पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..
पहा कशी लोळते सुखाने उधारवारी
अजून खस्ताच खात आहे दुकानदारी
पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले
निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी
खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे
उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी
शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही
उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी
बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते
मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी
डॉ.सुनील अहिरराव
.. छान
लगालगागा/लगालगागा/लगालगागा
दुकानातल्या स्टीकरची आठवण झाली, कि ज्याच्या