लहानगा चिंटू खूप खुष होता . किती दिवसांनी त्याला नवीन दोस्त मिळाला होता . आजीलाही ह्या पोराला खेळायला कोणी मिळालं म्हणून बरं वाटलं . नाहीतर किती दिवस नुसत्या त्याच त्याच गोष्टी सांगून त्याला रमवणार. पण गोष्टी त्याच त्याच असल्या तरी आजीची सांगण्याची हातोटीच अशी होती कि चिंटूला त्या पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. चिंटू झोपायला त्रास देवू लागला कि मात्र आजी स्वताच्या मनानेच काहीतरी नवीन गोष्ट तयार करून त्याला ऐकवी .गोष्ट सांगितल्यावर मुकाट झोपण्याच्या अटीवर .
चव्हाण कुटुंब त्या घरात राहायला आलं . घर बैठ्या पद्धतीच होतं . आजूबाजूची घरंही बैठीच . मिस्टर आणि मिसेस चव्हाण खुश होते . कमी भाड्यात ऐसपैस , हवा खेळती असलेलं घर मिळालं म्हणून मिस्टर चव्हाण . तर आजूबाजूला मोकळी जागा आहे म्हणून मिसेस चव्हाण. त्यांना बागेची आवड होति. आता सुगंधी फुलांची झाडं लावता येतील म्हणून त्यांना बरं वाटलं. चव्हाण दाम्पत्याला दीपक नावाचा छोटा मुलगा होता . साधारण चिंटू च्याच वयाचा . नुकतीच दीपक च्या शाळेला उन्हाळ्याची मोठी सुट्टी लागली होती .
चिंटू आणि दीपक ची छान मैत्री जमली . आई कामात गढलेली असली कि हे दोघेही खेळण्यात गढून जात . आई झोपलेली असली कि दीपक चिंटूला खेळायला बोलवे .चिंटू त्याला बाहेर हि घेवून जावू लागला. कसल्या कसल्या लपण्याच्या जागा दाखवू लागला . कसली कसली खेळणी दाखवू लागला. आईने दीपकला जेवायला खायला बोलावले कि चिंटू जायला निघे. दीपक ने आग्रह केला तरी थांबत नसे. आजीने सांगितलाय कोणाच्या घरी काही खवू नये म्हणून .तुझी आई माझ्याशी खेळताना बघून तुला रागवेन म्हणून चिंटू आईचं लक्ष नसताना खेळायला येई .
हल्ली आजीला जरा काळजीच वाटू लागली होती . हे पोरगं वेळी अवेळी खेळायला पळतंय म्हणून. दीपक च्या आईला संशय येवू लागला होता. आई ने दीपकच्या बाबांकडे बोलूनही दाखवले . बाबांनी तिलाच वेड्यात काढले . चिंटू आजीच्या मागे लागू लागला . सारखं दीपक च्या आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं. आपण दीपक ला आपल्याकडे आणूया म्हणू लागला . आजीने समजावून आणि थोडं दटाहूनही पाहिलं .पण चिंटू हल्ली हट्ट करू लागला.
दीपक थोडा आजारी पडल्यासारखा झाला . औषधपाणी चालू होतं पण ताप वाढूच लागला . दीपक च विचित्र वागणं आईला अस्वस्थ करतच होतं . आताशा बाबांनाही करू लागलं होतं . आता मात्र आजीला काजळी वाटू लागली आणि चिंटूला आनंद.
आजीने निर्णय घेतला . नवीन गोष्ट तयार केली . मुकाट झोपण्याच्या बोलीवर चिंटूला ती रंगवून सांगितली . पोरगं कधी पेंगुळलं आणि झोपी गेलं त्याचं त्यालाच कळलं नाही . पहाटेचे ४. ३० वाजले असावेत . आजीने दीपकच्या आई बाबांना हलवून जागं केलं .आपली ओळख सांगितली .आमचा मृत्यू ह्याच घरात झाला होता . गेल्या १५ वर्षांपासून इथंच राहतोय आम्ही. अनेक आले आणि गेले. त्यात लहान मुल कोणीच नवतं . १५ वर्षांपासून खेळायला आसुसलेला माझा नातू आता दीपक ला सोडायला तयार नाही . आपल्याकडे आणूया त्याला असं म्हणतोय .दिपकला वाचवायचं असेल तर लगेच घर सोडून जा म्हणून सांगायला आलेय . एवढं बोलून आजी अदृश्य झाली . असल्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारे बाबा सुधा चपापले . चिंटू उठायच्या आताच आवरा आवरी करून ते कुटुंब घर सोडून गेलेलं बघून आजीला आनंद हि झाला आणि आता माझं लेकरू पुन्हा नवीन दोस्ताची किती वर्षे वाट पाहणार ह्याचा विचार मनात येवून दुखःही.
वाचने
6276
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
गद्य की पद्य ?
खूप मस्त आहे कथा! असा एक
थोडी विस्त्रुत लिहायला हवी
In reply to खूप मस्त आहे कथा! असा एक by जडभरत
स्वतः पाहिलेला???
In reply to खूप मस्त आहे कथा! असा एक by जडभरत
नाही हो भाऊ, काही अनुभव असे
In reply to खूप मस्त आहे कथा! असा एक by जडभरत
होय . पहिलीच कथा आहे सांभाळून
सांभाळून घेऊच हो !
In reply to होय . पहिलीच कथा आहे सांभाळून by तुडतुडी
ओह . ते कसं कुठं डकवायचं
पहिल्या प्रयत्नाच्या मानाने
सहमत +१०१
In reply to पहिल्या प्रयत्नाच्या मानाने by उगा काहितरीच
गोष्ट आवडली.
चांगला प्रयत्न आहे.
छान ! भयानक
आवडली
हि भयकथा असेल
कथेत संदर्भ लागत नाहीत.
स्पा ह्यां ची 'ते' हि मालिका
कथा आवडली
कथा जमलीये. अजुन फुलवता आली
अवांतराशी सहमत
In reply to कथा जमलीये. अजुन फुलवता आली by मृत्युन्जय
प्रयोजनः त्यांना वर कुणीतरी
In reply to कथा जमलीये. अजुन फुलवता आली by मृत्युन्जय
कथा आवडली
नाही हो .आत्मप्रौढी वगेरे
छान आहे
छान आहे कथा. आवडली. कॉन्सेप्ट
अगदी ! भुताची पण घुसमट भावली.
In reply to छान आहे कथा. आवडली. कॉन्सेप्ट by पद्मावति