मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा
जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत.
मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून!
या स्पर्धेच्या दोन फेर्या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!
पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे. - जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.) - ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील. - ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील - ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे! - वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात. - ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील. - वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. - स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. - पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल. - काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.वर्गीकरण
प्रतिक्रिया
एखादा विनोद हा ...
विषय कोणताही चालेल.
अभिनंदन
>>>>कथा १०० भागात संपली
स्पर्धेला शुभेच्छा.एक सुचना-
लय भारी़़़
पाहूया लिहून जमतंय का ते
वाचकांची मतं लक्षात घेताना
होय.
अरे व्वा..
छोटीशी विनंती!
हम्म. पुढच्या टायमाला करू हा
१०० शब्द-मर्यादा:
शुभेच्छा!
शंका
फक्त शब्दच. विरामचिह्ने शंभर
मिपाच्या पहिल्या पानावर फक्त
अनुमोदन
वेगळा ग्रुप केलेला दिसतोय. पण
सिकल सर्वानी लिहाय्चा की नंब्रात अलेल्यानीच ?.
अंतिम फेरीत गेलेल्या सहा
पहिल्या सहा व्यतिरिक्त अन्य
कृपया पुढच्या वेळेला अशी
१००% सहमत. पहिली कथा
अबब! पूरच आला आहे, शतशब्द
पहिली कथा पूर्ण हवी
सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा
अहो बक्षीस प्रॉपर कथेलाच
कृपया
http://www.misalpav.com
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
मला वाटतं एखाद दुसरं वाक्य
पण इथे संपादक मंडळ आणि
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
मी पा नाही मिपा. बाकी किती
१०० शब्दांपेक्षा कमी जास्तं
एक शंका.......
डु बक्षीस देणार
आणि तेक्काय बुवा?
डू आयडी वर आणिक शशका वर चर्चा
आजची साक्षरी
मिपावर या स्पर्धेमुळे बरेच
पहिल्या फेरीचे शेवटचे तीन
आदुदादु आता तुमीच राहिलात
कथा प्रकाशित करण्यासाठी
धन्यवाद. पण आता हे इथले लिखाण
आवश्यक नाही
अप्रकाशित केलाय प्रतिसाद.
धन्यवाद.
नमस्कार.