Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] देवकी

लेखक dadadarekar यांनी गुरुवार, 06/08/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली. मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं. भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ? कालच युरिन टेस्ट पोझिटिव्ह आलेली ! दुसर्‍या दिवशी सर्व देवताना साधा नमस्कार केला आणि श्रीकृष्णापुढे मात्र डोके आपटून बोलली .. ' ये रे माझ्या बाळा ! ' माझ्या बापाला चारही मुलीच . बाकी तीन बहिणीनाही तीन मुलीच . मला मुलगा झाला तर तो माझ्या बापाला दत्तक देवून मी संसारातून बाहेर पडुन माहेरच्यांच्यासाठी नोकरी करणार. "मुलगा व्हावा. कृष्णासारखा व्हावा ! जन्माला तुझ्या घरात येऊन वाढायला माझ्या घरात जावा ! "

वाचने 5025
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

माझी कथा कृपया स्पर्धा विभागात हलवावी.

+0 लॉजीक पटल नाही. मंजे मुल माहेरी दत्तक देणे आणी पुन्हा त्यांच्यासाठीच काम करायच.

+१

Vegalaa vishay

जन्माला तुझ्या घरात येऊन वाढायला माझ्या घरात जावा ! "
दुसर्‍या दिवशी सर्व देवताना साधा नमस्कार केला आणि श्रीकृष्णापुढे मात्र डोके आपटून बोलली .. ' ये रे माझ्या बाळा ! ' माझ्या बापाला चारही मुलीच . बाकी तीन बहिणीनाही तीन मुलीच . मला मुलगा झाला तर तो माझ्या बापाला दत्तक देवून मी संसारातून बाहेर पडुन माहेरच्यांच्यासाठी नोकरी करणार. "मुलगा व्हावा. कृष्णासारखा व्हावा !
एकवेळ नवरा आणि सासरची मंडळी (पुरोगामी दृष्टीकोण ठेऊन) मुलगा हवा म्हणून मागे लागत नाहीत, माहेरच्यांनाच मात्र मुलगा होऊन हवा असतो. जमल्यास मुलगा माहेरी वडीलांना दत्तक देणे हि तशी जुनीच प्रथा आहे. या कथेत बदलत्या समाजाच एक वास्तव आल नाहीए मुलगा झाला नाही तर माहेरची मंडळी प्रसंगी जावयालाही दोष देतात (शिक्षणाचा परिणाम अजून काय ? ! :) ) हे ही पाहीलय.
' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली. मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं. भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ?
पण या पहिल्या ओळींमधेय लेखक दादांना काय म्हणायचय हे समजंल नाही.

In reply to by माहितगार

बायकोला ते पोस्टर भाजीवालीच्या दुकानात दिसलं. तिने ते मागून आणले. भिंतेवर दोन चार चित्रे होती. तेच देवघर .

In reply to by dadadarekar

दादा, इथे स्पष्टीकरण द्यावं लागतंय म्हणजे कथा पुरेशी बोलकी नाहीये. हे आपलं च नाही तर बऱ्याच लोकांबाबत होतंय. (माझ्यासकट) सिक्वेल चा विचार केल्यानं असेल की नंतर च्या भागात लिहू पण ते स्पष्ट करण्याची उत्सुकता वाचकांना वाटू द्यायला हवी. स्पर्धेची हीच थीम असावी बहुतेक.

+१

+१

माझ्या बापाला चारही मुलीच.बापाला चार मुलीच असतील तर पात्र मुलगी असणार ' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.बायको असेल तर पात्र मुलगा असावा लेखक( पात्र) मुलगा आहे कि मुलगी? गोंधळ होतो आहे? अज्ञानाबद्दल माफ करा

पूर्वी असे झाल्याचे ऐकिवात आहे, म्हणजे मूल माहेरी दत्तक देण्याचे...पण काडीमोड घ्यायचा हे थोडे unexplained वाटले...कदाचित पुढील भागात कळेल!

खोट्या कथांना +१. आणि १०० % सत्यकथा लिहून आमच्या कथेला मात्र नापास केले !

In reply to by dadadarekar

१०० % सत्यकथा लिहून आमच्या कथेला मात्र नापास केले !..... असे नाही...... तुम्ही काय किंवा माझ्या सारखेच इतर अनेक जण काय.... आपण चपखल शब्दांत आपले अनुभव मांडू शकलो नाही. असो, तुमच्यासारखाच दोष माझ्याकडून पण झाला आहेच. (स्वगत : दोष आपल्याकडे घेतला की, आपलेच दोष फार लवकर दूर होतात.अद्याप तरी माझा अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास सुरु आहे.)

In reply to by मुक्त विहारि

स्वगत मस्तच मुविजी!!! याबद्दल माझ्याकडून तुम्हांस एक चिकन बिर्याणी विथ "ते" पार्टी लागू. नम्र राहिले तर खूपसे प्रश्न सुटतात असा माझा अनुभव!!!

In reply to by जडभरत

मी स्वतः मस्त दम बिर्याणी बनवतो म्हणून म्हटले. मला पाकृ पण टाकायची आहे पण फोटो अपलोड अजून करता येत नाहीत म्हणून थांबलोय.

+२११

+१

कथा समजली नाही. कट्ट्याला आलात आणि कथा उलगडून सांगीतलीत तर उत्तम. तोपर्यंत.... +०.५

In reply to by मुक्त विहारि

बायकोला संसार नकोच होता. माहेरची रिकामटेकडी पोसायला तिला भीष्माचार्य व्हायचं होतं. पण बायको भीष्माचार्य झाली तर या पिढीचा प्रश्न मिटला. ते नवीन बाळ म्हणजे पुढच्या पिढीची सेवा करायला पुढचा भीष्माचार्य उर्फ ' कटाप्पा ! ' म्हणून ते बाळ तिकडे द्यायचे .

दादा, ही कथा शतशब्दकथेच्या format ला योग्य वाटली नाही. हिचा आवाका खूप मोठा आहे. हे म्हणजे पंजाबी लस्सी कटींग चहाच्या ग्लासमध्ये देणं झालंय.

कथेच्या लेखकावर कधीही कथा समजाऊन देण्याची वेळ येऊ नये! ते लेखकासाठी फार त्रासदायक असते, हा अनुभव मी घेतलेला आहे. शहाणपण यातच असते, की कथा किंवा कविता ह्यांच्या अर्थाचे चर्वितचरण, लेखकाने चुकून देखील करू नये. कितीही उकसावले तरी! ज्याना नाही समजले, त्यांचा तोटा! आपल्याला काय? म्हणून मजा बघत रहावे!

In reply to by अरुण मनोहर

"मिपावर" तरी, लेखकाला, त्याची कथा वाचकांना समजावून द्यायलाच हवी. "कूट-कथा" असली तरी. कारण, त्याशिवाय, "लेखक-वाचक" हे समन्मवय राहणार नाही. "मिपावर" अशी लोकशाही असल्यानेच मी अद्याप "मिपाकर" आहे.