Skip to main content

रंगल्या रात्री अश्या

लेखक भैड्या यांनी रविवार, 13/09/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो

वाचने 11021
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

बापरे! कविता काहिच्च कळली नाही! तरीपण आवडली!!! काय भयानक चित्रसृष्टी निर्माण केलीय लेखकाने!!! बाबौ!!! सलाम त्याबद्दल!!! आवडलं लिखाण!!!

In reply to by एस

भौ! कृपया अमूर्त चित्रसृष्टीकडे लक्ष द्यावे. जे पकडायचा प्रयत्न करून देखील सापडत नाही असे काहीतरी आहे. त्या अमूर्ताचा शोध हाच कवितेचा प्लस पाॅईंट आहे.

कळाली... मला कविता कळाली... अस वाटायच्या आतच लांब पळाली! (विको वज्रदंती लावल्यावर कळेल काय? :-/)

या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला भरतं आलेलं हाये. डोळ्यातील चार टिपुस धाग्यावर शिंपडुन वरच्यांच्या आभारप्रदर्शनाचा ठराव पास खरतो. असावा लोभ भैडु.

In reply to by भैड्या

कायंच कळलं नाय, पण मस्तं. भक्क्कळ - व्वा. सरकार नवा शब्द दिला तुम्ही माय मराठीला. पण, तो "क्क्क" कसा वाचायचा आणि उच्चारायचा ?

In reply to by नाव आडनाव

आधी चुळ भरा बघू.. मग घसा घराघरा खाक्रा. आता वर बघा (तिकडे नैवो).. परत खाली बघा. जोर लावुन वरडा " हे क्क्काय आहे?????" बघा जमलं की नाही.

कविता आवडली. टकल्यावर चंद्रमा चमकल्या सारखे वाटले. पांढरे केसं असती तर सूर्य चमकला असता.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

भैड्याजी????? चरणकमळ करा हीकडे ( खेटरं बाजुला).. आपलाच (अडला हरी) भैडु

In reply to by अत्रुप्त आत्मा

महा-तम्यांचे चरण दोऱ्याला लागले अणिक जीव खालसा झाला. _/\_