सिरियस्ली घेऊ नका
"चॉकलेट नको मला"
"मग पाच रुपये सुट्टे दया"
"नाहीत माझ्याजवळ"
"मग ठेवा ती साखर अण निघा"
-----------------------------------------------------
डायल 198
डायल 3
डायल 9
"हेलो"
"नमस्कार, मी आपली काय सहायता करू शकतो?"
"मी पन्नासचा रिचार्ज मारला. त्रेचाळीस रुपये चा बॅलेन्स आल्याचा मॅसेज आला. दुकानाच्या बाहेर आलो की दोनच मिनिटांत त्रेचाळीस रुपये उडाल्याचा मॅसेज आला"
"तुमचा इंटरनेट ऑन होता"
"दोन मिनिटांत त्रेचाळीस रुपये? माझ्या 2G फोनला तुम्ही 5G सर्विस जोडली होती काय?"
"माफ़ करा पण तुमचा इंटरनेट पॅक नसल्यामूळे मेन बॅलेन्स मधुन डिडक्शन झाले. हवं तर मी तुम्हाला त्याचे डिटेल्स देऊ शकतो"
-------------------------------------------------------------------------
"सतराशे रुपये काउंटरवर भरले का?"
"हो"
"हे घ्या तुमचे रिपोर्ट आणि आंत जाऊन डॉक्टरांना दाखवा"
तो थरथरत्या हातात रिपोर्ट आणि गोळ्यांची कॅरिब्याग घेऊन आंत जातो.
"काळजी करायचे काही कारण नाही. तुमचे सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत."
"डॉक्टरसाहेब! आहो मला साधी सर्दी झाली होती ओ! त्यालाच तुम्ही सतराशे रुपयांच्या कसल्या कसल्या टेस्ट कराव्या लावल्या आणि तिनशेचे मेडिकल लिहुन दिले"
"आहो साधी सर्दीच् झाली होती तर मग मेडिकल मधे जाऊन 'सेट्रिझिन' घ्यायचीना? इकडे कशाला आलात?"
-------------------------------------------------------------------
शाहराबाहेर धो धो वाहत आलेल्या गटाराजवळ लघुशंका करायचा उद्देश् डोळ्यासमोर ठेऊन गाडी उभा केली. एक मोठा सुस्कारा सोडुन तयारीत उभा राहिलो तेवढ्यात गटाराच्या काठावर भप् भप् करणाऱ्या इंजिनावर ध्यान गेले. अख्ख्या शहराने बाहेर काढुन दिलेल्या या सडक्या, घान पाण्याला कोणतरी बहाद्दर इंजिन लाऊन ओढतोय. 'ते कश्यासाठी?' हे पाहण्यासाठी मी इंजिनातून निघालेल्या पाईपच्या कडेने समोर गेलो.
एका भल्यामोठ्या चौकोनी खड्डयात लालजरित टॉमेटोची झाडे, मेथी, पालक, कोथंबीर डुलत होते आणि पायपातुन पडणारे पाणी घटाघटा पीत होते. पोटात उचमळुन आले म्हणुन मटकन खाली बसलो.
मला पाहुन एक भैया जवळ आला;
"साब, दु क्या दो चार किलु टमाटर? मार्केट में सौ से निचे नहीं मिलेगा! अभी अस्सी से लगाता हूँ. बोलो?"
-------------------------------------------------------------------
पंचवीस लीटरच्या दोन क्यानी दुधाने गच्च भरुन ठेवलेल्या. मन्या निरम्याचा पुडा घेऊन आला, सपकन् ब्लेड मारली आणि अर्धा अर्धा पुडा क्यानीत रिचुन दिला. मी धावतच त्याच्याजवळ गेलो.
"मन्या, तु चक्रम झालास काय? त्या क्यानीत दुध आहे"
"पन्नास लीटर दुधात पंचवीस लीटर त् पाणीच् हे"
"अबे गध्या! पाणी हे त् मग निरमा टाकुन कपडे भिजु घालनारेस काय?"
