एक अशीही राधा !!
'अनोळखी' म्हणून भेटला खरा
'आत्ताच ओळख झाली' म्हणाला खरा
तिनेही मग तसेच सावरून घेतले
कसे सांगू कसले ओझे मनावर घेतले !
त्याच्याचसाठी राखून ठेवले होते शब्द,
लिहून मग न धाडलेली हजार पत्रं ,
मजकूर त्याला कधी कळला नसता
डोळ्यातला भाव फक्त बोलला असता !
वाटेवर डोळे लावून बसलेली ती राधा
गुंतलेले मन कि फक्त उसवणारा धागा ,
तिलाच कळेना कसा हा घननिळा
खरच 'अनोळखी' कि नुसतीच त्याची लीला !
जे तिचे नव्हते कधीच, ती गमावून बसली होती
त्याने मात्र गमावले, जे फक्त 'त्याचेच' होते ,
'आहे खुशीत मीही' हेच भासवले मग तिने
कसले हे प्रेम अन 'त्याच्या ' प्रेमात जीणे !
त्याचे प्रेम म्हणजे फक्त एक स्मितहास्य, ओठांवर फुललेलं !
तिचे प्रेम म्हणजे नुसतीच एक नीर ओळ, डोळ्यात दाटलेली !
त्याचे प्रेम म्हणजे एक श्वास, आतून गहिवरलेला !
अन तिचे प्रेम म्हणजे एक हुंदका , कुणाला न कळलेला !
……… असा हा कान्हा आणि अशी हि राधा !!
....फिझा
प्रतिक्रिया
18 Apr 2016 - 2:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच...
18 Apr 2016 - 2:34 pm | चांदणे संदीप
चांगली कविता!
Sandy
18 Apr 2016 - 3:22 pm | पैसा
कविता आवडली
18 Apr 2016 - 3:48 pm | जगप्रवासी
खूप छान
18 Apr 2016 - 3:54 pm | प्रमोद देर्देकर
कधीतरी उगवता पण एक कविता टंकुन जाता.
आवडली मस्त.
18 Apr 2016 - 4:34 pm | गणेशा
कविता छान
ऑर्कुट वरील आमच्या " अशीच एक राधा" ची ही आठवण झाली शिर्षका मुळे
19 Apr 2016 - 10:48 am | नाखु
कविता..
दैनिक मिपा फुफाटामधील याचकांची पत्रे मधून साभार.
19 Apr 2016 - 12:24 pm | फिझा
खर आहे !! ४ वर्षांपूर्वी हे सगळे मात्तबर कवी मिपा वर active असायचे !!!! आणि खूप खूप सुंदर कविता वाचायला मिळायच्या !!!
22 Apr 2016 - 9:32 am | रातराणी
छानचं!
23 Apr 2016 - 3:52 pm | बरखा
मनातील भावनांचे वर्णन छान केले आहे. आवडली कविता.
23 Apr 2016 - 6:35 pm | एक एकटा एकटाच
सुरेख
23 Apr 2016 - 8:37 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा! .
16 Sep 2016 - 11:09 pm | निनाव
वाआह्ह..
18 Sep 2016 - 9:45 am | विवेकपटाईत
मस्त आवडली.
18 Sep 2016 - 10:40 am | चाणक्य
कशी काय वाचायची राहून गेली होती ही काय माहित. फारच सुंदर आहे.