'पावली' (विडंबन)
प्रेरणा- महाकाव्य!!!
१०० चा टाकटायम टाकला तवा ती पावली!
पाच भार साखळ घितली तवा ती पावली!
१५दिवस कालीजमधी मारल्या चकरा,
तवा ती पावली!
आवडून घेतला तिचा नकरा,
तवा ती पावली!
तिचा बा माराया धावला!
आपला पण जीव कावला!
पण बाची मुस्काटात घीतली!
तवा ती पावली!
लगीन कराया सांगितलं माझ्यासंगं,
तवा ती नाय पावली!
आनं तिच्यापाय माझ्याकड,
नाय रायली 'पावली'!
प्रेरणा!!
खि खि खि,,,मस्तय
धँस!
लय भारी =))
Thanks jenny