कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओके. थँक्यू ढेरे सर.
क्रेडिट कार्डाने पेत्रोल भरलं
ओके. नेक्श्टाईम ४००+ भरुन
हजार रु.चं भरलं होतं. क्रेडिट
अक्षरशः हेच सांगण्याचा खूप
आता दिशाभूल क्रेडिट कार्ड
Paytm launches payment method
तर बेंबट्या ...
हा हा
हा हा हा
+१
हास्यास्पद
=)) =)) =))
बरोबर आहे,
मला वाटते आधार कार्ड च्या
बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना
बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना
बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते.भारतातले बहुतांश तथाकथित बुद्धिजीवी हातातल्या झेंड्याला आणि स्वतःच्या हितसंबंधाला सोईचे मार्गदर्शन करतात, असा इतिहास आहे, हे काही गुपीत नाही ;) :)विषय चांगला आहे.
कॅशलेस होणं हे अंतिम उद्दिष्ट आहे
.
भरपूर लूज एंडस आहेत सर. त्यात
हो ना !
मी कुठे राहतो
इतकं वाईट वाटून घेऊ नका
वर टाकलेला प्रतिसाद परत एकदा
+१००
जगात कोठेही, या संबंधात
ज्या वेळी एखाद्या गावात जिथे दिवसातले काहीच तास वीज आहे, इंटरनेट नाही किंवा असलेले इंटरनेट फारसे वेगवान नाही, व्यवहार करणारी जनता अशिक्षित आहे अश्या ठिकाणी हे कॅशलेस व्यवहार कसे होणार ?जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? कालच रिझर्व बँकेनेही "रु२००० च्या खालचे व्यवहार कॅशने करण्यात हरकत नाही असे "टीव्ही९ मराठी" या वाहिनीने बातम्यात सांगितले आहे. जसे पेपरलेस म्हणजे व्यवहारात कमीत कमी कागदाचा वापर उर्फ "लेस पेपर" अस्ते, तसाच कॅशलेस हा शब्द व्यवहारात वापरला जातो, आणि प्रसंगी चतुर लोक त्याचा स्वतःचा विपर्यासी मुद्दा पुढे ढकलायला उपयोग करतात. तेव्हा काळजी नसावी.जेथे अशी अवस्था आहे तेथे फार
अगोदर न केलेल्या अनेक गोष्टी
२००० वरचे व्यवहार शेतकर्
सुविधा नसतील तर आता जसं करतात
२००० वरचे व्यवहार शेतकर्
हेच काही महिन्यांपर्यंत
थोडावेळ पुर्वग्रह बाजूला ठेवा
तुमच्या मनातली समस्या
वीज आणि नेट लागते त्याचे काय?
बँका, पाण्याचे पंप, मोबाईल
बँका, पाण्याचे पंप, मोबाईल
मार्मिक,
मित्रा...
+१११
उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद.
संदिप डांगे,
इथे आपण जे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहात त्याला सिद्ध करायला तुम्ही पुरावे देऊ शकणार नाही. दिले तरी ते मान्य होणार नाहीत.मिसळपावर दिले गेलेले लॉजिकल पुरावे अमान्य कोणी केले आहेत हे जरा समजावून सांगा आणि शक्य असेल तर त्याच्या लिंका द्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वांचीच अडचण होत आहे हे सूर्यप्रकाशाइतके उघड आहे. तसेच अंमलबजावणीमध्ये सुधारणा आवश्यक आहेत हे ही येथे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे. अर्थात या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. कारण "गोपनीयता हा मुख्य मुद्दा असल्याने अडचणी होणारच" हे गृहीतक मान्य नसल्याने मतभेद उद्भवत आहेत हे माझे वैयक्तीक मत - यावर कोणाचे अन्य काही मत असल्यास वाचायला आवडेल.जे लोक अडचणींतून जातायत ते इथे प्रतिसाद द्यायला येणार नाहीत, आले तरी त्यांना ओवरस्मार्टगिरी दाखवून त्यांच्या अडचणी ह्या अडचणी नसून चोचले - खोटारडेपणा आहे असे म्हटले जाईल.पुन्हा वरचा प्रतिसाद वाचा आणि सरसकटीकरण करून आरोप करणे टाळा.इथे मिसळपाववर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही व गरज तर अजिबातच नाही.येथे कोणाचा कैवार घेऊन बोलण्याची गरज आहे की नाही हा तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र.. "मिसळपाव वर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही" हे वाक्य कशासाठी लिहिले आहे..? अनेक क्षेत्रात नडलेल्या लोकांच्या मदतीला अनेक मिपाकर जात असतात आणि यथाशक्ती मदतही करत असतात. मग हे सरसकटीकरण कशासाठी..? "आपण येथे व्यक्त होत असताना संस्थळाचा आणि सदस्यांचा अपमान करत आहोत का..?" याचेही भान राखावे ही नम्र सूचना.एसेमेसवरून ट्रँझॅक्शन करता
कायप्पावर फिरणारा एक विनोद
म्हात्रे सर तुमच्या ज्ञानाचा
काय करणार ? सत्य लिखितापेक्षा
सरकार आता छोट्या
मी २८ नोव्हेंबरला जे म्हणालो
मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54 सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.अजून थोडे