दुनियादारी....
ना शाळेत शिकवली, ना कोलेजात शिकवली,
ही तर दुनियादारी आहे, आम्हाला या दुनियेनी शिकवली....
वाटेत होता वाटसरू , म्हणालो मदत तुम्हा काय करू,
ऐकवले प्रवचन म्हणे इथे तिथे तोंड नको मारू,
दोस्त होता पुढे , आनंद होता मला,
दुनियादारी म्हणते तू मागे तर तो पुढे कसा काय गेला,
ती पण गेली सोडून वाटेत मला अर्ध्यावरती,
म्हणे दुनियादारी शिक, तू तर आहे फारच सरळ सोबती,
मग काय किताब होती मोठी , दुनियादारी शिकत गेलो,
कधी याचे तर कधी त्याचे पाय ओढत गेलो,
वाईट नव्हतो कधीच, खूप पहिली होती आम्ही दुनियादारी
बस कळली आम्हास जेव्हा संपली होती आमच्यासाठी दुनिया सारी..........
चांगलंय
मस्त!
कविता छान.
निरर्थक आहे हो आयडी चा अर्थ..
सदस्यत्व घेतल्यापासून
:) मला तर ३-४ वर्षे लागली !
दुनियादारी आवडली.
कविता छान आहे.
खूप छान....
खुपच छान ....