Skip to main content

ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 30/01/2016 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच. ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.

वाचने 78154
प्रतिक्रिया 280

प्रतिक्रिया

मी पयला (तुम्ही बोलावलत तर) बाकी आठवड्यातून एकदा निवांत बसावं. ९० मिली रेड रम घ्यावी. (ओल्डमंकास पर्याय नको) सगळ्या डोक्याला तरास करणार्‍यांच्या नावाने एकच होलसेल शिमगा करावा. रमची चव पुसट होताहोता कचकून जेवण हानावं. सकाळी डोस्कं अन पोट सगळं साफ. :) येतेय का कोण आज? . . आमच्या अत्यंत प्रिय अन सदैव तत्वज्ञानाच्या नशेत टुल्ल असणार्‍या मित्राने दिलेले (वस्तुस्थितीदर्शक नसले तरी) बेवडा हे नामाभिधान आम्हास आवडले आहे. .

In reply to by अभ्या..

बाकी ड्रायडेचा मुहूर्त साधून हां धागा टाकण्याच्या समयसूचकतेचे कौतुक. आज गांधीजी पुण्यतिथि.;-)

In reply to by अभ्या..

अभ्या साल्या . . येतोय फेब्रुवारीत मी सोलापूरला . . तव बसू जरा म्हातारा सन्याशी घेऊन . ऑफिसातले साले पुळचट आहेत एक एक . बियर पाइण्ट मध्ये औट होतात

In reply to by अद्द्या

आमचा सोलापूरातील वार्ताहर कळवतो की मा. अभ्या डॉट डॉट यांनी यापुढे वृद्ध संन्याशाची भेट घेणार नाही असे जाहीर केले आहे.

In reply to by अभ्या..

asdf आम्हाला ही जर्मन कन्या भेटल्यावर मल्ल्याच्या पोरीला आम्ही टाटा बाय बाय केला होता. आता विरक्तीमुळे हिलाही निरोप दिला. ;)

In reply to by सतिश गावडे

हे आहेत जर्मन बियर ब्रँड्स... Oettinger Krombacher Bitburger Beck's 2.78 Warsteiner Hasseröder Veltins 2.72 Paulaner Radeberger Erdinger आणि हे डच...  यातली दोघींच्या डोक्यावर बसलेली आमची लाडकी आहे ! :)

In reply to by आदूबाळ

बेल्जियन बिअर सर्वात उत्तम असतात हा नेदरलँड्स मध्ये शोध लागला होता. 1. Leffe 2. Duvel 3. Trappist 4. La Trappe 5. hoegaarden

In reply to by अभ्या..

होगार्डन परळच्या फीनिक्स मिलमध्ये असलेल्या "स्पोर्ट्स बार" मध्ये मिळते हे नक्की. ऑनलाईन मागवता येतात का ते माहीत नाही. इमानातून आणायला "माणशी दोन बाटल्या" हा नियम आहे वाटतं. मग तुम्ही हार्ड ड्रिंक आणा किंवा बियर. बाकी मैत्रभाऊ आणि मी दोघेही नेदरलँड्सच्या माहेरवाशिणी असल्यामुळे बेल्जियन बियरची आवड जुळली यात नवल नाही ;)

मागे यावर बराच काथ्याकुट झाला आहे. मी माझे मत दिले होते. लोकांनी बरीच टीका केली होती. आता टंकाळा आहे तेंव्हा कोणी त्या धाग्याचा दुवा शोधला तर बरे होईल.

In reply to by सुबोध खरे

काथ्या कूटतांना तुम्हीच उत्तर लिहावं अशाच अपेक्षेने हा प्रपंच केला आहे. कंटाळा करू नका. एकच प्रतिसाद लिहा पण भारी लिहा. प्रत्येकाला उत्तर लिहित बसू नका. सवडीने लिहा पण या धाग्यावर जरूर लिहा. -दिलीप बिरुटे

माझे वैयक्तिक मत असे आहे की दारू ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या पेल्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी दारू, सिगारेट पासून कोसो दूर असलेला) उका.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आणि पांडू आला की बुवा येतात. आम्हाला वाटले आता तरी थांबेल ते. तर कसलं काय. जुन्या सवयी अशा सहजासहजी सुटतात होय. ;)

In reply to by प्रचेतस

ती ओवी सांगाना सटीप. पडीले वळण ..................... रसाळ व्याखानाचा श्रोता नाखु

पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा एखाद्या मित्राची बॅचलर्स पार्टी असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे पिणार फ़क्त स्कॉच किंवा डार्क रम त्यातही स्कॉच ब्लेंड वगैरे पिणार नाही कधीच (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही सगळ्या देशी विदेशी एक्सपेरिमेंट केल्या आहेत) तर प्यायची असली तर फ़क्त स्कॉच ती सुद्धा फ़क्त ग्लेनफिड्डीच असली तरच मस्त एक लार्ज घ्यावा त्यात गारेगार २ स्कॉच स्टोन्स सोडावे मग खरपुस भाजलेली कोंबड़ीची टंगड़ी घेऊन कोपर्यात बसावे तोच पेग माइक्रो सिप घेत आजुबाजूची मंडळी त्यांची ढोसे पर्यंत चालवावा नंतर हलके फुलके काही खाऊन पड़ी मारावी रम असल्यास एक लार्ज + एक स्मॉल घ्यावा सोबत बॉयल्ड एग्स किंवा अंडा पकोड़ा असावा पण रम फ़क्त न फ़क्त ओल्ड मोंकच! बाकी अगदीच ओल्डमोंक नसल्यास कॉन्टेसा चालवुन घेतो पण ते मॅकडोवल वगैरे होमेओपेथिक औषधाच्या चवीचे लाल पाणी अजिबात नाही!!जेवण हलके घ्यावे अन मग पड़ी मारावी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कॉन्टेसा मिळतच नाहीये हो हल्ली! हळहळ. बाकी रमसोबत मुंग दाल + मिरची + टमाटे + चाट मसाला आदींचा मसाला अप्रतिम कोम्बो.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

हाय कम्बख्त अनिरुद्ध भाऊ क्या याद निकाली है

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

.

ते सोत्रि कुठे गेले? दारूच्या प्रकारांबरोबरच प्रमाणही माहीत असेल त्यांना. ;))

सोत्रि आमचे मद्य गुरु!! _____/\_____

खुशवंत सिंग रोज ६० प्यायचे म्हणे. ९९ वर्ष जगले. एका डायटिशनने दारू वाईट नाही पण चकल्या/शेव्/वेफर्स हा चकणा बराच घातक असं सांगितलं होतं. बिना (असला) चकणा थोडी दारू फार वाईट नसावी.

In reply to by सायकलस्वार

तुम्ही काढा शिवांबूवर धागा. त्यावर देईल कोणीतरी तुम्हाला पाहिजे ती प्रतिक्रिया. दारूच्या धाग्यावर दारूऐवजी शिवांबू प्या असा सल्ला कोण देईल? उगाच कायतरी...

ओल्ड मंकास पर्याय नाही याबद्दल अभ्या आणि बापूसो यांजशी बालके आदूबाळ सहमत आहे. दुसरा आवडता प्रकार म्हणजे जॅक डॅनियल्स. हेच मिपानाम घेतलेले आमचे परममित्र सध्या भेटत नसल्याने हा योग सहसा येत नाही.

In reply to by आदूबाळ

टेनेसी सावर मैश उर्फ़ जॅक डॅनियल्स एकदा प्यायलो होतो , ज़रा जास्त गोड वाटली मला ती! स्कॉच मधे एक क्रंच हवाहवा वाटतो, फ्यूमिंग स्लो असावेसे वाटते, I get it all only in १२ years matured Glenfiddich. व्हाइट रम फ़क्त कॉकटेल्स मधे उत्तम वाटते, स्टैंड अलोन नाय आवडली अज्याबात

In reply to by आदूबाळ

ओल्ड मंकास लावून ३० मिनिटात लावून, ११ वी मध्ये स्पिरीट आणि स्टआइल वर गुलाब च्या बहिणीला आणायला गेलो होतो त्याची आठवण झाली. असो. कधी बसायचे ते सांग, टेनेसी मध्ये जेडी प्यायचीच मजा वेगळी आहे. अजून लक्कास व्हायचे असल्यास मूनशाइन पण मागवून ठेवतो.

In reply to by गवि

होय ज्या काउंटी मधे जेडी बनते ती ड्राय काउंटी आहे असे नॅशनल जियोग्राफिक वर पाहिल्याचे स्मरते आहे

जोपर्यंत दारू तुम्हाला पित नाही तोपर्यंत, दारूवर प्रेम करा. १. मित्रांबरोबर कट्टा करता करता जमेल तितके दारू वर प्रेम करा. आणि. २. परत नंबर १ कडे वळा. खरेतर सुरापान हा एक सोहळा असतो. कधीतरी एखादा वीकेंड ठरतो. भेटायचे बेत ठरले जातात.कुणी कुणाला निरोप द्यायचा ते ठरते.बायकोला मस्का मारून, तिची परवानगी काढायला लागते.मिपाकट्टा म्हटल्यावर, जास्त मस्का मारायला लागत नाही.टांगारूंना रीतसर टाळण्यात येते आणि तो दिवस ठरतो. एखाद दुसरा राउंड होत नाही तोच, मिपाचे चविष्ट धागे परत एकदा उसवल्या जातात. स्वगत : ह्या बिरुटे सरांना कसे काय समजले की, पुढच्या महिन्यात मिपाकट्टा आहे म्हणून?

In reply to by सायकलस्वार

=)) काढाच धागा लाटकर काका. स्त्रीयांनी दारु पिणे गरजेचे आहे का किंवा दारु पिणाऱ्या स्त्रिया आणि बुडालेली संस्कृती. २०० नक्की करुन देऊ.

हो मी राहायचो तिथे तापमान उणे २℃ ते उणे २०℃ च्या मधे असे मुख्य म्हणजे करायला कायच नसे अन त्याहुन मुख्य म्हणजे मला ड्रिंक्स आवडतात म्हणे काका मी! :)

आपल्या पिण्याची वारंवारता वाढली असून आता थांबायला हवे असे वाटण्याची वेळ येऊ नये इतपत कमी असायला हवे. :)

ड्रिंक्स घेणे अथवा न घेणे हे प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असू शकतं. खासकरुन सहकार्‍यांनी भरीस पाडण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही फर्म असल्यास ते काहीही करु शकत नाहीत! माझ्या स्वतःच्या बाबतीत विचाराल तर ओल्ड माँकला पर्याय नाही! (निदान रमच्या बाबतीत तरी) वाईन प्यायचीतर ती पण रेड वाईनच!