Skip to main content

नाते

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 26/07/2016 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच्या पलीकडचे जे नाते जुळले होते आदी असे न अंत तयाला ते कालातीत होते जुळले म्हणून होते म्हणू की होते म्हणून जुळले? प्रवाह होते नाते की ते अथांग सागर होते? पृथ्वीच्या गर्भातील अंकुर आकाशी भिडणारे पाखुर फुलातील मकरंद असे की प्रेमातील एक युगुल? ते आहे जोवर अर्थ जीवना जरी असे ते पलीकडले नाते जुळता शब्द थिटे अन् भावनाच खरी मज भासे! -------------
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1416
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

ग-ग्यांगबद्दल काही बोलू नकोस रे...तुझा आयडी टपकवायला इथे टपूनच बसलेले आहेत

शब्दांच्या पलीकडचे जे नाते जुळले होते शब्दांची गरज नसे तयाला खुणेने काम सहजी होते १२० - ३०० म्हणू की म्हणू माणिकचंद जर्दा दाने दानेमे केसर का दम किंवा असो सातारी जर्दा चिमटीभर गायछाप घेउनी मळुनी त्यावर केशरी चुना दाढेखाली अलगद ठेवत रामकृष्णहरी तुम्ही म्हणा ते आहे जोवर अर्थ जीवना जरी पुडी असे दुसर्या कडे मागायला शब्द कशाला, तळव्यावर बोट ठेवणे असे पुरे Tambhaku (चित्र अंजा वरुन साभार) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काऊ ष्टांम्प ऊठिवलाच लगेच.... सातारी जर्दावाल्या सोलापुरीचा पुणेरी मित्र नाखु