'शिग्रेट'!
लेखनप्रकार (Writing Type)
'शिग्रेट'! शिग्रेट लागती काकाला.
मला दोन रुपय दिलं आन मनालं
"जांब्या, जारं बिस्टाल घीऊनं यं"
बिस्टाल दिड रुपायाची आन आठाण्याचं चाकलेट मला.
सुरकीच्या दुकानातनं म्या बिस्टाल घीतली आन एक काफी चाकलेट. लय गॉड आसतं. मज्जा. चिमणीच्या दातानं तायडीला ऊल्स. बाकी समदं मला.
पण हातात बिस्टाल. लय पांढरी, मागं मऊ मऊ गादी. घातली तोंडात. आहा! मज्जा! दोन झुरकं बी घेतलं. खोटंखोटं. चुटकी वाजवून राख पण झाडली. आहा! मज्जा!
मग काका दिसला. शिग्रेट दिली. त्यानं तोंडात घालून काडी वढली.
"तोंडात घालून आणली कारं?"
"न्हाय बी"
मग हातात घीऊन त्यानं बघीतली
"हि काय, समदा फिल्टर वला वला झालाय, लका त्वा तोंडातच घातली हुती, पळ भाड्या"
मग आमी पण सुटलो.
शिग्रेट तोंडात घातल्यावर म्हागच्या गादिला जीभ लावायची नसती, हे तवाच समजलं, जरा लवकरच न्हाय का?
प्रतिक्रिया
=)) मस्त.
मस्त
+१
मस्त जव्हेरभाऊ.
हा...हा
लै
:)
हाहाहा
हाहा
"म्हागच्या गादिला जीभ लावायची
लोल .. मस्तच !
चांगली आहे..
मस्त हो जव्हेरभाऊ!
:)
:-)
येव्हड्याशा गोष्टीतुन येव्हड
मस्त
हम्म्म
:)
पटलं?
पहिलि षिग्रेट आथ्वलि