✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

ज — जव्हेरगंज, Sun, 02/07/2016 - 10:05
पुण्यात जरा ऊदासच वाटलं शुक्रवार पेठेत एक माकड मारलं रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला चालत चालत मिरजेला गेलो वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला सांगोल्याला मावशीच्या घरी तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला पंढरपुरात जेव्हा पोहोचलो विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला चंद्रभागेत बुडी मारुन पुन्हा परतीचा रस्ता शोधला पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं _________________ (आधारीत )

प्रतिक्रिया द्या
8159 वाचन

💬 प्रतिसाद (33)

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/07/2016 - 10:11 नवीन
पण पुण्यात उदास का वाटलं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कशावर आधारित? मस्त आहे पण.. ;

संदीप डांगे
Sun, 02/07/2016 - 10:32 नवीन
कशावर आधारित? मस्त आहे पण.. ;-)
  • Log in or register to post comments

यावर आधारित आहे:

आदूबाळ
Sun, 02/07/2016 - 13:16 नवीन
यावर आधारित आहे: मुंबईनं भिकेस लावलं कल्याणला गूळ खाल्ला ज्या गावाला नाव नव्हतं पण एक धबधबा होता तिथं एक ब्लँकेट विकलं अन पोटभर पाणी प्यालो पिंपळाची पानं चघळत नाशकापर्यंत आलो तिथं तुकाराम विकला अन् वर खिमापाव खाल्ला जेव्हा आग्रारोड सोडला तेव्हा एक चप्पल तुटलं न मागता मिळालेली कांदाभाकर खाऊन ऊठलो ढुंगणाखालची हॅवरसॅक उचलून पाठीवर घेतली मग दोन मैल विचार केला अन परतायचं ठरवलं - अरुण कोलटकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ह्यासाठी धन्यवाद! अर्थगर्भ

संदीप डांगे
Sun, 02/07/2016 - 13:20 नवीन
ह्यासाठी धन्यवाद! अर्थगर्भ आहे कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

या कवितेसाठी धन्यवाद! खूप

प्राची अश्विनी
Sun, 02/07/2016 - 15:20 नवीन
या कवितेसाठी धन्यवाद! खूप सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हो ,

जव्हेरगंज
Sun, 02/07/2016 - 15:22 नवीन
हो , यावरच आधारित आहे धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मुंबईने भिकेस लावल्यावर

भक्त प्रल्हाद
Sun, 02/07/2016 - 15:37 नवीन
मुंबईने भिकेस लावल्यावर पुण्याला आलात. मग उदास वाटणारच! असो. तुमची कविता समजली नव्हती. हि कविता दिल्यावर आता न समज्लेल्या दोन कविता झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कशावर आधारित समजले नाही.पण

अजया
Sun, 02/07/2016 - 11:00 नवीन
कशावर आधारित समजले नाही.पण कविता मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

पण पुण्यात उदास का वाटलं ?

Rahul D
Sun, 02/07/2016 - 11:11 नवीन
पण पुण्यात उदास का वाटलं ?
  • Log in or register to post comments

पुण्यात जरा काय...फुल्ल उदास

अभ्या..
Sun, 02/07/2016 - 12:57 नवीन
पुण्यात जरा काय...फुल्ल उदास असते हो. मी येतच नाही आजकाल. :(
  • Log in or register to post comments

उदास राहू नका बा.

पैसा
Sun, 02/07/2016 - 14:14 नवीन
पुणे आवडलं नै तर हुंबैला चला. विचार करायला पण वेळ भेटणार नाय. अरुण कोलटकरांच्या कविता वाचणार्‍या सर्वांना लांबूनच साष्टांग नमस्कार.
  • Log in or register to post comments

पण पुण्यात उदास का वाटलं ? >>

जव्हेरगंज
Sun, 02/07/2016 - 14:17 नवीन
पण पुण्यात उदास का वाटलं ? >>>> कवितेतच ऊत्तर द्यायचा प्रयत्न केलाय . बघा सापडले तर :)
  • Log in or register to post comments

माकड मारल्याचं ( एका

कंजूस
Sun, 02/07/2016 - 14:27 नवीन
माकड मारल्याचं ( एका हुच्चभ्रूला सुनावलं) त्याचं प्रायश्चित्त घेऊन परत आल्यावरसुद्धा शुक्रवारपेठेत स्वागतच झालं "या एकदा सवड काढून."
  • Log in or register to post comments

छान कविता

सिरुसेरि
Sun, 02/07/2016 - 14:48 नवीन
कोल्हापुरचे सहकार मसाला दुध आणी मिरजेची शिवाप्पा हलवाइची लस्सी .
  • Log in or register to post comments

पूर्वीचे पुणे राहिले नाही.

