चांदणधुळ
चांदणधुळ माळुनी
केसात
आजही तू तशीच
दिसतेस
सोडुनी आलो
कळीला
तरीही टवटवीत
भासतेस !
उल्कापाताचे खडे आजही
जपलेत
कालचे कृष्णमेघ
रूपेरी जाहलेत
तशीच ओढ अजुनी
आहे बरसण्याची
शिशिरगोठल्या ओठी
स्मित टेकविण्याची !
काळात हरवलेली
सय
पुनश्च मिलनाचे
भय
जाळीदार पिंपळपानापरी
हृदयी कोरले
पुन्हा आठवणींचे पुस्तक
जोडले !
वळुनी जातानाची
नजर
हृदयी बंद आहे
अत्तरकुपीपरी
युगे लोटली अनेक
साहवासाची
उर्मी साठवली
उरी !
फिरुनी आलीस तू
सामोरी
मनाची जाहाली
भिंगरी
देऊनी गेलीस बगल
हलकेच
पुन्हा तीच उरी
शिरशिरी !
विजयकुमार.................
01 / 01 / 2009
वाचताना लय नाही सापडत पण..
सुरेख रचना. शब्दांमधून
मस्तच
फिरुनी आलीस तू
प्रतीसादाबद्दल धन्यवाद
बॉस खास तुमच्यासाठी तुमच्याच
मस्तच वा वा
आणि दूर क्षितिजावर समुद्र
=)) =)) =)) =))
सहीच....
कविता आवडली.
काही काही शब्द खूप आवडले, जसे
कविता आवडली!
मस्त. शब्द खूपच सुन्दर निवड्ले आहेत.
मस्त है राव
मारवा
अरुण कोलटकरांची कविता आहे.
समजलं
आवडली.
कविता आवडली खंडेराया.
कृपया खर्या कवीचे नाव टाका,हि
01 / 01 / 2009
समीर आभार मित्रा
समीर
पुनश्च सांगितलेत!
समीर आभार मित्रा
धन्यवाद सर
विजय हे आमचे जुने ओर्कुट
प्लस वन
विजय हे आमचे जुने ओर्कुट
अविनाश काका आभार
कविता आवडली पण