Skip to main content

चांदणधुळ

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 15/12/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणधुळ माळुनी केसात आजही तू तशीच दिसतेस सोडुनी आलो कळीला तरीही टवटवीत भासतेस ! उल्कापाताचे खडे आजही जपलेत कालचे कृष्णमेघ रूपेरी जाहलेत तशीच ओढ अजुनी आहे बरसण्याची शिशिरगोठल्या ओठी स्मित टेकविण्याची ! काळात हरवलेली सय पुनश्च मिलनाचे भय जाळीदार पिंपळपानापरी हृदयी कोरले पुन्हा आठवणींचे पुस्तक जोडले ! वळुनी जातानाची नजर हृदयी बंद आहे अत्तरकुपीपरी युगे लोटली अनेक साहवासाची उर्मी साठवली उरी ! फिरुनी आलीस तू सामोरी मनाची जाहाली भिंगरी देऊनी गेलीस बगल हलकेच पुन्हा तीच उरी शिरशिरी ! विजयकुमार................. 01 / 01 / 2009
लेखनविषय:

वाचने 4496
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

फिरुनी आलीस तू सामोरी मनाची जाहाली भिंगरी मस्तच उपमा उपमेय उपमान यमक शब्द्छंद नादब्रम्ह अलंकार वृत्त साऱ्या परीमानांना पुरून उरलेली रचना … मला वाटते पण "देऊनी गेलीस बगल" पेक्षा "मारून गेलीस बगल" जास्त छान वाटले असते …

In reply to by कहर

प्रतीसादाबद्दल धन्यवाद आहो तो प्रौढ वयातील प्रियकर असे कसे म्हणेल मरून गेलीस वगैरे, कारण नकळत बगल देतात म्हजे अचानक सोडून गेली किंवा जाणे बगल देतात मारत नाहीत

In reply to by पालीचा खंडोबा १

बॉस खास तुमच्यासाठी तुमच्याच शैलीत आमच्याकडून दोन ओळी चहाच्या गाळणीतून जेव्हा चांदण्या गाळल्या तेव्हा वाळूतून तेल निघाल्याप्रमाणे उस्फुर्तलास रे खंडेराया बाळंतीण अधाशासारखी निहारात होती दर्पण आणि दूर क्षितिजावर समुद्र लाटांच्या डिजे वर वाजवत होता … बानुबया बानुबया

अतोनात ताकद आहे या शब्दांमध्ये.... छानच आहे कविता... उल्कापाताचे खडे आजही जपलेत कालचे कृष्णमेघ रूपेरी जाहलेत तशीच ओढ अजुनी आहे बरसण्याची शिशिरगोठल्या ओठी स्मित टेकविण्याची !

या खंडोबाला चॅलेंज नाही बाय द वे जेजुरी वाचली का हो तुम्ही ?

In reply to by मारवा

जेजुरी काय आहे ? हल्ली वयोमानाप्रमाणे लक्षात काही रहात नाही.

नाही फार....तरी पण आवडली

कृपया खर्या कवीचे नाव टाका,हि कविता तुमची नाही, मी या आधी ऑर्कुटवर वाचलेली आहे, हि "पुनश्च हरिओम" यांची कविता आहे, अश्या चोर्या मार्या बंद करा !!!!

In reply to by समीर_happy go lucky

समीर आभार मित्रा पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.

समीर आभार मित्रा पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.

विजय हे आमचे जुने ओर्कुट मित्र आहेत...त्यांच्या कवितेचे आम्हा ओरकुटकर फ्यान आहोत..

विजय हे आमचे जुने ओर्कुट मित्र आहेत...त्यांच्या कवितेचे ,आम्हि ओरकुटकर फ्यान आहोत..