ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते. मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे असणारे इतर लोक शोधून त्यांचेशी मैत्री करतात आणि त्यांना वाटते की हे सगळे जग फक्त आपल्याच विचारधारेनुसार चालले आहे. खरे तर कुणाचीच विचारधारा परिपूर्ण आणि पूर्ण सत्य नसते. वेगळ्या विचारधारा वेळोवेळी स्वीकारल्या तर जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळत राहते. कदाचित आपल्यापेक्षा वेगळ्या विचारधारेत आपल्या समस्यांचे उत्तर सुद्धा दडलेले असू शकते. पण वेगळी विचारधारा स्वीकारण्यात आडवा येतो तो अहंकार. कारण आपली विचारधारा चुकते आहे असे अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही. अहंकार कशाचाही असू शकतो: वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, राजघराण्याचा, यशाचा, पैशांचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा!
मिसळपाव
प्रतिक्रिया
गल्ली चुकलं पीयेल. इकडं हाना
गल्ली चुकलं पीयेल. इकडं हाना:
https://www.misalpav.com/node/31481
निसो काका आल्ल्ले
:)
निसो फॉर्मात वाचक कोमात :)
चला कहितरि वेगळा आणि अत्यंत विचारपुर्वक असा लेख वाचायला मिळाला, नाहितरि सध्या मोदि, केजरिवाल, पप्पुबाळ ह्याच्यावरच धुळवड चालु असते.
हो
In reply to निसो फॉर्मात वाचक कोमात :) by होबासराव
होबासराव +१
(No subject)
इतक्या अतृप्तपणे उड्या का मारत आहात आपण?
थकाल ना!
तेच तर!
In reply to इतक्या अतृप्तपणे उड्या का मारत आहात आपण? by निमिष सोनार
तेच तर!
(तुमचं तुम्हाला कळलं ........ तर! )
तुम्ही केलेलं हे सदर
In reply to तेच तर! by अत्रुप्त आत्मा
तुम्ही केलेलं हे सदर प्रमेयसदृश लेखन... एक प्रमेय म्हणून, तुमच्या आजवर केलेल्या प्रत्येक लेखणास लावून पहा ब्रे!!! मंजी मी काय म्हन्तो टे कळेल. आणि न पाहिलेत तर सदर लेखातल्या आरोपांचे पहिले बळी तुम्हीच आहात्,हे तुमच्या निदर्शनाला येइल.
इतर लेखांत मी इतरांचे विचार स्वीकारतो आणि चर्चेला तयार असतो.
In reply to तुम्ही केलेलं हे सदर by अत्रुप्त आत्मा
तुम्हाला असे कशाला वाटले की मी चर्चेला तयार नसतो. मी चर्चेला तयार असतो. फक्त टिंगल टवाळी स्वीकारण्यासाठी मी तयार नसतो.
उलट माझ्या वरील लेखातला विचार तुम्हाला न पटल्याने ...
In reply to तुम्ही केलेलं हे सदर by अत्रुप्त आत्मा
..तुम्ही अस्वस्थ झालात आणि तो लेख तुम्हालाच लागू होत आहे. इतरांचे विचार स्वीकारण्यास तयार नाही. स्वत:ची विचार धारा बदलण्यास तयार नाही अन काही नाही!
@तयार नाही अन काही नाही! >>
In reply to उलट माझ्या वरील लेखातला विचार तुम्हाला न पटल्याने ... by निमिष सोनार
@तयार नाही अन काही नाही! >> ह्हीह्ही ह्हीह्ही आणि ह्हीह्ही!
लेख इतकाही ज्वालाग्राही नव्हता काही ....
.. की इतके भाजलात तुम्ही? की उड्याच मारायला लागलात?
अरे मुला... ते चित्र तुझी
In reply to लेख इतकाही ज्वालाग्राही नव्हता काही .... by निमिष सोनार
अरे मुला... ते चित्र तुझी लेखकावस्था आहे.. हे कळलं नसेल्,तर समजुन घे!
खिक्कं. लाह्या फुटल्या ओ
In reply to अरे मुला... ते चित्र तुझी by अत्रुप्त आत्मा
खिक्कं. लाह्या फुटल्या ओ गुरुजी ;)
मारा अजून उड्या... माझं काय जातंय?
थकून पडाल बरं खाली!
सर तुस्सि ग्रेट हो
कारण आपली विचारधारा चुकते आहे असे अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही. अहंकार कशाचाही असू शकतो: वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, राजघराण्याचा, यशाचा, पैशांचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा!
मि आणि अन्या दातार तर फार आवडीने वाचतो निसो सरांचे लेख ते फारच गहन विचार करुन लिहिलेले असतात.
http://www.misalpav.com/comment/680344#comment-680344
बुवा मागे तुम्हि अशीच एक स्मायली दिलि होति प्रतिसादात, निसो संर्रानि लगेच एक शिघ्र जिलबि त्यावर सुद्धा पाडली होति..कहितरि स्प्रिंग का दगड धोंड्यवर लेख होता बघा सर्रांचा.
@कहितरि स्प्रिंग का दगड
In reply to http://www.misalpav.com/comment/680344#comment-680344 by होबासराव
@कहितरि स्प्रिंग का दगड धोंड्यवर लेख होता बघा सर्रांचा.>>>
आपके
आपके विचार पढकर मेरे सामने माताजीकी प्रतिमा आ रही है. जल्दीसे नजदीकके माताजीको प्रसाद चढाओ. सब कल्याण हो जाएगा. नेक्स्ट ?
.
छाण
तुमचे ह्या आधिचे आणि आजचा
तुमचे ह्या आधिचे आणि आजचा चर्चा प्रस्ताव पाहता तुम्हाला एका समुपदेशकाची गरज आहे असे वाटते.
//मग असे लोक फक्त आपल्या
//मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे असणारे इतर लोक शोधून त्यांचेशी मैत्री करता////// हे मात्र खरे लिहिले आहे.......
+++१११
In reply to //मग असे लोक फक्त आपल्या by जयंत कुलकर्णी
+++१११
तस तर सदर लेखनातलं बरच काही "खरं" म्हणता येइल. पण ते प्रयोजन शून्य लेखन आहे. आणि यात लेखकाचा स्वत:चा अक्कलेनी काहीही सहभाग नाही! अर्थात सदर लेखकाच्या बाबतीत ही गोष्ट नेहमीच दिसून येते. यांच सर्व लेखन हेतुशून्य आणि निव्वळ प्रचारकी स्वरुपाचं असतं. म्हणुन तर त्याची इथे टवाळि उडते.
तरी या महाशयांचे डोळे उघडत नाहित. उलट लोकानीच यांच्या आरत्या ओवाळाव्या,अशी यांची (स्वत:बद्दल भलतीच)अपेक्षा असते.
बरं! माझे लेखन आणि मी चूक मानले तर …
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
… मग तुम्ही आणि तुमचे लेखन कोणत्या प्रकारातले आहे ते तरी कळू द्या की आम्हाला सर!
अक्क्ल असल्याशिवाय माणूस लिहितो का हो?
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
सांगा बरे! तुम्ही ही प्रतिक्रिया लिहिली त्यावरून तुम्हाला स्वत:ला नक्की काय वाटते?
माझ्याबद्दल लिहिताना तुम्ही नेमके "काय" वापरून प्रतिक्रिया लिहिली आहे?
मी असं कुठेही म्हटलं नाहिए की माझे लिखाण तुम्ही …
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
… आवडूनच घ्या !
अहंकार माणसाला काय काय करायला लावतो. . . !
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
आपणच फक्त एक चांगले "अत्रुप्त" आणि श्रेष्ठ टीकाकार आहोत, सुबुद्ध वाचक आहोत आणि इतराना काहीच कळत नाही, इतर वाचक मूर्ख आहेत हा तुमच्या डोक्यात फिट्ट बसलेला "अहंकार" आहे जो तुम्हाला माझ्या लेखाला मुद्दाम वाईट म्हणायला प्रवृत्त करतोय आणि व्यक्तिगत टिका करायला लावतो आहे … पण मी तुम्हाला तरीही मोकळ्या मनाने माफ करतो.
आणि हो,. माझ्या पुढच्या लेखावर तुमच्या प्रतिक्रियेची मी जरूर वाट बघीन …
अर्थात माझे "फालतू" लेख तुम्हाला वाचायला मी आग्रह करीत नाही . . .
वाचायची इच्छा नसेल तर कृपया वाचू नका !!
आपण लहान नाही,हे सिद्ध
In reply to अहंकार माणसाला काय काय करायला लावतो. . . ! by निमिष सोनार
आपण लहान नाही,हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
व पुढिल लेखनास शुभेच्छा!
मिपावर "काय लिहिलं आहे
मिपावर "काय लिहिलं आहे यापेक्षा कुणी लिहिलं आहे" हे जास्त महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
हे मुक्तक छोटेखानी असलं तरी आत्मप्रेमी व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींचे एक महत्वाचे वर्तनलक्षण यात अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दांत मांडले आहे.
लेखन आवडले. अशा पद्धतीच्या लेखनाला स्वानुभवाची किंवा आजूबाजूला घडणार्या घटनांची जोड दिली तर ते अधिक प्रभावी होईल.
+१
In reply to मिपावर "काय लिहिलं आहे by सतिश गावडे
+१
अगदी हेच लिहायला आलो होतो....
आपले काय म्हणणे आहे ते लागू होणारे एखादे उदाहरण द्या ...
सगा, तुमच्या स्वप्रतिमेच्या
In reply to मिपावर "काय लिहिलं आहे by सतिश गावडे
सगा, तुमच्या स्वप्रतिमेच्या प्रेमातल्या व्यक्तिमत्वांबद्दल एक लेख होता, त्याची लिंक सापडत नाहीये. असेल तर इथे शेअर कराल का.
समर्थांनी म्हंटले आहे 'तुटे
समर्थांनी म्हंटले आहे 'तुटे वाद संवाद त्यांते म्हणावें, विवेक अहंभाव याते जिणावे.
विवेक जागा करा, अहंकार सुटेल, तेंव्हाच खरा संवाद होईल.
आत्ताच दुपारचा झोपून उठलो आहे, चहाचा एक पेग ही घेतला आहे. कुणाशीही संवाद (????) करण्यासाठी तैयार....विवेक जागा झाला आहे.
सोनार साहेब,
सोनार साहेब,
हे मिसळपाव आहे. मिसळीमध्ये, तिखट, कडू, गोड, आंबट सर्वच स्वाद असतात. आपल्या जेवणात ही असेल तर पचन चांगले होते. आरोग्य चांगले राहते. तसेच चर्चेचे आहे. चेहऱ्यावर माश्या न हळू देता चर्चा करणारे कि मिसळपाव सोबत आनंद घेणारे. आता त्या चर्चेत गोड सोबत कडू पण राहणारच. छोल्यात स्वादासाठी कसुरी मेथी ही टाकतात. मी तर जवळपास सर्वच भाज्यात कसुरी मेथी वापरतो.
निसो बॅक विथ वरिजिनल आयडि
आळी मिळी गुप चिळी! (काव्य) आणि आत्महत्या! (गंभिर गुढ लेखन):- साहित्यसुर्य सटक
सर तुम्हि आताशा मिपावर टोपण नावाने (पेन नेम) सुद्धा लिहिता तरी पण आम्हि वळखले का नाहि..मग्ग..
चला आता आलाच आहात तर वरील काव्य आणि गंभिर लेखन जरा मिपा कराना इस्कटुन सांगा ना.
माझ्या पुढच्या लेखावर तुमच्या
माझ्या पुढच्या लेखावर तुमच्या प्रतिक्रियेची मी जरूर वाट बघीन …
अहो सर आम्हि सुद्धा तुमच्या लेखनाचि (चिंतनाचि) वाटच बघत असतो ना.. तुम्हि नस्ता तेव्हा लोक आप्ले उगा केजरिवाल, पप्पु, मोदि असला काहि बाहि लिहत, वाचत आणि तोडत - फोडत असतात. त्या लेखांमध्ये ति खोलि नसते ति सौन्दर्यानुभुति नसते जि तुम्च्या साहित्यात असते.