"तस नाय रे! डेरिवर 'फॅट' मोजायचं मशीन हाय. दुधात निरमा असला की त्याची डिग्री सर्र्कान वर जाते अण दुधाला दाबुन भाव भेटतु"
---------------------------------------------------------------
"राम्या, टपरिवर एक कटिंग सांग अन तु खालीच थांब. एक लाल इंडिकावाला साहेब आला की त्याला ही फाइल दी. त्यांच्याकडून एकतीस हजार रुपये घी. एक तुला घी अण तिस माह्या खात्यावर जमा करुन ई"
"पर साहेब, कालच बांधकामवाल्याच्या हाफिसातला घोटाळा पकडिलाय. चायनेलवाले रातभर दाखित हुते"
"गधड्या, आपुण काय हजार कोटीचा घोटाळा नै करुन राहिलो. अण तिस हजाराचा घोटाळा दाखिला तर पब्लिकच पोट धरून हसल अण चायनेलवाल्याला खुळ्यात काढल"
-----------------------------------------------------------------
हवालदार साहेब बराचवेळ पासुन बसस्टैंडवर खोळंबलेले. पिरम्या आणि रवण्याला बसस्टैंड मधे घुसताना पाहुन जवळ आले. पिरम्याने इकडे तिकडे पाहत शंभरच्या दोन नोटा हळूच त्यांच्या खिशात कोंबल्या. साहेब दबक्या आवाजात "फ़क्त एक तास" म्हणुन हळूच बसस्टैंडच्या बाहेर सटकले.
लेट झालेली बस आली तशी ताटकळलेली पब्लिक बसच्या दिशेने पळाली.
पिरम्या पळत जाऊन गर्दीत घुसला. रवण्या हळू हळू निघाला.
बसच्या दाराजवळ चढ़ाणारे आणि उतरणारे एकमेकांना भिडले.
एका चढणाऱ्याची भली मोठी ब्याग मागून येणाऱ्याच्या आणि उतरणाऱ्याच्या मधे गुतली. ब्यागमुळे त्याला वरती जाता येइना आणि आतल्यांना खाली उतरता येइना. पब्लिक खुळी झाली. गोंधळ उडाला. कंडक्टरने शिट्टया मारून तिढा सोडविला. बस खच्चुन भरली. कंडक्टरने जोर लाउन दरवाजा ओढला आणि बेल दिली.
गाडी हळू हळू बसस्टैंडच्या बाहेर निघाली तसा पिरम्या जोराने ओरडला;
"रवण्या, उतर निचे! ये गाडी बम्बई जारी, पूना नै"
गाडी थांबली. बसच्या पार शेवटच्या टोकाला जाऊन उभा राहिलेले दोघेही पब्लिकला दाबत दाबत खाली उतरून मुतारिकडे पळाले. बस निघुन गेली.
दोघे मुतारीच्या माघे आले. पिरम्याने खिशतल्या तिन पाकिटातल्या नोटा काढुन खिशात टाकल्या. पाकिट परत चाचपुन तिथेच फेकुन दिले. रवण्याने हातातल्या मोबाइलला झटक्यात उघडुन ब्याटरी बाजूला केली आणि कुंपनावारून उड्या मारून मागच्या झाड़ित पसार झाले.
---------------------------------------------------------------------------
"अग! हे बघ ना या धाग्यावर कांबीकरने काय लिहलय"
"अहो मी वाचलय! अण तुम्ही ते सिरियस्ली घेऊ नका.... नाहीतर येड़े व्हाल"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त..
आवडल..
शाहराबाहेर धो धो वाहत आलेल्या
...
आमचे बाबा महाराज म्हणतात....
नाईलाजाने अनुमोदन द्यावे
अवघडे सगळं.
डॉक्टरसाहेब! आहो मला साधी
...
समंजस माणूस टेस्ट करायच्या
निरम्याने फॅट वाढत नाय ओ.
अभ्या भौ
भारीच की!!
:( नाही घेतलं सिरियसली.
लाचेची रक्कम खात्यावर ?
उद्धवा
कांबीकर