Skip to main content

चर्चा नको? वाद हवा??

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 29/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते. मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे असणारे इतर लोक शोधून त्यांचेशी मैत्री करतात आणि त्यांना वाटते की हे सगळे जग फक्त आपल्याच विचारधारेनुसार चालले आहे. खरे तर कुणाचीच विचारधारा परिपूर्ण आणि पूर्ण सत्य नसते. वेगळ्या विचारधारा वेळोवेळी स्वीकारल्या तर जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळत राहते. कदाचित आपल्यापेक्षा वेगळ्या विचारधारेत आपल्या समस्यांचे उत्तर सुद्धा दडलेले असू शकते. पण वेगळी विचारधारा स्वीकारण्यात आडवा येतो तो अहंकार. कारण आपली विचारधारा चुकते आहे असे अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही. अहंकार कशाचाही असू शकतो: वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, राजघराण्याचा, यशाचा, पैशांचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4713
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

चला कहितरि वेगळा आणि अत्यंत विचारपुर्वक असा लेख वाचायला मिळाला, नाहितरि सध्या मोदि, केजरिवाल, पप्पुबाळ ह्याच्यावरच धुळवड चालु असते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही केलेलं हे सदर प्रमेयसदृश लेखन... एक प्रमेय म्हणून, तुमच्या आजवर केलेल्या प्रत्येक लेखणास लावून पहा ब्रे!!! मंजी मी काय म्हन्तो टे कळेल. आणि न पाहिलेत तर सदर लेखातल्या आरोपांचे पहिले बळी तुम्हीच आहात्,हे तुमच्या निदर्शनाला येइल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्हाला असे कशाला वाटले की मी चर्चेला तयार नसतो. मी चर्चेला तयार असतो. फक्त टिंगल टवाळी स्वीकारण्यासाठी मी तयार नसतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

..तुम्ही अस्वस्थ झालात आणि तो लेख तुम्हालाच लागू होत आहे. इतरांचे विचार स्वीकारण्यास तयार नाही. स्वत:ची विचार धारा बदलण्यास तयार नाही अन काही नाही!

In reply to by निमिष सोनार

@तयार नाही अन काही नाही! >> ह्हीह्ही ह्हीह्ही आणि ह्हीह्ही!

कारण आपली विचारधारा चुकते आहे असे अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही. अहंकार कशाचाही असू शकतो: वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, राजघराण्याचा, यशाचा, पैशांचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा! मि आणि अन्या दातार तर फार आवडीने वाचतो निसो सरांचे लेख ते फारच गहन विचार करुन लिहिलेले असतात.

बुवा मागे तुम्हि अशीच एक स्मायली दिलि होति प्रतिसादात, निसो संर्रानि लगेच एक शिघ्र जिलबि त्यावर सुद्धा पाडली होति..कहितरि स्प्रिंग का दगड धोंड्यवर लेख होता बघा सर्रांचा.

आपके विचार पढकर मेरे सामने माताजीकी प्रतिमा आ रही है. जल्दीसे नजदीकके माताजीको प्रसाद चढाओ. सब कल्याण हो जाएगा. नेक्स्ट ?

छाण

तुमचे ह्या आधिचे आणि आजचा चर्चा प्रस्ताव पाहता तुम्हाला एका समुपदेशकाची गरज आहे असे वाटते.

//मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे असणारे इतर लोक शोधून त्यांचेशी मैत्री करता////// हे मात्र खरे लिहिले आहे.......

In reply to by जयंत कुलकर्णी

+++१११ तस तर सदर लेखनातलं बरच काही "खरं" म्हणता येइल. पण ते प्रयोजन शून्य लेखन आहे. आणि यात लेखकाचा स्वत:चा अक्कलेनी काहीही सहभाग नाही! अर्थात सदर लेखकाच्या बाबतीत ही गोष्ट नेहमीच दिसून येते. यांच सर्व लेखन हेतुशून्य आणि निव्वळ प्रचारकी स्वरुपाचं असतं. म्हणुन तर त्याची इथे टवाळि उडते. तरी या महाशयांचे डोळे उघडत नाहित. उलट लोकानीच यांच्या आरत्या ओवाळाव्या,अशी यांची (स्वत:बद्दल भलतीच)अपेक्षा असते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सांगा बरे! तुम्ही ही प्रतिक्रिया लिहिली त्यावरून तुम्हाला स्वत:ला नक्की काय वाटते? माझ्याबद्दल लिहिताना तुम्ही नेमके "काय" वापरून प्रतिक्रिया लिहिली आहे?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आपणच फक्त एक चांगले "अत्रुप्त" आणि श्रेष्ठ टीकाकार आहोत, सुबुद्ध वाचक आहोत आणि इतराना काहीच कळत नाही, इतर वाचक मूर्ख आहेत हा तुमच्या डोक्यात फिट्ट बसलेला "अहंकार" आहे जो तुम्हाला माझ्या लेखाला मुद्दाम वाईट म्हणायला प्रवृत्त करतोय आणि व्यक्तिगत टिका करायला लावतो आहे … पण मी तुम्हाला तरीही मोकळ्या मनाने माफ करतो. आणि हो,. माझ्या पुढच्या लेखावर तुमच्या प्रतिक्रियेची मी जरूर वाट बघीन … अर्थात माझे "फालतू" लेख तुम्हाला वाचायला मी आग्रह करीत नाही . . . वाचायची इच्छा नसेल तर कृपया वाचू नका !!

मिपावर "काय लिहिलं आहे यापेक्षा कुणी लिहिलं आहे" हे जास्त महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. हे मुक्तक छोटेखानी असलं तरी आत्मप्रेमी व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींचे एक महत्वाचे वर्तनलक्षण यात अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दांत मांडले आहे. लेखन आवडले. अशा पद्धतीच्या लेखनाला स्वानुभवाची किंवा आजूबाजूला घडणार्‍या घटनांची जोड दिली तर ते अधिक प्रभावी होईल.

In reply to by सतिश गावडे

+१ अगदी हेच लिहायला आलो होतो.... आपले काय म्हणणे आहे ते लागू होणारे एखादे उदाहरण द्या ...

In reply to by सतिश गावडे

सगा, तुमच्या स्वप्रतिमेच्या प्रेमातल्या व्यक्तिमत्वांबद्दल एक लेख होता, त्याची लिंक सापडत नाहीये. असेल तर इथे शेअर कराल का.

समर्थांनी म्हंटले आहे 'तुटे वाद संवाद त्यांते म्हणावें, विवेक अहंभाव याते जिणावे. विवेक जागा करा, अहंकार सुटेल, तेंव्हाच खरा संवाद होईल. आत्ताच दुपारचा झोपून उठलो आहे, चहाचा एक पेग ही घेतला आहे. कुणाशीही संवाद (????) करण्यासाठी तैयार....विवेक जागा झाला आहे.

सोनार साहेब, हे मिसळपाव आहे. मिसळीमध्ये, तिखट, कडू, गोड, आंबट सर्वच स्वाद असतात. आपल्या जेवणात ही असेल तर पचन चांगले होते. आरोग्य चांगले राहते. तसेच चर्चेचे आहे. चेहऱ्यावर माश्या न हळू देता चर्चा करणारे कि मिसळपाव सोबत आनंद घेणारे. आता त्या चर्चेत गोड सोबत कडू पण राहणारच. छोल्यात स्वादासाठी कसुरी मेथी ही टाकतात. मी तर जवळपास सर्वच भाज्यात कसुरी मेथी वापरतो.

आळी मिळी गुप चिळी! (काव्य) आणि आत्महत्या! (गंभिर गुढ लेखन):- साहित्यसुर्य सटक सर तुम्हि आताशा मिपावर टोपण नावाने (पेन नेम) सुद्धा लिहिता तरी पण आम्हि वळखले का नाहि..मग्ग.. चला आता आलाच आहात तर वरील काव्य आणि गंभिर लेखन जरा मिपा कराना इस्कटुन सांगा ना.

माझ्या पुढच्या लेखावर तुमच्या प्रतिक्रियेची मी जरूर वाट बघीन … अहो सर आम्हि सुद्धा तुमच्या लेखनाचि (चिंतनाचि) वाटच बघत असतो ना.. तुम्हि नस्ता तेव्हा लोक आप्ले उगा केजरिवाल, पप्पु, मोदि असला काहि बाहि लिहत, वाचत आणि तोडत - फोडत असतात. त्या लेखांमध्ये ति खोलि नसते ति सौन्दर्यानुभुति नसते जि तुम्च्या साहित्यात असते.