तर्री
Sun, 02/07/2016 - 14:54 नवीन
पूर्वीचे पुणे राहिले नाही.
  • Log in or register to post comments

पुण्यात उदास वाटले तर

सतिश गावडे
Sun, 02/07/2016 - 15:25 नवीन
पुण्यात उदास वाटले तर बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे. तिथल्या स्वर्गिय वातावरणाने आणि जेवणाने उदासिनता कुठल्या कुठे पळून जाते. निदान तिथल्या बिलाने तरी नक्कीच जाईल.
  • Log in or register to post comments

_/\_

कपिलमुनी
Sun, 02/07/2016 - 17:16 नवीन
बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीला जेवायला जावे, आल्यावर त्यावर धागे काढावेत मग आपला आणि बऱ्याच मिपाकरांचा उदासपणा नक्की जातो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

याच अर्थ

नाखु
Mon, 02/08/2016 - 10:00 नवीन
सूज्ञ मिपाकर "उदास"(आडनाव नाही चित्तवृत्ती) झालेले लोकच बार्बेक्यू नेशन किंवा स्पेंडर कंट्रीलाच जातात असा जावईअशोधाच्या धाग्याच्या प्रतीक्षेत रहावे लागेल आम्हाला !!! नाखु वाटपहाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मलाही पुण्याला येऊन माकड

अजया
Sun, 02/07/2016 - 15:32 नवीन
मलाही पुण्याला येऊन माकड मारायचे आहेच एकदा.
  • Log in or register to post comments

माकडाने काय घोड मारलाय !

जेपी
Sun, 02/07/2016 - 15:41 नवीन
माकडाने काय घोड मारलाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

काय हे....कोणी माकड मारायची

टवाळ कार्टा
Sun, 02/07/2016 - 15:53 नवीन
काय हे....कोणी माकड मारायची भाषा करतयं...कोणी हत्ती मारायची भाषा करतयं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जव्हेरभाऊ नाही आवडली.

उगा काहितरीच
Sun, 02/07/2016 - 17:12 नवीन
जव्हेरभाऊ नाही आवडली.
  • Log in or register to post comments

ही अजून एक

जव्हेरगंज
Sun, 02/07/2016 - 18:12 नवीन
मै भाभीको बोला क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? भड़क गयी साली रहमान बोला गोली चलाऊँगा मै बोला एक रंडीके वास्ते? चलाव गोली गांडू. - अरुण कोलटकर
  • Log in or register to post comments

जव्हेर जी माफ करा मात्र

मारवा
Mon, 02/08/2016 - 14:30 नवीन
हे विडंबन वा अजुन जे काय तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय ते अजिबात आवडल नाही. मुळ कविच्या वहीवर विनाकारण चिंखडण्यासारख वाटलं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हम्म..

नीलमोहर
Mon, 02/08/2016 - 10:20 नवीन
एकतर पुणं.. त्यात पेठ.. तीही.. असो. पुण्यात सर्वाधिक माकडं स... आणि श... पेठेत आढळून येतात बहुधा.
  • Log in or register to post comments

हे नियमांत बस्ते का?

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 12:28 नवीन
हे नियमांत बस्ते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

काय हो ?

नीलमोहर
Mon, 02/08/2016 - 14:08 नवीन
मी खर्‍र्रया - खुर्‍र्या शेपटीवाल्या प्राण्यांबद्दल (स्वतः पाहिलेले) लिहीले आहे. आपण कशाबद्दल म्हणताय ;) (पेठ निवासी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 14:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

पेठेतली माकडं म्हणे आजकाल

बॅटमॅन
Mon, 02/08/2016 - 14:14 नवीन
पेठेतली माकडं म्हणे आजकाल कोथ्रुडात ट्रान्स्फर झालीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

काय पण कविता

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 02/08/2016 - 15:20 नवीन
काहीतरी समजेल असे लिहा ना जव्हेरभौ!! उगीच डोक्याला शॉट
  • Log in or register to post comments

@पुण्यात जरा ऊदासच वाटलं

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/08/2016 - 19:44 नवीन
@
पुण्यात जरा ऊदासच वाटलं
>> अस्स्सं!!!
  • Log in or register to post comments

गेले आंब्याच्या वनी

खटासि खट
Mon, 02/08/2016 - 23:05 नवीन
गेले आंब्याच्या वनी म्हटली मैनेसवे गाणी चाफा बोलेना, चाफा चालेना
  • Log in or register to post comments

हे वाचुन...

अभिदेश
Tue, 02/09/2016 - 04:37 नवीन
ऊदास वाटल... काहिहि हा जव्हेरजी ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा