✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

न
नीलमोहर यांनी
गुरुवार, 02/25/2016 - 15:36  ·  लेख
लेख
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ... ची १५०१५+ वाचने म्हणजे जवळपास ५०,००३+ वाचने, सर्व मिळून गेल्या काही दिवसातच झाली आहेत. ही एक मोठी कमालच म्हणावी लागेल कारण एवढी ढिगाने वाचने मिपाच्या इतिहासात इतक्या वेगाने कधीच झाली नव्हती. आणि यापेक्षाही मोठी कमाल म्हणजे हे सारेही एकाच असंबद्ध शैलीत लिहिणारे लेखक आहेत. आता यांच्या यशाचे गमक काय? मराठी वाचकांच्या अभिरुचीत सोशल मेडियामुळे झपाट्याने झालेला बदल कि 'आक्रमक' आणि 'भडकाऊ' धाग्यांमुळे अचानक निर्माण झालेला नववाचक वर्ग? (वेग पाहता 'अचानक' आणि 'झपाट्याने' हेच शब्द समर्पक आहेत.) ... हे लेखक मिपावर नवीन नवीन लिहीत असताना त्यांना वाचकांनी ठेंगा दाखवला, कोणी विषयाला अनुसरून प्रतिसाद देईनात, नुसतेच अवांतर चालवलेले, मग हे लोक भयंकर कमेंटी आणि डेंजर धागे टाकायला लागले. यांनी मिपाकरांविषयी जेथे तेथे अद्वा-तद्वा लिहीणे सुरु केले. हे त्यावेळी जिलब्या लिहायचे. त्या जिलब्यांत त्यांनी लिहिलेले असेच क्लिष्ट काही वाचून यांच्या एका मित्राने म्हणे यांना लेखमाला लिहायचे सुचवले, हे भलतेच मनावर घेऊन त्यांनी एक धागा लिहिला, तो बघता बघता ट्यारपी-गेनर झाला. मग यांनी काय करावे ? तर नवीन काही लिहायचे सोडून त्याच धाग्यातील तेच विषय आणि तेच संदर्भ उचलून त्यांचे अतार्किक तत्वज्ञान पुढे लांबवले आणि 'That's the way i write!' नावाने आणखी एक बाळबोध लेखमाला लिहून काढली.. तर त्यांच्या फक्त काहीच वाक्यातील जरी तोडक्या मोडक्या लेखनशैलीकडे दुर्लक्ष केले तरी ... अशा महाशयांना लेखक म्हणावे कि नाही हा प्रश्न उद्भवतो. फक्त एक दोन अतर्क्य आणि अगम्य विषय उचलायचे, आणि त्यांच्यातले बळे जुळवून आणलेले बालिश आणि मूर्ख संदर्भ दाखवायचे आणि बेसावध, अबोध आणि निष्पाप वाचक टार्गेट करून हि शब्दांची बंडलं 'लेखमाला' या नावाने खपवायची हेच यांचे उद्योग. यांना आपण मिपाचे मारेकरी म्हणतो ते दोन कारणांसाठी, एक तर यांच्या जबर एकामागून एक पळणार्‍या धाग्यांचे साहित्यिक मूल्य शून्य आहे, उलट दर दोन वाक्यानंतर मांडलेले काहीतरी विसंगत मुद्दे आणि संदर्भरहित बडबड. आणि दुसरे म्हणजे, यांचे हे निरुपयोगी आणि नॉनसेन्सिकल रायटिंग सिंंड्रोमचा इफ्फेक्ट असणारे धागे वाचून आपण साहित्य वाचतो आहोत असा होणारा कोवळ्या अजाण वाचकांचा गैरसमज. यामुळे एक संपूर्ण पिढी साहित्या विषयीची मतेच चुकीची करून घेत आहे. याचाच परिणाम म्हणजे 'तत्वज्ञान आणि अमिबाचा आकार' वाचणार्‍या वाचकांना 'अंतरिक्षः मेंदूतील रिकामी जागा' अथवा 'ससे रात्री झोपतात किंवा कसे: एक विचार' वाचण्यात कसलाच रस नसतो. आणि साहित्य म्हणजे काय हे बर्याच वाचकांना ह्या ना..क लेखकांमुळे कळतच नाही. हे त्यांना दर आठवड्याला एक नवा दुर्बोध धागा वाचायला लावतात. एवढ्यावरही हि मंडळी थांबली असती तरी काही आपत्ती नव्हती, पण एक धागा चालला म्हणून "बास, आता हापिसात दुसरे काही करायचेच नाही तर नुसते रिकामे धागे पाडायचे" असला टीपीयुक्त प्रोपागांडा घेऊन लेखन करायला आलेले हे लोक सध्या येता जाता लेख टाकतात (नव्हे खपवतात). आणि जोडधंदा म्हणून 'मिड्टाईम्स ऑफ नॉर्थ ईस्ट महाराष्ट्रा' मध्ये "What marathi reader wants?" या मथळ्याखाली मराठी वाचकांचे विचार मांडण्यासाठी स्वतः होऊन प्रतिनिधित्व करतात. आणि त्यात मुलुखभराचा मूर्खपणा वर्तमानपत्री भाषेत छापून आणतात. आजकाल ... महाशय स्वतःला "Motivational writer" असेही म्हणवून घ्यायला लागले आहेत. लाखमोलाची बँड्विड्थ वाया घालवून हे "अक्सीडेंटल लेखक" अश्राप नव-वाचकांना stereotypical advice देऊन आयमाय एक करतात. खरे म्हणजे जो माणूस स्वतः अचानक यशस्वी झाला आणि तो हि काहीच न करता तोच माणूस 'यशस्वी कसे व्हावे' या विषयी मराठीतील सर्वोत्तम संस्थळावर लिहीण्यास देण्यास पात्र आहे का? तरी बरे इथे त्याच्या बौद्धिक पातळीविषयी बोलत नाहीये. एक मजेशीर गोष्ट सांगून हे पाल्हाळ संपवूया, काही दिवसांपूर्वी, या ...चा म्हणे कीबोर्ड बडवतांना बोटं मुडपली, किरकोळ फ्रॅक्चर झाले तर हे महाशय पोहचले थेट संस्थळाच्या मालकाकडे, आणि म्हणाले 'आता मला एक महिना लिखाण रेस्ट घ्यावी लागेल आणि यामुळे माझे मेगाबायटी नुकसान होईल आणि मला अगोदरच कितीतरी धागे पेंडिंग आहेत, हे सर्व धागे मला कुणीतरी आयते लिहून द्यावे' पण अ‍ॅडमिनने *** वर लाथ मारून त्यांची बोळवण केली.मग यांनी स्वतःचा रीकवर होत असतानाचा एक व्हीडीओ बनवला आणि युट्युब वर टाकून दिला. आणि म्हणाले "दिल मे सच्ची चाह हो तो लेखकू कुछ भी कर सकता है, मुश्किल कितनी भी बडी क्यू न हो हमारे लिखाण को नही रोक सकती" आणि काही महिन्यानंतर पुन्हा ढीगभर धागे बाजारात आणले. आता अशा महान माणसांविषयी आणि यांना 'मिसळपावचे शिलेदार' म्हणणाऱ्या वायझेड माझा विषयी काय लिहू तेच सुचेनासे झालेय. ** आपली मते जाणून घ्यायला आवडतील, ... आणि ... विषयी खूप लिहिणार आहे पुढच्या भागात... (लेखन पूर्णपणे ऑन डिमांड लिहीले गेले आहे, त्यामुळे लिखाणाविषयी काहीही आक्षेप असल्यास तो परस्पर डिमांड करणार्‍याकडे लागू होतो याची नोंद घ्यावी ;) आपण काय पेर्र्णा लिहायाला घाबरत नाही ब्वा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
नाट्य
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
विडंबन
व्युत्पत्ती
औषधोपचार
भूगोल
राहती जागा
क्रीडा
फलज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
आस्वाद
माध्यमवेध
प्रश्नोत्तरे
मदत
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
28183 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

