✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अगा ते ब्रम्हकमळ उमलले दारी...

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 09/03/2015 - 16:23  ·  लेख
लेख
आमच्या टेरेसवरच्या छोट्याश्या बागेत अनेक वर्षे एक ब्रह्मकमळाचे (Epiphyllum oxypetallum) रोपटे एक कोपरा पकडून झोपाळू अनामिक सदस्यासारखे चूपचाप पडून आहे. हिमालयात आणि श्रीलंकेत मूळ घर असलेली ही वनस्पती भारताच्या अनेक घरांच्या बागेत रोपट्यांच्या स्वरूपात वाढवली जाते. तिचा भारतापेक्षा थोडा वेगळा प्रकार (Phyllocactus purpusii) मेक्सिको, ब्राझील, इ अमेरिकन खंडातील देशांतही सापडतो. बागेतल्या इतर नखरेल वृक्षवल्लींना सांभाळताना आणि त्यांच्या सुंदर रूपरंगाचे कौतुक करताना या कार्टूनमध्ये रोडरोलर अंगावर जाऊन सपाट झाल्याप्रमाणे दिसणार्‍या बिचार्‍या वनस्पतीकडे बर्‍याचदा लक्षही जात नाही. कारण Epiphyllum oxypetallum असे भारदस्त शास्त्रीय नाव आणि ब्रम्हकमळ असे दैवी भारतीय नाव असलेल्या या झुडुपाला फार आकर्षक रूपरंग नाही. ऑर्किड-कॅक्टस (Family Cactaceae) प्रकारात मोडणार्‍या या झुडुपाच्या फांद्या लांबलचक पानांसारख्या दिसतात (phylloclade) आणि त्यांच्या कडांत असलेल्या खाचांसारख्या दिसणार्‍या डोळ्यांतून नवीनं फांद्या फुटतात. याला Jungle cactus व Dutchman's Pipe या नावानेही ओळखले जाते...  अशी ही वनस्पती आमच्या टेरेस बागेत जवळ जवळ तीन वर्षे निद्रावस्थेत राहिल्यावर अचानक जागी होवून काही दिवसांपूर्वी आपले अस्तित्व जाणवून द्यायला लागली. तिच्या सर्वात समोरच्या फांदीच्या एका डोळ्यामधून अगदी डोळ्यात भरेल अश्या मोक्याच्या जागी एक पिटुकले बाळ डोकावू लागले आणि त्याने "मी सर्वसामान्य फांदी नसून एक बालकलिका आहे" हे जाहीर केले. हे कवतिक हा हा म्हणता सर्वसामान्य झाडांच्या कळ्यांना स्वतःबद्दल न्यूनत्व वाटावे इतके मोठे झाले. ती कलिका अर्थातच घरातल्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र झाले यात काहीच आश्चर्य नव्हते !

 ......

तिचे फूल हे या वनस्पतीचे सर्वात मोठे आकर्षण आहे. या वनस्पतीला अनेक (३ ते ५) वर्षांतून एखादेवेळेस फुल येते आणि ते कधी येणार याचा अंदाज कळी दिसायला लागल्यावरच येतो, हे कारणही तिच्याबाबतची उत्सुकता वाढवते. १० ते ३० सेमी लांब देठावर १५ ते ३० सेमी लांब आणि १५ ते २० सेमी रुंदीचे असलेले हे फूल विशालकाय तर असतेच, पण त्याच्या गुंतागुंतीच्या पण नाजूक रचनेने त्याला जगप्रसिद्धी मिळवून दिली आहे. याला त्यात असलेल्या benzyle salisylate मुळे मंद गोडसर वास असतो. या फुलाचा अजून एक विशेष म्हणजे ते सर्वसाधारण फुलांच्या विपरित संध्याकाळी उमलायला लागते, मध्यरात्री पूर्ण उमलते आणि सकाळपर्यंत कोमेजून गळूनही पडते ! थोडक्यात, हे फूल उमलण्याचा प्रवास आणि त्याचे पूर्ण उमललेले रुपडे पहायचे असेल तर जागरण करायला लागते. आम्ही रात्री जागून पाहिलेल्या या अनवट फुलाची जीवनयात्रा तुम्ही दिवसाउजेडी आरामात खुर्चीत बसून खालील चित्रांच्या रूपात पहा...

 ...... ब्रह्मकमळ : ०१ व ०२ : संध्याकाळी ५ व ६ वाजता

.

 ब्रह्मकमळ : ०३ : रात्री ९ वाजता

.

 ब्रह्मकमळ : ०४ : रात्री ९ वाजता

.

 ब्रह्मकमळ : ०५ : रात्री १० वाजता

.

 ...... ब्रह्मकमळ : ०६ व ०७ : रात्री १० व ११ वाजता

.

 ब्रह्मकमळ : ०८ : रात्री १२ वाजता पूर्ण फुललेले फूल

.

 ब्रह्मकमळ : ०९ : रात्री १२ वाजता पूर्ण फुललेले फूल

.

 ब्रह्मकमळ : १० : १२ वाजता पूर्ण फुललेले फूल

. मध्यरात्रीनंतर हे फूल कोमेजू लागते आणि सकाळपर्यंत हे एका रात्रीचे आश्चर्य संपून जाते !

 ब्रह्मकमळ : ११ : सकाळी कोमेजलेले फूल

. सकाळी १० वाजेपर्यंत फूल झाडावरून गळून गेले होते आणि ते झुडूप जणू काहीच घडले नाही असे पूर्वीप्रमाणे टेरेसच्या एका कोपर्‍यातिल तटस्थ सदस्य झाले होते...

 ब्रह्मकमळ : १२ : दुसर्‍या दिवशी सकाळी दिसणारे ब्रह्मकमळ झुडूप

. इतके दिवस दुर्लक्षित असलेल्या या झुडुपाने त्याचा प्रसिद्ध चमत्कार दाखविल्यामुळे आता दुसरी कळी आली की काय हे पाहण्यासाठी त्याच्या दर फांदीचे रोज मोठ्या कुतूहलाने निरीक्षण केले जाणार आहे हे काय सांगायलाच हवे काय ?! .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
34738 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

हा.हा.हा.... :)

मदनबाण
Wed, 09/09/2015 - 01:00 नवीन
हा.हा.हा.... :) ब्रम्हदेव दिसण्याची शक्यता नाही, त्यामुळे कमळाचे दर्शन सुद्धा कसे होइल ? असे खरे तर लिहणार होतो. ;) आमच्या घरी अनेक वर्ष हे झाड होते... आता फुल येइल... आता फुल येइल म्हणुन अनेक वर्ष वाट पाहिली... शेवटी कळी लागली.पण च्यामारी हे कमळ रात्री उमलले आणि मला पाहताच आले नाही. :( मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Maharashtra: 69 talukas facing drought-like conditions to get relief
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्तच!!!

वेल्लाभट
Tue, 09/08/2015 - 12:06 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments

चित्रे न दिसणार्‍यांसाठी

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/09/2015 - 11:33 नवीन
चित्रे न दिसणार्‍यांसाठी किमान पूर्ण फुललेले ब्रम्हकमळ तरी दिसावे म्हणून हा अजून एक प्रयत्न... Image removed. . Image removed.
  • Log in or register to post comments

आताचे हे दोन्ही फोटो दिसले.

नाव आडनाव
Wed, 09/09/2015 - 11:49 नवीन
आताचे हे दोन्ही फोटो दिसले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मूळ दुवा जरा जास्त वेळ उघडा

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/09/2015 - 12:06 नवीन
मूळ दुवा जरा जास्त वेळ उघडा ठेवून पहा. हाय रेझोल्युशन फोटो असल्याने ते लोड होण्यास उशीर लागत असावा, कदाचित्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

पाहिले.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/09/2015 - 12:09 नवीन
अजी मी ब्रह्मकमळ पाहिले, अssssजी मी ब्रह्मकमळ पाहिले....
  • Log in or register to post comments

फटू दिसेनत, घरी जाऊन पाहतो.

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 13:56 नवीन
फटू दिसेनत, घरी जाऊन पाहतो.
  • Log in or register to post comments

अरे मला पण दिसत नाहीत

पैसा
Wed, 09/09/2015 - 16:43 नवीन
क्रोमवर गूगल लॉग इन केलेले असेल तरच दिसताहेत. अँड्रॉईडसारखे क्रोमवर लॉग इन करून रहायचे असे काही तरी नव्याने सुरू झालंय का देवजाणे. क्रोममधेच काहीतरी बदल झालेत हल्ली. माझ्या ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंटचे जावा अ‍ॅपलेट अचानक चालत नाहीसे झालंय. कुछ तो गडबड है. डॉक. नी फोटो दिलेत त्यावर राईट क्लिक केले तर नेहमी जे मेनु यायचे तेही येत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आता आले फोटू - क्रोम मधे

नाव आडनाव
Wed, 09/09/2015 - 17:10 नवीन
आता आले फोटू - क्रोम मधे मिसळपावच्या बाजुच्या टॅब मधे जीमेल लॉगिन केल आणि मिसळपावचं पान रिफ्रेश केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जादू

प्रियाजी
Sun, 09/13/2015 - 16:27 नवीन
'नाव आडनाव' तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि जादू झाल्यासारखे फोटो दिसायला लागले. आता हीच युक्ती नेहमी वापरत जाईन. डॉ. सुहास, तुमचा माहितीपूर्ण लेख, डोळे निववणारे फोटो अतिशयच आवडले. तुमची पुष्पांजली १/२ अतिशय मन्मोहक आहे. ह्यामागे तुमच्या घरच्यांचे कष्त्ट असणारच. तुम्हीही फोटो टाकून त्यांच्या प्रयत्नांना दाद दिलीत. खूप छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

अप्रतिम फोटो. निसर्गाचा खरंच

पद्मावति
Wed, 09/09/2015 - 21:58 नवीन
अप्रतिम फोटो. निसर्गाचा खरंच चमत्कार आहे. रात्रभर जागून फोटो काढून ते आमच्याबरोबर शेअर केल्याबदद्ल खूप आभार तुमचे. खूप सुंदर माहीती आणि फोटो. नाव आडनाव, तुम्ही सांगितल्या प्रमाणे जीमेल लॉग इन करून मिपा रीफ्रेश केलं. अक्षरश: जादू झाल्यासारखे सगळे फोटो दिसायला लागले आहेत. थॅंक्स सो मच.
  • Log in or register to post comments

छायाचित्रे दिसत नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/10/2015 - 07:11 नवीन
:( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जीमेल चालू असताना दुसर्‍या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/10/2015 - 08:58 नवीन
जीमेल चालू असताना दुसर्‍या टॅबमध्ये मिपा उघडल्यास चित्रे पहायला समस्या येत नाही. स्वगत : गुगल फोटोतला नवीन (?मुद्दाम ठेवलेला) बग दिसतोय.
  • Log in or register to post comments

दिसले फोटो दिसले.मस्त प्रसन्न

इशा१२३
Fri, 09/11/2015 - 16:06 नवीन
दिसले फोटो दिसले.मस्त प्रसन्न फुल.सुरेख दिसताहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा