शिक्षणाच्या नावानं चांगभलं !
शिक्षणाच्या नावानं चांगभलं !
( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?)
आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला. त्यात, ‘जलतरण, आरोहण, धावणे आणि उड्डयण’ अशा चार क्षमताविषयांचा समावेश केला. आता एवढ्या भरमसाठ प्राण्यांचा कुठे वेगवेगळा विचार करीत बसा, म्हणून सगळ्या प्राण्यांनी सगळे विषय अनिवार्यपणे घेतलेच पाहिजेत, असा नियम केला. झालं, शाळा सुरु झाली!
बदक पोहण्यात एकदम सराईत! अगदी त्याच्या गुर्जींपेक्षा सरस! उड्डयनातही त्याला फारशी अडचण आली नाही. धावताना मात्र, त्याचे अतोनात हाल होत! पळताच येत नसे. धावण्यात सुधारणा व्हावी म्हणून, शाळा सुटल्यावर थांबून त्याने धावण्याचा सराव करणे, सक्तीचे करण्यात आले. एवढेच नव्हे तर, धावण्याच्या सरावासाठी वेळ मिळावा, म्हणून त्याचे पोहणे बंद केले. धावण्याचा उघड्या जमिनीवर सराव करताना, त्याच्या पायांच्या बोटांमधील पडदे पार फाटून गेले. फाटक्या पंज्याने पोहताना, त्याला प्रचंड वेदना होत. त्यामुळे पोहण्यात अव्वल असूनही, फाटक्या पंज्यामुळे त्याला ‘क’ श्रेणीवर समाधान मानावे लागले. पण शाळेत, ‘सामान्य, साधारण’ असण्याला जास्त मान्यता होती. म्हणून बदकाखेरीज इतरांना खेदखंत काही वाटले नाही! बिचारे बदक मात्र मनातून खचून गेले. आपल्या फाटक्या पंज्याकडे ते केविलवाणे होऊन पहात रहायचे.
धावण्यात ससोबाचा हात [पाय] कोण धरणार? सुसाट वेगाने स्वारी धावायची! पण पोहण्याच्या तासाला, त्याचे अस्से भिजले मांजर व्हायचे कि त्याला nervous breakdown चा सामना करावा लागला.
खारूताईची गोष्टच निराळी! आरोहनात उत्तम. सरसर झाडामाडांवर चढाउतरायची. पण सगळेच विषय अनिवार्य असल्याने तिला उड्डयनाच्या तासाला कंपल्सरी उडावे लागे. तिला जमत नसतानाही गुर्जी तिला बळेबळे उडायला लावायचे. ती बिचारी धप्पकन कोसळायची! कधी एकदा हा तास सरेल, आणि कधी आपला छळ संपेल, असे होऊन जायचे तिला! अतिश्रम आणि थकव्यामुळे ती प्रवीण असलेल्या आरोहण कौशल्यावर मात्र विपरित परिणाम झाला. त्यात तिला ‘क’ श्रेणी मिळाली. खारुताई कायमची हिरमुसली!
गरुडाची गणना ‘problem child’ मध्ये होई . उड्डयनाच्या तासाला त्याची उत्तुंग झेप, आकाशातील भरारी, तन्मयतेने केलेला विहार, पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवी. उंच उंच झाडांच्या शेंड्यांवर तो अगदी सहज, डौलाने बसे. ‘झाडांच्या शेंड्यांशी कसे पोहचावे’ याबाबतीत त्याची, आपल्या गुर्जनवर्गाहून वेगळी आणि स्वतंत्र मते होती आणि त्यांवर तो ठाम असे! असा ‘problem child’ हाताळणे, गुर्जनवर्गाला एकूण कठीण! मग त्याला करडी शिस्त लावण्यासाठी, जालिम उपाय सुरु केले.
शैक्षणिक वर्षाखेरीस बाजी मारली, ती मात्र बेडकाने! पोहण्यात ‘अ’, धावण्यात ‘ब’! फुटभर चढून हातभर श्रेणी मिळवण्यात त्याच्याइतका हातखंडा दुसऱ्या कुणाचा नव्हता! झाडाच्या बुंध्यावर हातभर चढल्यावर आरोह्नाचे गुण मिळायचे आणि तिथून टुन्नकण उडी मारली कि उड्डयनाचे गुण मिळायचे. (त्याच्या या उडीसमोर गुर्जनवर्गास गरुडाची झेप ‘ह्या’ वाटायची!) त्यात त्याने ‘क’ श्रेण्या मिळवल्या. अशा रितीने तो ‘सर्वकौशल्यसंपन्न’ म्हणून घोषित झाला. त्याचा सत्कार करून त्याला पारितोषकही देण्यात आले!
भटक्या आणि शिकारी कुत्र्यांना शिक्षा म्हणून नेहमी वर्गाबाहेर उभे केले जायचे. आपण नेहमीच वर्गाबाहेर असतो तर, असेच शाळेबाहेर का न पडावे, असा कल्पक विचार करून ते एक दिवस शाळेबाहेर पडले, ते कायमचे!
पण बाहेर पडताच त्यांनी आपली झुंड बनवली. झुंडीने विचार केला – फाडणे, चावे घेणे, वासावरून माग काढणे, जमीन उकरणे, पाठलाग करणे, इत्यादी आपल्या उपयोगाचे विषयच शाळेत नव्हते, तर शाळेने आपल्याकडून इतकी भरमसाठ फी घेतलीच कशाची? म्हणून मग त्यांनी ‘फी परत पायजेल’ म्हणून शाळेविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला. अर्थात, निकाल त्यांच्या विरुद्ध लागला. पण ते खचले नाहीत!
उलट, तेव्हापासून ते अधिक जोमाने झुंड बांधणीच्या कामाला लागले. थोड्याच दिवसात, त्यांनी घुशी, घुबडं आणि कोल्ह्यांच्या संगनमताने त्याच जंगलात नवीन खाजगी शाळा सुरु केली. गुणवत्तेचे सगळे मानदंड मोडीत काढून , आज ती शाळा यशस्वीपणे चालू आहे!
प्रतिक्रिया
नुकतचं तोत्तोचान वाचुन
लेख आवडला.. whatsapp वर शेअर
हम्म..
लाल गरुड
तोतोचान आणि तिचा शिक्षक, तिची
‘The Animal School’ पुन्हा या
सध्या शिक्षणाच्या क्षेत्रात
छान..
हेच म्हणतो
बत्तीस कला आणि चौसष्ठ विद्या .............
शाळेने फक्त लिहायला-वाचायला शिकवावे.....
पालकांनी वाचली पाहिजे अशी
पालकांनी वाचली पाहिजे अशी गोष्ट.....
.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की काय मह्त्वाचे वाटते?
१० पेक्षा जास्त वर्षांचा
मस्त.....
सचिन तेंडुलकर, बिल गेट्स,
प्रस्तुत सेलीब्रीटींची नावं
एखादा हुशार ऑटोमोबाईल इंजिनीअर....
+१११
खूपच उद्बोधक कथा....
अतिशय मार्मिक कथा.
मध्यम वर्गीय लोकान्ची गुण आधरित मनसिकता
मध्यम वर्गीय लोकान्ची गुण
अगदी योग्य प्रतिसाद.
मस्त!!!!
मस्तच
मला असलेल्या अत्यंत कमी
आजच्या (१५ वी पर्यंतचा) ९०%
वाचून चर्चेत सहभागी होत आहात
खुप उशीरा वाचला हा धागा..
छान