एक अशीही राधा !!

फिझा जे न देखे रवी...
एक अशीही राधा !! 'अनोळखी' म्हणून भेटला खरा 'आत्ताच ओळख झाली' म्हणाला खरा तिनेही मग तसेच सावरून घेतले कसे सांगू कसले ओझे मनावर घेतले ! त्याच्याचसाठी राखून ठेवले होते शब्द, लिहून मग न धाडलेली हजार पत्रं , मजकूर त्याला कधी कळला नसता डोळ्यातला भाव फक्त बोलला असता ! वाटेवर डोळे लावून बसलेली ती राधा गुंतलेले मन कि फक्त उसवणारा धागा , तिलाच कळेना कसा हा घननिळा खरच 'अनोळखी' कि नुसतीच त्याची लीला ! जे तिचे नव्हते कधीच, ती गमावून बसली होती त्याने मात्र गमावले, जे फक्त 'त्याचेच' होते , 'आहे खुशीत मीही' हेच भासवले मग तिने कसले हे प्रेम अन 'त्याच्या ' प्रेमात जीणे ! त्याचे प्रेम म्हणजे फक्त एक स्मितहास्य, ओठांवर फुललेलं ! तिचे प्रेम म्हणजे नुसतीच एक नीर ओळ, डोळ्यात दाटलेली ! त्याचे प्रेम म्हणजे एक श्वास, आतून गहिवरलेला ! अन तिचे प्रेम म्हणजे एक हुंदका , कुणाला न कळलेला ! ……… असा हा कान्हा आणि अशी हि राधा !! ....फिझा
वर्गीकरण
लेखनविषय:

15 टिप्पण्या 2,924 दृश्ये

Comments

गणेशा नवीन

कविता छान ऑर्कुट वरील आमच्या " अशीच एक राधा" ची ही आठवण झाली शिर्षका मुळे

नाखु नवीन

कविता..
मिपावरील मातब्बर कवींनी यानिमित्तने आप्ल्या कळफलकावरची धूळ सारून चार श्ब्द टंकले हे ही ह्या कवितेचे मोठे फलित आहे.
दैनिक मिपा फुफाटामधील याचकांची पत्रे मधून साभार.

फिझा नवीन

In reply to by नाखु

खर आहे !! ४ वर्षांपूर्वी हे सगळे मात्तबर कवी मिपा वर active असायचे !!!! आणि खूप खूप सुंदर कविता वाचायला मिळायच्या !!!

बरखा नवीन

मनातील भावनांचे वर्णन छान केले आहे. आवडली कविता.

चाणक्य नवीन

कशी काय वाचायची राहून गेली होती ही काय माहित. फारच सुंदर आहे.