Skip to main content

कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण

लेखक अप्पा जोगळेकर यांनी गुरुवार, 01/12/2016 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल. या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही. हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत. नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. १. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52 आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-( २. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05 ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील. सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे. ३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43 सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत. नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. image ४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54 आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्‍याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल. बरोबर..? ५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15 नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते. पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते. आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे. शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.) आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्‍या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो. पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते. या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत. ६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35 सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे. पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल. ७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40 काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे). उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ? असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता. ८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.

वाचने 104047
प्रतिक्रिया 582

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

चार्जेस हा मुद्दा आहे. चार्जेस हा मुद्दा नाही. चार्जेस लागतात हे सत्यच आहे. चार्जेस कार्ड होल्डरला लागू होत नाहीत, व्यावसायिकाला लागू होतात हा मुद्दा आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

चार्जेस लागतात हे सत्यच आहे. मग मी काय म्हणतोयं ? चार्जेस कार्ड होल्डरला लागू होत नाहीत, व्यावसायिकाला लागू होतात हा मुद्दा आहे. आणि मर्चंट ते कस्टमरला लावतो ! शिवाय नेट-बँकीगवर तर डायरेक्ट चार्जेस लागतात.

In reply to by संजय क्षीरसागर

आता सांगा इथल्या धुरिणींना ! काय सांगायचे. मर्चंट कस्टमरला लावतो हे खरे नाही. पेट्रोल पंपावर तर नाहीच. हॉटेलातही नाही, टॉकीज मधेही नाही. मर्चंट चार्जेस झेलतो कारण कार्ड सुविधा त्याचा धंदा वाढवते आणि व्याजाचे पैसेही त्याला मिळतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

मर्चंट कस्टमरला लावतो हे खरे नाही तुम्ही मर्चंटसनी लावलेले बोर्ड बघितलेले दिसत नाहीत. पेट्रोल पंपावर तर नाहीच. हॉटेलातही नाही, टॉकीज मधेही नाही पेट्रोलवर चार्जेस लागतात आणि त्यासाठी थत्त्यांच्या प्रतिसादाची लिंक दिली आहे. हॉटेलवाले (ते ही मोठे) बेअर करतात. हे आधीच सांगितलं आहे. पिक्चरची तिकीट सध्या काय आहेत ते पाहा. मल्टीप्लेक्समधे पिक्चर पाहाणं म्हणजे कधी नवत करायची ऐश आहे. असो, चार्जेस हा कॅशलेस इकॉनॉमीत, सामान्यांना बसणारा नाहक भुर्दंड आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही त्या पेट्रोल पंपाचा पत्ता का देत नाही. दुसर्‍यांदा विचारत आहे. मी तुमच्या शहराच्या आजूबाजूलाच राहतो. तुम्हालाच का चार्जेस पडतात हे तिथे जाऊन चेकवायचे आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पेट्रोलवर तर सर्रास लागतात कोणत्या पेट्रोल पंपावर आणि कोणत्या कार्डवर लागतात. मला पत्ता,फोन नंबर मिळेल का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

कारण सध्या चार्जेस नाहीत. आणि हा माझा एकट्याचा अनुभव नाही. बघा बाय द वे, भाषा सांभाळाल तर बरं !

In reply to by संजय क्षीरसागर

पेट्रोलवर तर सर्रास लागतात आणि भारतात असाल तर पी एन गाडगीळ किंवा तत्सम दुकानात जा (मॉल नाही), तिथे कार्ड पेमंटला चार्ज पडेल असा बोर्डच असतो. d mart, सहकारी भांडार, हॉस्पिटल या ठिकाणी केलेल्या खरेदी वर २% सरचार्ज किंवा इतर कुठलाही सरचार्ज लागत नाही , कुठल्याही बँकेचे कार्ड असो. पण ज्वेलर कडे २% सरचार्ज लावतात हा काय प्रकार आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

क्रेडीट कार्ड म्हणजे बँकेनं दिलेलं टेंपररी लोन आहे. अगदीच कहर 'स्वीपिंग' स्टेटमेंट आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

काही जण वाण्याच्या वहीत 'मांडून' ठेवतात. ते कर्ज असते का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

माझं वाक्य नीट वाचावं : क्रेडीट कार्ड म्हणजे बँकेनं दिलेलं टेंपररी लोन आहे

In reply to by संजय क्षीरसागर

टेंपररी असो अथवा पर्मनंट. कर्जावर व्याज लागते. क्रेडिट वर नाही. जर मिनिमम ड्युज वगैरे प्रकार आपखुशीने ग्राहकाने स्वीकारले तर क्रेडिटचे टेंपररी लोन बनते. डिफॉल्ट केले तर दंड बसतो. व्याज नाही. म्हणून 'स्वीपिंग स्टेटमेंट' असे म्हटले.

In reply to by अप्पा जोगळेकर

डिफॉल्ट केले तर दंड बसतो. व्याज नाही.
पूर्ण चूक विधान. वेळेवर बिल भरलं नाही तर दंड आणि व्याज दोन्ही बसते. (करोन बघा एकदा डिफॉल्ट :))

In reply to by अनुप ढेरे

वेळेवर बिल भरलं नाही तर दंड आणि व्याज दोन्ही बसते. ओके. तरीही क्रेडिट म्हणजे टेंपररी लोन ही व्याख्या 'स्वीपींग' आहेच.

In reply to by अप्पा जोगळेकर

ओके. तरीही क्रेडिट म्हणजे टेंपररी लोन ही व्याख्या 'स्वीपींग' आहेच.>>> -- टांग उपर करके ही गिरेंगे...

In reply to by अप्पा जोगळेकर

टेंपररी असो अथवा पर्मनंट. कर्जावर व्याज लागते. क्रेडिट वर नाही. क्रेडीटचा अर्थ उधार असा आहे. आणि उधारचा मराठी अर्थ कर्ज आहे. व्याज हा कर्जाचा महत्त्वाचा, पण अनुषंगिक घटक आहे. कारण कर्ज बिनव्याजी असू शकते. जशी वाण्याची उधरी. कर्जाचा मूळ घट टाईम आहे. रोख म्हणजे व्यावहार होतांना आणि उधार म्हणजे कालावधी नंतर. डेबिट कार्ड हा रोखीचा व्यावहार आहे. क्रेडीट कार्ड हा उधारीचा. सो क्रेडीट कार्ड हे बँकेनं कस्टमरला दिलेलं टेंपररी लोन आहे. समजलं ?

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा यात काहीही चूक नाही. क्रेडिट कार्ड हे कर्जच असतं. म्हणूनच ते देताना बँक तुमच्या उत्पन्नाची भरपूर चौकशी करते. क्रेडिट कार्डाचं बिल थकवलं तर क्रेडिट रेटिंगवर परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला पुढील कर्ज मिळवायला त्रास होतो. क्रेडिट कार्ड ट्रांझॅक्षन = कर्ज यात काहीही चूक नाही.

In reply to by अनुप ढेरे

चूक नाही. पण एखाद्याला क्रेडिट कार्डची माहिती नसेल तर नक्कीच दिशाभूल होऊ शकेल. म्हणून 'स्वीपिंग स्टेटमेंत' असे लिहिले.

In reply to by अप्पा जोगळेकर

आता दिशाभूल क्रेडिट कार्ड एजंत्स जास्तं करतात. चार्जेस अस्तात पण सांगताना झिरो चार्जेस सांगणे वगैरे. बादवे, वाण्याकडणं मांडून सामान आणने हे देखील कर्जच आहे. बिनव्याजी.

In reply to by अनुप ढेरे

बादवे, वाण्याकडणं मांडून सामान आणने हे देखील कर्जच आहे. बिनव्याजी. तस पाहायच तर डाळीतले खडे किंवा वजनात मारलेला रवा हे व्याजच आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

कैच्याकै. बळच वाद घालत आहात. असो. तुमच्याशी वाद घालण्यात इटरेस्ट नाही. पण ही चर्चा वाचून लोकांचे गैरसमज होऊ नयेत म्हणून लिहितो आहे.

In reply to by अनुप ढेरे

डाळीतले खडे किंवा वजनात मारलेला रवा ते बिनव्याजी कर्ज वगैरे मला शब्दच्छल वाटला म्हणून आमचा आपला कंट्री विनोद साहेब. यात वाद वगैरे काय दिसला. दंड आणि व्याज दोन्ही भरावा लागतो हे तुमचे म्हणणे मान्य आहे. तसे स्पष्ट लिहिले सुद्धा. आणखीन काय करायचे ? आणखीन काही चुकले बिकले असेल तर माफी असावी.

In reply to by अप्पा जोगळेकर

बिनव्याजी कर्ज वगैरे मला शब्दच्छल वाटला ? मित्रामित्रात दिलेले हात उसने म्हणजे कर्ज नाही का? आणखीन काही चुकले बिकले असेल तर माफी असावी. ओके. पण तुम्ही पुन्हा : नंतर आपण न वाचलेली अट म्हणजे 'हिडन चार्ज' असे होऊ नये. पंगा घेतायं !

In reply to by विशुमित

नंतर आपण न वाचलेली अट म्हणजे 'हिडन चार्ज' असे होऊ नये. पंगा घेतायं !>>> -- अजून टांग हवेतच आहे? मतलब गिरणे वाले नही हे ओ...

In reply to by अप्पा जोगळेकर

आणखीन काय करायचे ?
'कार्ड पेमेंट वेळेवर केली नाही तर व्याज लागत नाही.' असली चुकीची विधानं आत्मविश्वासाने करायची नाहीत.

In reply to by अनुप ढेरे

ओके. थँक्यू ढेरे सर. 'बिनव्याजी कर्ज' या विषयावरील प्रदीर्घ मार्गदर्शनासाठी शतशः आभार. अवांतर- तुम्हालादेखील संक्षी सरांसारखाच २% सरचार्ज पडतो का ?

In reply to by अनुप ढेरे

ओके. नेक्श्टाईम ४००+ भरुन पाहा. आणि सरचार्ज रिक्रेडिट होतो का ते चेकवा. होईलच.

In reply to by अप्पा जोगळेकर

हजार रु.चं भरलं होतं. क्रेडिट कार्डाला लागले चार्जेस. रिक्रेडिट झाले नाहीत. एक समजत नाही, प्रत्येक कार्ड, बँक अकाउंट वेगळे वेगळे प्लान्स ऑफर करतात. प्रत्येक जण आपापल्या कार्डाचेच प्लान्स युनिव्हर्सल आहेत अशा प्रकारे का भांडतोय? मला क्रेडिट कार्डाला चार्जेस पडतात. ते चार्जेस नसलेली क्रेडिट कार्ड देखील असतात.

In reply to by अनुप ढेरे

आता दिशाभूल क्रेडिट कार्ड एजंत्स जास्तं करतात. चार्जेस अस्तात पण सांगताना झिरो चार्जेस सांगणे वगैरे. अगदी अगदी. म्हणूनच डोळसपणे कार्ड घेण्यात हंशील आहे. नंतर आपण न वाचलेली अट म्हणजे 'हिडन चार्ज' असे होऊ नये.

तर बेंबट्या हे लोक हे असेच. हे असले लोक आमच्यावेळी देखील होते हो. अरे बैलगाडी च्या पुढे मजल नाही गेली यांची. आगगाडी आल्यावर ओरडायला लागले असला प्रवास भीतीदायक , अपघात होणारच , आम्हाला कसे झेपणार वगैरे अरे कोयना धरण चालू केले तर म्हणू लागले पाण्यातील वीज (ऊर्जा) काढून घेऊन सत्वहीन पाणी शेतीस मिळते तस्मात धरण बंद करा वगैरे .. आहेस कुठे तू .. त्यामुळे जगातील सर्वच प्रगत देश कमीत कमी रोकड वापरून व्यवहार करत असताना,त्याचे फायदे दाखवून देत असताना, तंत्रज्ञानाचे फायदे घेत असताना हे लोक थुक्क्की लावून नोटा मोजणे कसे व्यवहार्य असे ओरडा करून सांगणारच हो (आम्ही बदलत नसतो आणि इतरांना देखील बदलून देत नसतो हां . ) . उद्या एखादा कोणी म्हटलाच समज की मशीन वापरून पैसे दिलेत तर बँकेच्या व्यवहारासाठी २% जास्त लागतील पण रोकड दिलीत तर बिल न देता तेवढेच पैसे घेतो,तर हे भामटे २% जास्त लावले म्हणून सरकारलाच शिव्या देतील, रोकड मोजतील आणि मिपावर भ्रष्टाचार संपत कसा नाही याच्या गरम गरम गोष्टी रंगवतील. सरकार कोणत्याही हेतूने का असेना ढकलत आहे ना कमी रोख व्यवहारांकडे. मग ढकलू द्या की. उत्तमच आहे. किमान आपल्यासारखे शिक्षित लोक तरी सुरवात करू. उत्तम हेतू आहे की . अर्थात "कोणते" सरकार आहे हे बघून मग हेतूचा विचार करायचा असेल तर .. तर बेंबट्या तूच विचार कर .. . आकाशात उपग्रह सोडला कि खाली निघणाऱ्या धुराचा आणि धुरळ्याचा लोकांना कसा त्रास होतो असेही बोलू शकणारे आणि तेवढाच विचार करू शकणारे हे .. तस्मात बेंबट्या , हे लोक हे असेच .. काय समजलेस ?

In reply to by सुज्ञ

विनोदी प्रतिसाद.... http://www.german-way.com/germanys-cash-culture-geld-stinkt-nicht/ थुक्की लावून नोटा मोजणे नक्कीच व्यवहार्य आहे. इंटरनेट चालत नाही. कार्ड मशीन बंद पडलंय. कार्ड नेटवर्क बंद पडलंय. आम्ही फक्त विसा घेतो मास्टरकार्ड नाही. तिथं कोल्ड हार्ड कॅश ही नेहमीच कामी येते. सरकार कोणत्याही हेतूने ढकलत आहे हे डोळे (आणि मेंदू) बंद करुन एकदा मान्य करायचे ठरवले की ते उत्तमच हे आपोआपच ठरणार. कॅश स्वरुपात पैसे वापरले की खर्च आपोआप कमी होतो. इलेक्ट्रॉनिक-प्लॅस्टिक मनी वापरले की जास्त खर्च होतो हे अनेक पर्सनल फायनान्स कन्सल्टंट आवर्जून सांगतात. http://www.daveramsey.com/blog/good-and-bad-carrying-cash

In reply to by आजानुकर्ण

आपले प्रतिसादात अत्यन्त हास्यास्पद असतात .. त्यामुळे आपण ते टंकण्याचे कष्ट घेतले नाहीत तरी चालेल .आपल्या प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही . "कार्ड मशीन बंद पडलंय. कार्ड नेटवर्क बंद पडलंय. आम्ही फक्त विसा घेतो मास्टरकार्ड नाही. तिथं कोल्ड हार्ड कॅश ही नेहमीच कामी येते" हा आपला प्रतिसाद म्हणजे "पाणी संपल्यास दगड नेहेमीच कामी येतो आणि तो कुठेही मिळतो . पाणी दुर्मिळ आहे" छाप आहे . तस्मात आपले लेखनश्रम कमी करा

In reply to by सुज्ञ

=)) =)) =)) न्यूटनचा इनर्शियासंबंधीचा नियम फक्त जड वस्तूंनाच नाही तर मानवी मनाला पण लागू होतो. त्यातून, मनात काही गुप्त हितसंबंधांना धोका होण्याचा संशय मनात असला तर अधिकच जास्त लागू होतो ;) :)

In reply to by सुज्ञ

बरोबर आहे, ह्या लोकांची वृत्ती अशी असते की स्वत: काही करायचे नाही आणि कोणी दीर्घकालीन चांगल्या परिणामांसाठी बदल करू पाहत असेल तर स्व:चे बुद्धीकौशल्य वापरून जनतेची दिशाभूल आणि बदल करू पाहणार्याचे पाय ओढायचे .

In reply to by ओम शतानन्द

मला वाटते आधार कार्ड च्या वेळेस पण जनतेने असेच समर्थन करायला पाहिजे होते. बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते. आता पर्यंत सगळी सरकारी अनुदाने प्रत्येकाच्या खात्यावर जमा झाली असती. बँक खाती आपोआप काढली असती लोकांनी आणि जन धन योजनेची गरज पण भासली नसती. पण नाही ना काँग्रेस होती त्यावेळेस, कसे समर्थन करतील... (चुकीचे गृहीतक असेल तर जाणकारांनी मार्गदर्शन करावं )

In reply to by विशुमित

बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते.
हे झाले नाही असं आपण कुठल्या आधारावर म्हणत आहात? कि आपल्याला असं म्हणायचं आहे कि बुद्धिजीवींनी तसं केलं नाही म्हणून आधार कार्ड म्हणावं तितकं यशस्वी होऊ शकलं नाही?

In reply to by विशुमित

बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते. भारतातले बहुतांश तथाकथित बुद्धिजीवी हातातल्या झेंड्याला आणि स्वतःच्या हितसंबंधाला सोईचे मार्गदर्शन करतात, असा इतिहास आहे, हे काही गुपीत नाही ;) :)

विषय चांगला आहे. वर जवळ जवळ ३९५ प्रतिक्रिया आहेत, त्यातील सगळ्या नसल्या तरी खूपशा वाचल्या. कॅशलेस व्यवहार होण्याने भ्रष्टाचार जरी थांबला नाही तरी अश्या पैशाचा वापर कसा व कुठे करायचा हा प्रश्न उद्भवेलच त्यामुळे भ्रष्टाचारावर थोडाफार अंकुश हा लागणारच. पण मला पडलेला एक प्रश्न आहे जो मी अश्याच एका पोस्टवर उपस्थित केला होता, ज्यावर फारश्या प्रतिक्रिया किंवा उत्तरे आली नव्हती. ज्या वेळी एखाद्या गावात जिथे दिवसातले काहीच तास वीज आहे, इंटरनेट नाही किंवा असलेले इंटरनेट फारसे वेगवान नाही, व्यवहार करणारी जनता अशिक्षित आहे अश्या ठिकाणी हे कॅशलेस व्यवहार कसे होणार ? आजही गावातील एखाद्या शेतकर्याच्या बैलगाडीचे चाक दुरुस्त करायचे असेल त्यावेळी तो गावातल्याच एखाद्या लोहाराकडे जातो, आपले काम करून घेतो आणि रोखीने पैसे देतो. ह्या ठिकाणी कॅशलेस व्यवहार कसे होणार ? हाच प्रकार एखाद्या आडवाटेवर असलेल्या हॉटेलबाबत घडू शकतो. जर तेथे वीज, इंटरनेट नसेल तर कॅशलेस व्यवहार कसे होणार ? मिपाच्या वाचकांनी ह्या बाबतीत काही माहिती दिल्यास आभार.

In reply to by सौन्दर्य

कॅशलेस होणं हे अंतिम उद्दिष्ट आहे. तिथे पोचेपर्यंत बराच प्रवास करायचा आहे. आत्ताचं हे कदाचित दुसरं किंवा तिसरं पाऊल असावं. पुढे किती पावलं जायला लागेल त्याला किती वेळ लागेल हे नक्की कोणालाच सांगता येणार नाही. तुम्ही म्हणताय तसं अगदी कोपऱ्यातल्या गावात जिथे अगदीच सगळाच प्रॉब्लेम आहे तिथे शेवटपर्यंत रोख वापरली जाईलच. त्यासाठी नोटा उपलब्ध आहेत. अगदी ३० डिसेंबर पासून १ रुपया ते २००० रुपयांपर्यंत सगळ्या नोटा अवैध ठरणार अशी परिस्थिती नाहीये.

In reply to by संजय क्षीरसागर

याचा तसं म्हणलं तर काही संबंध नाही. मी पूर्णपणे भारतीय आहे, भरपूर वर्षे भारतात राहिलेलो आहे. अगदी एटीएम नसल्यापासून बँक सेवा वापरात आहे. एटीएम आल्यावर लाईनीत उभा पण राहिलेलो आहे व एटीएममध्ये पैसे नसण्याचा अनुभव पण घेतला आहे. खरं तर मी हा प्रश्न विचारायला नको पण तरी तुम्ही मला विचारलाच आहे तर मी पण विचारतो - तुम्ही कधी परदेशात खूप महिने/ वर्ष राहिला आहात का? नाही म्हणजे तुम्हाला कॅशलेस मधून एकदम फक्त कॅश मध्ये आल्यावर कसं वाटतं याचा अनुभव आहे का एवढंच मनात आलं म्हणून विचारलं.

In reply to by सौन्दर्य

वर टाकलेला प्रतिसाद परत एकदा टाकतो - "मला नाही वाटत कि भारत सरकार (कोणत्याही पक्षाचं असो) कधीही पूर्ण कॅशलेससाठी प्रयत्न करेल! कमीतकमी मला तरी "कॅशलेस = कशासाठीही रोख चालणार नाही" असा अर्थ अभिप्रेत नाही तर "कॅशलेस = कशासाठीही रोख नसले तरी चालणार" असा अभिप्रेत आहे." "सरकार आपण म्हणता ते प्रॉब्लेम्स न सोडवता अचानक एके दिवशी कॅशलेस म्हणजे बाजारातून सगळी रोख रक्कम काढून घेण्याचा निर्णय जाहीर करणार आहे " असा अपप्रचार/बुद्धिभेद करण्याने काय साध्य करायचे असते हे जगजाहीर आहे. आपली सोय होते म्हणून फक्त रोखीने व्यवहार करायचा एवढा एकच हिशेब जमेस धरायचा आणि ते केलेले रोख व्यवहार करप्रणालीत येतात कि नाही हे बघणं वजा करायचं - अजब अर्थशास्त्र आहे. मी कार्डने सामान खरेदी करतो, ऑनलाईन वस्तू खरेदी करतो, पेट्रोल भरतो, जेवणाचे बिल देतो, इतर सर्व बिले भरतो आणि याला चार्ज लागत नाही (या अर्थाने कि मी रोखीत व्यवहार केला असता तर तेवढेच पैसे पडतात) हे कितीही वेळेला सांगितले तर ते असे असूच शकत नाही, चार्जेस छुपे असतील असा महिन्यात काय अर्थ आहे? उलट चार्जेस मला वैयक्तिक पडत नाहीत हे मान्य करून ते कसले कार्ड आहे, असे कार्ड सगळ्यांना घेता येते का आणि येत असेल तर इथे आपण सगळ्यांना ती माहिती पोहोचवणे जास्त संयुक्तिक आणि योग्य नाही का? पण तसे होताना दिसत नाहीये उलट कार्ड वापरणे म्हणजे स्वतःचे २% जास्त देणे हा एकाच हेका दिसत आहे. तस्मात - म्हणणे एकच आहे - जरी चार्जेस पडत असतील तरी ते कन्विनियन्स चार्जेस आहेत असे मान्य करणार्यांनी कॅशलेस व्यवहार करून लपवालपवी करणाऱ्या व्यावसायिकांना संधी न दिल्याच्या आनंदात रहावे आणि ज्यांना असे कन्विनियन्स चार्जेस म्हणजे आपल्या पैश्यावर डल्ला आहे असे वाटते त्यांनी रोखीने व्यवहार करावा. उगाच नोटबंदीमुळे झालेल्या तात्पुरत्या चलनतुटवड्याला जमेस धरून सरकार जबरदस्ती करतेय वगैरे म्हणणे हा शुद्ध राजकारणी डाव आहे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

+१०० आणि प्रसंगी, सोईचे असेल तेव्हा, हेच लोक "भारतातली सिस्टीमच लैच खराब अशी चर्चा करायला" सर्वात पुढे असतील आणि स्वीडन कसा कॅशलेस होऊ घातलाय याचे मनसोक्त गुणगान गातील. विनोदी वाटले तरी खरे तर हे वाक्य खूप दुर्दैवी आहे. :(

In reply to by सौन्दर्य

जगात कोठेही, या संबंधात सर्वात पुढे असलेल्या स्वीडनमध्येही, १००% कॅशलेसचा आग्रह नाही. शब्दशः अगदी अचूक शब्दप्रयोग "लेस कॅश" असा आहे. ज्या वेळी एखाद्या गावात जिथे दिवसातले काहीच तास वीज आहे, इंटरनेट नाही किंवा असलेले इंटरनेट फारसे वेगवान नाही, व्यवहार करणारी जनता अशिक्षित आहे अश्या ठिकाणी हे कॅशलेस व्यवहार कसे होणार ? जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? कालच रिझर्व बँकेनेही "रु२००० च्या खालचे व्यवहार कॅशने करण्यात हरकत नाही असे "टीव्ही९ मराठी" या वाहिनीने बातम्यात सांगितले आहे. जसे पेपरलेस म्हणजे व्यवहारात कमीत कमी कागदाचा वापर उर्फ "लेस पेपर" अस्ते, तसाच कॅशलेस हा शब्द व्यवहारात वापरला जातो, आणि प्रसंगी चतुर लोक त्याचा स्वतःचा विपर्यासी मुद्दा पुढे ढकलायला उपयोग करतात. तेव्हा काळजी नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? कालच रिझर्व बँकेनेही "रु२००० च्या खालचे व्यवहार कॅशने करण्यात हरकत नाही असे "टीव्ही९ मराठी" या वाहिनीने बातम्यात सांगितले आहे.
२००० हजारात बियाणे, खते, फवारणी औषधे मिळतात का हो ?

In reply to by मार्मिक गोडसे

अगोदर न केलेल्या अनेक गोष्टी आधुनिक शेतकर्‍यांनी अंगीकाराव्यात व स्वतःची प्रगती करून घ्यावी याला तुमचा विरोध नसावा. २००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही..
हे सर्व वापरण्यासाठी त्या भागात तशा सुविधा नसतील तर ?

In reply to by मार्मिक गोडसे

सुविधा नसतील तर आता जसं करतात रोखीमध्ये तसं करावं! अवांतर : १. सरकार ३१ नंतरही रोख पैसा पुरवू शकलं नाही तर त्यांना तेव्हा धारेवर धरता येईल, आताच त्या गृहिताकावर चर्चा करण्यात काहीच फायदा नाही. २. जर सरकार गावोगावी बँकेशी निगडित सुविधा पुरवू शकत नसेल तर सरकारला त्याबद्दलही धारेवर धरून सुविधा पुरविण्यास भाग पाडले गेले पाहिजे.

In reply to by मार्मिक गोडसे

२००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.
हे विनोदाने लिहिले का? कॅशलेसचा वापर आणि वाहनांचा वापर काही फरक आहे की नाही? अती व्हा.अ‍ॅ. च्या आहारी गेल्याची लक्षणे आहेत ही.

In reply to by मार्मिक गोडसे

हेच काही महिन्यांपर्यंत स्मार्टफोनबद्दल बोलले जात होते आणि त्यापूर्वी अनेकदा वेळोवेळी आलेल्या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल बोलले गेले आहे. तेव्हा शुभेच्छा ! कोणत्याही तज्ज्ञांच्या किंवा शंकेखोरांच्या अंदाजापेक्षा जास्त वेगाने जनता नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करते, हे जगभर वारंवार सिद्ध झालेले सत्य आहे ! तेव्हा आपल्या शेतकरी बंधूंच्या बौद्धीक कुवतीवर अविश्वास दाखविण्याची चूक करू नका. खेडेगावातून येऊन जगात झेंडा फडकवणार्‍या लोकांची उदाहरणे फार कमी नाहीत. आजही खेड्यांतले अनेक जण तुमच्या-माझ्यापेक्षा जास्त वरच्या जागांवर नाहीत याचे कारण बुद्धीमत्तेतला फरक हे नाही तर त्यांना तुमच्या-माझ्यासारखी शिक्षणाची व इतर संधी मिळाली नाही हेच आहे. मी कोणताच झेंडा हातात न घेतल्याने चांगल्या गोष्टीला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणायला मला काहीच हरकत वाटत नाही. सद्याच्या सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांची साखळी देश योग्य दिशेने पुढे नेईल असे मला वाटते व त्यात एक सजग नागरीक या नात्याने माझे शक्य ते योगदान द्यावे या मताचा मी आहे. उद्या याच (किंवा इतर कोणत्याही) सरकारने काही वाईट केले तर त्याला वाईट व चंगले केले तर त्याला चांगले म्हणायला मी विलंब करणार नाही. तुम्हाला, "जगात काही बदल घडणे शक्य नाही" आणि सर्वात महत्वाचे "सद्य सरकार काहीच चांगले करू शकणार नाही" असे ठरवलेच आहे असे दिसते, कारण ते साधण्यासाठी एक मुद्दा निकालात निघाला की विषय बदलून तुम्ही सतत गोलपोस्ट बदलत आहात. एक चलाख चाल म्हणून ते ठीक असले तरी त्यामुळे पुढे कितीही चर्चा केली तरी ती निष्फळच ठरणार आहे, नाही का ? तेव्हा, काही काळ वाट पाहू आणि ठरवू कोणाचा अंदाज बरोबर आहे ते ! त्याला फार काळ लागणार नाही. भारतीय अर्थकारणात या कारवाईचे सकारात्मक दृष्य बदल दिसायला तीन ते चार तीमाही (९ ते १२ महिने) लागतील. त्यावेळी, तुम्ही आम्ही इथे असूच विष्लेशण करायला. तेव्हा काही वेगळा खरा मुद्दा पुढे आला तर बोलू अन्यथा, लेट्स वेट अँड वॉच. धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

थोडावेळ पुर्वग्रह बाजूला ठेवा आणि माझे प्रतिसात पुन्हा एकदा नीट वाचा. मी कुठेही खेड्यातेल जनतेच्या बौद्धीक कुवतीवर अविश्वास दाखविलेला नाही. ज्या भागात विजेची खात्री नाही इंटरनेट नाही अशा भागातील जनता २००० च्या वरील खरेदी कोठलेही कार्ड वापरून कशी करू शकेल असे मी विचारले होते. जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? असे तुमचे म्हणणे होते. पुढे तुम्ही म्हणता,
२००० वरचे व्यवहार शेतकर्‍यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.
ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालवायला विज किंवा इंटरनेट लागते का? कार्ड आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला विज व इंटरनेट लागते, हे सध्या ज्या भागात नाही अशा जनतेला असे सल्ले देणे चुकीचे वाटते..

In reply to by मार्मिक गोडसे

तुमच्या मनातली समस्या सोडवायला सरकारने अगोदरच खालील सुरुवात केलेली आहे. अजून नवीन काही उपाय पाईपलाईनमध्ये असतीलच. Rupay Kisan Cards for farmers The Government through NABARD will also support Rural Regional Banks and Cooperative Banks to issue “Rupay Kisan Cards” to 4.32 crore Kisan Credit Card holders to enable them to make digital transactions at POS machines/Micro ATMs/ATMs. दुवा : http://timesofindia.indiatimes.com/Governments-digital-push-Top-11-ince…

In reply to by मार्मिक गोडसे

बँका, पाण्याचे पंप, मोबाईल फोन हवेवर चालतात का ? असे म्हटले तर राग येईल, पण तुमचा वितंडवाद प्रमाणाबाहेर गेला आहे. खालच्या कायप्पावरच्या विनोदाला तुम्ही सिद्ध करत आहात =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बँका, पाण्याचे पंप, मोबाईल फोन हवेवर चालतात का ? असे म्हटले तर राग येईल,
अजिबात नाही. किव येते तुमची असे फालतू प्रश्न विचारता म्हणून. बियाणे, औषधे, खतं बँकेत मिळतात का? जिकडे मिळतात तेथे विज व नेट नसते, कुठे कार्ड घासणार? बर्‍याच ठिकाणी दिवसा १२-१२. तास विज नसते, रात्री शेतात पाणी भरायला लागते. मोबाईलही तेव्हाच चार्ज करावे लागतात.

In reply to by मार्मिक गोडसे

मार्मिक, मला वाटते की काही दिवसांसाठी वाद थांबवावा. इथे आपण जे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहात त्याला सिद्ध करायला तुम्ही पुरावे देऊ शकणार नाही. दिले तरी ते मान्य होणार नाहीत. जे लोक अडचणींतून जातायत ते इथे प्रतिसाद द्यायला येणार नाहीत, आले तरी त्यांना ओवरस्मार्टगिरी दाखवून त्यांच्या अडचणी ह्या अडचणी नसून चोचले - खोटारडेपणा आहे असे म्हटले जाईल. इथे मिसळपाववर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही व गरज तर अजिबातच नाही. इथले प्रतिसाद वाचून सरकारातली मंडळी देशाची ध्येयधोरणं ठरवत नसावी. हे मी उद्वेगातून म्हणतोय असे नव्हे तर गेल्या चार दिवसात शांत राहून विचार केला आहे. म्हणून ह्या विषयासंबंधी सर्व धाग्यांवर वाचनमात्र राहायचे ठरवले आहे. पण तुम्हा दोघांच्या प्रतिसादाची दिशा बघून ह्या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद देतो आहे. मे २०१६ ते ऑक्टोबर २०१६ ह्या सहा महिन्यातला सर्व काळ (२४ बाय ७) मी शेतकर्‍यांसोबत काम केले आहे. तेही एका गावातल्या नव्हे तर नाशिक, नगर, पुणे ह्या तीन्ही जिल्ह्यातल्या सुमारे १६ तालुक्यांतल्या अनेक गावांमधल्या. यात अनेक कोट्याधिश ते कफल्लक असे सर्व प्रकारचे शेतकरी बघितले. शेतकर्‍यांपासून मागे जाणारी व पुढे जाणारी सर्व सप्लाय चेन बघितली. बीयाणे, औषधे, अवजारे, मोटारगाड्या, पंप, वीजपुरवठा, मोबाईल-रेंज, बॅन्कांची उपलब्धता, होणारे व्यवहार हे सर्व ८ नोव्हेंबरचा तमाशा सुरु व्हायच्या आधीच बघितले होते. (सुदैवाने ५ नोव्हेंबरपासून ते काम सोडले आणि नाशिकमधे परत आलो) आपल्या नागरी व्यवस्थेमधे अनेक स्तर आहेत. प्रत्येक स्तर हा दुसर्‍यापेक्षा भयंकर वेगळा, मध्यम वेगळा, किंचित वेगळा ह्या प्रकारात दिसतो. ह्यातल्या कोणत्याही स्तरातल्या व्यक्तिला दुसर्‍याच्या स्थितीकडे दुरुन डोंगर साजरे ह्या उक्तीनुसार बघावे लागते. मजा आणि त्रास हे प्रत्येक स्तरातल्या त्या त्या स्थितीप्रमाणे त्या त्या व्यक्तिला मिळतातच. त्याची तुलना होऊ शकत नसते. त्यामुळे दुसर्‍याची स्थिती प्रत्यक्ष भोगल्याशिवाय, बघितल्याशिवाय समजत नाही हे मागच्या सहा महिन्यात मला कळलेलं आहे. दोन जिल्ह्यातली, दोन शहरातली, दोन गावातली, दोन वस्तीतली, इतकंच काय तर अगदी आजूबाजूला शेत असलेल्या दोन शेतकर्‍यांचीही परिस्थिती जमीन-आसमान असते. जजमेंटल होण्यात अर्थ नाही. म्हात्रे सर व तुमच्या, दोघांच्याही मुद्द्यात अर्धसत्य आहे. ते पूर्ण चुकीचे किंवा पूर्ण बरोबर नाही. आता कोण कोणत्या अ‍ॅन्गलने बघतो इतकंच तिथे बाकी राहतंय. ग्रामीण अर्थव्यवस्था (म्हणजे व्यवहाराची पद्धत) शहरी भागापेक्षा कैक बाबतीत वेगळी पडते. तिथे अनेक समस्या आहेत. (त्या समस्या आहेत म्हटले की ७० वर्ष पुढे केली जातात, पण नवीन धक्काव्यवस्था आणतांना सत्य लक्षातच घ्यायचे नाही का हा प्रश्न मला सतत पडत आहे.) पण अनेक सुविधाही आहेत हे सत्यही नाकारले जाऊ शकत नाही. (म्हणजे सत्तर वर्ष झाले तरी सर्वत्र बैलगाड्याच चालू आहेत असे दिसत नाही) बी बीयाणे औषधे घ्यायला शेतकरी जवळच्या दुकानात जातात. हे जवळचे दुकान १ किमी पासून २०-२५ किमी इतके असू शकते. (ह्यापेक्षाही जास्त दूर असू शकते, पण ती थोडीशी दुर्मिळ बाब आहे, असत्य नव्हे) तर मोठ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी अत्याधुनिक व्यवस्था असलेली दुकाने आहेत तशीच अगदी टपरीवजा चालणारी दुकानेही आहेत. संगणकिकृत बील मिळते, हे संगणक थेट इन्टरनेटशी जोडलेले असतात, दुकानदार थेट नेटबॅन्किंगही करतात, किंवा बॅन्केत जाऊन आरटीजीएस सुविधांचा वापर करुन कंपन्यांना पेमेंट करतात. काही दुकानदार कच्च्या चिठ्ठ्या लिहून पावती देतात. पण दुकान कसेही असो, शेतकर्‍यांकडून बीलाचे पैसे घेतांना ९९% केसेस मधे 'रोखच' घेतली जाते हे माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार बघितले आहे. अगदी मोठी बीले जी वार्षिक चुकवली जातात - जसे की डाळींब, द्राक्ष, यांचे उत्पादक-शेतकरी - ती चेकने चुकवली जात असावीत असा अंदाज आहे. देणेकर्‍यांने उधार बुडवू नये म्हणून आजकाल दुकानदार संघटना उधारखाते सुरु करण्याआधी अनामत किंवा ब्लॅन्क चेक ठेवून घेते. नक्की प्रमाण सांगता येणार नाही पण उधार व रोख हे दोन्ही प्रकार दुकानात मजबूत चालतात. बियाणे व खते ह्यासाठी आगावू रोख मोजावी लागते तर वेळोवेळी लागणारी औषधे, दुय्यम खते ह्यासाठी साधारणपणे उधारी दिली जाते. बियाणे व खते ह्यांच्यासाठी दुकानदारालाही आगावू रक्कम भरली तरच माल दुकानात पोचतो. साधारण सर्वांना मार्चाखेर उधारखाती चुकवावी लागतात. शेतकरी पिक विकले जाईल तसे पैसे फेडत जातो. जिथे पिके थोड्या काळाची व नगदी चटकन पैसा देणारी जास्त प्रमाणात होतात तिथे रोख वर जास्त भर आहे तर जिथे जास्त काळ चालणारी व घुमून फिरुन पैसा देणारी पिके आहेत तिथे उधारी जास्त होते. तर ह्या व्यवस्थेत मुद्दा आहे की शेतकर्‍याला मोबाईल-कार्ड-चेक वापरुन व्यवहार शक्य आहेत का? ह्याचे उत्तर नरो वा कुंजरोवा असेच देता येईल. शक्य ही आहेत आणि नाही सुद्धा. सर्वात महत्त्वाची ती सुविधा व क्षमता. काही गोष्टी समर्थक व विरोधक दोन्ही पक्षांनी डोळे उघडे ठेवून पूर्वग्रह बाजूला ठेवून समजून घेतल्याच पाहिजेत. ही आताची चालू परिस्थिती आहे, भविष्यात काय होईल याबद्दल अटकळी बांधणे तूर्तास दोन्ही पक्षांनी सोडले पाहिजे. बॅन्कांचे जाळे पुरेसे नाही, रेंज नाही, साक्षरता नाही, वीज नाही, ह्या गोष्टी आहेतही आणि नाहीपण. मुख्य गावापासून सुमारे २५-५० किमी दूर असलेल्या गावांमधे लाखोची उलाढाल होत नाही हे सत्य नव्हे. फक्त ती रोज रोज होत नाही हेही सत्य आहे. अशा दुरच्या गावातल्या लोकांना सामान आणायला मुख्य जवळच्या गावात जावे लागते जिथे बॅन्का, रेंज, वीज, सगळं असतं. तिथे ते व्यवहार मोबाईल, कार्डने करु शकतात. गावातल्या गावातले व्यवहार छोट्या रकमेचे रेंज वीज वगैरे असेल तर शक्य आहे किंवा नाही. हे बायनरी आहे. तिथे कॅश लागेल व लोक कॅशच वापरतील. तेव्हा तो कॅशलेसचा बाऊ करण्यात अर्थ नाही असे समर्थक लोक म्हणत आहेत. पण ही भविष्यातली नाही तर आत्ता करंट सिचुएशन बघून म्हणणे योग्य आहे काय हे तपासावे लागेल. बॅन्का तयार नसतांना अचानक हजार स्वाईप मशिनची गरज त्या एखाद्या गावात कशी ताबडतोब पुरवू शकतील? त्यासोबत अचानक लाखभर खातेधारकांना कार्ड-मोबाईल बॅन्किंग शिकवणे कसे शक्य होईल? असे अनेक प्रश्न एका रात्रीतून अचानक सुटतील असे मानणारे इथे कुणी असतील असे वाटत तर नाही. असतील तर गांजाचा अंमल पुरेपुर चढलाय असं समजूया. ठिक आहे, थोडा वेळ लागेल, मग तोवर काय करायचं? उधारी करायची, अमुक तमुक करायचं. किती काळ? महिना, दोन महिने, तीन महिने? सतत नकारात्मक का बोलता असं अनेक जणं इथं विचारतील. 'नुसतं' सकारात्मक 'बोलून'ही उपयोग नाही किंवा जग कुठे चाललंय असं कुत्सितपणे बोलुन अमेझॉन-गो च्या कल्पनेचा (प्रोटोटाईप-कन्सेप्ट) विडियो टाकून उपयोग नाही. ते जग प्रत्यक्षात असेल आणि मग कुणी तक्रार करत असेल तर त्याला जोड्याने मारण्यालायकच समजले पाहिजे. सरकार आता पूर्ण १४ लाख कोटीची करन्सी आणणार नाहीच असे दिसते आहे, म्हणजे लेसकॅश हे वास्तव असणार. आता मी गेला महिनाभर नाशकातच आहे, बाहेर कुठेही गेलो नाहीये, त्यामुळे इतर ठिकाणी नक्की काय स्थिती आहे ह्यावर मत देणं उचित नाही. पण एवढं इमॅजिन करु शकतो की बॅन्क-चेक-कार्ड-मोबाइल-रेंजही नाही आणि रोख पैसाही नाही (देशभरातले ३५% एटीएम चालू आहेत - जे अल्पावधीत कॅशलेस होतात) अशा अवस्थेत काय सकारात्मक विचार करता येईल-बोलता येईल. परंतु अशा अवस्थेतल्या लोकांना प्रत्यक्ष भेटल्या-बोलल्याशिवाय नक्की काय परिस्थिती आहे ह्याबद्दल सकारात्मक-वा-नकारात्मक बोलणे योग्य ठरणार नाही. चेकद्वारे मोठ्या आकड्यांचे व्यवहार. मोठ्या आकड्यांचे व्यवहार चेकद्वारेच होत असतात. पण दोन-तीन लाख पर्यंत रकमा साधारण हाताळल्याच जातात. दुसरं असे की व्यापार्‍याने चेक देऊन फसवण्याचे प्रकार घडू शकतात म्हणून चेक-आधारित व्यवस्थेवर विश्वास कमी आहे. (त्याचेही अनुभव ह्या सहा महिन्यात दिसलेच आहेत) चेक बाउन्स झाला तर कोर्टकज्जेगिरि करत बसणे परवडत नाही (ह्यात सरकार काय मदत करु शकणार ते माहित नाही). काही चेक क्लिअर व्हायला १५ दिवस लागलेले हा माझा स्वतःचा अनुभव आहे. घोडेगावात एका लोकल बॅन्केचा इशु केलेला चेक चाळीस किमी दूर नारायणगावात आणून भरावा लागतो कारण ती दुसरी प्रायवेट बॅन्क घोडेगावात नाही. तिथून ती प्रा. बॅन्क पुण्याला (लो बॅन्क सोबत टाय-अप असलेल्या प्रा. बॅन्केला) चेक कुरियर करते. सर्व तपासून तो चेक ती प्रा. बॅन्क तो चेक घोडेगावला कुरियर करते. असे बरेच झोल होतात व १२-१५ दिवसांनी चेक पास होतो व अकाउंटला पैसे शो करतात. (कुणाला विश्वास नसेल तर व्य नि करा. बॅन्केचे नाव व नंबर देतो स्वतः चौकशी करुन खात्री करु शकता.) शेतकरी इतके दिवस नाही थांबू शकत, शेतातलं पीक नाही थांबू शकत, मजूर नाही थांबू शकत, गाडीभाड्यावाला आणि असे अनेक देणेकरी नाही थांबू शकत. गावाखेड्यांमधले व्यवहार असे रेंगाळले तर जीडीपी नक्कीच गटांगळ्या खाईल. दोन चार दिवसांची म्हणून ही अडचण रेटत रेटत लोकांनी महिनाभर काढली. आता पुढे अजून किती शक्य आहे ते कळेलच व त्याचा परिणामही येत्या सहा महिन्यात कळेलच. असे लॉन्ग-रुट-चेक-क्लिअरिंग सारखे अनेक प्रश्न असतात, आहेत जे आपण इथे लॅपटॉप समोर बसून टिकटिक करत नाही इमॅजिन करु शकत. कुणी मांडले तर त्यावर शहाजोगी ओवरस्मार्टगीरी दाखवणे इतकेच सद्यस्थितीत आपल्या हातात असते. समस्यांवर उपाय आपल्याला दिसतात की अरे हा उपाय आहे, तो उपाय आहे, अमकं करु शकतात, तमकं करु शकतात. हे बोलणे सोपे आहे पण अचानक हातावर न चालता पायावर चालायला लावण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. कॅशलेस व्यवहारांना माझा विरोध नाही, कधीच नव्हता फक्त अपुरी व्यवस्था असतांना व जनमानसाला काहीच पूर्वसूचना न देता धाडकन तीव्र नोटाटंचाई लादणे व त्याला कॅशलेसचे गोंडस नाव देणे पटलेले नाही. (नोटाबदल आणि बाकीचा सर्व सावळा गोंधळ ह्यावर आता काहीही बोलणे उपयुक्त राहिलेले नाही) असो. ह्या सर्व चर्चांमधे एक प्रकारचा प्रचंड मोठा गॅप आला आहे. खूप खोल व लांब दरी आहे. एकाचे बोलणे दुसर्‍याला ऐकु जात नाहीये. त्यामुळे काही काळ गप्प राहिलेलेच बरे असे मला वाटत आहे. कोणीही कोंबडं झाकलं आणि कोणीही बांग दिली तरी सूर्य उगवायचा राहणार नाही व तो कोणत्या दिशेला उगवेल हे समर्थक-विरोधकांना दिसणारच आहे. इथे व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप-अपमान-धुरळा उडवून जमीनी समस्यांवर कोणतीही उपाययोजना होणार नाही. शहरी भागातल्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या गरजेपुरती माहिती मिळाल्याचा उपयोग सोडता सर्व चर्चांचे फलित मला तरी शून्य दिसत आहे. परत असो. माझ्यातर्फे विराम. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

हा प्रतिसाद एक नवीन काथ्याकुट म्हणुन आण मिपावर. नजीकच्या काळात या अँगलने चर्चा करणे उत्तम होईल.