✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

प — प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Sun, 07/24/2016 - 08:35
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. कवीला मूक्ती भेटली काय, न भेटली काय कवीला स्वप्नात जगायची जन्मजात सवयच हाय मी तरी वास्तव जगात जगून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेतून सामाजिक प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या कवींना अजिबात काय कळतच नसतं. कविता पेनड्राइव्ह मधे भरुन पुस्तक काढीन म्हणतो, मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेशी प्रतारणा करुन कथा लिहिता येते, कवितेशी इमान राखणारे घरात कुढत बसतात, कवीचे नाव फक्त संदर्भापुरते घ्यायचे, काम झाले की वार्‍यावर सोडायचे पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ 'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.

प्रतिक्रिया द्या
22097 वाचन

💬 प्रतिसाद (67)

बेक्कार हसलोय राव!

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 08:41 नवीन
बेक्कार हसलोय राव!
  • Log in or register to post comments

आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 08:55 नवीन
मला आपलं लय टेन्शन होतं. हलकेच घेता की नाय म्हणतो. कविता इंजॉय केल्याबद्दल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मी तितका बेक्कार नाही हो

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 13:45 नवीन
मी तितका बेक्कार नाही हो जितके तुमचे "मित्र" समजतात. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे

कविता१९७८
Sun, 07/24/2016 - 08:49 नवीन
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. ओके
  • Log in or register to post comments

आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 08:53 नवीन
उगा, कुठलेही संदर्भ याला जोडू नका म्हणतो. मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो, मी बी काय तरी लिहीन म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या

संजय पाटिल
Sun, 07/24/2016 - 11:09 नवीन
मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो,>>> किती करायचेत बोला? ४००? ५००?.. बादवे विडंबन आवडले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे

कविता१९७८
Sun, 07/24/2016 - 12:23 नवीन
आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे सोडुन कधीबी अन कुटबी प्रतिसाद देणार्‍या आयडीने इथे प्रतिसाद द्यावा तो ही पहीलाच यातच सगळ आल की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा अस व्हय.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 12:38 नवीन
आता त्यांच्या रचनेची आम्ही मोड़तोड़ केली आता त्यांनी येऊन बघितलं, आता त्यावर ते काय बोलले तर तो माझा दोष का ? असो, आपल्याला वाटलं ना, त्यांचं माझं कनेक्शन आहे, तर आहेच म्हणतो. कशाला नाय म्हणू.....(तसं माझं जवळ जवळ सर्वच मिपाकरांशी कनेक्शन आहे) आपल्या विचाराला मी थांबवू शकत नाही. आपला रविवार सुखात जावो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

ते पण दोन दोन प्रतिसाद !

हेमन्त वाघे
Sun, 07/24/2016 - 14:01 नवीन
हा हा ha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

+100

नूतन सावंत
Mon, 07/25/2016 - 11:27 नवीन
+100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

कविता,100%सहमत,स्वतः चाच

नूतन सावंत
Mon, 07/25/2016 - 11:31 नवीन
कविता,100%सहमत,स्वतः चाच ढाव्यावर निम्म्यापेक्षा जास्त प्रतिसाद देऊन शिळे वाङ्मय पुन्हा प्रसारित करणार्यांचा पहिलाच इतरांच्या धाग्यावरचा प्रतिसाद पहिला,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

सुरंगी तै

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/25/2016 - 11:39 नवीन
विडंबन आवड़लं की नाही ते पण सांगितलं असतं तर लिहिण्याचा हुरूप वाढला असता हो.... :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

बिरूटे सर यू टू????

खालीमुंडी पाताळधुंडी
Tue, 07/26/2016 - 17:13 नवीन
बिरूटे सर यू टू???? मुटे=बिरूटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> स्वतः चाच ढाव्यावर

उडन खटोला
Mon, 07/25/2016 - 14:32 नवीन
>>>> स्वतः चाच ढाव्यावर म्ह्न्जे? मुटेण्चा ढावा/बा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

साताजन्माचं कनेक्शन हाय

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 14:09 नवीन
होय. डॉ. प्रा. बिरुटे आणि माझं साताजन्माचं कनेक्शन हाय. १) कलियुगात मी त्यांचा खापरजोबा आहे आणि ते माझे पणतू आहेत. २) संतयुगात ते तुकाराम होते आणि मी जगनाडे ३) कृष्णयुगात ते बलराम होते आणि मी दुर्योधन ४) रामयुगात ते साक्षात रामच होते मी कुंभकर्ण एवढं मुखोद्गत झालं की सांगा नंतर मी त्याआधीचे ३ कनेक्शन सांगतो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

जनम जनम का साथ

हेमन्त वाघे
Sun, 07/24/2016 - 14:52 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

भारीये

कविता१९७८
Sun, 07/24/2016 - 15:10 नवीन
भारीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

धागा बिरुटेजीन्चा आहे, मी

कविता१९७८
Sun, 07/24/2016 - 17:21 नवीन
धागा बिरुटेजीन्चा आहे, मी प्रतिसाद त्यानाच दिलेत आणि उत्तराची अपेक्षाही बिरुटेजीकडुनच आहे, दुसर्‍याने उगाच बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना होउ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

हे उत्तर मुटेना दिलय

कविता१९७८
Sun, 07/24/2016 - 17:22 नवीन
हे उत्तर मुटेना दिलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

लम्र विनंती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 17:47 नवीन
श्री मुटे आणि कविता १९७८ यांना विनंती की आपण माझ्या विंडंबनाला दाद दिली त्याबद्दल मन:पूर्वक आभार. बाकी काही चर्चा करायच्या असतील तर दोघांनीही माझ्या खरडवहीचा वापर करावा ही लम्र विनंती. नवीन प्रतिसाद आला की माझ्या मोबाइलवर ट्याव ट्याव असा टोन वाजून नोटिफिकेशन येतं. नवीन प्रतिसादात कोणी कौतुक केलं असं बघायला धावत येतो. (आत्ता बाथरुम मधे घुसत होतो परत यावं लागलं) आणि अवांतर बघून मूड जातो. प्लीज सहकार्य कराल अशी अपेक्षा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

कायेना बिरुटेजी नको खरडवही

कविता१९७८
Sun, 07/24/2016 - 18:11 नवीन
कायेना बिरुटेजी नको खरडवही.करु की तुमच्या धाग्याचे पण ५०० .आपल्या माणसाला मदत करावी म्हणून हो .तुम्ही मला पुस्तक नाही का पाठवणार ? मुटेंचा काय तो पंचनामा आणि जनम जनम का कनेक्शन कळु दे की सर्वाना. उगाच का मुटे राहतात बोका सारखा आयडी जातो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठीक आहे जशी आपली इच्छा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 18:15 नवीन
आपण माझ्या धाग्याचा खरडफळाच कारायचाच ठरवला तर.. आपणास मन:पूर्वक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

जशी आज्ञा

कविता१९७८
Sun, 07/24/2016 - 18:19 नवीन
जशी आज्ञा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझी सपशेल माघार.

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 18:22 नवीन
माझी सपशेल माघार. तुमच्या इच्छेचा माझ्याकडून मान राखला जाईल. या धाग्यावर माझ्याबद्दल कोणी कसेही बोलले तरी मी बोलणार नाही. मात्र अधून मधून वाचून आनंद मिळवायला नक्कीच येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही पण

सामान्य वाचक
Sun, 07/24/2016 - 18:26 नवीन
तुमच्या धाग्यावर फक्त 'लोकांच्या' प्रतिक्रियांच वाचायला जातो त्याच काय त्या चांगल्या, अभ्यासू, माहितीपूर्ण आणि 'अ'अपमानस्पद असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मूळ कविता आणी हे विडंबन

अभिजीत अवलिया
Sun, 07/24/2016 - 09:05 नवीन
मूळ कविता आणी हे विडंबन दोन्ही आवडलेले गेलेले आहे.
  • Log in or register to post comments

कुरकुरित भेंडी आवडली.

कंजूस
Sun, 07/24/2016 - 09:17 नवीन
कुरकुरित भेंडी आवडली. ( बाकी भेंडी कोणाचा बळी घेणार नाही याची खात्री आहे)
  • Log in or register to post comments

औरंगाबादी तडका, कवितेचा भडका.

अभ्या..
Sun, 07/24/2016 - 09:30 नवीन
औरंगाबादी तडका, कवितेचा भडका. मस्त जमलाय. लगे रहो.
  • Log in or register to post comments

जमलंय...

मुक्त विहारि
Sun, 07/24/2016 - 09:48 नवीन
जमलंय
  • Log in or register to post comments

मस्तं!

साती
Sun, 07/24/2016 - 10:04 नवीन
विडंबन आवडलं!
  • Log in or register to post comments

+१११

उडन खटोला
Sun, 07/24/2016 - 13:18 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

सर यू टू?????????

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 07/24/2016 - 10:15 नवीन
कोण आहे रे तिकडे? बिरुटे सरांनाही दोन घोट द्या बरे? सर अजुन काही हवे असले तर नि:संकोच सांगा. बाकी तुमच्या कविते बद्दल म्या पामराने काय बरे बोलावे? आवडली..... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आवडले!

संत घोडेकर
Sun, 07/24/2016 - 10:22 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments

छान. आपल्या आस्वादासाठी एक

एस
Sun, 07/24/2016 - 11:04 नवीन
छान. आपल्या आस्वादासाठी एक शेर ऐकवतो - बे(भे)सूर आळवावा, कवीला 'भाव' नाही! पण सुरसुरी आणली, जिल्बी पाडण्याने. ;-) (ह. घे.)
  • Log in or register to post comments

क्रिप्टीक

विनायक प्रभू
Sun, 07/24/2016 - 11:12 नवीन
फार फार क्रिटिक लिहीता बॉ. जरा सरळ समजेल असे लिहा बॉ. टिकल्या सांडल्या ना बॉ. तुम्ही सी.ई.टी. दिली नव्हती का प्रा. डॉ.?
  • Log in or register to post comments

९

विनायक प्रभू
Sun, 07/24/2016 - 11:13 नवीन
९ वर्षांचा हिशोब फिट्टं फाट
  • Log in or register to post comments

हाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 11:25 नवीन
सर, असा हिशेब पूर्ण केला तर. आपल्या धाग्यावर लक्ष ठेवण्यात येईल. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

यु टू प्रा डॉ ?! ;)

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 07/24/2016 - 11:25 नवीन
यु टू प्रा डॉ ?! ;) फक्कड जमलेय. :)
  • Log in or register to post comments

वाह व्वा. जबराट !

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/24/2016 - 12:00 नवीन
वाह व्वा. जबराट !
  • Log in or register to post comments

दोन घोट ??

हेमन्त वाघे
Sun, 07/24/2016 - 12:12 नवीन
डॉक्टर आपण दिलं खुश केलात असा दोन घोट नाही तर क्वार टर चा मजा आला जसा मुंबईत येण्याचा काही प्लॅन ? थोडे "बसू" , आणि बोलू!
  • Log in or register to post comments

विडंबन आवडले

ज्योति अळवणी
Sun, 07/24/2016 - 15:15 नवीन
विडंबन आवडले
  • Log in or register to post comments

वाहव्वा वाहव्वा......

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/24/2016 - 15:52 नवीन
इडंबन फर्मास बर्का सर....एक लंबर...!
  • Log in or register to post comments

लै भारी.

मितभाषी
Sun, 07/24/2016 - 16:44 नवीन
लै भारी.
  • Log in or register to post comments

दोन घोट कसले पिता म्हणे

सतिश गावडे
Sun, 07/24/2016 - 19:12 नवीन
दोन घोट कसले पिता म्हणे तुम्ही? ;)
  • Log in or register to post comments

कॉफीचे दोन घोट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 19:28 नवीन
कॉफीचे दोन घोट रे बाबा ! पुढच्या भेटीत कॉफी घेत घेत माझं कुठे कुठे कनेक्शन आहेत त्यावरही लिहीन म्हणतो... ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्ही पुण्याला या. तुम्हाला

सतिश गावडे
Sun, 07/24/2016 - 19:33 नवीन
तुम्ही पुण्याला या. तुम्हाला सीसीडीची कॉफी पाजू. अट एकच, कॉफी प्यायल्यानंतर "यापेक्षा टपरीवरील चहा बरा" अशी नावे ठेवायची नाहीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली

प्रचेतस
Sun, 07/24/2016 - 20:08 नवीन
कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली आहेत का हो? विडंबन म्हणून कविता छान. मूळ प्रेरणा वाचली असल्याने त्याबाबत पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वाचली 'नसल्याने' असे वाचावे.

प्रचेतस
Sun, 07/24/2016 - 20:08 नवीन
वाचली 'नसल्याने' असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तूच आगोबा.. तूच!

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/24/2016 - 21:55 नवीन
तूच आगोबा.. तूच! ल्लुल्लुल्लुल्लु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गावडे सरांनी

नाखु
Mon, 07/25/2016 - 08:36 नवीन
आधी टपरीवर चहा पाजून मग सी सी डी त (मुद्दाम) नेल्यास आपण इथे कॉफी साठी (मुळीच) आलो नाहीत हे वल्लींबरोबर राहून प्रा डाँना माहीत नसेल असे मला वाटत नाही. देव त्या दिवशी सी सी डीत उपयुक्त गर्दी ठेवो हीच प्रार्थना.. अता कवितेबद्दल ही कवीता कवींच्या व्यथेबद्दल भाष्य करते की प्रथेबद्दल यावर मुवींनी एक समीक्षण लेख लिहावा ही विनंती.शकयतो याच धाग्यात, मला प्रा डाँ चा एकतरी धागा पंच्शतकी पहायचाच आहे. मूळ अवांतर :(नेहमी प्रमाणे शेवटी) कवीता मस्त आहे पण उपमा मुद्दम सौम्य करून वापरल्या आहेत ते जाणवते (प्रत्यक्ष प्रा डाँना भेटलो असल्याने) अश्या "शाक भाजीची" अपेक्षा ठेवली नव्हती. मिपा वारकरी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा