माझी नवीन गुढ(भय्)कथा वाचुन अभिप्राय देणे

येडा खवीस's picture
येडा खवीस in जनातलं, मनातलं
6 Sep 2008 - 5:30 pm

नमस्कार मित्रांनो,

मी मिसळपावचा एक नवा सदस्य आहे...व्यवसायाने ज्योतिष मार्गदर्शक आणि गुढविद्या अशा क्षेत्रातील आहे ( म्हणजे पांढर्या कपड्यातील जरा बरा मांत्रिक म्हणलात तरी हरकत नाही) त्याचप्रमाणे एक हौशी गुढकथालेखकही आहे. सध्या माझ्या ब्लोग वर एक नवीन गुढकथा लिहिलेली आहे...मिसळपावच्या रसिक वाचकांनी ती वाचुन अभिप्राय नोंदवावा ही नम्र विनंती...कथा जरा मोठी आहे त्यामुळे सवडीने वाचा

कथेची लिंक पुढीलप्रमाणे
http://sachinparanjpe.wordpress.com/%e0%a4%a5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0/

( मी नवा सदस्य असल्याने जर अशी लिंक वगैरे देण्याची प्रथा मिसळपाव मध्ये नसेल तर मालकांनी हा विषय उडवला तरी हरकत नाही.....)

वावरसमीक्षा

प्रतिक्रिया

खट्याळ's picture

6 Sep 2008 - 6:10 pm | खट्याळ

एक काम करा, तुमच्या ब्लॉगवरून ती कथा कॉपी पेस्ट करून इथे चिकटवा आणि खाली हवं तर तुमच्या ब्लॉगची लिंक द्या.
कथा आवडल्यास रसिक वाचक तुमचा ब्लॉग पाहतीलच.

खट्टु खट्याळ!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2008 - 8:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक काम करा, तुमच्या ब्लॉगवरून ती कथा कॉपी पेस्ट करून इथे चिकटवा आणि खाली हवं तर तुमच्या ब्लॉगची लिंक द्या.
कथा आवडल्यास रसिक वाचक तुमचा ब्लॉग पाहतीलच.

असेच म्हणतो. ( कथा लांब वाटत असेल तर क्रमश: करा.)

घाटावरचे भट's picture

7 Sep 2008 - 9:15 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

>>( कथा लांब वाटत असेल तर क्रमश: करा.)
आणि मिपाच्या दैदीप्यमान परंपरेचे क्रमशः पाईक व्हा.... :)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2008 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाच्या दैदीप्यमान परंपरेचे क्रमशः पाईक व्हा....

हा हा हा हा

खरं तर या क्रमश: वाल्यांनी आपल्या लेखनाचा एक तृतियांश सारांश पहिल्याच भागात दिला पाहिजे असे वाटते ;)
( क्रमश: वाले मित्रहो,ह.घ्या)

चतुरंग's picture

9 Sep 2008 - 12:09 am | चतुरंग

अहो सारांशसुद्धा क्रमशः देतील हो हे!! :O #o

चतुरंग

सखाराम_गटणे™'s picture

6 Sep 2008 - 6:16 pm | सखाराम_गटणे™

जर कथा तुमची असेल तर तुम्ही ती कथा येथे टाकु शकता.

विजुभाऊ's picture

6 Sep 2008 - 6:23 pm | विजुभाऊ

कथाबीज चांगले आहे पण ते फार थोडक्यात आटोपले आहे.
प्रयत्न स्त्युत्य :)
लिहीत रहा

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मीनल's picture

6 Sep 2008 - 6:31 pm | मीनल

मी घरात ब-याचदा एकटी असते.
तेव्हा आधी वाचलेल्या ,टीव्हीवर पाहिलेल्या गोष्टी आठवतात.
मग सर्व काही कठीण होऊन बसत.
दिवसा /रात्री झोप लागत नाही.
बेसमेंटला जायलाही भिती वाटते.
डोक्यातून जाता जात नाही.

म्हणून मी काहीही भयंकर किंवा भिती वाटेल असे वाचत/पाह्त/ऐकत नाही.
क्षमस्व.

मीनल.

विकेड बनी's picture

6 Sep 2008 - 6:42 pm | विकेड बनी

तर नका वाचू हो. लेखक काही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही वाचनाची ,पण हे असे मुद्दाम प्रतिसाद लिहून विचका करण्याची गरज नाही.

येडा खवीस's picture

6 Sep 2008 - 6:52 pm | येडा खवीस

प्रश्न असा आहे की इथे एवढ्या मोठ्या कथेला अपलोड केलं तर चालेल कसं???? त्यात फोटो बिटो पण जाम टाकलेत वातावरनिर्मितीसाठी

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

मीनल's picture

6 Sep 2008 - 6:53 pm | मीनल

इथे वाचनाची जबरदस्ती नाही हे मी जाणते.

भयंकर असे वाचून माझी कशी अवस्था होते ते सांगायचे होते.
अशी प्रतिक्रिया देण्याची मोकळीक मिपावर आहे असे वाटते.

मुद्दाम विचका करण्याच्या हेतूने प्रतिसाद दिलेला नाही.मी त्यातली नाही.
आणि विचका होत असेल तर खुशाल उडवून टाकावा प्रतिसाद!

मीनल.

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 7:48 pm | विसोबा खेचर

मिपा आणि मीनल,

पण हे असे मुद्दाम प्रतिसाद लिहून विचका करण्याची गरज नाही.
आणि विचका होत असेल तर खुशाल उडवून टाकावा प्रतिसाद!

दोघंही शांत व्हा! :)

मला जरा सुखाने जगू द्या! :)

मीनलताईंनी जो प्रतिसाद टाकला आहे त्यात व्यक्तिश: मला तरी काही गैर वाटत नाही!

असो...
हा विषय येथेच संपला असे धरून चालतो!

आज मिपाच्या दारी गौरी आल्या आहेत, सगळे मिळून हसतमुखाने त्यांचं स्वागत करू! :)

तात्या.

रेवती's picture

7 Sep 2008 - 6:57 am | रेवती

आपली भयकथा वाचली. सुरूवात ते अर्धा भाग छान जमला आहे. बाकी अर्धा भाग वाचकाला बांधून ठेवू शकत नाही असे वाटते. मधे टाकलेली छायाचित्रे खास करून अपघातांची, अंगावर काटा आणणारी आहेत.

रेवती

सुनील's picture

7 Sep 2008 - 4:55 pm | सुनील

कथा चांगली जमली आहे.

अपघातांचे फोटो भारतातील न वाटता अमेरिकेतील वाटत आहेत. अर्थात, त्यामुळे बिघडत काहीच नाही. लिहीत रहा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यशोधरा's picture

7 Sep 2008 - 9:09 pm | यशोधरा

आवडली कथा. शेवटी जरा लांबल्यासारखी वाटली.

प्राजु's picture

8 Sep 2008 - 3:18 am | प्राजु

मिपावर तुमचे स्वागत.
कथा सवडिने वाचेनच..पण इथे मिपावर लिहिलित तर लवकर वाचली जाईल. नाहीतरी इथे क्रमशः लिहितातच लोक.. तुम्हीही चढवा इथे तुमची कथा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्नेहश्री's picture

8 Sep 2008 - 12:33 pm | स्नेहश्री

खतरनाक...!!!!!........वातावरण निर्मिती मस्तच होती जणु ह्या घटनेची मी साक्षिदार आहे अस वाटत होत...!!!

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

अनिल हटेला's picture

8 Sep 2008 - 1:05 pm | अनिल हटेला

लेखक महोदय !!

१०-१२ वेळा प्रयत्न केला ..

पण तुमचा ब्लोग उघडत नाहीये .....

लोड पेज एरर येतये ......

बहुतेक भुताटकीची लागण माझ्या पी सी ला आधीच झालीये की काय ?

काय तर आयडीया द्या राव..........

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अभिरत भिरभि-या's picture

8 Sep 2008 - 5:17 pm | अभिरत भिरभि-या

कथा जमली आहे.. पण वाचताना आम्हाला दूरदर्शन वरील शक्तीमान मालिकेची आठवण होत होती.
Sataan व Holy Spirit मधली लढाई खरे तर ख्रिस्ती वा इस्लामी संकल्पना ..
गाणगापुर निवासी सद्गुरु वैदिक धर्म सोडुन असे यावनी आचरण केव्हापासुन करु लागले ?
अर्थात पुनर्जन्माचे पिल्लु सोडुन कथेचे भारतियीकरण ही झाले आहे...
लेखन स्वातंत्र्यामुळे आपण कसेही लिहु शकता पण Out of Context संदर्भ मिळाल्याने जरा वाचनाची मजा जरा कमी झाली.
( सेक्युलर भारताचा धर्मनिरपेक्ष नागरिक) भिरभि-या

-------
तरी एक फरक आहे ..
शक्तीमान बिचारा प्रेम वगैरे करायचा. कथानायक परिक्षित असे वामाचारी नसावेत

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 12:58 pm | विसोबा खेचर

खविसा,

तुझ्या ब्लॉगसोबत मिपावरही लिहीत जा रे! :)

तात्या.

येडा खवीस's picture

22 Sep 2008 - 5:27 pm | येडा खवीस

पुन्हा एक नवीन भयकथा लिहिलेली आहे

वाचा......."चकवा" अशा नावाने कथा आहे

लिंक- http://sachinparanjpe.wordpress.com/%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be...

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

मालोजीराव's picture

16 Feb 2011 - 5:49 pm | मालोजीराव

sachinparanjpe.wordpress.com is no longer available

....हे तुमच्या ब्लोग वर वाचून फार भीती वाटली !....तुमच्या पुढच्या एकवाक्कीय गुढकथेसाठी शुभेच्छा :D

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Feb 2011 - 10:12 pm | निनाद मुक्काम प...

खविसा
गुढकथा हि मला जीव कि प्राण
त्यात तुम्ही एवढ्यात चक्क दोन गूढ कथा सादर केल्या आहेत .
चवी चवीने रात्री वाचेन म्हणतो .
बाकी गुढविद्या म्हणजे...
अफलातूनच
त्यावर एक स्वतंत्र लेखमाला होऊन जाऊदे
.

झुळूक's picture

16 Feb 2011 - 10:51 pm | झुळूक

मिपा वरती लिहा हो, तुमचा ब्लोग ओफिसात ओपन नाहि होत!

शिल्पा ब's picture

18 Feb 2011 - 7:58 am | शिल्पा ब

कुठंय ती कथा? लिंक उघडली तर तो ब्लॉग अस्तित्वात नाही असं येतयं...आम्हालाही वाचु द्या की भयकथा...इथंच चिकटवा...लिंका नका देउ!!