✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पावडर

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 11/17/2015 - 20:12  ·  लेख
लेख
(ह्या कथेत इंटरनेटच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. ही कथा वाचत राहा, तिचा आनंद घ्या पण चुकूनही ह्या जगाची ओळख स्वत: करून घ्यायचा प्रयत्न करू नका हीच कळकळीची विनंती.) **************************************************************************** गोष्ट तशी फारशी जुनी नाही. सहा आठ महिन्यांपूर्वी मी माझे गुजरात राजस्थान मधले काम संपवून नुकताच पुण्यात स्थानापन्न झालो होतो. गणपती संपत आले होते, अचानक तेव्हाच एके दिवशी आमचा मोबाईल खणखणला. बघतो तर कश्यप साहेबांचा फोन. कश्यप साहेब गेल्या वर्षीच पुण्याच्या सायबर क्राईमला जॉईन झाले होते. त्यांचे एकूणच ज्ञान, गुन्हा हाताळण्याची पद्धती, स्वभाव ह्या सगळ्याचे आपण एकदम फॅन, त्यामुळे पहिल्या रिंगलाच फोन उचलला. 'सुसकाळ साहेबजी. आमची आठवण कशी काय काढली आज?' 'पुण्यात आहेस?' साहेबांनी विचारले. 'असशील तर ताबडतोब ऑफिसला येऊन भेट. महत्त्वाचे काम आहे.' साहेबांचा सूर ऐकूनच काहीतरी बिनसले असल्याचे लक्षात आले, आणि मी 'पोचतोच अर्ध्या तासात' असे सांगत फोन ठेवला. साधारण साडेबारा एकच्या सुमाराला साहेबांच्या ऑफिसात पोचलो. 'सणावारी तरी सुखाने मोदक बिदक गिळू देत चला की..' असे ओरडतच मी साहेबांच्या केबिन मध्ये घुसलो आणि एकदम चपापलो. केबिन मध्ये कश्यप साहेबांबरोबरच एक अजून साहेब आणि एक मॅडम बसलेल्या होत्या. "ये रे टोणग्या.." साहेबांनी सुरुवात तरी खेळीमेळीने केली होती. मी यायच्या आधी बहुदा माझाच विषय चालला असावा कारण बाकीचे दोन लोकं प्रदर्शनातले माहितीपत्रक वाचल्यावरती त्या वस्तूकडे बघतात तसे माझे निरीक्षण करत होते. "प्रसाद, हे इन्सपेक्टर विजय कसाळकर आणि ह्या इन्स्पेक्टर रीटा गोम्स. दोघेही सध्या स्पेशल ड्यूटीवरती आहेत, आणि तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुझ्याविषयी सगळी माहिती मी त्यांना दिली आहेच. जशी तू अधे मध्ये आम्हाला मदत करतोस, तशी त्यांना पण करावीस असे मला वाटते." "नमस्कार" मी आपले उगाच माझे संस्कार वगैरे दाखवत दोघांकडे पाहून हात जोडले. "कश्यप काकांनी माझ्या बद्दल काय काय सांगितले आहे मला माहिती नाही, पण मला इंटरनेट, हॅ़किंग किंवा तत्सम क्षेत्रातले संपूर्ण ज्ञान खचीतच नाही. जे थोडेफार आहे, त्याच्या मदतीने शक्य ती मदत मी नक्की करेन." "धन्यवाद प्रसाद. आम्हाला नक्की तुमच्याकडून काय मदत हवी आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो, ते ऐकून तुम्ही तुमचा निर्णय घ्या. अर्थात तुमचा मदतीला नकार असेल, तर इथले झालेले संभाषण तुम्ही बाहेर पडतानाच विसरावेत हे तुम्हाला वेगळे सांगण्याची बहुदा आवश्यकता नसावी. बरोबर?" कसाळकरांनी सुरुवात केली. "हो मला कल्पना आहे. ह्या आधी मी एक दोन छोट्या प्रकरणात तुमच्या विभागाला मदत केली आहे. त्यामुळे तुम्ही तेवढा विश्वास नक्कीच ठेवू शकता." "नक्कीच! विश्वासू नसतात तर कश्यप साहेबांनी तुमचे नाव सुचवलेच नसते. पण तरी एकदा खुंट हालवावासा वाटला म्हणून बोललो. राग नका मानू. तर प्रसाद, आम्हाला एक केस संदर्भात तुमची मदत हवी आहे. १५ दिवसांपूर्वी पणजीम जवळच आम्ही एका परदेशी नागरिकाला गर्द विकताना एका तरुणाला पकडले. हा तरुण मूळचा नाशकातला. थर्ड डिग्री लावल्यावरती त्याच्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्या आधारे आम्ही अजून एका माणसाला अटक केली. ह्या अटक केलेल्या माणसाचे नाव बशीर आहे. ह्या बशीरकडे मात्र माहितीचा चांगलाच खजिना हाताला लागला.” थोडे थांबून साहेबांनी पाणी पिले आणि पुन्हा बोलायला लागले. "ह्या बशीरच्या माहितीनुसार सुमारे साडे सात कोटींचे अंमली पदार्थ पोरबंदर मार्गे मुंबईत उतरवण्यात आले आहेत. ह्यातला चार कोटींपेक्षा जास्तीचा माल एकट्या मुंबईतच विकला गेला, तर उरलेला गोव्यात दाखल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात आम्ही अथक प्रयत्न केले, गोव्या बरोबरच मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबईत देखील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. मात्र एखाद दीड कोटीच्या मालाच्या विक्रीचे हिशेब आणि काही लाख रुपये रोख ह्या शिवाय आमच्या हाताला काहीच लागले नाही. जी माणसे पकडली गेली, ती देखील महत्त्वाची काहीही माहिती देऊ शकली नाहीत. पण ह्या सगळ्या जमा केलेल्या माहितीतून एक महत्त्वाची बातमी अशी मिळाली, की आजकाल जेवढा अंमली माल भारतात दाखल होतो, त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के माल हा हस्ते-परहस्ते ग्राहकांपर्यंत पोचवला जातो. उरलेला माल इंटरनेटद्वारे खपवला जातो. ऐकूनच आम्हाला धक्का बसला. आम्ही जंग जंग पछाडले, पण आम्हाला एखाद्या ठाम दिशेला नेईल असा कुठलाच पुरावा मिळाला नाही. आम्ही अनेक संशयिताबरोबरच त्यांच्या कॉम्प्युटर्सची देखील झाडाझडती घेतली पण उपयोग शून्य.” येवढे बोलून कसाळकरांनी अपेक्षेने माझ्याकडे पाहिले. मी चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसणार नाहीत ह्याची पूर्ण काळजी घेत होतो. कसाळकरांना हळूहळू कुठल्या दिशेला जायचे आहे ते माझ्या चांगले लक्षात येत होते, पण जिथे जाण्याचा रस्ता ते शोधत होते त्या दुनियेत मी वावरून आलो असल्याने पुढचा प्रचंड धोका मला घाम फोडत होता. कसाळकर थांबताच आता रीटा मॅडमनी चार्ज आपल्याकडे घेतला. "प्रसाद येवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज विकले जातात तरी कसे, आणि ते देखील कुठलाही सुगावा लागू न देता? हा आमच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं आमच्या तपासात असेही आढळले आहे, की ह्या मार्गाने फक्त ड्रग्जच नाही, तर शस्त्रास्त्रे आणि सेक्सची देखील धडाक्यात विक्री होते. आणि हेच सगळे खणून काढायला आम्हाला तुमची मदत हवी आहे." मला ह्याचा अंदाज होताच, त्यामुळे मॅडम बोलेपर्यंत मी माझे उत्तर मनात तयार करायला सुरुवात केली होतीच. त्यांचे बोलणे होताच मी चेहऱ्यावरती गोंधळाचे भाव आणत बोलायला सुरुवात केली, "तुम्ही काय म्हणताय माझ्या अजून लक्षात येत नाहीये. हे सर्व इंटरनेटशी संबंधीत आहे हे कळले पण ह्यात मी काय मदत करणार? कुठला तरी आयपी ट्रेस कर, नायजेरियन फ्रॉड विरुद्ध थोडीफार मदत कर येवढ्यापुरतीच माझी मर्यादा आहे." "पण पॅपिलॉनकडे अमर्याद ताकद आहे... नाही?" कश्यप साहेब खाडकन बोलले आणि मी चांगलाच सटपटलो. "प्रसाद तुझी सगळी कुंडली मी त्यांना सांगितली आहे. हे बघ, हा प्रश्न तुला वाटतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे. ह्या सर्व व्यवसायातून मिळणारा पैसा हा अतिरेकी संघटनांकडे रवाना होतो आणि तो भारता विरुद्ध वापरला जातो अशी आमची पक्की खात्री झाली आहे. हे रॅकेट लवकरात लवकर उद्ध्वस्त व्हायलाच हवे. मागच्या महिन्यात फेसबुकवरती कोणालातरी 'झेंडे फडकवण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करा!' अशी अक्कल शिकवत होतास ना? मग आता तुझ्यासाठी ती वेळ आली आहे, पाठ दाखवू नकोस." "मला नाही वाटत मला ह्यात काही करता येईल. काका, तुम्हाला तर माहिती आहे, हे सगळे सोडून मला आता एक मोठा काळ उलटला आहे. तंत्र बदलली आहेत, रस्ते बदलले आहेत, नवे नवे ज्ञानी इथे रोज बस्तान बसवत आहेत. मी कसा ह्या सगळ्यातून मार्ग काढणार आहे?" "उगाच आता कारणे शोधत बसू नकोस. ह्या सगळ्याबद्दल तुला आधी कितपत माहिती आहे ते सांग" कसाळकरांनी दम हाणला. "माहिती म्हणाल, तर मी तुमच्यापुढे १०० पावले आहे." मी हसून म्हणालो. कसाळकर आणि रीटा मॅडम अविश्वासाने, तर कश्यप 'मला खात्री होती ह्या डांबीस माणसाला थोडी फार माहिती असणारच' अशा कौतुकाने बघायला लागले. "तुम्ही आम्ही ईमेल, फेसबुक, गूगल अशा अनेक सेवांचा लाभ घेत असतो. आपण ज्याला इंटरनेट म्हणून ओळखतो, त्या व्यासपीठावरती हे सगळे उपलब्ध असते. पण तुम्ही आम्ही ज्याला इंटरनेट म्हणून ओळखतो, त्याच्यापेक्षा तिप्पट मोठे असे एक अजून इंटरनेट अस्तित्वात आहे, ज्याला 'ब्लॅक वेब' अथवा 'डिप वेब' नावाने ओळखले जाते. आपल्या नेहमीच्या ब्राउझर्सनी ना ह्या जगात प्रवेश करता येतो, ना काही सर्फ करता येते. ह्या जगातल्या प्रवेशासाठी ब्राउझर्स पण तेवढीच खास लागतात, जसा की टॉर ब्राउझर. जगातली सगळ्यात जास्ती अनाधिकृत मालाच्या खरेदीची व्हर्च्युअल दुकाने तुम्हाला इथेच आढळतील. ड्रग्ज, शस्त्रास्त्रे, चोरलेली क्रेडिट कार्डस आणि सेक्स सर्व्हिस देखील. इथले व्यवहार चालतात ते बिटकॉईन आणि व्हर्च्युअल मनीच्या आधारे..." मी नकळत बोलायला देखील सुरुवात केली. ************************ (क्रमश:)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
साहित्यिक
तंत्र
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
23709 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

मी पयला.

बाप्पू
Tue, 11/17/2015 - 20:19 नवीन
मी पयला. मस्त सुरवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

पेपिलॉन, वेलकम बॅक!

एस
Tue, 11/17/2015 - 20:24 नवीन
पेपिलॉन, वेलकम बॅक!
  • Log in or register to post comments

वेलकम बॅक

आदिजोशी
Tue, 11/17/2015 - 20:27 नवीन
असं म्हणायचं असतं. पटापट पुढचे भाग टाक आता.
  • Log in or register to post comments

लय भारी. डीप वेबबद्दल ऐकून

आदूबाळ
Tue, 11/17/2015 - 20:28 नवीन
लय भारी. डीप वेबबद्दल ऐकून आहे. बिटकॉईन आणि तत्सम व्हर्चुअल करन्सीबद्दलही. पुढचा भाग लवकर लिहिणे.
  • Log in or register to post comments

भन्नाट सुरुवात पण परा मालिका

प्रचेतस
Tue, 11/17/2015 - 20:28 नवीन
भन्नाट सुरुवात पण परा मालिका पूर्ण करेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments

बरोबर

नाखु
Wed, 11/18/2015 - 09:02 नवीन
आहे सुशींच्या चार कथानायकांच्या कथेचे पुढे काय झालयं ते अजून माहीत नाहीय. अता ही अर्धवट राहू नये म्हणून चिमण्या गणपतीला सव्वा रुपयाचा "प्रसाद" कबूल केला आहे. वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हेच आणि हेच म्हणतो..

चिगो
Wed, 11/18/2015 - 14:18 नवीन
पराशेठ, जबर्‍या पुनरागमन.. दोन-चार ओळींत, कशाला, दोन-चार शब्दांत माणसाला खिळवून ठेवण्याची तुमची हातोटी 'भन्नाट' आहे.. प्ण टांगून ठेवण्याची लय बेक्कार सवयपण आहे तुम्हाला.. तेव्हा वल्लींशी सहमत होत बोलतो कि साहेब एकदा हात/मेंदू आणि किबोर्ड सुसाट दौडवा आणि मागचा सगळा बॅकलॉग भरुन काढा, प्लिज.. आणि हो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. अवांतर : पराशेठची 'भन्नाट' मालिका वाचायला देऊन सुशिंच्या शैलीची झलक ओळख करवली होती बायकोला लग्नानंतर. पण आता मुलगी तीन वर्षांची झाली तरी त्या गोष्टीच्या प्रतिक्षेत आम्हीपण बॅरीस्टर दिक्षितांसारखी छातीतली कळ घेऊन डोक्यावर खारका मारत बसलोय.. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

या शिंच्या डीप वेबबद्दल लै

बॅटमॅन
Tue, 11/17/2015 - 20:30 नवीन
या शिंच्या डीप वेबबद्दल लै परस्परविरोधी कायकाय ऐकून आहे. लिहा लवकर, वाचतोच आहोत.
  • Log in or register to post comments

झकास सुरुवात!

पैसा
Tue, 11/17/2015 - 20:37 नवीन
पटापट पुढचे भाग येऊ देत!
  • Log in or register to post comments

मस्त रे पर्या.... उस्स्सुकथा

मृगनयनी
Tue, 11/17/2015 - 21:04 नवीन
मस्त रे पर्या.... उस्स्सुकथा प्रचन्ड ताणल्या गेली आहे!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हैला ताई तुम्ही पण आलात? जै

मांत्रिक
Tue, 11/17/2015 - 21:07 नवीन
हैला ताई तुम्ही पण आलात? जै हो जै हो जै हो!!! स्वागत स्वागत स्वागत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

नयनाही आली परतून..!

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/17/2015 - 22:13 नवीन
नयनाही आली परतून..! अता जुने मिपा परतल्या सारखे वाटू लागले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मग अता "तु ये तुला फुक्कट

टवाळ कार्टा
Tue, 11/17/2015 - 23:38 नवीन
मग अता "तु ये तुला फुक्कट देईन" ची स्किम पण येणार का परतून? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पु भा प्र

रुस्तम
Tue, 11/17/2015 - 20:43 नवीन
पु भा प्र
  • Log in or register to post comments

अनोळखी विषय

चित्रगुप्त
Tue, 11/17/2015 - 20:43 नवीन
वा अगदी म्हणजे अगदीच अनोळखी विषयाबद्दल वाचायला मिळणार. आपण सर्वसामान्य नेटकरांनी एकंदरित काय सावधगिरी घ्यावी याबद्दल देखील मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

सुरुवात चांगली झालीये. वाचत

रेवती
Tue, 11/17/2015 - 20:49 नवीन
सुरुवात चांगली झालीये. वाचत राहीन.
  • Log in or register to post comments

परा,

स्वाती दिनेश
Tue, 11/17/2015 - 20:58 नवीन
बॅक विथ अ बिग बँग.. सुरुवात तर मस्तच. पुभाप्र. स्वाती
  • Log in or register to post comments

पुभाप्र

जेपी
Tue, 11/17/2015 - 20:58 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

भन्नाट!

अनुप ढेरे
Tue, 11/17/2015 - 21:03 नवीन
भन्नाट! आयसीस डीपवेबमध्ये खूप अ‍ॅक्टीव आहे असं नुकतच वाचलं.
  • Log in or register to post comments

डीप वेब????

बाबा योगिराज
Tue, 11/17/2015 - 23:35 नवीन
वाचायला, ऐकायला, षिकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

डीप नाही, डार्क वेब म्हणतात!!

मांत्रिक
Tue, 11/17/2015 - 23:37 नवीन
डीप नाही, डार्क वेब म्हणतात!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

फार भारी सुरुवात

इडली डोसा
Tue, 11/17/2015 - 21:04 नवीन
आणि अतिशय रंजक विषयावरची कथा... लवकर टाका पुढचे भाग. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हे

रामदास
Tue, 11/17/2015 - 21:07 नवीन
मागच्या महिन्यात फेसबुकवरती कोणालातरी 'झेंडे फडकवण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करा!' अशी अक्कल शिकवत होतास ना? मग आता तुझ्यासाठी ती वेळ आली आहे, पाठ दाखवू नकोस." आम्ही बोलतो तेव्हा आयकतच नाही. पोलीसच पायजेत.
  • Log in or register to post comments

झक्कास!!

तुषार काळभोर
Tue, 11/17/2015 - 21:09 नवीन
परा इज बॅक अ‍ॅण्ड हाऊ!!
  • Log in or register to post comments

मस्त रे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/17/2015 - 21:14 नवीन
इंट्रेस्टिंग !!!! वेलकम. कसं जमतं रे परा तुला कथा रंगवणं ? (पळा) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

तुम्ही बसा झक मारत..

पीके
Tue, 11/17/2015 - 22:18 नवीन
मग आम्हाला असेच काहितरी लिहुन वेळ मारून न्यावी लागनार.... डागतरानू ह,घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्कंठावर्धक

सर्वसाक्षी
Tue, 11/17/2015 - 21:14 नवीन
पुढे वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

सुन्दर

सिद्धार्थ ४
Tue, 11/17/2015 - 21:25 नवीन
आता पुढचे भाग पण येऊ दे फ़टाफ़ट. पहिला भाग तर खूपच छान जमला आहे.
  • Log in or register to post comments

जबरी!

बोका-ए-आझम
Tue, 11/17/2015 - 21:37 नवीन
पुभाप्र!
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात....

मुक्त विहारि
Tue, 11/17/2015 - 21:48 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

जब्रा

टवाळ कार्टा
Tue, 11/17/2015 - 21:49 नवीन
जब्रा
  • Log in or register to post comments

जबराट विषय! पुभाप्र.पुभालटा!

अजया
Tue, 11/17/2015 - 21:51 नवीन
जबराट विषय! पुभाप्र.पुभालटा!
  • Log in or register to post comments

हे ह्या आधीही वाचलय. परत

प्रीत-मोहर
Tue, 11/17/2015 - 21:53 नवीन
हे ह्या आधीही वाचलय. परत वाचुन सुद्धा आवड्याच
  • Log in or register to post comments

वाचलंय :/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/17/2015 - 22:39 नवीन
मला लिंक व्य नि करा. वाचुन घेतो या पराचा पुढचा भाग कोणत्या वर्षी यायचा ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

तिथे तरी पुर्ण केलय अस वाटतय

प्रीत-मोहर
Tue, 11/17/2015 - 22:57 नवीन
तिथे तरी पुर्ण केलय अस वाटतय का तुम्हाला प्राडॉ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्रबोर

तुषार काळभोर
Wed, 11/18/2015 - 10:39 नवीन
'तिथे' पण एक वर्षापासून हाच एक भाग (आणि अन्य कथांचे पहिले भाग) पडून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

पुभाप्र

मित्रहो
Tue, 11/17/2015 - 22:08 नवीन
लवकरच येऊ द्या
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त!!! आमाले त ह्ये

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/17/2015 - 22:09 नवीन
जब्बरदस्त!!! आमाले त ह्ये सगळे नवीणच ना बाबा. आता फुडचे बाग़ लवकर लवकर ल्हिऊन ह्रां ना!
  • Log in or register to post comments

मस्त सुरवात.पुभाप्र..

Maharani
Tue, 11/17/2015 - 22:41 नवीन
मस्त सुरवात.पुभाप्र..
  • Log in or register to post comments

जबरदस्त सुरुवात ! येऊद्या

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/17/2015 - 22:56 नवीन
जबरदस्त सुरुवात ! येऊद्या पुढचे भाग भरभर !
  • Log in or register to post comments

खरंच ! जीव टांगणीला लागलाय

उगा काहितरीच
Wed, 11/18/2015 - 18:57 नवीन
खरंच ! जीव टांगणीला लागलाय लवकर येऊ द्या पुढील भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खरंच ! जीव टांगणीला लागलाय

उगा काहितरीच
Wed, 11/18/2015 - 21:20 नवीन
खरंच ! जीव टांगणीला लागलाय लवकर येऊ द्या पुढील भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

क्रमशः???????????

बाबा योगिराज
Tue, 11/17/2015 - 23:34 नवीन
दुत्त दुत्त दुत्त. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

वाचतोय!

ब्रिटिश टिंग्या
Tue, 11/17/2015 - 23:49 नवीन
वाचतोय!
  • Log in or register to post comments

जबरदस्त अब आयेगा मजा

एक एकटा एकटाच
Tue, 11/17/2015 - 23:59 नवीन
जबरदस्त अब आयेगा मजा
  • Log in or register to post comments

पर्‍या पुढचा भाग आता कधी

पिंगू
Tue, 11/17/2015 - 23:59 नवीन
पर्‍या पुढचा भाग आता कधी येणार?
  • Log in or register to post comments

मस्त

महेश हतोळकर
Wed, 11/18/2015 - 00:40 नवीन
वाट पहातो आहे. लवकर पूर्ण कर.
  • Log in or register to post comments

जबरदस्त सुरूवात. वाचकांची

पाषाणभेद
Wed, 11/18/2015 - 00:46 नवीन
जबरदस्त सुरूवात. वाचकांची उत्सूकता ताणली गेली आहे. लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

सुरस....

प्रभाकर पेठकर
Wed, 11/18/2015 - 03:11 नवीन
आमच्या पिढीला हे तांत्रिकी शब्द म्हणजे 'मंगळ उच्चीचा आहे आणि शनी वक्री आहे' सारखाच आहे. पण कथानक फार सुरस दिसते आहे. शिकायचा प्रयत्न करतो आहे. पुढील भाग लवकर लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

पुभालटा!

रातराणी
Wed, 11/18/2015 - 05:48 नवीन
पुभालटा!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा