गोधडीची चोरी

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
14 Jan 2016 - 12:00 pm

गावात सगळी कडे निरव शांतता होती. रात्रीचे बहुतेक ११ वाजले होते. दिनुला घरी येऊन दोन दिवसच झाले होते. (एस वाय . बि एस सी ) चे पेपर संपल्यामुळे तो सुट्टयात घरी आला होता.

बाहेर अंगणात खाटेवर
दिनु गाढ झोपेत होता . अचानक त्याला एक भयानक स्वप्न दिसले आणि तो दचकुन जागा झाला . आजुबाजुला बघतो तर काळा भिन्न अंधार होता.

समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. ईतक्यात समोरुन कुणी तरी पळत जात असल्याचा आवाज दिनुला आला तो चपलांचा आवाज दिनुने ऐकला. तो सावध पणे ऐकु लागला तर तो आवाज थोड्याच वेळात येईनासा झाला. हे बघुन दिनुने हातात टॉर्च घेतली आणि तो बघायला निघाला की कोण आहे .

तो आवाजाच्या दिशेने गेला पण त्याला कोणीच दिसले नाही.

दिनु परत येऊन झोपला . पण आता पुढे जे काही घडणार होते ते खुपच भयानक होते. याची जाणीव त्याला नव्हती.
हळुच समोरच्या बोळातुन तीन सावल्या अलगद पणे आवाज न करता दिनुच्या दिशेने सरसावल्या दिनु च्या तोंडावर गोधडी असल्यामुळे त्याला याची चाहुल लागली नाही. तिनही सावल्यांनी एकदाच दिनु वर झेप घेतली त्यांच्या शक्ती पुढे दिनुला काहीच करता आले नाही . त्याने खुप प्रतिकार केला पण एकाने दिनुच्या तोंडावर रुमाल टाकला तसा दिनु बेशुद्ध पडला. ...

सकाळी जेव्हा दिनुला जाग आली तेव्हा त्याला कळाले की काल गावात चोरी झाली .
दिनुने ऱात्री झालेला प्रकार घरी सांगितला. पण दिनुला एक गोष्ट कळत नव्हती की आपल्याला त्या चोरांनी का बेशुद्ध केले . पण जेव्हा दिनुला कळले की आपली गोधडी पण गायब आहे . तेव्हा मात्र त्याला खुप हसु आले . म्हणजे काय ते आता वाचणाऱ्यांना कळाले असेलच . !!

पुढे एक नवीन कथा मी घेऊन येत आहे.
( केम पर्वतावरील परिसाच झाडं )

थोडी सत्य थोडी काल्पनिक ::::::

कलाकथाबालकथाविचारआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

वगिश's picture

14 Jan 2016 - 12:06 pm | वगिश

नाही कळले

दिनु गवळी's picture

14 Jan 2016 - 12:10 pm | दिनु गवळी

चोरली होती त्यांनी थंडी वाजत होती

कविता१९७८'s picture

14 Jan 2016 - 12:12 pm | कविता१९७८

कुठल्या ईयत्तेत आहात हो तुम्ही?? पहिलीत की दुसरीत??

दिनु गवळी's picture

14 Jan 2016 - 12:15 pm | दिनु गवळी

ना... स

कविता१९७८'s picture

14 Jan 2016 - 12:17 pm | कविता१९७८

अच्छा

काय हे नीलकांत! अहो मिपावर 'बालविभाग' म्हणून एक दालन सुरू करायचे होते ना? बघा काय व्हायला लागलेय इथे!

आंबट गोड's picture

14 Jan 2016 - 12:47 pm | आंबट गोड

पहिलीतल्या मानाने चांगला लेख!

सतिश पाटील's picture

14 Jan 2016 - 1:05 pm | सतिश पाटील

आणि त्याच्या SYBSC च्या पेपर संपण्याचा काय संबंध या कथेशी?

होबासराव's picture

14 Jan 2016 - 1:46 pm | होबासराव

विठा काका, हेला काका, मास्टर दिनु .....आणि स्वयंप्रकाशित साहित्यसुर्य आचार्य णिसो.
फक्त प्रतिक्रिया वाचल्यात आणि प्रतिक्रिया देतोय्...णिसो क्लब साहित्य समजण्याएव्हढि बुद्धि नाहिये आणि ति नकोय.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2016 - 7:58 pm | मुक्त विहारि

मस्त...

(पहिली ब, मागचा बाक, उजव्या खिडकी जवळचा) मुवि

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2016 - 8:19 pm | अत्रुप्त आत्मा

बालिका किंवा जिल्बुचा ,यांना तुमच्यावर मास्तरिण म्हणून नेमल पाहिजे! ;)

मोजींच्या कथांची सर कुणालाच नाही...

तरीही क्लोज सेकंड असावेत हे ?

आम्हाला शिकवा कुणितरि.आज असच होतय.. दुसरीकडे धातु होता तो हि कलला नाहि.