शिक्षणाच्या आई चा घो !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुलीच्या शाळेतून फोन आला. आमच्या चिऊताई च्या टिचर नी आम्हा उभयतांना शाळेत बोलावले होते.
शनिवारी शाळेला सुटी होती तरी आम्हाला बोलावले.
मी जरा आमच्या कन्ये बद्दल सांगतो, येत्या शुक्रवारी ३ वर्षाची होइल.
सौभाग्यवती खूपच काळजी करू लागली. काय झालं असेल, मुलीने काही पराक्रम तर नाही केला शाळेत. ( पूर्वी एकदा असंच एकदा शाळेतून बोलावणं आलं होतं , आमच्या कन्येने टिचर च्या कानाखाली गणपती काढला होता … ती कहाणी नंतर कधी तरी )
दोन दिवस सौभाग्यवती नीट झोपली नाही. सारखी काळजी.
एकदाचा तो दिवस उगवला. आम्ही शाळेत पोहोचलो. बरोबर मुलगी आणि आम्ही दोघ शाळेत पोहचलो.
नमस्कार चमत्कार झाल्यावर लगेच मुद्यावर हात घातला.
टीचर : तुमची मुलगी साधारण आहे, तिच्यात काही असाधारण असं काहीच नाही, तुम्ही दोघा हि सुशिक्षित आहात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या स्पर्धेच्या युगात तुम्ही मुलांना तयार केले पाहिजे, तुमची मुलगी कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेत. जेवढा विचारले जाते तेवढंच उत्तर देते. स्वताहून काही करायला मागत नाही.
मी टीचर शी चर्चा( वादविवाद ) करण्यास सुरुवात करताच बायको नि आम्हालाच तंबी दिली. बरोबर बोलताहेत टीचर. मी उद्या पासून अजून जास्त अभ्यास घेत जाईन.
मला खरच कळत नव्हत मी हसू कि रडू, काय चाललाय हे , ३ वर्षाच्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवायच्या. त्यांनी सर्धेत भाग घ्यायचा.
आणि या स्पर्धा म्हणजे कसल्या ड्रोईग आणि स्टोरी टेलिंग, क्राफ्ट आणि बडबड गीते.
या पूर्वी जिंगल स्पर्धेत मुलीने जॉनी जॉनी म्हटलं तर बाई म्हणल्या हि प्ले ग्रुप मधली कविता आहे, नर्सरी ला याहून अधिक आलं पाहिजे.
या पूर्वीच्या मीटिंग मध्ये बाईनी नी सांगितल ज्या मुलांच्या घरात मराठी मध्ये बोललं जातं त्या मुलांना फोनिक्स च्या क्लास ला घाला, त्याचं इंग्लिश लवकर सुधारतं म्हणे, उच्चार स्पष्ट होतात … मग काय लगेच आमच्या सौ गुगल करून कुठे चांगला फोनिक्स क्लास बघून अडमिशन करून आली मुलीसाठी ( फी महिना २२०० ),
मी शाळेत बाकी पालकांसोबत चर्चा केली, सगळी कडे हेच …. मुलांना आता पासूनच आता पासूनच रेस मध्ये पाळण्यासाठी तयार केलं जातंय.
सकाळी शाळा, दुपारी शिकवण्या, संध्याकाळी आई घरी अभ्यास घेणार, शनिवारी ड्रोईग किंवा कत्थक…. सगळ्या पालकांना आपल्या मुलांना सुपरमेन बनवायचं. दहावी बारावी चे निकाल ऐकावे तर ९९% एवढे मार्क एका मुलाला ?? , गरिबाचे दोन तीन पोरं पास होतात तेवढ्या मार्कात.
मला कळतंय स्पर्धेचं युग आहे पण किती आणि कधी पासून…. लहान लहान मुलांचं बालपण हरवत चाललय. काय हा अनाठाई हट्ट, काय साध्य करतोय आपण.
मला आठवतंय मला ५वीत इंग्रजी विषय पहिल्यांदा आला तेव्हा परीक्षेत माय नेम इस उमेश असा लिहिताना may name is umesh असा लिहिल होतं , भोपळा मिळाला होता त्या प्रश्नाला, ५वीत इंग्रजी विषयाला सुरुवात करूनही आमचं काही बिघडलं नाही, ३ वर्षांच्या मुलांकडून काय आणि किती अपेक्षा ठेवायच्या.
३ वर्षाची असताना जर तिला नाही कळाला कि भेंडी ला लेडी फिंगर म्हणतात तर कुठे बिघडलं.शिकेल ती आज नाही तर उद्या, भेंडी ला लेडी फिंगर नाही म्हटलं तरी भेंडीच राहणार, त्याचा बटाटा नाही होणार.
संध्याकाळी मी बाहेरच्या खोलीत काहीतरी काम करत होतो , कन्या बाहुबली चित्रपट बघत होती , अचानक धावत आली म्हणाली " बाबा बाहुबली नि त्या काकुंचे कपडे काढले " ( चित्रपटात एक गाणं आहे त्यातला काही रोमेंटिक सीन सुरु होता )
मी तिच्या चेहर्याकडे एकटक बघत राहिलो. काय बोलावं काही सुचेना.
माझं मन म्हणत होतं अजून आभाळ फाटायचं बाकी आहे. !!
प्रतिक्रिया
टाळ्या...!!!!
उत्तम प्रतिसाद ! विचारी व सजग
छान!
लहान मुलांना दिल्या जाण्यार्
शाळा एक संस्था व् संस्थान
अजुन एक बारिकसा मुद्दा
बारीकसा नाही
लेख वाचून वाईट वाटले. माजलेत
प्रत्येक मूल हे वेगळ्या
माझ्यामते स्पर्धा ह्या
तुमच्याशी सहमत आहेच! आपल्या
मुलांना वाढू द्या
आमची आई शाळेची मुख्याध्यापक
धागा मिसला होता. आता वाचला.
शाळेतले प्रोजेक्ट कशासाठी
हे प्रोजेक्टस म्हणजे डोक्याला
जातांना जीवंत साळींदर घेऊन जा
सगळ्याचेच विचार पटतात.
मलापण!!! द्या टाळी!!
तुमच्या आयाडीच्या जवळपास शब्द
अहो अलीकडे डुआयडी लैच
मयतरी
>>तुमची मुलगी साधारण आहे,
शेंचुरी बद्दल श्रीउमेश
माझी आई गेली २७ वर्षे बालवाडी चालवते
मस्त वाटले प्रतिसाद वाचून.
रंगाशेठ
एका शिक्षण-योगिनीच्या कार्याचं अप्रतिम वर्णन!
कुठे आहे ही बालवाडी?
मी त्याच शाळेत शिकलेली आहे :
दुसरी बाजू
Pagination