Skip to main content

मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 27/07/2015 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत. मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून! या स्पर्धेच्या दोन फेर्‍या असणार आहेत. आणि त्यात परीक्षकांबरोबर वाचकांचाही सहभाग असणार आहे!
पहिली फेरी:
- ता० १ ऑगस्ट २०१५ ते १५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या मिपाकरांनी शतशब्दकथा लिहून स्वतःच प्रसिद्ध करायची आहे. - जर कथा आवडली असेल तर वाचक कथेला आपलं मत देऊ शकतात. वाचकांनी आपलं मत "+१" असं लिहून आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवायचं आहे. (प्रत्येक प्रतिसादकाचं एकच मत ग्राह्य धरलं जाईल.) - ता० १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट मध्ये वाचकांच्या मतांची बेरीज घेतली जाईल आणि सर्वाधिक मतं प्राप्त करणार्‍या तीन शतशब्दकथा अंतिम फेरीत जातील. - ता० १६ ते २० ऑगस्ट या दरम्यान परीक्षकही तीन इतर कथांची निवड अंतिम फेरीसाठी करतील.
अंतिम फेरी:
- अशा प्रकारे अंतिम फेरीत सहा लेखक आणि त्यांच्या सहा शतशब्दकथा दाखल होतील - ता० २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मध्ये या सहा लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा पुढील भाग (मराठीतः सीक्वल!) शतशब्दकथेच्या स्वरूपातच लिहायचा आहे! - वाचक पहिल्या फेरीप्रमाणेच आपलं मत प्रतिसादात "+१" लिहून नोंदवू शकतात. - ता० ३१ ऑगस्ट नंतर परीक्षक त्यांचं गुणांकन देतील. - वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या गुणांकनाला समान महत्त्व देऊन तीन विजेते घोषित करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. सूचना: प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. - स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. - पहिल्या फेरीत कथेचं सीक्वल प्रकाशित करू नये. फक्त सहा लेखकांना/कथांना स्पर्धेसाठी सीक्वल लिहायची संधी मिळेल. - काही प्रश्न असल्यास कृ० साहित्य संपादक मंडळाशी संपर्क साधावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21471
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by dadadarekar

अंतिम फेरीत गेलेल्या सहा लेखकांचीच सीक्वल्स स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्वांनीच सीक्वल लिहिल्या तर स्वागत आहेच

In reply to by आदूबाळ

पहिल्या सहा व्यतिरिक्त अन्य लेखकांनी मूळ कथेच्या प्रतिसादातच सिक्वल लिहीला तर? (अन्यथा हे शंभर आणि ते शंभर असा धाग्यांचा गुंता होईल. शिवाय सिक्वल एकाच असावा असा नियम थोडाच आहे?)

कृपया पुढच्या वेळेला अशी कथांची स्पर्धा घेताना 'पहिल्या भागाचा अर्थपूर्ण शेवट ' हा निकष पण लावावा . दुसरी गोष्ट म्हणजे, पहिली कथा कैच्या कै . , दुसरी बरी , तिसरी चांगली , चौथी उत्कृष्ट असं होत असल्यामुळे लेखकाची शेवटची कथा लक्षात घेत येईल काय ?

In reply to by तुडतुडी

१००% सहमत. पहिली कथा अर्थपूर्ण असेल आणि शेवट कथेतच होत असेल तरच सिक्वेल बद्दल अंदाज बांधता येणार नाही. या गोष्टीचा विचार निकष साठी करावा.

अबब! पूरच आला आहे, शतशब्द कथांचा पाहता पाहता महोत्सव झालाय. दिवाळी अंका प्रमाणे मिपाने स्वातंत्र्य दिवस अंकाची तयारी करण्यास हरकत नाही.

एखादि कथा अशा रीतीने संपली कि सिक्वेल शक्यच नाही असे वाचकाला वाटायला हवे. आणि त्यानंतर सिक्वल लिहिण्यात लेखकाची खरी कसोटी लागेल. नाहीतर "आमची गाडी बंद पडली आणि सुनसान वाड्याचे दार किरकिरत उघडले … " इथे पहिली कथा संपणार आणि to be continued… सारखी दुसरीकथा (सिक्वेल) "समोर कंदील घेऊन एक म्हातारा उभा होता" अशा काहीशा वाक्याने सुरु होणार अशा कथांमध्ये पुढच्या भागाची उत्सुकता असली तरी तिला पूर्ण कथा म्हणता येईल का ?

कृपया सिक्वेल आणि प्रीक्वेल मधला फरक स्पष्ट करा. कथेचा पहिला भाग रहस्यमय लिहून दुसऱ्या भागात तसे का घडले स्पष्टीकरण देणे याला सिक्वेल म्हणायचे का ?

In reply to by कहर

अहो बक्षीस प्रॉपर कथेलाच देतील हो. प्रीक्वल सिक्वल समजणारे परीक्षक असणारच की. निदान ५० मार्क तरी त्यांच्या हातात असणारच. तुम्ही लिहा बिनधास्त.

कृपया ह्या शतशब्दकथांचे वेगळे पान बनविता येईल काय ? उदाहरणासाठी ऐसीवरचा भा.रा. भागवत विशेष अंक बघा. म्हणजे नेहमीचे इतर लेख व्यवस्थित वाचता येतील.

http://www.misalpav.com/comment/726016#comment-726016 ह्यावर संपादक मंडळाचे आणि साहित्य संपादकांचे आणि नीलकांत चे काय मत आहे ? अन्य भाषातील साहित्य मिपावर चालेल का ?

मला वाटतं एखाद दुसरं वाक्य हिंदी , इंग्लिश मध्ये चालू शकतं पण अर्धी किवा पूर्ण कथाच इतर भाषेत असावी हे पटलं नाही . हे मराठी संकेतस्थळ आहे आणि इथे मराठीचा आग्रह असलाच पाहिजे . अहो आपणच असं करायला लागलो तर आपल्या मराठीचं काय होणार ? आधीच पुढची पिढी इंग्लिशमय झालीये . :-( आणि फक्त मी पा वरच नै तर इतर वेळी सुधा आपण हटकून मराठीतच बोललं पाहिजे .

In reply to by तुडतुडी

मला वाटतं एखाद दुसरं वाक्य हिंदी , इंग्लिश मध्ये चालू शकतं पण अर्धी किवा पूर्ण कथाच इतर भाषेत असावी हे पटलं नाही
हे आपल्याला वाटते हो ! पण इथे संपादक मंडळ आणि नीलकांतला काय वाटते हे महत्वाचे आहे ! काही माणसे उगाचच इथेही हिंडी रेट्ण्याचा प्रयत्न करतात , आपण त्यांच्याशी वाद घालु नये , आपण डायरेक्ट संपादकांकडे बोलावे , ते ठरवतील ! एक्गाद दुसरा ईम्ग्रजी हिंदी शब्द मराठीत आणणे निराळे अन हिंदी अख्खी भाषाच व्याकरणासकट मराठी संकेतस्थळावर रेटणे निराळे ! आपण वादात पडु नये ! संपादक ठरवतील काय ठरवायचे ते ! आता उद्या हिंदी किंव्वा इंग्रजी किंव्वा उर्दु लेखनाला मिपावर परवानगी मिळाली तर आम्हाला आनंदच आहे आम्ही अन्य भाषातही लिहितोच की :)

पण इथे संपादक मंडळ आणि नीलकांतला काय वाटते हे महत्वाचे आहे !>>> महाराज मी पा काय फक्त संपादक मंडळ आणि नीलकांत च्या जीवावर चालतं का ? आणि मी त्यांच्याशीच बोलतेय तुम्हाला मी कुठं काय म्हणलाय का ? तुम्ही कशाला वादात पडताय ?

१०० शब्दांपेक्षा कमी जास्तं शब्द असणार्‍या कथा स्पर्धेमधुन बाद केल्या जाव्यात. लेखकांना कुठल्याही प्रकारचा बदल संपादक अथवा साहित्य संपादक मंडळाने करुन देउ नये. अपवाद नावामधे [शतशब्दकथा स्पर्धा] असा फ्लॅग टाकणे. हि स्पर्धा आहे. नो सेकंड चान्स.

डु आयडीने बक्षिस मिळवल्यास त्याला ते कसे देणार ? ....की त्यालाच तडीपार करणार ?

डू आयडी वर आणिक शशका वर चर्चा चालू आहे म्हणून हे सुचले मिसळपावातील भय http://www.misalpav.com/node/३२३४० ===================== आजची साक्षरी बाहुबली भाग 2

In reply to by नीलांबरी

कथा प्रकाशित करण्यासाठी उजवीकडे 'लेखन करा' असे दिसत असेल, तेथुन 'स्पर्धा' हा विभाग निवडा आणि ही कथा प्रकाशित करा. म्हणजे ती स्वतंत्र लेखाच्या स्वरुपात दिसेल आणि त्यावर प्रतिसादक मतं देऊ शकतील.

In reply to by नीलांबरी

[शतशब्दकथा स्पर्धा] दोष कुणाचा? - ही शशकथा वरच्या प्रतिसादात राहू दिल्याने काही बिघडणार नाहीये. संपादक मंडळाला वाटले तर ते उडवू शकतात.

नमस्कार. शशक स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा आज शेवटचा दिवस. आज मध्यरात्री १२ वाजता (भाप्रवे) मतदान बंद होईल. पहिल्या फेरीचे निकाल लवकरात लवकर (जास्तीत जास्त ता० २० पर्यन्त) जाहीर केले जातील. ही योग्य जागा नव्हे, पण स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी सगळ्यांचे मनापासून आभार!