✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sat, 01/30/2016 - 20:02  ·  लेख
लेख
नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच. ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
77609 वाचन

💬 प्रतिसाद (280)

प्रतिक्रिया

टेनेसी सावर मैश उर्फ़ जॅक

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 01/30/2016 - 21:52 नवीन
टेनेसी सावर मैश उर्फ़ जॅक डॅनियल्स एकदा प्यायलो होतो , ज़रा जास्त गोड वाटली मला ती! स्कॉच मधे एक क्रंच हवाहवा वाटतो, फ्यूमिंग स्लो असावेसे वाटते, I get it all only in १२ years matured Glenfiddich. व्हाइट रम फ़क्त कॉकटेल्स मधे उत्तम वाटते, स्टैंड अलोन नाय आवडली अज्याबात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ओल्ड मंकास लावून ३० मिनिटात

जॅक डनियल्स
Sat, 02/06/2016 - 06:07 नवीन
ओल्ड मंकास लावून ३० मिनिटात लावून, ११ वी मध्ये स्पिरीट आणि स्टआइल वर गुलाब च्या बहिणीला आणायला गेलो होतो त्याची आठवण झाली. असो. कधी बसायचे ते सांग, टेनेसी मध्ये जेडी प्यायचीच मजा वेगळी आहे. अजून लक्कास व्हायचे असल्यास मूनशाइन पण मागवून ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लोल. तीच आठवण आली होती.

आदूबाळ
Sat, 02/06/2016 - 19:05 नवीन
लोल. तीच आठवण आली होती. टेनेसीमध्ये जेडी ब्यान आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

टेनेसीमध्ये जेडी ब्यान आहे ना

गवि
Sat, 02/06/2016 - 19:14 नवीन
टेनेसीमध्ये जेडी ब्यान आहे ना?
आँ? नाशकात सुला ब्यान.. गोव्यात फेणी ब्यान.. अशातलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

होय ज्या काउंटी मधे जेडी बनते

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 02/06/2016 - 19:34 नवीन
होय ज्या काउंटी मधे जेडी बनते ती ड्राय काउंटी आहे असे नॅशनल जियोग्राफिक वर पाहिल्याचे स्मरते आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आमच्या मते....

मुक्त विहारि
Sat, 01/30/2016 - 22:10 नवीन
जोपर्यंत दारू तुम्हाला पित नाही तोपर्यंत, दारूवर प्रेम करा. १. मित्रांबरोबर कट्टा करता करता जमेल तितके दारू वर प्रेम करा. आणि. २. परत नंबर १ कडे वळा. खरेतर सुरापान हा एक सोहळा असतो. कधीतरी एखादा वीकेंड ठरतो. भेटायचे बेत ठरले जातात.कुणी कुणाला निरोप द्यायचा ते ठरते.बायकोला मस्का मारून, तिची परवानगी काढायला लागते.मिपाकट्टा म्हटल्यावर, जास्त मस्का मारायला लागत नाही.टांगारूंना रीतसर टाळण्यात येते आणि तो दिवस ठरतो. एखाद दुसरा राउंड होत नाही तोच, मिपाचे चविष्ट धागे परत एकदा उसवल्या जातात. स्वगत : ह्या बिरुटे सरांना कसे काय समजले की, पुढच्या महिन्यात मिपाकट्टा आहे म्हणून?
  • Log in or register to post comments

ड्रिंक घेणे खरेच गरजेचे आहे

हेमंत लाटकर
Sat, 01/30/2016 - 22:37 नवीन
ड्रिंक घेणे खरेच गरजेचे आहे का?
  • Log in or register to post comments

ड्रिंक म्हण्जे अपणास दारू

संजय पाटिल
Sat, 01/30/2016 - 22:47 नवीन
ड्रिंक म्हण्जे अपणास दारू अभिप्रेत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

या प्रश्णामागे 'बायकांनी' असं

सायकलस्वार
Sat, 01/30/2016 - 22:52 नवीन
या प्रश्णामागे 'बायकांनी' असं लिहून मस्त नवी जिलबी पाडता येईल नै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

सुरेख जिल्बी पडेल हो ;)

विजय पुरोहित
Sat, 01/30/2016 - 22:53 नवीन
सुरेख जिल्बी पडेल हो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार

=))

अजया
Sat, 01/30/2016 - 23:18 नवीन
=)) काढाच धागा लाटकर काका. स्त्रीयांनी दारु पिणे गरजेचे आहे का किंवा दारु पिणाऱ्या स्त्रिया आणि बुडालेली संस्कृती. २०० नक्की करुन देऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार

काढाच धागा लाटकर काका.

हेमंत लाटकर
Sat, 01/30/2016 - 23:26 नवीन
काढाच धागा लाटकर काका. सध्या धागा सन्यास घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

नुसता धागा नसेल टाकायचा तर

अभ्या..
Sat, 01/30/2016 - 23:34 नवीन
नुसता धागा नसेल टाकायचा तर महावस्त्र (पक्षी लेखमाला) टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हो मी राहायचो तिथे तापमान उणे

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 01/30/2016 - 22:39 नवीन
हो मी राहायचो तिथे तापमान उणे २℃ ते उणे २०℃ च्या मधे असे मुख्य म्हणजे करायला कायच नसे अन त्याहुन मुख्य म्हणजे मला ड्रिंक्स आवडतात म्हणे काका मी! :)
  • Log in or register to post comments

आपल्या पिण्याची वारंवारता

सतिश गावडे
Sat, 01/30/2016 - 22:45 नवीन
आपल्या पिण्याची वारंवारता वाढली असून आता थांबायला हवे असे वाटण्याची वेळ येऊ नये इतपत कमी असायला हवे. :)
  • Log in or register to post comments

ड्रिंक्स घेणे अथवा न घेणे हे

राँर्बट
Sat, 01/30/2016 - 23:18 नवीन
ड्रिंक्स घेणे अथवा न घेणे हे प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असू शकतं. खासकरुन सहकार्‍यांनी भरीस पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही फर्म असल्यास ते काहीही करु शकत नाहीत! माझ्या स्वतःच्या बाबतीत विचाराल तर ओल्ड माँकला पर्याय नाही! (निदान रमच्या बाबतीत तरी) वाईन प्यायचीतर ती पण रेड वाईनच!
  • Log in or register to post comments

पिणे वालेंको पिणे का बहाणा

हेमंत लाटकर
Sat, 01/30/2016 - 23:19 नवीन
पिणे वालेंको पिणे का बहाणा चाहिये. दारू पिण्यापेक्षा फळांचा ज्युस बर्फ टाकूण पिणे चांगले.
  • Log in or register to post comments

लट्टुकाका वन्स अगेन राॅक...

विजय पुरोहित
Sat, 01/30/2016 - 23:21 नवीन
लट्टुकाका वन्स अगेन राॅक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

एरंडेलात बर्फ टाकून पण प्या!

राँर्बट
Sat, 01/30/2016 - 23:21 नवीन
एरंडेलात बर्फ टाकून पण प्या! माय लाईफ माय चॉईस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

फळं आणि बर्फ?

आदूबाळ
Sun, 01/31/2016 - 01:39 नवीन
फळं आणि बर्फ? हेलाकाकांना बहुदा हे म्हणायचंय: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

(नीट) दारू पिण्यापेक्षा

संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 02:45 नवीन
(नीट) दारू पिण्यापेक्षा फळांचा ज्युस बर्फ टाकूण पिणे चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मी चखणा खाणारा असल्यामुळे

बोका-ए-आझम
Sat, 01/30/2016 - 23:39 नवीन
पिण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. माझ्या चखण्याचं बिल हे नेहमीच मित्रांच्या पिण्याच्या बिलापेक्षा जास्त येतं.
  • Log in or register to post comments

ड्रींक्स प्रमाणात पिणे?

इनू
Sat, 01/30/2016 - 23:49 नवीन
ड्रींक्स प्रमाणात पिणे? मला वाटतं दारुच्या थेंबालाही हात लावता कामा नये. दारू एखाद्याला आणि त्याच्या कुटुंबाला कसे बरबाद करते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.
  • Log in or register to post comments

सहमत. कळकळीचे बोल आहेत हे.

अभ्या..
Sat, 01/30/2016 - 23:51 नवीन
सहमत. कळकळीचे बोल आहेत हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनू

उपयुक्त माहिती.

प्रचेतस
Sat, 01/30/2016 - 23:57 नवीन
उपयुक्त माहिती. मद्य न पिणाऱ्या आमच्यासारख्यांना मद्य पिणाऱ्या माणसांचे निरिक्षण करायला आवडते. आमच्या एका मित्रांनी पूर्ण धुंदित असताना अगदी सुरेल आवाजात गाणे ऐकवून त्रुप्त केले होते.
  • Log in or register to post comments

पूर्ण शुध्दीत असताना पडले

अभ्या..
Sun, 01/31/2016 - 00:00 नवीन
पूर्ण शुध्दीत असताना पडले वगैरे नाहीत ना कुठे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नै नै. पण त्यांना तेव्हा गाणं

प्रचेतस
Sun, 01/31/2016 - 00:06 नवीन
नै नै. पण त्यांना तेव्हा गाणं सुरेल आवाजात म्हणता नै आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

किस्सा

अगम्य
Sun, 01/31/2016 - 01:32 नवीन
आंतरजालावर वाचलेला किस्सा "माझा एक मित्र त्याच्या होणाऱ्या बायकोला घेऊन पहिल्यांदाच डिनर साठी गेला. ऑर्डर करायच्या आधी, "मी ड्रिंक घेतलं तर चालेल ना" असं तिला विचारलं. ती हो म्हणाली. त्यानी वेटरला बियर सांगितली. वेटरनी बियरची बाटली त्यांच्या टेबलवर आणून ठेवली. त्या बाटलीकडे बघून भावी-बायकोनी राग-युक्त आश्चर्यानी विचारलं, "ही एवढी दारू तू पिणार आहेस?" मित्रानी विचारलं, "नको का एवढी? बरं..." वेटरला बोलावलं आणि म्हणाला, "हे घेऊन जा रे... आणि एक निप आण"...! वेटरनी आणून ठेवलेली क्वार्टरची बाटली भावी बायकोला दाखवत विचारलं, "ही एवढी प्यायलेली चालेल का?".... तो आपल्याला विचारतो आणि आपलं ऐकतो या आनंदात अत्यंत प्रेमानं ती म्हणाली, "हो... ही चालेल... आधीची फारच मोठी होती बाटली!!" And they lived happily ever after!!"
  • Log in or register to post comments

लोल !बऱ्याच जणांना "झेपनार"

उगा काहितरीच
Sun, 01/31/2016 - 02:11 नवीन
लोल !बऱ्याच जणांना "झेपनार" नाही ना किस्सा , बहुतेक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

_/\_

अद्द्या
Sun, 01/31/2016 - 02:17 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

सुप्प्पर! __/\__ खरंच!

संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 02:44 नवीन
सुप्प्पर! __/\__ खरंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

हा असाच किस्सा आमच्या घरात पण घडलेला आहे....

मुक्त विहारि
Sun, 01/31/2016 - 09:08 नवीन
मी आणि माझे भाऊ सहकुटुंब नंदी पॅलेसला बसलो होतो. आमच्या एका वहिनीला "दारू" नामक प्रकरणाबाबत तिटकारा. मी आणि माझा एक भाऊ पेग रिचवत असतांना दुसर्‍या भावाने "बियर" मागवली.त्याची बायको लगेच करवादली. "तुमचे इतर भाऊ थोड्या प्रमाणात दारू पित असतांना, तुम्ही जास्त दारू पिऊ नका." भावाने पडत्या फळाची आज्ञा मानली आणि त्याने बियरची ऑर्डर कॅन्सल केली आणि तो पण आमच्यात सामील झाला.त्या दिवसापासून त्याचे बियर प्यायचे वांधे झालेले आहेत. असो, सुरापानाचा आनंद घेता येत नसेल, तर निदान त्या सुरेल सुरेला "दारू" तरी म्हणू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

सुरापानाचा आनंद घेता येत नसेल

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 09:12 नवीन
सुरापानाचा आनंद घेता येत नसेल, तर निदान त्या सुरेल सुरेला "दारू" तरी म्हणू नका. मनःपूर्वक सहमत! दारू दारू ब्लंट वाटते फार! सुरा म्हणा मदिरा म्हणा वारुणी म्हणा! हाय काय एक सो एक रसिक नावे आहेत राव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

खरे तर सुरा बनवणे हे एक शास्त्र आहे....

मुक्त विहारि
Sun, 01/31/2016 - 09:21 नवीन
कौटिल्याचे अर्थशास्त्र ह्या पुस्तकात (ह्याला पुस्तक तरी कसे म्हणावे?), कौटिल्याने सुरा कशी बनवावी? आणि राजासाठी योग्य सुरा कोणती? ह्याबद्दल उत्तम माहिती दिली आहे. असो, माणसाला सुरा कधीच वर्ज्य न्हवती. आणि आमची बाबा महाराज म्हणतात ======"अति सर्वत्र वर्जयेत." मग ते पॉर्नच्या बाबतीत असो किंवा अहिंसेच्या बाबतीत किंवा देवाच्या नादी लागण्याच्या बाबतीत. प्रमाणामध्ये सर्व काही असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ही नावं रसिक कसली हो ....

गामा पैलवान
Sun, 01/31/2016 - 14:09 नवीन
बापूसाहेब, तुम्ही म्हणता ती वारुणी, मदिरा, सुरा वगैरे नावं बायकी वाटतात हो. दारू, बेवडा, ठर्रा वगैरे कशी मर्दानी नावं आहेत ! ;-) आ.न., -गा.पै. विशेष अगत्याने सूचना : मी 'तसला' नाहीये बरंका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हा स्त्रित्वाचा अपमान आहे

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 14:17 नवीन
हा स्त्रित्वाचा अपमान आहे स्त्रियांना समान हक्क आहेत चांगल्या वाईट दोहोत, "बायकी" साउंड्स हाइली सेक्सिस्ट :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पैलवान सर

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 01/31/2016 - 14:22 नवीन
जी मुळातच अंगुरकी बेटी आहे तिला नावेही बायकीच असणार. दारूला मर्दानी नावे ठेवण्या पेक्षा मर्दांनी तिचा आस्वाद घ्यावा. मी तसलाच आहे बरका! पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

डोक्यावर बसत असल्याने

नाखु
Mon, 02/01/2016 - 08:45 नवीन
आणि डोक्यात जात असल्याने दारू ही बायकीच असणार. हे नि:संशय आहे. अज्याबात दारू न पिणारा (पण दारू पिण्यारांचा राग रागही न करणारा) पार्टी मित्र नाखु
स्वगतः डॉ. किमान २०० प्रतिसादांची सोय केली लक्ष्यात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

शाॅल्लीड किस्सा आहे! हपपुवा.

चंबा मुतनाळ
Sun, 01/31/2016 - 10:03 नवीन
शाॅल्लीड किस्सा आहे! हपपुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नशीबवान!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/02/2016 - 12:00 नवीन
नशीबवान हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

माहितीपूर्ण चर्चा

श्रीरंग_जोशी
Sun, 01/31/2016 - 09:20 नवीन
माहितीपूर्ण चर्चा. बस एका वैधानिक इशाऱ्याची कमी आहे.

संसारा उध्वस्त करी दारू बाटलीस स्पर्श नका करू...

सौजन्य - आमची वाहिनी सह्याद्री वाहिनीवरील एक जुनी जाहिरात. अवांतर - पांढऱ्या खोडीचे नाव कुणीच कसे घेतले नाही?
  • Log in or register to post comments

बाटलीस स्पर्श नका करू...

मुक्त विहारि
Sun, 01/31/2016 - 09:23 नवीन
आम्ही तर बाटलीला अजिबात स्पर्श करत नाही.ते काम वेटरच करतो. रंगा शेठ, थोडी मस्करी केली हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मी काय वेगळं केलं

श्रीरंग_जोशी
Sun, 01/31/2016 - 09:30 नवीन
मी काय वेगळं केलं होतं? बाकी शेठ नाही फक्त रंगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जोशी सरांशी बाडिस.....

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 01/31/2016 - 11:35 नवीन
आम्ही देखिल आज पर्यंत दारुच्या थेंबाला साधा स्पर्श सुध्दा केलेला नाही आणि या पुढे ही कधीच करणार नाही. दारुच्या थेंबाला कोणी स्पर्श करू नये असे आमचे पष्ट मत आहे. प्यायला सुरवात करण्या आधी ग्लासात बोटं घालून चार दिशांना प्रोक्षण करणाऱ्याचा आणि शॅम्पेनची बाटली गदागदा हलवून हवेत फवारे उडवणाऱ्या जमातीचा मला भयंकर संताप येतो. इतकी मुल्यवान गोष्ट अशी हवेत उडवण्यासाठी असते कां? बाटलीतून ग्लासात, ग्लासातून ओठात, ओठातून पोटात, पोटातून मेंदु आणि तिकडून ते हृदया पर्यंत हाच मदिरेचा राजमार्ग आहे आणि त्याच मार्गाने जाणारी मदिरा आम्हाला आवडते. वरती बापू म्हणाले तसे ओल्ड माँकला पर्याय नाही. त्या बरोबर चीज चिली टोस्ट हे आमचे आवडते खाद्य आहे. शेंगदाणे, फरसाण इत्यादी फुकट येणारा चखणा आम्ही आमच्या बरोबर असणाऱ्या पण मद्यपान न करणाऱ्या सोवळ्यां दोस्तांना उदार पणे देऊ करतो. हे असले सोवळेनेसून मद्यालयात येणारे लोक पाहिले की मला देवळात जाउन देवाला नमस्कार न करणारे नास्तिक आठवतात, दोघेही तेवढेच कट्टर असतात आणि समोरच्याला सुधारण्याचा विडा उचलूनच आलेले असतात. पण हे लोकं मनाने फार चांगली असतात. बिल आले की हेच लोक हिशोबाच्या आणि नंतर सगळ्यांना आपापल्या घरी सुरक्षीत पोचवण्याच्या कामाला येतात. ओल्ड माँक सोडून बाकी वारुणीं बरोबर आमचे काही वैर नाही. पण म्हाताऱ्या साधूबरोबर "लव्ह अ‍ॅट् फर्स्ट साईट" झालं ते अजूनही टिकून आहे. का? ते पण सांगतो....... प्यायला सुरुवात करण्या आधी ओल्ड माँकचे झाकण उघडून बाटली नाकाशी धरुन तिचा सुगंध छाती भरुन घेउन पहा. त्यानंतर मग हळूवार पणे ती ग्लासात ओतून घुटक्या घुटक्याने....... अतिशय सावकाश........ तिच्या प्रत्येक थेंबाचा आनंद घ्या. बघा तुम्ही देखिल प्रेमात पडाल म्हाताऱ्याच्या. स्वर्ग सुख, स्वर्ग सुख म्हणतात ते हेच तर असते. आहाहा त्या सुगंधाच्या नुसत्या आठवणीने देखील काळिज गलबलायला लागले. वैधानिक इशारा:- दोन पेग पोटात गेल्यावर असा सुगंध छातीत भरुन घ्यायचा अचरटपणा करू नये. त्यात मना ऐवजी शर्ट सुगंधी होण्याचीच जास्त शक्यता आहे. आद्य मदिराचार्य सोत्री यांनी कॉकटेलचे अनेक प्रकार मिपाकरांना शिकवले. आम्ही देखील त्यातले बरेच प्रयोग स्वत: करुन पाहिले. काही आवडले देखिल. पण मदिरेत काही मिसळून तिची वरिजनल ठेस्ट बदलून पिण्यात काही फारशी मजा येत नाही. ती आहे तशीच मस्त लागते. ज्यांना ऑन द रॉक्स जमत नाही त्यांनी फार तर पाणी घ्यावे . पण त्यात काहीबाही मिसळून पिऊ नये. अगदी सोडा सुध्दा. खजुराहोच्या शिल्पांना जर पैठण्या नेसवल्या तर ती बघायला आपल्याला आवडतील का? पैठण्या ल्यालेली शिल्पे ही चालती बोलतीच हवीत आणि खजुराहोची शिल्पे जशी आहेत तशीच बघण्यात मजा आहे. मद्य पण जसे आहे तसे बिनशर्त स्वीकारावे असे आमचे मत आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अगागागा...

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 11:38 नवीन
अगागागा... १००% पैजारबुवा स्टाईल प्रतिसाद... दंडवत घ्या माऊली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

दारूत सोडा घालणे म्हणजे

संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 11:59 नवीन
दारूत सोडा घालणे म्हणजे दारूचा सर्वोच्च अपमान. पहिले, असा सोडा घालून पिणारे 'नक्की का जगतात' असा प्रश्न पडतो. दुसरे, भसाभस ग्लास रिकामा करणारे, दहा दिवसापासून तहानलेले असल्यासारखे. तिसरे, बसल्या टेबलवर दहा वर्षांआधीची (किंवा कधीचीही) पार्टी-मैफिल काय सुरेख होती वैगरे आठवणींचा पूर काढणारे. जी आता चालू आहे त्याचा आस्वाद न घेता भूतकाळात रमणारे. चौथे, विनाकारण आग्रह करणारे. पाचवे, आपला ब्रँड सोडून दुसरे कशी फालतू दारू पितात अशी टिका करणारे हे पाच प्रकारची लोकं मैफिलीत असतील तर न बसणेच श्रेयस्कर. (आमच्या दारूकामाबद्दल नंतर लिहितो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

लोकांनी कशा पद्धतीने (म्हणजे

सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 12:02 नवीन
लोकांनी कशा पद्धतीने (म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने पिता) दारू प्यायला हवी त्या आदर्श पद्धतीवर एक छान लेख लिहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लोकांनी कशी प्यावी हा लोकांचा

संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 12:06 नवीन
लोकांनी कशी प्यावी हा लोकांचा प्रश्न हो गावडेसर. वरोल्लिखित लोकांसोबत बसायचे नाही हा माझी आदर्श पद्धत. बाकी आम्ही जगाला शहाणे करणार्‍या पंथातले नाही. जो जे वांच्छिल तो ते लाहो. ( आज तुम्हाला बराच वेळ दिसतोय... ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

दारूत सोडा घालणे म्हणजे

सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 12:30 नवीन
दारूत सोडा घालणे म्हणजे दारूचा सर्वोच्च अपमान. पहिले, असा सोडा घालून पिणारे 'नक्की का जगतात' असा प्रश्न पडतो.
सोडा घालून दारू पिणार्‍या लोकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलंत म्हणून म्हटलं. :) आज आमच्या लाडक्या सूर्यदेवांचा वार. आज निवांत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुम्ही 'दारूत सोडा' घालता काय

संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 12:42 नवीन
तुम्ही 'दारूत सोडा' घालता काय? मुळात तुम्ही पिता काय? तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या काय? वरील पैकी सर्व प्रश्नास उत्तर होय असेल तर .... पोस्टीकडे दुर्लक्ष करणे. ते आमचे वैयक्तिक मत आहे. त्याचा दारुड्या पक्षाशी काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा