✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा फिटनेस विकांत

प
प्रशांत यांनी
Sun, 12/04/2016 - 20:39  ·  लेख
लेख
नमस्कार, एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत. यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा. मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही ************************* नेहमीप्रमाणे कांही सूचना. १) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे. २) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा. ३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्‍या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;) *************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
51109 वाचन

💬 प्रतिसाद (179)

प्रतिक्रिया

अभिनंदन

प्रशांत
Mon, 12/12/2016 - 18:10 नवीन
अभिनंदन
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

धन्यवाद!!!

अनिल मोरे
Mon, 12/12/2016 - 22:16 नवीन
धन्यवाद!!!
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

दोन्ही दिवस प्रत्येकी दोनेक

लॉरी टांगटूंगकर
Mon, 12/12/2016 - 00:20 नवीन
दोन्ही दिवस प्रत्येकी दोनेक किमी धावलो. तेवढीच सायकल. पंधरा पुलप्स. पन्नास पुशप्स. बाकी वजनं घेउन हातं-पायं हलवले. तद्नंतर ढेरी साठे क्रंचेस, क्रोस क्रंचेस, रिव्हर्स क्रंचेस झोपून सायकल वगैरे प्रकार केले. मग घरी येउन दुपारभर झोपा काढल्या.

_/\_

एस
Mon, 12/12/2016 - 00:31 नवीन
मिपा फिटनेस विकांतात अहमहमिकेने भाग घेतलेल्या सर्व मिपाकरांचे जोरदार अभिनंदन आणि आभार! या उपक्रमाला उचलून धरणारे श्री. मोदकराव आणि श्री. प्रशांतराव यांचे आभार. हा एका-दोन दिवसांचा उपक्रम न राहता आपल्या रोजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. पुनरेकवार सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचेही आभार. धन्यवाद! _/\_

अर्रर्र

विंजिनेर
Mon, 12/12/2016 - 01:20 नवीन
हिरव्या पच्चीम किनार्‍यावरचा रविवार अंमळ बाकी आहे. आभार प्रदर्शनाची घाई नको :)
↩ प्रतिसाद: एस

८.५ मैल (८:५० मै/माईल पेस)

विंजिनेर
Mon, 12/12/2016 - 01:17 नवीन
साडे आठ माईल्स "ईझी" रन मिपा फि. विकांताय स्वाहा - इदं मिपा फि. विकांताय - इदं न मम | एकूण आठवड्यातले माईलेज - २० मैल (३० किमी मात्र)

साडेचार किमी चालल्या गेले आहे

गवि
Mon, 12/12/2016 - 02:10 नवीन
साडेचार किमी चालल्या गेले आहे. पायाला जरा दुखापत झाल्याने कमी झालं अंतर. पण विकांत अगदीच लोळण्यात न गेल्याचं समाधान.

मी पाय पुन्हा दुखावुन

प्रीत-मोहर
Mon, 12/12/2016 - 12:56 नवीन
मी पाय पुन्हा दुखावुन घेतल्यामुळे, चालणे नाही जमवले पण सुन झाले २५.

आता हा वॉर्मअप समजून त्या

गवि
Mon, 12/12/2016 - 13:05 नवीन
आता हा वॉर्मअप समजून त्या व्यायामाची उष्णता कमी होण्याच्या आत पुढचा उपक्रम ठरवावा ही विनंती. यंदा चालणे / धावणे या विशिष्ट व्यायामावर भर देणारा सप्ताह ठेवूया का? वर्किंग डेजसहित एका आठवड्यात किती किलोमीटर जमतात ते पाहू या? (आपापल्या शक्त्यनुसार पण किंचित जास्तीचा चॅलेंज घेऊन).

नक्कि

प्रशांत
Mon, 12/12/2016 - 14:52 नवीन
आता हा वॉर्मअप समजून त्या व्यायामाची उष्णता कमी होण्याच्या आत पुढचा उपक्रम ठरवावा ही विनंती
हो नक्की.
↩ प्रतिसाद: गवि

सप्ताह करा, हरकत नाही.

अरिंजय
Mon, 12/12/2016 - 18:17 नवीन
सप्ताह करा, हरकत नाही.
↩ प्रतिसाद: प्रशांत

हा वीकांत फक्त भटकण्यात गेला

पाटीलभाऊ
Mon, 12/12/2016 - 14:48 नवीन
हा वीकांत फक्त भटकण्यात गेला...त्यामुळे काहीही व्यायाम झाला नाही :( पण हि कसर या आठवड्यात भरून काढण्यात येईल.

२३० किमी....औ'बाद-पुणे

डॉ श्रीहास
Mon, 12/12/2016 - 15:05 नवीन
२३० किमी १० तासात .... माझी पहिली डबल सेंच्युरी !!

वा....अभिनंदन

पाटीलभाऊ
Mon, 12/12/2016 - 15:10 नवीन
_/\_
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

झकास !!

देशपांडेमामा
Mon, 12/12/2016 - 15:16 नवीन
डॉक रॉक्स !!! देश
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

डॉक पुन्हा एकदा अभिनंदन!

केडी
Mon, 12/12/2016 - 15:37 नवीन
डॉक पुन्हा एकदा अभिनंदन! भेटून खरंच छान वाटलं काल सगळ्यांना! कीप रायडींग! आता लक्ष २०१७! डेक्कन क्लीफ हँगर! किंवा BRM कम्प्लिट करा सगळी सिरीज!
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

सही... ____/\____ अभिनंदन...

शलभ
Mon, 12/12/2016 - 16:09 नवीन
सही... ____/\____ अभिनंदन...
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

अभिनंदन डॉक्टर

दाते प्रसाद
Mon, 12/12/2016 - 16:15 नवीन
अभिनंदन डॉक्टर २३ किमीचा सरासरी वेग -- जबरदस्त
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

खतराच हो डॉक. जबरदस्त एकदम.

अरिंजय
Mon, 12/12/2016 - 16:39 नवीन
खतराच हो डॉक. जबरदस्त एकदम.
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

देशपांडेमामा आणी डॉ श्रीहास..

बाळ सप्रे
Mon, 12/12/2016 - 17:20 नवीन
देशपांडेमामा आणी डॉ श्रीहास.. जबरदस्त सायकलिंग.. कीप इट अप !!

strava

प्रशांत
Mon, 12/12/2016 - 18:37 नवीन
शक्य असेल त्यांनी सायकलिंगसाठी मिपा सायकल सायकल हा strava ग्रुप जॉईल करा आणि धावणे\चालणे या साठी मिपा रनर्स हा ग्रुप जॉईल करा.

मुलाला शुक्रवार रात्रीतुन ताप

पिलीयन रायडर
Mon, 12/12/2016 - 22:14 नवीन
मुलाला शुक्रवार रात्रीतुन ताप आल्याने पुढचे दोन दिवस त्याच्याच मागे गेलेत. सपशेल विसरुन गेले की असं काही करायचं होतं. अजुन २ दिवस तर असेच जातील. झोप होत नाहीये नीट त्यामुळे सुर्यनमस्कार घालायला गेले तर साष्टांग नमस्कार घालताना तिथेच झोपुन जाईन! जे काही करेन ते लिहीते इथे.

आज तीन किमी सलग. तुलनेत

गवि
Tue, 12/13/2016 - 22:42 नवीन
आज तीन किमी सलग. तुलनेत वाढीव वेगाने. इथल्या इतरांच्या मानाने तीन किमी म्हणजे काहीच नाही. पण एकेकाळी अर्धा किमीदेखील चालण्याची मारामार होती, त्या तुलनेत ही वाढलेली स्टॅमिनापातळी फार आनंददायक वाटते. हळूहळू साडेतीन मग चार असं करता येईल.

आज तीन किमी सलग. तुलनेत

गवि
Tue, 12/13/2016 - 22:43 नवीन
आज तीन किमी सलग. तुलनेत वाढीव वेगाने. इथल्या इतरांच्या मानाने तीन किमी म्हणजे काहीच नाही. पण एकेकाळी अर्धा किमीदेखील चालण्याची मारामार होती, त्या तुलनेत ही वाढलेली स्टॅमिनापातळी फार आनंददायक वाटते. हळूहळू साडेतीन मग चार असं करता येईल.

धावलो

चंबा मुतनाळ
Sun, 01/01/2017 - 18:10 नवीन
आज नववर्षानिमित्त पुण्यात ९ किमी धावलो

धावलो

चंबा मुतनाळ
Sun, 01/01/2017 - 18:10 नवीन
आज नववर्षानिमित्त पुण्यात ९ किमी धावलो

निरोप

मित्रहो
Sun, 01/01/2017 - 22:09 नवीन
काल नवीन वर्षाचा निरोप १०२ किमी सायकल हैद्राबाद ते चेवेला आणि तसेच परत. मस्त रोड आहे. आज रिकव्हरी राइड ४५ किमी चिलकूर आणि आसपास. एकूणच आठवडाभरात २०३ किमी. साऱ्या राइड एकट्यानेच. बरेच दिवसानंतर मिपावर आलो. दहा ते बारा डिसेंबर मधे सुद्धा एक शतकी राइड ११५ किमी. हैद्राबाद क्लब राइडच्या मार्गाने. भयंकर हाल झाले होते. प्रचंड भूक लागली आणि खायला काही मिळत नव्हते. सध्याच्या वातावरणात सकाळी थंडीचा आळस सोडला तर मग सायकलींगला भरपूर मजा येते. २०१६ मधे ४५०० किमी सायकल चालविली. सायकलींग साठी वर्ष मस्त गेले. एकदम पैसा वसूल.

माझा ईतिहास...२०१३-१४

राजेंद्र देवी
Mon, 01/02/2017 - 13:59 नवीन
हे असेच चालायचे ... लहानपणी एक पाय नाचिव रे गोविंदा किंवा चाल चाल बाळा तुझ्या पायात वाळा पासून चालणे सुरू झाले ते तेवढ्यापुरतेच मर्यादित होते. म्हणजे तसे लहानपणापासून आपण किती चाललो हे आपणास लक्षात येत नाही. गावी १०वी पर्यंत पायात चप्पल हा प्रकार नव्हता. सगळीकडे अनवाणीच फिरायचे. ११वी ला अहमदनगराला शिकण्यास गेलो अन पायात पहिल्यांदा स्लीपर आली. नगरला असताना जवळच असणारे केडगाव येथे एकदा यात्रेसाठी चालत गेलो होतो. नंतर कॉलेज शिक्षण घेण्यासाठी पुन्हा गावी परत आलो. कॉलेज शिक्षण पूर्णं करून नोकरीसाठी पुणे गाठले व येथेच स्थायिक झालो. असो हा थोडक्यात पूर्व इतिहास. पुण्यात सायकल स्कूटर अन नोकरीच्या जागी कंपनीच्या बसने प्रवास अन बैठे काम म्हणजे थोडक्यात चालणे हा प्रकार फारच कमी. फक्त गणपती पाहण्यासाठी जे काही पायी हिंडलो असेल तेवढेच. माझ्या कंपनीतील सहकारी सतत कुठे ना कुठेतरी पायी दौरा करीत असत व त्याचे रसभरीत वर्णन करीत असत. ते ऐकून मलाही वाटे की आपणही थोडे चालावे म्हणून सरावासाठी रोज १-२ की.मी. सुरुवात केली. वयाची पन्नाशी उलटून गेल्याने हा सराव हळूहळू वाढवितं होतो. शेवटी एकदा सहकाऱ्यांना सांगितले की मला पण तुमच्या बरोबर पायी यावयाचे आहे. पहिली भ्रमंती ठरविली कात्रज बोगदा. म्हणजे कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. तेथून बसने घरी. ६.३० ते १०.३० या वेळेत हे चालने पूर्णं केले. पौर्णिमेची रात्र असल्याने मजा आली. बोगद्यामध्ये जरी दिवे असले तरी बॅटरी वापरणे अपरिहार्य होते कारण लोखंडी ऍगल पायात आडवे येत होते अन गाड्यांचा धूर पण भरपूर होता कात्रजच्या या यशस्वी चालीनंतर काही दिवसांनी ठरविले की ऑफिस सुटले की अकुर्डी ते देहू हे अंतर चालत जावयाचे. हे अंतर फक्त १२ की. मी. होते. तुकारामाच्या समाघीचे दर्शन घेऊन व येताना बसने घरी परतलो. चालताना भंडारा डोंगर पाहिला व पुढील वेळी येथे यावयाचे ठरवले पण तो योग आला नाही. अशा प्रकारे पायी चालण्याचा छंदच जडला. असेच एकदा सहजच ठरविले की का आपण ऑफिसमधून घरी बसने जाण्यापेक्षा चालतच जाऊ नये ? झाले. अकुर्डी ते दगडूशेठ गणपती असे २० की. मी. अंतर ५.३० ते रात्री ९.३० वेळेत पूर्णं केले. जुलै महिन्यात (भर पावसात) सहकाऱ्यांनी ठरविले म्हणून सिंहगडावर जायचे ठरले. पहाटे ५ वा. स्वारगेट ला रेनकोट वै. घालून हजर. पाऊस चालूच होता. मित्रांची वाट पाहत होतो पण कोणी आलेले दिसले नाही. वाटले पुढील थांब्यावर येतील पण कोणी आले नाही. आता काय करावयाचे. वाट माहिती नाही. योगायोगाने बसमध्ये एक कंपनीतील ओळखीचा चेहरा दिसला. तो खूपच अनुभवी होता अन मी नवशिका. असो. त्याच्याबरोबर सिंहगड भर पावसात चढावयास सुरुवात केली पण त्याचा वेग जास्ती होता व त्याला माझ्यावेगाने चालणे अवघड वाटत होते. शेवटी त्याला पुढे जाण्यास सांगून मी माझी चढाई चालूच ठेवली. पाऊस भरपूर होता. वरून पावसाच्या धारा अन