चालत राहू......
रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू,
गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू.
उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही
कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू.
जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही,
कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू.
दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही,
आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू.
नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही,
कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.
सुंदर
होय बाई, विंग्रजी शब्द न
तेव्हा जे खटकले ते स्पष्टपणे
:)
आवडली
सुंदर!!!!!!!!!!!
आवडली कविता.
+१
वा!
हे
सुंदर!
आवडली कविता.
सुंदर
कविता आवडली!
जॉनी वॉकर साठी सुरेख
सद्ध्याच्या समाजाची अवस्था.
छान आहे
९० एम एल अवस्था
ध्य्येयहीन , दिशाहीन असे
वॉव...!
सर्वांचे आभार.