहे आणि त्यावर केस चालू आहे. तसाच गुन्हा समोरच्या बाजूवर हि दाखल आहे. कोर्ट ठरवेल ना पुढचं. बाकी ते वेलमध्ये घुसणं, अध्यक्ष्यानी खडसावण वगैरे लोकसभेतल्या रोजच्या गोष्टी आहेत. दहा वर्ष भाजप तेच करत होते आणि त्याआधी इतर विरोधीही तेच करत होते, मग मुद्दा कसलाही असो. खासदारांना सक्तमजुरी व्हावी कि अजून काही हे कोर्ट ठरवतं आणि सुदैवाने कोर्ट कुणाच्या आकसयुक्त भावना लक्षात घेत नाही. त्या तशा घेतल्या गेल्या असत्या तर आकस असणाऱ्या लोकांनी सक्तमजुरीची नाही तर या प्रकरणात फाशीचीही मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिवसेना आपल्या प्रत्येक

श्रीगुरुजी
Wed, 04/05/2017 - 19:47 नवीन
शिवसेना आपल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करते. पूर्वी बाळासाहेब ठाकरे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करण्यासाठी संभाजीनगरला गेले असताता एका स्थानिक उर्दू दैनिकाने "बाल ठाकरेका औरंगाबादमे ठंडा स्वागत" अशी बातमी दिली होती. त्यामुळे संतापून दुसर्‍या दिवशी पत्रकार परीषदेत शूर शिवसैनिकांनी त्या वृत्तपत्राच्या बातमीदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून (त्याच्या गुप्तांगावर सुद्धा लाथा मारल्या होत्या) जबर जखमी केले होते. त्या मारहाणीचे बाळासाहेबांसकट सर्वांनी समर्थन केले होते. या प्रकरणात संपूर्ण चूक गायकवाडांचीच असल्याने शिवसेनेला मारहाणीचे समर्थन करणे अशक्य झाले आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

विषयांतर. अर्थात तुमच्यासाठी

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 04/05/2017 - 20:34 नवीन
विषयांतर. अर्थात तुमच्यासाठी मुळातच विषय शिवसेना असल्याने नसेलही म्हणा विषयांतर!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उस्मानाबादेत अजून बंद चालू

अनुप ढेरे
Tue, 04/04/2017 - 10:26 नवीन
उस्मानाबादेत अजून बंद चालू आहे का संपला?

तो बंद कधीच संपला. सध्या

श्रीगुरुजी
Tue, 04/04/2017 - 13:05 नवीन
तो बंद कधीच संपला. सध्या गायकवाडांचे सार्वजनिक दर्शन बंद आहे आणि त्यांचा सर्व वर्गातील विमानप्रवास बंद आहे.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

उस्मानाबाद बंद...

देशपांडेमामा
Tue, 04/04/2017 - 10:57 नवीन
वरुन आठवले आमच्या भागातली अपेयपानाची दुकाने बंद झाली आहेत .. विकांताची सोय कशी करणार ह्या विचारात आहे देश

काय ठरलं ते सांगतो

गामा पैलवान
Tue, 04/04/2017 - 21:26 नवीन
मोदक,
काय ठरले मग..?
यासंबंधी माझं आकलन सांगतो. प्रा. गायकवाडांची प्रमुख चूक म्हणजे त्यांची शक्ती कमी पडली. सध्यातरी एअर इंडिया गायकवाडांहून बलिष्ठ दिसते आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण करू नये अशा मताचा मी आहे. मात्र यापुढे जर कोणावर अशी वेळ आली तर एअर इंडियाच्या संदर्भात आपले बलाबल जाणून असणे अत्यंत जरुरीचे आहे. हे बलाबल कसे जोखावे ते मला थेटपणे ठाऊक नाही. मात्र अंदाज लावता येतो. जर एखाद्या मंत्र्याला थोबाडून काढायची आपली औकात असेल तर एअर इंडियाचे बळ आपल्याहून कमी आहे असे खुशाल धरून चालावे. हा माझा केवळ अंदाज आहे. माझा सल्ला स्वत:च्या जबाबदारीवर वापरावा. आ.न., -गा.पै.

मी माझे आकलन सांगू का..?

मोदक
Wed, 04/05/2017 - 00:41 नवीन
मी माझे आकलन सांगू का..? गायकवाड किती वेळा पुणे-दिल्ली करतात आणि किती वेळा मुंबई-दिल्ली करतात ते पाहिले पाहिजे. कारण त्या फ्लाईट अटेंडंटचा चेहरा लपवलेला एक व्हिडीओ आहे ज्यात ती सांगत आहे की "फर्स्ट क्लास शीटा पुणे-दिल्ली रूटवर नसतात" त्यामुळे असे असेलच तर हा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आलेला नाही. (मला तो व्हिडीओ नंतर सापडलेला नाही - मी गंभीरपणे शोधलेलाही नाही, कोणी शोधून देणार असेल तर आगाऊ धन्यवाद देतो) गायकवाडांनी मुंबई-दिल्ली सारखी पुणे-दिल्ली प्रवासाची अपेक्षा केली असेल. पुणे-दिल्ली फर्स्ट क्लासच्या शीटा नसलेले विमान आहे हे त्यांना आधी कळवले असेल तर त्यातून जाणे आणि नंतर CMD ला बोलवा अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे यात कोणताही संदेह नाही. विमान रोखून धरणे तर निव्वळ वेडेपणा आहे. एक विमान असे विनाकारण अडकून राहणे - ते पण फालतू कारणांमुळे, याचे किती काय काय प्रमाणात परिणाम होतात आणि किती पटीत नुकसान होते याची माहिती नेते साहेबांना असणे अपेक्षित असले तरी ती माहिती असेलच असे नाही. त्यातून ते पडले खळ्ळ-खट्ट्याक परंपरेतले. त्यामुळे "ठासून सांगण्याच्या नादात" नेहमीप्रमाणे राडा केला गेला. यात सुकुमार यांच्या वागणुकीची भर पडली असावी. (सुकुमार यांनी उद्धटपणा केला आहे असे त्यांचीच सहकारी म्हणत आहे) गायकवाडांनी या प्रकरणाला खूपच हलके घेत, "२५ वेळा मारले" "स्लीपरने मारले" वगैरे बढाया मारल्या त्यामुळे हे प्रकरण असेच पेटत राहिले आहे, त्यात सेनेचे विद्वान टीव्हीवर चर्चेमध्ये जाऊन "निदान एअर होस्टेसला तर मारले नाही" असे तारे तोडत आहेत. (देव त्यांचे भले करो) या भानगडीत सेनेचे नाक चेचण्याची संधी सहज न सोडणार्‍या भाजपाकडे करण्यासारखे फारसे शिल्लक राहिले नाहीये. अर्थात एअर इंडीयाला / स्टाफला भाजपाने मदत केली तरी आता त्याला सेनाविरोधाची झालर नसेल. उलट भाजपा पडद्याआडून सुत्रे हलवत असेल. यात १००% बरोबर बाजू कुणाचीच नाही. गायकवाडांनी अडेलतट्टूपणा करून सुरूवात केली आणि त्यात त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे आणखी गाळात रूतले आहेत व सुकुमार यांचे उद्धट वागणे साईडलाईन झाले आहे. ..आता तर काय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आई भवानी त्यांना आणखी संकटे सोसण्याचे बळ देवो. एकूण काय... म्हशीला औषधाचा गोळा नळीतून देताना नेमकी म्हशीने दुसरीकडून (ठासून) फुंकर मारलेली आहे. =))
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

म्हशीला औषधाचा गोळा...

अर्धवटराव
Wed, 04/05/2017 - 06:14 नवीन
=)) =)) =))
↩ प्रतिसाद: मोदक

काही निरीक्षणे

गामा पैलवान
Wed, 04/05/2017 - 11:57 नवीन
मोदक, तुमचं मत सांगितल्याबद्दल धन्यवाद! :-) तुम्हाला हवं असलेलं चेहरा धूसर केलेलं चलचित्र सापडत नाहीये. मात्र संबंधित बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-dont-think-he-wanted-to-throw-sukumar-down-the-ladder-he-was-trying-to-build-pressure-on-senior-officials-air-hostess/articleshow/57842144.cms प्रा. गायकवाडांचा आक्षेप व्यवसायवर्ग का नव्हता असा नसून त्याची आगाऊ माहिती का दिली गेली नाही असा आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की प्रा. गायकवाडांनी तक्रारपुस्तिकेत लिहिलेली तक्रार नेमकी काय आहे ते माध्यमं का उघड करंत नाहीयेत? शिवाय चेहरा धूसर केलेलं चलचित्रही हटवण्यात असेलं दिसतंय. बहुधा गायकवाडांच्या बदनामीमध्ये जास्त रस आहेसं दिसतंय. भरीस भर म्हणून गायकवाडांवर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल झालाय. पण तरीही त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला नाहीये. एकंदरीत गोंधळ वाढतोय. माध्यमांचं वर्तन (नेहमीप्रमाणे) शंकास्पद आहेच. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: मोदक

_____________________________

श्रीगुरुजी
Wed, 04/05/2017 - 14:56 नवीन
Image removed. ________________________________________________________________ हे पहा खासदारांची मुजोरी मोडून काढून त्यांना थेट शिंगावर घेणारे एअर इंडियाचे प्रमुख अश्वानी लोहानी. २०१५ मध्ये त्यांनी तिरूपती विमानतळावर विमानतळ व्यवस्थापकाच्या कानाखाली मारणार्‍या काँग्रेसच्या खासदार मिथुन रेड्डींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला लावली होती. गायकवाडांच्या प्रकरणात सुद्धा ते खासदारांच्या गुंडगिरीला न घाबरता आपल्या कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे आहेत.

करेक्शन पाहिजे वर -

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 04/05/2017 - 15:44 नवीन
करेक्शन पाहिजे वर - गायकवाडांच्या प्रकरणात सुद्धा ते खासदारांच्या गुंडगिरीला न घाबरता आपल्या कर्मचार्‍यांच्या उद्दामपणाच्या पाठीशी उभे आहेत. इथून पुढेही त्यांनी हाच पॅटर्न लागू करावा का? दोनच पर्याय ठेवायचे का? - १. कोणी तक्रार केली कि अरेरावी करायची, शिवीगाळ करायची, मग त्याचे पर्यवसन भांडणात झाले कि मग बंदी घालायची. किंवा २. कोणी तक्रार केली कि खोपच्यात घ्यायचा आणि कोणालाही ना कळू देता तोंड फुटेपर्यंत मारायचा. सेवा सुधारण्यात लक्ष द्यायला नको का?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कर्मचार्‍याचा कसला उद्दामपणा?

श्रीगुरुजी
Wed, 04/05/2017 - 19:43 नवीन
कर्मचार्‍याचा कसला उद्दामपणा? एक माणूस मूर्खपणाची मागणी करत विमानातून उतरायला नकार देऊन विमानात बसून राहतो व इतरांचा खोळंबा करतो. त्याला उतरायला सांगितल्यावर कर्मचार्‍याला चपलेने मारहाण करून विमानातून ढकलून द्यायचा प्रयत्न करतो. नंतर कॅमेर्‍यासमोर अभिमानाने आपले कर्तृत्व सांगतो आणि ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे अशा फुशारक्या मारतो. त्याचे वागणे योग्य आणि कर्मचारी उद्दाम!!!! सेवा सुधारण्यात जरूर लक्ष द्यायला हवे. परंतु व्यवसाय वर्गाची सुविधा नसलेल्या विमानात व्यवसाय वर्गाची मागणी करणे म्हणजे शुद्ध शाकाहारी भोजनालयात मटण थाळी ची सेवा का नाही अशी तक्रार करून वेटरला बदडण्यासारखे आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला हवं ते वाक्य बरोबर

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 04/05/2017 - 20:44 नवीन
तुम्हाला हवं ते वाक्य बरोबर गाळता! कर्मचाऱ्याने उतरायला सांगितल्यावर नाही, कर्मचाऱ्याने अरेरावी करून उद्दामपणाने काहीतरी बोलल्याने "मारा एक" असे आहे ते. बाकी शुद्ध शाकाहारी हॉटेलने मटन थाळी चे कुपन विकायचे कशाला मग? मग विचारल्यावर चलंय तुला वेज खायचे तर खा नाहीतर हो बाहेर, उतरला नाहीस आत नेऊन तोंड फुटेपर्यंत मारेन म्हटल्यावर भांडण होणार नाही का? आणि हो हॉटेलचा विषय काढलाच आहे तर, असं एका हॉटेलच्या वेटरशी भांडण झाल्यावर शहरातल्या सगळ्याच हॉटेल्सनी बंदी घालणं योग्य वाटतं ना?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इथे फक्त शाकाहारी जेवण मिळत

श्रीगुरुजी
Wed, 04/05/2017 - 22:38 नवीन
इथे फक्त शाकाहारी जेवण मिळत असताना व मटणथाळी पलीकडच्या गल्लीतल्या हाटेलात मिळत असताना, इथे येउन शाकाहारी भोजन चेपल्यानंतर कांगावा करण्यात काय अर्थ आहे? अशा गुंडावर शहरातल्या सगळ्याच हॉटेल्सनी बंदी घालणं योग्यच आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

गायकवाडांनी घेतलेल्या

श्रीगुरुजी
Wed, 04/05/2017 - 19:38 नवीन
गायकवाडांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हा वाद आता मिटला आहे. गायकवाडांनी स्वाभिमान दाखवून आता स्वतःच एअर इंडियावर बहिष्कार टाकला आहे. यातून एअर इंडियाला चांगलाच धडा मिळेल. इतर आमदार खासदारांनी देखील गायकवाडांचे अनुकरण करावे.

प्रत्येक खासदाराला एक इमान

अभ्या..
Wed, 04/05/2017 - 22:38 नवीन
प्रत्येक खासदाराला एक इमान आणि एक हेलीकेप्टर साठी सरकारी अनुदान द्यायला पैजे. उड़ा म्हणावे स्वखर्चाने. . बाकी जाउद्या गुरूजी आता, त्येन्चे ते उडले उगी तुम्ही लिबन्ध लिहित बसलाव. तेवढया शाईत एक विमान रंगले असते आख्खे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारी प्रतिसाद

उपेक्षित
गुरुवार, 04/06/2017 - 15:12 नवीन
भारी प्रतिसाद
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाय ओ! कुत्र्याचे शेपूट वाकडे

अत्रे
गुरुवार, 04/06/2017 - 06:49 नवीन
नाय ओ! कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच! शिवसेनेचा संसदेत गोंधळ घालण्याचा इशारा
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कुत्र्याचा अपमान केल्याचा

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 08:33 नवीन
कुत्र्याचा अपमान केल्याचा तीव्र निषेध.
↩ प्रतिसाद: अत्रे

अपेक्षेप्रमाणे शिवसेना

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 15:10 नवीन
अपेक्षेप्रमाणे शिवसेना खासदारांनी लोकसभेत यथेच्छ धुडगूस घातला. इतके दिवस शांत असलेल्या अनंत गीतेंनी तर कहरच केला. ते चक्क विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले व त्यांची कॉलर धरायचा प्रयत्न केला असे सर्व वाहिन्यांवर (मराठी सुद्धा) सांगत होते. मराठी वृत्तपत्रांच्या आंतरजाल आवृत्तीतही असेच सांगितले आहे. या गीतेंना मंत्रीमंडळातून हाकलून लावावे अशी इच्छा आहे. मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. मुंबई विमानतळ यांच्या तीर्थरूपांचा असावा बहुतेक. आपल्या पक्षाच्या खासदाराच्या गुंडगिरीबद्दल व माजाबद्दल एक कणभरही शब्द नाही, खंत नाही आणि इतरांनाच धमक्या देताहेत. गायकवाडांनी तर एकापाठोपाठ एक षटकार मारले. म्हणे मी शिक्षक असून विनम्र स्वभावाचा आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला आपण २५ वेळा चपलेने मारले, भविष्यातही असेच मारू, ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नसून शिवसेनेचा आहे, मी कशाबद्दल माफी मागू अशी उन्मत्त मुक्ताफळे यांनी उधळलेली सर्वांनी पाहिलेली आहेत. ही यांची विनम्रता! म्हणे त्या कर्मचार्‍याने नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला म्हणून मी त्याला मारले. मोदींबद्दल एवढा आदर होता तर उधोजींनी मोदींचा उल्लेख अफझलखान असा करून त्यांचा बाप काढला होता. त्यावेळी उधोजींना यांनी किती चपला मारल्या? अर्थात एका थर्डक्लास पक्षाच्या थर्डक्लास खासदाराकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही. असले गावठी आणि उन्मत्त खासदार मराठी आहेत याची लाज वाटते.
↩ प्रतिसाद: अत्रे

कमाल आहे

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 04/06/2017 - 15:59 नवीन
ते चक्क विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले व त्यांची कॉलर धरायचा प्रयत्न केला असे सर्व वाहिन्यांवर (मराठी सुद्धा) सांगत होते.
उत्तर प्रदेश विधानसभेत मागे माईक काढून एकमेकांवर फेकणे, खुर्च्या एकमेकांवर फेकणे असे प्रकार झाले होते. तसा प्रकार लोकसभेत झाला नाही आणि नुसते मंत्र्यांच्या अंगावर धावून जाण्यावरच थांबले ही काय कमी महत्वाची गोष्ट आहे का? :(
मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.
गायकवाडांवरची बंदी मागे घेतली नाही तर मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्‍यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी. एका शिवसेना खासदाराला उडायला बंदी घातली म्हणून या घटनेशी काहीही संबंध नसलेल्या लाखो प्रवाशांना वेठीस धरणे समर्थनीय आहे का? बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एअर इंडियाच्या एका कर्मचार्

हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 04/06/2017 - 17:17 नवीन
एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्‍यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी.
नाहींचाये ते बरोबर आणि हेच तर सुरुवातीपासून सांगणे आहेना? आता शिवसेना म्हणाली म्हणून अशा बंदीतली चुकीची बाजू समोर आली का?
बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!
बाकी हे मात्र अत्यंत अनपेक्षित आणि अकारण वाटलं! ह्या हिशेबाने साधारण सगळी माध्यमे आणि वृत्तपत्रे बंदच व्हायला हवी होती, नाही का?
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

या बातमीत लिहिल्याप्रमाणे,

प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/06/2017 - 16:25 नवीन
या बातमीत लिहिल्याप्रमाणे, शिवसेनेच्या गायकवाड नावाच्या चप्पलमार खासदाराचा, उंदीर झालेला दिसतोय, "एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं." २५ वेळा चपलेने मारले असे कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारणार्‍या ह्या खासदारांने संसदेत तर सरळ-सरळ घूमजाव केले आहे. सध्याच्या शिवसेनेची हि सवयच झालेली दिसतेय, कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारायला एक बोलायचे व प्रकरण अंगाशी आल्यावर शेपुट घालायचे, पुर्वी बाळासाहेब त्यांनी मांडलेल्या विधानावर ठाम तरी असत पण सध्या फक्त बोलबच्चन लोकच उरलेत शिवसेनेत.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

<<<असले गावठी आणि उन्मत्त

विशुमित
गुरुवार, 04/06/2017 - 16:25 नवीन
<<<असले गावठी आणि उन्मत्त खासदार मराठी आहेत याची लाज वाटते.>>> ==>> त्या शिवसेनेच्या खासदारांचे जे होयचे ते होवो, मला त्याचे काय देणे घेणे नाही पण तुम्ही "गावठी" शब्द वापरून गाव आणि शहर यांच्यातल्या अमंगळ भेदभावाला खतपाणी घालत आपली वैचारिक दिवाळखरी मात्र सिद्ध केलीत. शहरी लोकांनी किती ही सभ्यपणाचा आव आणला तरी दुसऱ्यांना नीच दाखवण्यात कधीच कसर सोडत नाहीत. काही अपवाद सोडून. तसे ही शहरात गुंठा आणि फ्लॅट घेऊन राहणारे स्वतःला शहरी समजणारे कधी काळचे गावाकडचे उपरेच (गावठी?) आहेत हे सोयीस्करपणे विसरतात. असो...
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिवसेनेचे खासदार एकत्र नाहीत

हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 04/06/2017 - 17:00 नवीन
शिवसेनेचे खासदार एकत्र नाहीत आणि या गोष्टींवर गायकवाडांसोबत नाहीत हि तुमची अपेक्षा फोल ठरल्याबद्ल खेद वाटला. बाकी शिवसेनेच्या खासदारांना आणि मंत्र्यांना हाकलून द्यावा हा तुमचा आणि भाजपचा मत बर्राबर जुळता :):)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मातोश्रीवरून दट्टया बसलेला

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 17:29 नवीन
मातोश्रीवरून दट्टया बसलेला दिसतोय, म्हणून तर आता गीते आणि इतर काही जणांनी तोंड उघडलेलं दिसतंय. अर्थात सेना खासदार संसदेत दांडगाई करून कांगावा करणार ही अपेक्षा अजिबात फोल ठरली नाही. ही बंदी तूर्तास तरी उठविली जाणार नाही असे एअर इंडियाने निर्णय घेतल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवित आहेत. एअर इंडियाचे अभिनंदन!
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हाहाहा! चित भी मेरी पट भी

हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 04/06/2017 - 21:14 नवीन
हाहाहा! चित भी मेरी पट भी मेरी! बाकी तुम्ही कुठले चॅनेल बघता माहित नाही. पण आताची ब्रेकिंग न्युज अशी दाखवत आहेत की जर हि बंदी १० तारखेच्या एनडीएच्या मिटिंग आधी उठवली नाही तर शिवसेना या मीटिंगमध्ये सहभागी होणार नाही या भूमिकेनंतर बंदी उठवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बंदी अजून उठविलेली नाही.

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 23:17 नवीन
बंदी अजून उठविलेली नाही. मांजर उंदराला जसे खेळविते, तसा भाजप शिवसेनेला खेळवित आहे. संजय राउतांनी भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या कितीही फुसक्या धमक्या दिल्या, तरी भाजप त्यांना कणभरही किंमत देणार नाही.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

च्यामारी ही सगळी भाजपाची

अभ्या..
गुरुवार, 04/06/2017 - 23:30 नवीन
च्यामारी ही सगळी भाजपाची प्लान्ड गेम आहे होय? तरिच म्हणले....... (संपादित), लगेच कशी एक्टिव्हेट झाली. चालु दया चालु दया......
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा