विजयासाठी - रातीस खेळ चाले ....
रातीस खेळ चाले ...
निवडणुकीचा रणधुमाळीत जिल्हा सांगली, शिराळा तालुक्यातील नाटोली परिसरात विरोधकांच्या पाडावासाठी भानामती! हे शीर्षक असलेले बातमीपत्र दिगंबर शिंदे यांनी सांगलीहून पाठवले होते. (लोकसत्ता शनिवार. दि 25 फेब्रूवारी 2017, पुणे आवृत्ती, पान 8 - राज्यकारण) या बातमीत जणू काही किराणाभुसारी मालाच्या यादीची आठवण व्हावी अशी लांबलचक मागणी वाचून रंजन झाले... खिळे ( 6 इंची नग) ९, लिंबू (आकार मोठा नग) २१, टाचण्या (१इंची?) नग २१, रंगीत बाटल्या ७ (श्रमपरिहारासाठी?), बिनशेडीचे नारळ नग ६, साड़ी? काळे कापड (२मीटर) ओटीचे साहित्य, शिजवलेला भात, कणकेचे पीठ ठेवायला दुर्डी, नावे असलेल्या चिठ्ठीच्या काळ्या बाहुल्या (नग) ६ (सर्व कंस माझे) अशी साज सामानाची ही तयारी नाडोल कांदे येथील म(म्ह)सोबा देवळाजवळ आडरानात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे! याची गरमागरम चर्चा अग्रभागी.... अशी बातमी .... हे सर्व कोणाच्या विजयासाठी (का कोणास पराभूत करायला) केले गेले होते ते जिल्हा परिषदेच्या मंगळवारी मतदानाचा निकाल लागल्यानंतर समजून आले असेल. भानामतीची युक्ती खरोखर काही पदरात पाडून गेली का? याची माहिती, शिवाय ज्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काळ्या बाहुल्यांना होत्या ती नावे न कळल्याने विरस झाला. डॉ दाभोळकरांच्या खुन्याला शोधायला पोलिस प्रमुखांनी भानामतीचा प्रयोग करून पाहिला होता असे वाचल्याचे स्मरते. भानामती प्रकार नेहमीच चक्रावून टाकतो. सहज मूड आला आहे म्हणून हा भानामतीवरील धागा सादर. काहींना आधीच्या धाग्यांना उपसून काढायची सुरसुरी आली तर नवल नाही!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हॅतिच्या !
तो खेळ खेळायला
डॉ दाभोळकरांच्या खुन्याला
काय हे काका, ओक काकांना
हो ना! मिपावरचा सरकता पट
प्लॅंचेट कि भानामती?
पुराणांतली वानगी ....
माझ्या धाग्यांची उजळणी...
माझ्या धाग्यांची उजळणी...
माझ्या धाग्यांची उजळणी...
माझ्या धाग्यांची उजळणी...
बातमीदार शिंदे दिगंबर