एक आटपाट शहर होत, त्या आटपाट शहरात किनई एक 'किनी' रहात असे. त्याच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचं नाव होत, 'धरा'. एक दिवस 'किनी' मोठा झाला, नौकरीसुद्धा करु लागला. तसं 'धरा'नी त्याला प्रोपोज केलं; पण त्यावेळी 'किनी'ला आवडली होती 'मिनी'.
'किनी'ने 'मिनी'ला प्रोपोज केले, 'मिनी' हो म्हणाली, पण त्या आधी 'मिनी'ने विचारलेच होते तुझ्या आधीच्या मैत्रिणी कोण ?
'किनी'ने 'मिनी'ची 'धरा'शी ओळख करुन दिली.
'मिनी' किनई 'धरा'ला भेटली तिला उगीउगी सॉरी म्हणाली, 'धरा'ने लग्नात गीफ्ट काय देऊ म्हणून 'मिनी'ला विचारले; 'मिनी' 'धरा'ला म्हणाली 'किनी'ने विचारण्यापुर्वी मलाही अजून वेगळे कुणी आवडत असे पण त्यालाही माझी दुसरी मैत्रिण आवडली, माझी मैत्रिण मला त्याचा 'चमचा' म्हणत असे आणि त्यालाही जेवणास छोटे चमचे आवडत म्हणून किनई मी त्यांना लग्नात 'मिनी' चमच्यांचा सेट भेट केला. आणि जेवताना घेतलेला 'मिनी'चमचा टाकू नको असे सांगितले.
हि गोष्ट ऐकुन 'धरा'नेही 'किनी'-'मिनी' च्या लग्नात चमच्याचा सेट दिला, 'चमचात धरलेला घास सांडू नकोस' असे बजावले. तेव्हापासून 'किनी'चे जेवणात लक्ष नसलेकी 'मिनी' 'किनी'ला अहो 'धरा' चमचा नीट 'धरा' अशी थट्टा करते. आणि 'किनी'-'मिनी' एकमेकांसोबत संसारात सुखाने नांदतात. हि कथा ऐकलेले सगळे 'किनी' त्यांनी 'धर'लेले 'मिनी'चमचे सांडत नाहीत ! अशी ही 'किनी'ने 'मिनी' चमचास 'धर'ण्याची कथेची अनुभूती येऊन वाचकांघरी सफळ संपुर्ण होवो.
*( अंशिक तात्कालीक प्रेरणा 'या कवितेमुळे' आणि मागील पिढीतील माहित असलेल्या एका सत्यकथेतून )
याद्या
1730
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा किनी मिनीबॉम्ब झालाय.
वा वा ...किती सोपा करुन सांगितलंय !!
.
किनी मस्त मिनी कथा
चमचा गोटी
आम्ही आपलं शिंपल शिंपल लिवल,
In reply to चमचा गोटी by अनन्त्_यात्री