खो खो खो!

निशांत_खाडे
Fri, 02/26/2016 - 01:44 नवीन
_/\_ मुजरा स्वीकारा..
  • Log in or register to post comments

कळलं का?

बहुगुणी
Fri, 02/26/2016 - 01:56 नवीन
कळलं का, निशांत_खाडे, मिसळपाव म्हणजे कसं मौजमस्तीचं धमाल तळं आहे ते? असंच उडी घेऊन पोहा, किंवा काठाकाठाने मजा घ्या, पण त्रागा वगैरे सोडून द्या म्हणजे एंजॉय कराल. _/\_ मुजरा स्वीकारा.. प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit! :-) देर आये, दुरुस्त आये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे

कळले कळले..

निशांत_खाडे
Fri, 02/26/2016 - 02:05 नवीन
हे अगोदरच कळले असते तर बरे असते :-D लिहिताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे आता :-). धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आणि हे इतके कनस्ट्रकटीव

निशांत_खाडे
Fri, 02/26/2016 - 02:11 नवीन
आणि हे इतके कनस्ट्रकटीव क्रीटीसीजम म्हटल्या नंतर तर तळ्यातून बाहेर यावेसेच वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

तळंही नाही, हा मिपाचा भवसागर आहे.

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 14:29 नवीन
जगभराचे ताणतणाव व्याप-ताप इथे येऊन विसरून जायचे आणि या ज्ञान सागरात डुंबत रहायचं, लेखन-वाचन आनंद घ्यायचा द्यायचा - बास ! मज्जानु लाईफ !! बाकी खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 02/26/2016 - 02:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

शमत रे भावा!

भरत्_पलुसकर
Fri, 02/26/2016 - 03:43 नवीन
तै उगा नाय तुमचं नाव आमच्या लिश्टीत हाय ते! तोडफोड केलीया निस्ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

सतिश गावडे
Fri, 02/26/2016 - 08:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जास्त झालं...

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 16:00 नवीन
कौतुक, हवा जाईल अशाने... डोक्यात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भन्नाट

श्रीरंग_जोशी
Fri, 02/26/2016 - 02:55 नवीन
विडंबनकार नीमो यांचा विजय असो.
  • Log in or register to post comments

पाउलखुणा आवडल्या. मस्तेत. काय एकेक रत्नं शोधलीयेत.

गामा पैलवान
Fri, 02/26/2016 - 03:12 नवीन
‌
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 15:42 नवीन
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार. माझ्या लेखांच्या बाबतीत एक गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते, किंबहुना इथे सातत्याने लिहीत राहण्यामागे तीही एक प्रेरणा आहे म्हणता येईल :) विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच, मूळ लेख तोवर वाचलेला नव्हता, वाचल्यावर जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली, मग काय मज्जाच ! एकवेळ साधं सहज लेखन करणं सोपं पण हे असं लिहीतांना फार दमछाक होते, फॅ फॅ उडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो.
  • Log in or register to post comments

ते सगळं खरं,

सस्नेह
Fri, 02/26/2016 - 16:13 नवीन
पण 'प्रेर्णा' लिंकवायला विसरलीस ना ! आम्हाला शोधावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

हो ना..

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 16:29 नवीन
अतिउत्साह दुसरं काय ;) नंतर प्रतिक्रिया वाचून खुश होतांना आठवलं प्रेरणा राहून गेली. पण तुम्ही आहात ना आठवण करून द्यायला, घ्या मग काम, लेखाच्या शेवटी ही लिंक__/\__ चिकटवून टाका. आपण काय पेरणा लिहायाला घाबरत नाही ब्वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/28/2016 - 11:39 नवीन
>>>>विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच... मी नै कै हं...! उगं माझं नाव नै घ्यायचं (असं जाहीर) ;) मी फक्त भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे मारेकरी असं लिहा म्हटलं होतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली

होबासराव
Fri, 02/26/2016 - 15:47 नवीन
;))
  • Log in or register to post comments

=))

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 15:56 नवीन
वरती तुमचीही डिमांड वाचली, 'आहे चा महिमा' वर लिहा - म्हणजे काय ते मात्र समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

मतबल तै ये आपने पढ्याच नै

होबासराव
Fri, 02/26/2016 - 16:34 नवीन
मतबल तै ये आपने पढ्याच नै. http://www.misalpav.com/node/34952
  • Log in or register to post comments

नाही हो,

नीलमोहर
Fri, 02/26/2016 - 17:08 नवीन
'आ ता मा झ्या त ता क द ना ही' (मंगेश देसाई स्टाईलमध्ये इमॅजिन करावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा