अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ निकाल
नमस्कार मंडळी,
अमेरिकेत मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होईल. भाप्रवे सकाळी ५.३० पासून मतमोजणी सुरू होईल. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडायच्या प्रायमरी सुरू झाल्यानंतर मिपावर त्याविषयी लिहायला सुरवात केली होती पण नंतर इतर काही कामांमुळे त्या धाग्यांवर पाहिजे तितक्या प्रमाणात लिखाण करता आले नव्हते. तेव्हा निदान भारतातील निवडणुकांच्या मतमोजणीप्रमाणे अमेरिकेतल्या या निवडणुकांच्या मतमोजणीवर लाईव्ह धागा काढावा हा मानस आहे. शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे. जरी रजा घेता आली नाही तरी कल स्पष्ट होऊन कोण अध्यक्षपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावरच ऑफिसला जायला निघणार आहे :)
अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेज हा महत्वाचा घटक असतो. याविषयी मी मिपावर पूर्वी इथे लिहिले आहे. या निवडणुकांसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे मते आहेतः
सध्याच्या विविध मतदानपूर्व चाचण्यांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे:
वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत.
नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे.
सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्यातले असेल.
तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच.

तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच. Book traversal links for अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ निकाल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नॉर्थ कॅरोलायना-जॉर्जिया
नॉर्थ कॅरोलायनामध्ये ट्र्म्प
नॉर्थ कॅरोलायना
ट्रम्पः २१६
चुरस
ट्रंप : -222 हिलरी : -2O2
ट्रंप : -222 हिलरी : -2O9
पेन्सिल्वेनिया
फ्लॉरीडा
मिशिगन-विस्कॉन्सीन
ट्रम्पः २३२
गूगल ला विचारा
निकाल
ट्रंप = २५४ हिलरी = २०९
वॉशिंग्टन
जॉर्जियामध्ये ट्रम्प
आता सी.एन.एन.वर अॅण्डरसन
जनमतचाचण्यांना दणका
सिनेट आणि हाउस सुद्धा
पेन्सिल्वेनिया-युटा
आयोवा
ट्रम्पला अजून २६ वोट हवी आहेत
इलेक्टोरल व्होट्स
पेन्सिल्वेनिया
:))
गूगल वर
हाउस जिंकले रिपब्लिकन पक्षाने
प्रचंड चुरस
नेट सिल्वर
गॅरी जॉन्सन आणि ती दुसरी बाई
४%
न्यू हॅम्पशायर
नेवाडा
ट्रम्पभौ जिंकतायत -
लेटेस्ट
ट्रम्प
आणि ऍरिझोना?
नाही
विस्कॉन्सिन्स , मिशिगन, अ
ट्रम्प 264
ट्रम्प ३०४+ ने जिंकण्याची
एक मूलभूत प्रश्न
नाही
अब की बार, ट्रंप सरकार!
जिंकले हो ....
Trump 268, Hillary 215
ट्रम्प तात्या जिंकले
या लोकसत्ता वाल्याच्या थोतरीत
ट्रम्पभाऊ अभिनंदन
ट्रम्पभाऊंचं अभिनंदन