भाजलेले मटण
सोलापुरला भाजलेले मटण म्हणुन एक खाद्य प्रकार मिळतो.
खाटिका कडुन मटण विकत घ्यायचे. त्याला सांगायचे की भाजुन घेण्यासाठी हवे आहे. म्हणजे तो मटणाचे थोडया वेगळ्या प्रकारे तुकडे करतो आणि चिरा मारुन देतो. बोनलेस पाहिजे असल्यास तसे सांगावे. हे मटण घेउन भाजणार्याकडे जायचे. ते लोक मटणाला त्यांचा पारंपारिक घरगुती मसाला लावुन काहि वेळ मुरत ठेवतात (मटणाला चिरा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जाण्यास मदत होते - अर्थात खाल्ल्यावर आग किती लागली पाहिजे हे सांगितल्यावर त्यानुसार मसाला लावला जातो). नंतर हे मटणाचे तुकडे कबाबांप्रमाणे लोंखंडी सळ्यांवर लावुन विस्तवावर भाजले जाते. मटन भाजुन देणार्यांची एकाच ओळीत ६-७ दुकाने आहेत. घरि येउन मटणाचा स्वाद घेतला जातो. (काहि 'विशिष्ट स्थितीतील' लोक तिथेच बैठक मारतात). मटण भाजणार्यांकडे कडक भाकर्याही मिळतात. ह्या कडक भाकर्या आणि त्या बरोबर भाजलेले मटण म्हणजे पुछो मत यार! पुढच्या वेळी सोलापुरला भेट द्याल तेव्हा हा रसानुभव घेण्यास विसरु नका! (जे लोक मांसाहार करत नाही त्यांना सोलापुरच्या गरमी मधे स्वतः भाजुन निघणे हाच एक पर्याय! असो.)
छायाचित्रे:


वाचने
5042
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सह्ही..
तोंडाला पाणी सुटले.....!!!
व्वा! व्वा!
तोंडाला पाणी
चीन मध्ये सुद्धा हा आयटम मिळतो !!
काय म्हणता?
In reply to चीन मध्ये सुद्धा हा आयटम मिळतो !! by अनिल हटेला
हो खर आहे
काय खतरनाक
लाजवाब ....
वॉव!