रेनकोट मध्य घामाच्या धारा. पायवाटेवरून पाण्याचे लोट वाहत होते त्यामुळे त्या पाण्यातूनच वाट तुडवीत होतो. रस्ता नीट कळत नव्हता. पावसामुळे थोडेच लोक आले होते व ते पण केव्हाच वर चढून गेले होते. कसाबसा धापा टाकत पाऊण सिंहगड सर केला तेव्हा माझ्याबरोबर असणारा कंपनीतील सहकारी वर जाऊन परत फिरला होता. त्याने धीर दिला अन म्हणाला आता थोडेच राहिले आहे, बरोबर येऊ का? त्याला नकार दिला अन सांगितले की मी ह्या पावसात आता तुझ्याबरोबर परत उतरणार नाही. तू जा. मी जीपने खाली येईन. आणि मी देवाचे नाव घेत तसाच गड सर केला. हा अनुभव फारच वेगळा अन रोमांचकारी होता. जीपने उतरून बसने घरी परतलो अन मित्रांना फोन केला की ते का आले नाही. त्यांना तर मी सिंहगडावर जाऊन आलो यावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटले की मी काही या पावसात येत नाही व त्यांनी पण पावसामुळे येणे रद्द केले. यानंतर साघारणतः पुढच्या महिन्यात कंपनी(अकुर्डी) ते आळंदी असे चालत जायचे ठरले अन १८ की. मी. प्रवास ४ तासात पूर्णं केला. आळंदीला दर्शन घेऊन बसने घरी परतलो. घरची मंडळी म्हणू लागली की एवढे चालू नका पण चालायची खुमखुमी काही कमी होत नव्हती. एकदा रविवारी कोथरुडला नातेवाइकांकडे जायचे होते. तेव्हा सहज गंमत म्हणून बसने न जाता मी ते ८ की. मी. अंतर चालत गेलो. परगावी सुद्धा हातात सामान वै. नसेल तर स्टॅड ते घर चालतच जायचो. सकाळी चालण्याची मजा काही औरच आहे. अजिबात थकवा जाणवत नाही. थोड्याचं दिवसाने टूम निघाली. राजगड करायचा आहे. अर्थात पौर्णिमेची रात्र निवडली होती. गुंजवणे मार्गे जायचे ठरले. कंपनी सुटल्यावर स्वारगेट वरून निघालो अन रात्री ८ वा̱. गुंजवणे ला पोहचलो. रात्रीच गड चढावयास सुरवात करून १२ वा. वर गडावरती पोहचलो. तेथील मंदिरात जेवण करून झोपलो. सकाळी बालेकिल्ला केला , संजीवनी माची केली अन दुपारी २ वा. गड उतरण्यास सुरुवात केली. गुंजवणे ते कात्रज जीप व नंतर बसने घरी. (या लेखात गडाचे वर्णन वै. लिहितं नाही कारण ते सर्वत्र उपलब्ध आहे. ) असो. काही दिवसांनी पुन्हा कंपनीच्या बसने तळेगावला उतरून तेथून चालत शिरगाव (प्रती शिर्डी) ला १६ की. मी. चालत मुंबई पुणे मार्गे अकुर्डीला आलो अन बसने घरी. काही दिवसानंतर पुन्हा टूम निघाली की आळंदीला जायचे पण या वेळेस ते दगडूशेठ ते आळंदी असे २४ की. मी. चालावयाचे. पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत ते पूर्णं केले. अधे मध्ये २-३ वेळा रवीवारी सिंहगड चढणे उतरणे चालूच होते. आता चालण्यास वेग आला होता व सरावलो होतो. साधारणतः ५० मिनिटात वर जाता येत होते. वर पोहताच १ ग्लास सरबत अन लगेच परत खाली उतरणे. पण राजगडच्या ट्रेकने गड पुन्हा पुन्हा बोलवू लागले होते. सर्वांनी ठरविले की यावेळी हरिश्चंद्र गड करूया. मग काय ऑफिस सुटले की राजगुरुनगरला उतरून खिरेश्वर ला बसने गेलो. रात्री (पौर्णिमा) ९ वाजता सुरुवात केली अन टोलार खिंडीत १२ वा. पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा गड चढावयास सुरुवात केली. रात्री २वा. गडावर पोहचलो. गुहेत जागा नसल्याने तेथील झोपडीत आश्रय घेतला. फेब्रुवारी महिना होता तरीपण गडावर खुप थंडी होती. सकाळी स्नान करून तारामती पॉइंट पाहून दुपारी विश्रांती घेतली. ४ वाजता प्रसिद्धं कोंकण कडा पाहण्यास गेलो. अप्रतिम व अवर्णीनीय. तेथून गुहेत जागा मिळवली. रात्री खिचडी खाऊनं झोपलो. सकाळी उठून पाचनाई मार्गे गड उतरलो व पुण्यास परतलो. अधूनमधून कंपनी (अकुर्डी) ते घरी (रविवार पेठ) अशी चालत जाण्याची हुक्की येई. हे २० की. मी. अंतर अंदाजे ४ तासात पूर्णं होई. असेच एका रवीवारी चतुर्थी येत होती. हा योग साधून आम्ही सारस बाग गणपती ते थेउर २५ की. मी. सोलापूर रस्त्याने गेलो. पहाटे ५ ला सुरुवात केली व १० वा. थेउरला पोहचलो. १ तास रांगेत उभे राहिलो व दर्शन घेतले अन बसने घरी परत. आमचे सर्व चालणे साधारणात १ महिन्याच्या अंतराने असे. वातावरण , वेळ, प्रसंग पाहून ठरवीत असू. मध्ये बरेच दिवस हालचाल नव्हती अन चुळबूळ सुरू झाली कारण माझे एक सहकारी श्री. मराठे हे चालण्यात एकदम तरबेज. त्यांनी ३-४ वेळा पुणे ते अक्कलकोट, पुणे ते पंढरपूर, पुणे ते पंढरपूर व तेथून अक्कलकोट असे पायी प्रवास रोज ५० ते ६० की. मी. वेगाने पूर्णं केले होते. २५० ते३००की. मी. चालणे व बसने परत. अर्थात माझी तेवढी तयारी नसे. पण मला वाटे की आपण एका दिवसात किती चालू शकू? हे पाहावे म्हणून त्यांना एकदिवसीय पायी प्रवासाचे मनोगत सांगितले अन ठरले की चालत नारायणपुरला जायचे. रात्री ८ वा. (पौर्णिमा) शंकर महाराज मठापासून सुरुवात केली. कात्रज बोगद्याजवळ नास्ता केला. पुढे कैलास ची भेळ रात्री १२ वा. खाऊनं पहाटे ४ वाजता नसरापुर फाटा गाठला. पाय खूपच दुखू लागले होते अन फोड पण आले होते. परत फिरावे असे वाटू लागले पण मन हार मानावयास तयार नव्हते. शेवटी तसेच चालत चालत पहाटे ६ वाजता बालाजीला (नारायणपुर) पोहचलो. तेथे अंघोळ करून दर्शन घेतले व जीप/ बसने घरी परत आलो. हा ४२ की. मी. चा टप्पा गाठू शकलो. आतापर्यंतचा हा माझा सर्वात मोठा पल्ला. पण हायरे दैवा ... पुढे पुढे माझे गुडघे दुखू लागले. औषधाने थोडे बरे वाटे पण त्रास वाढू लागला. डॉ. नि चालण्यास बंदी केली आणि माझा २-३ वर्षाचा चालीत्सोव बंद पडला. मनाची खुप तयारी असली तरी आता शरीर साथ देईनासे झाले. आता गरजेपुरते थोडे चालतो. असो हे सर्व जसे आठवेल तसे लिहून काढले आहे. आपण काय करू शकतो हे आपणास केल्याशिवाय कळत नाही. आपली ताकद आपण अजमावून पाहत नाही. पन्नाशीनंतर मी हे सर्व करू शकलो यावर माझाच विश्वास बसत नाही. अजूनही खुप चालावे वाटते. दुर्ग खुणावतात पण ... हे असेच चालायचे राजेंद्र देवी.
↩ प्रतिसाद: मित्रहो

नवीन वर्षाची सुरूवात ..........

नितीन पाठक
Mon, 01/02/2017 - 14:15 नवीन
२०१७, नवीन वर्षाची सुरूवात चांगली झाली. सकळी नेहमीप्रमाणे ६.५ किमी चालणे आणि संध्याकाळी ४१.९ किमी सायकलींग केली.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा