✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

म
मोदक यांनी
Wed, 02/01/2017 - 15:22  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी. जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी. ****************** सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते. नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..! देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;) सायकल नसणार्‍यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले. मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले. १) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी. २) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल. ३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल. ४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल. ५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन. तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो. ६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक. ******************** हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या. टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले. त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे. चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्‍या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत. **************************** पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत. मासिक आव्हाने १. एक सलग फेरी ५० किमी (१०० किमी) २. एक सलग फेरी १०० किमी (कितीही) ३. एकूण अंतर ५०० किमी ४. एकूण अंतर १,००० किमी (*) ५. एकूण चढण ३,००० मी ६. एकूण चढण ७,००० मी (*) वार्षिक आव्हाने १. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे २. १०० किमी दररोज असा १ आठवडा ३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना) ४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)⁠⁠⁠⁠ ५. किमान ५ घाट (*) **************************** सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे. **************************** @@@@@@@@@@@@@@@@@@@@ येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे. १) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी. २) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी. ३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी. ४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी. ५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी. @@@@@@@@@@@@@@@@@@@@
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
38331 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

मी आज केलेला व्यायाम

अजित पाटील
गुरुवार, 02/09/2017 - 11:48 नवीन
खुपच छान उपक्रम आहे !!
  • Log in or register to post comments

आमच्या ग्रुपनेही चांगली

पिलीयन रायडर
Sat, 02/11/2017 - 08:48 नवीन
आमच्या ग्रुपनेही चांगली कामगिरी केली आहे. सर्वांना नाही जमलं चॅलेंज पुर्ण करायला. पण हरकत नाही. सविता००१ - ५० किमी ५० सुन (ही फेब महिन्यात एकटी १५० किमी आरामात करेल!) सामान्य वाचक - ४० किमी २४ सुन (शिवाय स्ट्रेन्थ ट्रेनिंग वेगळं) पिरा - ३५ किमी (हा खरा लिंबुटिंबु मेंबर!) इशा - किमान १५०-२०० सुन तरी नक्की असतील. ती नक्की आकडा कळवतेय. (ही ४-५ जणींच्या वतीने सुन घालते!) बाकी मेंबर काही ना काही कारणाने पुर्ण नाही करु शकले. स्रुजाला पायाला लागलं पण पहिले चार दिवस तिनेही २० किमी केलेत. पण सध्या धरत नाही आहोत, त्यामुळे किमी मध्ये आमच्या ग्रुपने - १२५ किमी केले आहेत! आणि सोबत शेकड्याने सुर्यनमस्कार! (फायनल आकडा येतोचे..) पण आता हे थांबणार नाही इथेच. एक मी सोडले तर ग्रुपचे सर्व मेंबर इतका व्यायाम रोजच करत असतात. त्यामुळे त्याचे महिन्याचे आकडे फार भारी असतील. हे चॅलेंज माझ्या सारख्यांसाठी फार आवश्यक होतं. व्यायामाला टांग मारण्याची हुक्की रोज येत होती पण ग्रुपमुळे केलं. संपुर्ण महिनाभर हे कंटिन्यु करण्याचा पुर्ण प्रयत्न सगळ्याच करु. :)
  • Log in or register to post comments

इशा - २३७ सुर्यनमस्कार!!!!

पिलीयन रायडर
Sat, 02/11/2017 - 09:01 नवीन
इशा - २३७ सुर्यनमस्कार!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिराताई & ग्रुप - जोरदार चालु

अरिंजय
Sat, 02/11/2017 - 20:03 नवीन
पिराताई & ग्रुप - जोरदार चालु आहे. हे असेच चालू राहू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

झक्क्कास हो... अभिनंदन.

मोदक
Sat, 02/11/2017 - 20:42 नवीन
झक्क्कास हो... अभिनंदन. आणखी मोठी टीम बनवा.. नवीन नवीन चॅलेंज ठरवून पार करा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

1+

बाबा योगिराज
Tue, 02/14/2017 - 14:52 नवीन
अभिनंदन पिरा तै, उपक्रम अगदी व्यवस्थित चालू आहे. मला वाटत कि तुम्ही लिंबुटिंबु हे नाव बदलायला हरकत नाही. तुमच्या उपक्रमास भंरपूर शुभेच्छा. बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझा छोटा अपडेट

माझीही शॅम्पेन
Mon, 02/13/2017 - 12:26 नवीन
माझा छोटा अपडेट ह्या मौसमातील माझी शेवटची हाफ मॅरेथॉन , चढ उतरांनी भरलेली ठाणे हिरानंदानी हाफ मॅरेथॉन 2 तास आणि 35 मिनिटात पूर्ण केली , मज्जा आली अस सहज अजुन 4/5 किमी पळू शकलो असतो
  • Log in or register to post comments

तुम्ही फुल्ल मॅरेथॉन पण

मोदक
Mon, 02/13/2017 - 13:34 नवीन
तुम्ही फुल्ल मॅरेथॉन पण आरामात कराल हो. __/\__ हाभिणंदण..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अभिनंदन हो दादा

अरिंजय
Mon, 02/13/2017 - 18:26 नवीन
अभिनंदन हो दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

वा!!

डॉ श्रीहास
Tue, 02/14/2017 - 09:40 नवीन
अभिनंदन ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अभिनंदन

इरसाल कार्टं
Wed, 02/22/2017 - 10:24 नवीन
आता मलाही हाफ मॅरेथॉन ची तयारी करावीशी वाटायला लागलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन

अनिल मोरे
Mon, 02/13/2017 - 12:50 नवीन
काल मी हिरानंदानी ठाणे हाफ मॅरेथॉन १ तास आणि ४७ मिनिटात पूर्ण केली
  • Log in or register to post comments

झक्कास..!! अभिनंदन हो..!!

मोदक
Mon, 02/13/2017 - 13:32 नवीन
झक्कास..!! अभिनंदन हो..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

जबरदस्त मोरे साहेब __/\__

माझीही शॅम्पेन
Mon, 02/13/2017 - 15:46 नवीन
जबरदस्त मोरे साहेब __/\__ त्रिवार अभिनंदनं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

वॉव टायमिंग आहे.. टाळ्या..

बाळ सप्रे
Mon, 02/13/2017 - 16:39 नवीन
वॉव टायमिंग आहे.. टाळ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

+१११

sagarpdy
Mon, 02/13/2017 - 17:23 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन. टायमिंग तर एकदम

शलभ
Mon, 02/13/2017 - 18:02 नवीन
अभिनंदन. टायमिंग तर एकदम खतरनाक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

मस्त, जबरदस्त मोरे साहेब

अरिंजय
Mon, 02/13/2017 - 18:27 नवीन
मस्त, जबरदस्त मोरे साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

अभिनंदन.... जोरदार टायमिंग

डॉ श्रीहास
Tue, 02/14/2017 - 09:39 नवीन
अभिनंदन.... जोरदार टायमिंग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

धन्यवाद!!!

अनिल मोरे
Wed, 02/15/2017 - 23:23 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

पुन्हा एकदा कुणी चॅलेंज

पिलीयन रायडर
Mon, 02/13/2017 - 19:54 नवीन
पुन्हा एकदा कुणी चॅलेंज घ्यायला तयार आहे का? ७ दिवस - झेपेल तो व्यायाम - ओपन ग्रुप. ओपन ग्रुप - दिनांक १५ फेब पासुन सुरुवात करु. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथेच सांगा आणि टारगेट्स सुद्धा धाग्यावरच जाहिर करायचे प्रत्येकाने. लोक एकदा फायनल झाले की हवं असल्यास १५ ला रात्री एक व्यनि साखळी सुरु करु. ज्यात रोजचे अपडेट्स देता येतील.
  • Log in or register to post comments

स्रुजा, सविता, सामान्य वाचक,

पिलीयन रायडर
Mon, 02/13/2017 - 23:39 नवीन
स्रुजा, सविता, सामान्य वाचक, विशाखा, सुचेता १५ फेब पासुन सुरु करत आहेत. अजुन कुणाला यायचंय का ह्या ग्रुप मध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हो मी पण आहे तुमच्या या ओपन

सप्तरंगी
Wed, 02/15/2017 - 18:16 नवीन
हो मी पण आहे तुमच्या या ओपन ग्रुप...थँक्स. आजच्या व्यायामाबद्दल बद्दल काही वेळात सांगेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझे रनिंग्/सायकलिंग चॅलेंज..

शलभ
Mon, 02/13/2017 - 20:41 नवीन
डॉक्टरांनी कल्पना मांडली ७ दिवस चॅलेंजची आणि व्हाट्सअप ग्रुप वर त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आपापले ग्रुप बनवून, काही जण एकेकट्याने असे चॅलेंज चालू झाले. मलाही सुरुवात करायची होती पण नुकतीच SCMM फुल मॅरेथॉन झाली असल्याने मी रेस्ट मोड वर होतो. शेवटी ६-१२ फेब असा आठवडा ठरवून चॅलेंज ला सुरुवात केली. यात थोडा बदल म्हणून मी रनिंग आणि सायकलिंग दोन्ही केले. पहिले दोन दिवस १० किमी रनिंग करूनच हालत खराब झाली म्हणून तिसरा दिवस ५० किमी सायकलिंग केले. तीन दिवसातच एवढा थकलो कि चवथ्या दिवशी सकाळी उठलोच नाही. मग रात्री कामावरून आल्यावर सायकलिंग ला सुरुवात केली. ११.४५ पर्यंत ४० किमी होत आले. म्हटलं 12 च्या आत काही ५० किमी होत नाहीत म्हणून मग सायकल थांबवून उरलेल्या १५ मिनिटात २ किमी रनिंग केले आणि त्या दिवसाचं टारगेट संपवलं. पाचवा दिवस थोडा गडबडीचा गेला. शनिवार-रविवार कुटुंबासोबत पिकनिक ला जायचे ठरलेलेे. सहाव्या दिवशी थोडी सायकलिंग करायची म्हणून मित्राकडून सायकल स्टँड बसवून घेतला गाडीला. त्याची तयारी, थोडी कामं, एकदोन मित्रांना भेटायचे होते म्हणून गॅप घेत घेत १० किमी रनिंग पूर्ण केले. सहावा दिवस पूर्ण पिकनिक मूड मधेच होता. सायकलिंग करायला जमलंच नाही. मग रात्री १०.१५ ला रूमवर जेऊन आल्यावर ठरवलं बीच वर रनिंग ला जाऊ. बीच वर पळायला सुरुवात केल्यावर समजलं की सुक्या वाळूत ग्रिप मिळत नाहीय मग ओल्या वाळूत पळायला सुरुवात केली. बीच वरील वातावरण एकदम भारित करणारं होतं. आदल्या दिवशीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळे चंद्रप्रकाश मस्त पडला होता. भरतीला सुरुवात झाल्यामुळे लाटांचा आवाज हळूहळू मोठा होत होता. पूर्ण बीचवर कोणीच नव्हतं. मी मनाशी बोलतच होतो की कुत्रं पण नाही किनाऱ्यावर तेव्हाच एक कुत्रं कुठुनशी धावत आलं आणि मला पळताना बघून परत लांब गेलं. मी माझे राऊंड चालू केले एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे. दुसऱ्या टोकाकडे जाताना लांब एक लाईट दिसत होता. तिथपर्यंत जायचं ठरवलं. तिथून परत येत असताना बाजूला एक शेड दिसलं. नीट निरखून पाहिल्यावर समजलं कि ते स्मशान होतं. तसा माझा भुताखेतांवर विश्वास नाही पण भुतांचा माझ्यावर असला तर काय घ्या म्हणून उगाच रिस्क नको म्हणून परत तिथपर्यंत गेलो नाही. ओहोटीच्या लाटांनी परत जाताना किनाऱ्यावर बरीच नक्षी तयार केली होती. एक नक्षी तर मला खूप मोठ्या कोंबडीच्या पायासारखे वाटत होती. मनात विचार आला जर आता ती कोंबडी आली आणि तिने मला किड्यासारखं टिपलं तर. काही ठिकाणी पाण्यातल्या मिठामुळे काळ्या पांढऱ्या लाटा तयार झाल्या होत्या किनाऱ्यावर आणि त्या काळ्या भागात खड्डा आहे असं वाटत होतं सारखं. काही ठिकाणी तीच नक्षी उभी तयार झालेली. कशी झाली काय माहीत. पण तिकडून धावताना मागून हेडलाईट मारल्यासारखं वाटत होतं. मी दोनदा मागे वळून पण बघितलं कोणती गाडी आली की काय. ६ किमी नंतर पाय खूप दुखायला लागले. परत जावंसं वाटू लागलं. पण चॅलेंज परत पहिल्यापासून सुरु करायच्या विचारानेच टेन्शन आलं आणि परत पहिल्या जोमाने पाय टाकायला सुरुवात केली. साधारण ११.५० ला १० किमी पूर्ण झाले आणि मी बीच वरून परत निघालो. खूप अविस्मरणीय १० किमी रनिंग होतं माझ्या आयुष्यातलं. पण मला असं रात्री पळताना बघून स्थानिक लोकांमधे कुणा भुताचा जन्म झाला नाही म्हंजे मिळविली. सातवा दिवस म्हंजे आमचा पिकनिक वरून परत यायचा दिवस होता. रात्री ८.३० ला परत आलो आणि थोडं खाऊन अन आवरून निघालो १०.३० ला. ४ किमी झाल्यावर पाय खूप दुखायला लागले. थोडा आराम अन स्ट्रेचिंग करून परत चालू केलं पळायला. मागील ६ दिवसातले टार्गेट्स आठवून हळू हळू उरलेले किमी पूर्ण केले. खूप भारी फिलिंग होतं चॅलेंज पूर्ण केल्याचं. काहीतरी ग्रेट अचिव्ह झाल्यासारखं. आणि हे सर्व शक्य झालं माझ्या ग्रुप वरच्या मित्रांच्या प्रोत्साहनामुळे..__/\__ माझे स्टॅट्स : पहिला दिवस १०.१ किमी रनिंग दुसरा दिवस १०.२ किमी रनिंग तिसरा दिवस ५३ किमी सायकलिंग चवथा दिवस ३९.७ किमी सायकलिंग आणि २.१ किमी रनिंग पाचवा दिवस १०.१ किमी रनिंग सहावा दिवस १०.१ किमी रनिंग सातवा दिवस १०.४ किमी रनिंग एकूण - ५३ किमी रनिंग आणि ९२.७ किमी सायकलिंग. सलग 2-3 दिवस १० किमी पळणे खरंच टफ होतं. इंजुरीचे चान्सेस वाढतात अशाने. सुदैवाने मला असा त्रास झाला नाही. थोडीतरी शंका आली असती तर लगेच चॅलेंज थांबवलं असतं. पैर सलामत तो चॅलेंज/मॅरेथॉन पचास. आता भेटूया पुढच्या चॅलेंज ला 2 महिन्यांनी.
  • Log in or register to post comments

दंडवत घ्या राव... __/\__

मोदक
Tue, 02/14/2017 - 02:58 नवीन
दंडवत घ्या राव... __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

वा !!

डॉ श्रीहास
Tue, 02/14/2017 - 09:38 नवीन
मस्तंच ना... फाऽऽऽऽर इच्छा झालीये राव बीचवर पळायची !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

या मग तुम्हीपण पालघर ला

इरसाल कार्टं
Tue, 02/14/2017 - 10:14 नवीन
या मग तुम्हीपण पालघर ला..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

नक्की येईन

डॉ श्रीहास
गुरुवार, 02/16/2017 - 06:43 नवीन
तुम्ही पालघरचे का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

माफ करा. हा प्रश्न कदाचित आधी विचारला गेला असेल.

आषाढ_दर्द_गाणे
Tue, 02/14/2017 - 22:05 नवीन
वजने उचलणाऱ्यांना इथे सहभाग घेता येईल का? आठवड्याचे लक्ष्य 'एकूण हलवलेले वजन' ह्या प्रमाणात मोजता येईल. अजून कोणी असेल तर टीम बनवता येईल...
  • Log in or register to post comments

ह्याचा विचार करायला हवा.

पिलीयन रायडर
Tue, 02/14/2017 - 22:10 नवीन
ह्याचा विचार करायला हवा. मलाही निव्वळ कार्डीओ करायचा नाहीये. वजन उचलणे किंवा योगासनं प्रकारचे व्यायाम कसे अंतर्भुत करता येतील ह्यावर विचार करुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

एका वेळी उचललेले वजन गुणिले जितक्या वेळा उचलले = एकूण हलवलेले

आषाढ_दर्द_गाणे
Tue, 02/14/2017 - 22:29 नवीन
एका वेळी उचललेले वजन गुणिले जितक्या वेळा उचलले = एकूण हलवलेले वजन असे सोपे गणित करता येईल बाकी व्यायाम प्रकारांची नावे मराठीत लिहिताना दमछाक होणार एवढे नक्की तेव्हा सरळ Squats, बेंच प्रेस असे असे लिहावे लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

चालु शकेल ना? बादवे, मी

पिलीयन रायडर
Tue, 02/14/2017 - 23:08 नवीन
चालु शकेल ना? बादवे, मी ह्यातलं काहीच करत नाही =)) मला फक्त वेगवेगळे व्यायाम चॅलेंजमध्ये घेता येतील इतकंच हवंय. मला स्वत:ला निव्वळ जिमचा कंटाळा येतो म्हणुन.. अवांतरः- एक प्रश्न आहे सर्वांनाच. ट्रेडमिलवर पळताना पायात गोळा येत असेल तर तसं का होतं असावं? जिममम्ध्ये मी सतत पाणी पित असते. पण माझं एकंदरित दिवसभरात पाणी पिण्याचं प्रमाण कमी आहे. पाण्यात साखर मीठ वगैरे काही टाकावं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

नीट वॉर्मअप करतेस का..?

मोदक
Tue, 02/14/2017 - 23:50 नवीन
नीट वॉर्मअप करतेस का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ट्रेडमिलला काय वॉर्म अप

पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 00:54 नवीन
ट्रेडमिलला काय वॉर्म अप करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

असे नसते म्याडम.. उद्यापासून

मोदक
Wed, 02/15/2017 - 02:11 नवीन
असे नसते म्याडम.. उद्यापासून हातपाय ताणून आणि थोडे स्ट्रेचिंग करून वॉर्म अप कर आणि मग पळायला सुरूवात कर. आपला हार्टरेट वाढला पाहिजे, स्नायूंचा रक्तपुरवठा वाढला पाहिजे मग व्यायाम सुरू केला की स्नायूंवर लोड येत नाही.. (मी एकदा कुंडलिका ट्रेक दरम्यान वॉर्मअप वगैरे कांहीही न करता तिथल्या धरणात उडी मारून पोहायला सुरूवात केली, लगेचच दोन्ही पिंडर्‍यांमध्ये क्रँप आले आणि पाय हलवता येईना... इमॅजिन कर काय अवस्था झाली असेल. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओह! मी आपली जाते आणि फुल्ल

पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 02:14 नवीन
ओह! मी आपली जाते आणि फुल्ल स्पीडने ट्रेडमिल सुरु करते की रे!! आता उद्यापासुन नीट करेन वॉर्मप. आणि बराच स्वच्छंद झालास की रे.. रात्री बेरात्री मिपावर प्रतिसाद देतोस! (व्हॅलेंटाईन डे आहे ना आज.. बोलले असते.. पण जाऊ दे...!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ह्या ह्या ह्या.. "फेब्रुवारी

मोदक
Wed, 02/15/2017 - 16:56 नवीन
ह्या ह्या ह्या.. "फेब्रुवारी आणि मार्च" या दोन महिन्यांमधील प्रत्येक दिवस (आणि रात्र) आमचा ३१ जुलै असतो. नंतर १० महिने कुठेही कितीही उंडरायला कंपनीची परवानगी असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

इमॅजिन कर काय अवस्था झाली

माझीही शॅम्पेन
Wed, 02/15/2017 - 12:26 नवीन
इमॅजिन कर काय अवस्था झाली असेल
मिसळपावच बुडता बुडता वाचल म्हणायाच , परमेश्वराची कृपा :) कृपया ह. घ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भयानक

स्थितप्रज्ञ
Wed, 02/15/2017 - 20:49 नवीन
असाच अनुभव मला साधारण ८ वर्षांनी पाण्यात उडी मारल्यावर आला होता. सुदैवाने तो स्विमिंग पूल होता आणि किनाऱ्याचा बार (बुडू नये म्हणून धरायचा, गोव्याच्या किनाऱ्यावर असतो तो नाही) जवळच होता. रच्याकने, ट्रेडमिलवर पाळायला सुरुवात करायच्या आधी ४.५ किमी प्रती तास पेक्षा कमी वेगाने चाला (ते सुद्धा gradually वाढवत). बोअरिंग वाटलं तरी चालेल पण हे खूप आवश्यक आहे. साधारण २-२.५ किमी असे चालले कि मिनिटाला अर्धा किमी असा वेग वाढवत न्या. Cramps येणार नाहीत. झेपेल इतकाच (पाळताना एक पूर्ण वाक्य हाफ-हुफ न करता स्पष्ट बोलता यायला पाहिजे) वेग वाढवा, जमेल तितका वेळ पळत रहा आणि श्वास नाकानेच घ्या (उच्छवास तोंडाने सोडला तरी चालेल). हल्ली तोंडाने श्वास घ्यायचे सर्रास सल्ले दिले जातात ते तद्दम खोटे आहेत. त्याने डी-हायड्रेट आणि दमायला लौकर होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हाहा..

आषाढ_दर्द_गाणे
गुरुवार, 02/16/2017 - 03:41 नवीन
हाहा..
बुडू नये म्हणून धरायचा, गोव्याच्या किनाऱ्यावर असतो तो नाही
'फिस्स!' करून हसलो हापिसात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

जिम मधील सायकलिंग

स्थितप्रज्ञ
Wed, 02/15/2017 - 20:33 नवीन
मध्यंतरी बाहेरगावी असल्यामुळे ओपन एअर सायकलिंग बंद असल्याकारणाने अधून मधून जिममधील सायकलवर थोडे सायकलिंग केले. पण तुम्ही म्हणता तसे माझेही गुडघे दुखले म्हणून सायकलिंग सोडून ट्रेडमिलवर धावणे सुरु केले. जिममधल्या सायकल्स एकाच फ्रेम साईझच्या असतात. आपल्या उंचीला (तो फ्रेम साईझ) फिट होईलच याची शाश्वती नसते. त्यातून त्याचे बाईक-फिट पराकोटीचे गंडलेले असते. त्यामुळे पायडल पुढे असताना गुडघा आणि चवड्याचा पुढचा भाग एका रेषेत येत नाहीत. तसेच हॅन्डल adjustable नसल्यामुळे जिथे आहे तिथे धरून चालवावी लागते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सांधेदुखी. त्यामुळे जिम मधल्या सायकलवर दीर्घकाळ सायकल चालवू नका. त्यापेक्षा थोडी वॉर्मअप म्हणून सायकल चालवून उरलेला वेळ ट्रेडमिल वर धावणे उत्तम. सर्वात उत्तम मोकळ्या हवेत धावणे/सायकलिंग.
  • Log in or register to post comments

सादर उत्तर

स्थितप्रज्ञ
Wed, 02/15/2017 - 20:34 नवीन
सादर उत्तर पिलियन रायडर यांच्या एका प्राशनाला द्यायचे होते पण चुकून नवीन कमेंट पोस्ट झाली :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

माहितीसाठी धन्यवाद! जिममध्ये

पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 20:43 नवीन
माहितीसाठी धन्यवाद! जिममध्ये सायकल चालवताना मलाही हाच त्रास झाला. एलिप्टिकल मात्र आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

अतिशय उत्तम माहिती दिलीत!

आषाढ_दर्द_गाणे
Wed, 02/15/2017 - 22:59 नवीन
धन्यवाद! मला जिममध्ये ट्रेडमिलवर पळायला अजिबात आवडत नाही. ते खूप अनैसर्गिक आणि गुडघे खराब करणारे वाटते. म्हणून मी सायकलिंग करणार होतो. पण आता हि माहिती मिळाल्यावर त्या वाटेला नाही जाणार. मला वाटते एलिप्टीकल सर्वात उत्तम! पण ते करून धावण्या किंवा सायकलिंगपेक्षा कमी उष्मांक (कॅलरीस) जळतात असे वाटते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

असं मला काही आर्टीकल्स

पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 23:08 नवीन
असं मला काही आर्टीकल्स मध्येही लिहीलेलं सापडलं. पण मी पाहतेय तर मला तेवढ्याच कॅलरीज जळलेलय दिसतात. अर्थात ते क्रॉसरॅम्प आणि रेझिस्टन्सवरही अवलंबुन आहे. तो वाढवला की १३-१५ मिन मध्ये १ माईल होतो आणि १०० कॅलरीज जळतात. मी काल क्रॉसरॅम्प २० आणि रेझिस्टन्स १५ करुन पाहिला. म्हणजे वाढवत नेला. तर १३ मिनिटं कसं तरी करु शकले. हेच १० क्रॉसरॅम्प आणि ४ रेझिस्टन्सवर कॅलरी खूप कमी जळाल्या, पण मी कितीही वेळ मग एलिप्टीकलवर बागडु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

लौल!

आषाढ_दर्द_गाणे
गुरुवार, 02/16/2017 - 03:38 नवीन
त्या मशीनवर लिहून येणाऱ्या कॅलरीजवर फार विश्वास ठेवू नका. विशेषतः एलिप्टीकल तर जवळपास ४२% पर्यंत आकडा फुगवून सांगू शकतो असे सापडले आहे. धाप लागेपर्यंत, म्हणजे एक अख्खे वाक्य बोलता येणार नाही इतक्या तीव्रतेने (इंटेन्सिटी) व्यायाम करावा असे म्हणतात. तेव्हा नुस्तेच बागडण्यापेक्षा श्वासाकडे असू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

वर स्थितप्रज्ञ ह्यांनी आधीच

आषाढ_दर्द_गाणे
गुरुवार, 02/16/2017 - 03:43 नवीन
वर स्थितप्रज्ञ ह्यांनी आधीच धाप लागण्याविषयी लिहिले आहे, ते विसरलो चूभूद्याघ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

धाप लागोस्तोवर व्यायाम

स्थितप्रज्ञ
गुरुवार, 02/16/2017 - 13:29 नवीन
धाप लागोस्तोवर सुद्धा व्यायाम करू शकता पण ते HIIT प्रकारात मोडते. त्यात जास्तवेळ न घालवता जास्त उष्मांक जाळले जातात. हे थोडं अघोरी प्रकरण आहे (कारण इंज्युरी व्हायची शक्यता जास्तप्रमाणात असते) पण याचे इफेक्टस लौकर दिसून येतात. लांबपर्यंत पल्ला गाठायचा असेल आणि विशेषतः चरबी जाळायची असेल तर धाप लागून उपयोग नाही म्हणून तसे लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

काय???? अरे देवा!!! मी १००

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/16/2017 - 04:41 नवीन
काय???? अरे देवा!!! मी १०० कॅलरीज जळाल्या म्हणुन खुष होते.. पण मग तसं तर कुठलीच मशीन १००% बरोबर दाखवत नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

कुठल्याही मशीनवर आधी वजन एंटर

बाळ सप्रे
गुरुवार, 02/16/2017 - 09:54 नवीन
कुठल्याही मशीनवर आधी वजन एंटर करावे लागते ते बरोबर असेल तर दाखवलेल्या कॅलरीजच्या आकड्यावर विश्वास ठेवु शकतो. जर वजन माहीत नसेल तर कुठल्या आधारावर कॅलरीज मो़जणार. कॅलरी मोजणे म्हणजे साध्या भाषेत.. किती वजनाची वस्तू किती वेगाने किती वेळ ढकलली यासाठी लागणारी उर्जा.. त्यातला वेग आणि वेळ आपण पहात असतो मशीनवर.. राहीले वजन ते माहीत असायला हवे.. बर्‍याच वेळा डीफॉल्ट ६० किंवा ७० किलोसाठी कॅलरीजचा आकडा दाखवला जातो.. तुमचे वजन याच्या जवळपास नसेल तर तो आकडा तुमच्यासाठी नव्हता असे समजा.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा