✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Cashless

न
निओ१ यांनी
Sat, 11/19/2016 - 01:32  ·  लेख
लेख
नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत. १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट ३. औषधे - कार्ड पेमेंट ४. नेट बील - कार्ड पेमेंट ५. फोन बील - कार्ड पेमेंट ६. लाईट बील - कार्ड पेमेंट ७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट ८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट ९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट * यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते. त्यांनी ती घेतली होती. आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही, पण तेथे पण आता सरास कार्ड पेमेंट घेतात. प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी. नियमित असलेली २-३ दुकाने निवडली त्यांना माझे काम व माझे पैसे कसे रोख नसतात हे समजवले व त्यांना नेट बॅन्कीग शिकवले, त्यांच्या खात्यात त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले कारण नवीन पध्दतीने खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईल मासेज लगेच येतो व त्यांना कळते की ह्या व्यक्तीने पैसे दिले. दुसर्‍याला पैसे कसे द्यावे हे शिकवले, आपले पैसे, आपला पासर्वड आपला OTP कसा जपावा व का हे समजवले. हे झाले आमचे रामायण! पण गल्लीमध्ये अनेक असे होते की त्यांना हे समजणे अवघड होते. १. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. त्यांना त्याचा फायदा आता पण झाला या १० दिवसामध्ये व इतर काही गोष्टीमध्ये देखील. २. गॅस बुकिंग देखील करत होतो. पण आता रक्क्म जमा करताना अडचण येत होती, कारण माझा व्यवसाय, माझे उत्त्पन व मी भरत असलेली रक्क्म यात ताळमेळ करणे अवघड गेले असते. ९ तारखे पासून मी किमान माझ्या जवळपास असलेल्या व ऑनलाईन व्यवहार करत नसलेल्या अनेकांना नेट बॅकिंग व कार्ड वापरण्याचे फायदे शिकवले, काही शिकले काही धडपडत आहेत, पण शिकत आहेत. माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे. माझ्या हाती एवढे होते, तर एवढीच समाजसेवा करु शकलो. पुढील काही दिवस ही असेच निघून जातील. काही तासापुर्वीच एके ठिकाणी वाचले होते, तिरुपतीला १ मिनिटच्या दर्शनासाठी २४ तासाची किम्वा कधी कधी त्यापेक्शा मोठी रांग असते....! माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
17092 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

करा की विरोध माझ काय जातय

धनावडे
Wed, 12/07/2016 - 17:13 नवीन
करा की विरोध माझ काय जातय माझ्याकडे नोटाच नाहीत त्यामुळे बंदी घातली काय आणि नाही काय सारखच. आणि तुम्ही वाईला टवळाच गाव म्हणू शकता ते चालत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

सुश मय जी...

विशुमित
Wed, 12/07/2016 - 17:26 नवीन
वाई गावाला बोल्याबद्दल एवढं वाईट वाटून घेऊ नका हो.... आमच्या बारामतीला आणि बारामतीकरांना लोक (तुम्ही नाही बरका) उठसूट सारखे टोमणे आणि दगड मारत असतात, आम्हाला पण वाईट वाटतं पण काय करणार सहन करतोच ना आम्ही... तसे वाई मला खूप आवडते, त्यातल्या त्यात कृष्णामाईच्या वेळेस तर खूपच... कृपया गैरसमज नसावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

६-७ गावात एक शाखा आमच्याकडे

धनावडे
Wed, 12/07/2016 - 15:59 नवीन
६-७ गावात एक शाखा आमच्याकडे तर २०-२५ गावात एक पण नाय 20,कि मी लांबच पहिली बँक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

प्लास्टिक मनी वापरताय..

अभिजित - १
Tue, 12/06/2016 - 20:48 नवीन
प्लास्टिक मनी वापरताय...सावधान! Maharashtra Times | Updated: Dec 3, 2016, 11:52 PM ईस्ट एकीकडे ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळावी म्हणून प्रोत्साहन दिले जाते. मात्र सायबर गुन्हे रोखण्यासाठी मात्र यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक झालेली आहे त्याचा गेलेला पैसा परत मिळण्याची शक्यता कायदा असूनही धुसर झालेली आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/ravivar-mata/take-precaution-during-online-transaction/articleshow/55779597.cms जे प्लॅटिक मनी बाबत खरे आहे , तेच कॅशलेस बाबत पण खरे आहे. विचार करा ..
  • Log in or register to post comments

मी गेली दहा वर्षे ऑनलाईन

अमर विश्वास
Tue, 12/06/2016 - 22:20 नवीन
मी गेली दहा वर्षे ऑनलाईन व्यवहार करतोय तसेच डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड सर्रास वापरतो थोडीशी काळजी घेतली तर आपल्याला फसवणुकीची शक्यता कमी असते खिशात कॅश असतानाही पाकीट मारले जाऊ शकतेच ना? तसेच ऑनलाईनचे ही हल्ली two factor authentication मुळे ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आहे. प्लासिक मनी (डेबिट / क्रेडिट कार्ड ) वापरताना पुरेशी काळजी घेतली तर फारसा धोका संभवत नाही. तसेच transaction account आणि saving account वेगळे ठेवले तर एकूण रिस्क कमी करता येते तेंव्हा योग्य काळजी गया व कॅशलेस व्हा
  • Log in or register to post comments

स्वाइप मशिन माहिती

अजया
Wed, 12/07/2016 - 11:48 नवीन
स्वाइप मशिनचा डेमो नं एक आणि माहिती क्लिनिकसाठी मिळाली.हे IDBI बँकेने दिले आहे. (पुढच्या आठवड्यात HDFC बँकेकडून सवलतीत मशिन्स देण्याची आॅफर आणि डाॅक्टर लोकांना फुकटचे गिळायला, मुख्य म्हणजे प्यायला देऊन नोंदणी करुन घेणे असा एका रिसाॅर्टला प्रोग्रॅमच ठेवलाय!) IDBIअटी- बिझनेसचे करंट अकाउंट आवश्यक आहे. बँकेत एफ डी असणे आवश्यक आहे.पाच लाखाचे तरी! बाकी माहिती खालील फोटोत पहा. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

gprs rent

पैसा
Wed, 12/07/2016 - 12:00 नवीन
gprs rent महाग वाटते आहे. स्वतःचे सिम नाही का वापरता येत? http://www.mastercard.com/corporate/mpos.html आणि http://www.mswipe.com/mpos-plans.html याचीही चौकशी कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ओके.बघते हे पण.

अजया
Wed, 12/07/2016 - 12:29 नवीन
ओके.बघते हे पण. स्वाइप मशिन कितपत उपयोगी पडेल शंका येतेय. बँका चार्जेस वाढवत यात पैसा कमावणार नक्की. फक्त रोजचे बँकेत नेऊन भरण्याचे काम कमी होईल.पण बँक अगदीच शेजारी आहे.लागोपाठ चार बँका क्लिनिकच्या लाइनीत आहेत! त्यामुळे सध्याचे चेक आणि कॅश बरे पडतेय.त्यात आमचे उधार पेशंट अनेक.अतिपरिचयात् अवज्ञा! दुसरी मजा म्हणजे जो येतो तो गुलाबी गांधी माझ्याकडे सुटे करायला येतो! आता पंधराशे खाली सुटे देणे बंद करावे लागले आहे!जुन्या नोटेत देऊ का विचारते! मग लोक सुटे काढतात!मी तरी कुठून आणणार रोज शंभरचे जुडगे! एका ओळखीच्या ताईकडे पन्नासचा आहे म्हणे;) गोव्याला जायचा विचार करतेय ;) त्यामुळे सगळेच पर्याय वापरून बघते.
  • Log in or register to post comments

ये गोव्याला!

पैसा
Wed, 12/07/2016 - 12:37 नवीन
ये गोव्याला! इकडे ५० १०० ५०० काय पायजे ते मिळेल. गुलाबी गांधी देणार्‍यांना डॉ खर्‍यांचं औषध बरंय. १५०० चा चेक देते म्हणून लिहायला सुरुवात कर डायरेक्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

स्वाइप मशिन कितपत उपयोगी पडेल शंका येतेय !

संजय क्षीरसागर
Wed, 12/07/2016 - 12:47 नवीन
बँका चार्जेस वाढवत यात पैसा कमावणार नक्की. कार्ड स्वाइपींगवर मर्चंटला चार्जेस भरायला लागतात. ते तो कस्टमरला लावणार की नाही ? दाखवा म्हात्रे साहेबांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

=)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/07/2016 - 20:43 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अतिशय धोकादायक !!

अभिजित - १
Wed, 12/07/2016 - 20:29 नवीन
कॅशलेस होण्याकरता सरकार कोणत्याही स्तरावर जात आहे .. आत्ता पर्यन्त OTP म्हणजे मोठी सेफ्टी होती. आता नाही. तुमचा नंबर कोणाच्याही हाती लागला तर २ हजार च्या आतील व्यवहार OTP शिवाय होणार असल्याने कोणीही गैरफायदा घेऊ शकतो. http://www.loksatta.com/desh-videsh-news/otp-does-not-requires-for-online-transactions-till-rupees-2000-1356298/ दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना ओटीपी आवश्यक नाही ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी निर्णय लोकसत्ता ऑनलाइन | December 7, 2016 5:14 PM
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा