स्रीचे अस्तित्व!

अश्विनि कोल्हे's picture
अश्विनि कोल्हे in जे न देखे रवी...
13 Apr 2015 - 4:22 pm

कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा.
जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला.
या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी?
नाही!
कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे.
एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा
आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते.
कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर
कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते.
आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते.
आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी
जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय.
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही
"आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो.
अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा?
लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी
ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते.
तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो.
प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो.
पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत?
पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं
तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं .
प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते.
शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते.
पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे.
मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते.
तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण
ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे.
म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा.
तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन.
जय महाराष्ट्र!
रचना-सौ.अश्विनी कोल्हे.

मुक्तक

प्रतिक्रिया

स्वप्नांची राणी's picture

13 Apr 2015 - 8:17 pm | स्वप्नांची राणी

तो तुमचा तांब्या-बिंब्या त्याच्या हातात देऊ नका...सांडायचा उगाच..

लय ईचक कार्ट हाय त्ये...

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2015 - 8:37 pm | टवाळ कार्टा

ईचक??

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2015 - 8:36 pm | टवाळ कार्टा

शेंडी सोडली...पळी काढली
तांबीय कविता का बरे सोडली

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 9:12 pm | अत्रुप्त आत्मा

बरेच दिवस साठून होती , मिळत नव्हती जागा
आज बरी सापडली ही अशीच मोकळी पागा

केला जरा मी ही मग माझा तांब्या मो कळा
किती दिवस खायचा तोच इडली रवा ढो कळा? :-D

खटपट्या's picture

13 Apr 2015 - 11:00 pm | खटपट्या

लोटांगण !!

त्रिवेणी's picture

13 Apr 2015 - 8:48 pm | त्रिवेणी

अरे काय चाललय काय हे?

अरे कुठ नेवुन ठेवालाय मिपा
माझा

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2015 - 9:12 pm | टवाळ कार्टा

३/१४ वाल्यांना विचारा

सस्नेह's picture

13 Apr 2015 - 9:23 pm | सस्नेह

कोण स्री ?
...धन्यवाद +D

प्रसाद गोडबोले's picture

13 Apr 2015 - 9:54 pm | प्रसाद गोडबोले

खुप सुंदर कविता !
मनापासुन भावली ! एका स्त्रीचे भाव विश्व किती हळुवारपणे मांडले आहे ... शेवटच्या जय महाराश्ट्र ने तर डोळ्यात पाणीच आले !!

अभिनंदन !

पुलेशु !

असो

अवांतर : योग्य प्रतिसाद देण्याचा मोह आवरत आहे ... नाहीतर लगेच "हीन प्रतिसाद +१ हीन प्रतिसाद +११ ..." अशी मुंग्यांची रांग लागल्या प्रमाणे कंपूजन्य प्रतिसाद येतील =))

अग्गो बाई, अस्सं झालं का. काय बाई धाक त्या कपूवाल्यांचा! जाऊ दे हो, त्यांना काहीही म्हणू दे हीन-बिन. आपण आपले स्वयंघोषित तर्कनिष्ठ प्रतिसाद देत राहावं, कसे?

तुमचे ही भरपूर अभिनंदन. इतका मुद्द्याचा (इथे असंबद्ध असला म्हणून काय झालं?) प्रतिसाद बघून डोळे आधी उघडले मग पाणावले वगैरे वगैरे...

अजया's picture

13 Apr 2015 - 10:15 pm | अजया

एक नं प्रतिसाद!!बलिवर्दनेत्रभञ्जक का काय तसा ^_~

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2015 - 9:45 pm | प्रसाद गोडबोले

फक्त दोनच प्रतिप्रतिसाद :(

फारच अपेक्षाभंग झाला =))

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2015 - 10:04 pm | टवाळ कार्टा

+१

पोपशास्त्राचा पाईक

पियुशा's picture

13 Apr 2015 - 10:21 pm | पियुशा

प्रगो दद्दा, आल्ली बग लाल मुंग्याची लांग , चावनाल बग टुला जास्त ची व ची व करचिन तर :प

बाई, आधी तोंडातला तंबाखू थुकून मग टाईप करा.. =))))

तू आलास का बीडया-काडया फुकुन्?

नाय नाय, ते जेवल्यानंतर. भारी चवकश्या हो तुम्हाला!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 11:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अग्गगगगगगगगग्ग्ग्ग्गगगगग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गगगगग!!!

ठॉ ठॉ धडाम धुडुम!!! =))

कंपुबाज पियु!!असे शेपटावर पाय नाही ठिवु =))

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2015 - 10:51 pm | टवाळ कार्टा

अजुन १०० नै??? श्या

प्रदीप साळुंखे's picture

13 Apr 2015 - 10:55 pm | प्रदीप साळुंखे

झाले काय?

प्रदीप साळुंखे's picture

13 Apr 2015 - 11:47 pm | प्रदीप साळुंखे

झाले काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 9:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो धागा वाचनमात्र केल नसता तर मी पकडुन बरेचं आयडी स्वर्गवासी झाले असते एवढी मस्ती केलीये त्या धाग्यावर. त्या धाग्यामुळेच बर्‍याचं मिपाकरांशी मी बोलायला लागलो ही मात्र खरी गोष्ट. कवियत्रीचे आभार. ;)

अद्द्या's picture

14 Apr 2015 - 3:42 pm | अद्द्या

अरे काय केलंय ते तिथे . .
चहा उडवला स्क्रीन वर वाचता वाचता हसल्यावर =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 6:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळे जणं स्टेरॉईड घेउन आल्यासारखे वागत होते त्या दिवशी. बेक्कार हसलोय.

किसन शिंदे's picture

14 Apr 2015 - 12:51 am | किसन शिंदे

स्त्रीमुक्तीचे, अस्तित्वाचे उमाळे अधून मधून यायचेच त्याला काही पर्याय नाही. अस्तित्व आहेच की, ते कुणी नाकारलंय का? कि प्रत्येकवेळी असं "आमचं अस्तित्व आमचं अस्तित्व" ओरडून सांगितलेच पाहीजे. असो!

बाकी सर्व दंगा अपेक्षित!

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 3:41 am | संदीप डांगे

आपल्या पहिल्याच प्रयत्नात अवघ्या बारा तासाच्या आत १०० प्रतिक्रिया घेऊन मिपावर नवा विक्रम स्थापित केल्याबद्दल बालवाडीतल्या कवयित्रीस एक बाराखडीचं पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे असं याठीकानी मी झाईर करतो.

-
तर्फे
जेपीसाहेब आणि सत्कारसमितीचे कार्यकर्ते.
विशेस आबार - मिपामापंकाढेमित्रमंडळ,

स्पंदना's picture

14 Apr 2015 - 5:48 am | स्पंदना

धागा वाचल्या वाचल्या मी हा प्रतिसाद टंकणार होते( होती म्हणु का?) पण उगा असुदे तिकडे म्हणुन मोह आवरला.
बाईंचे प्रतिसाद वाचल्यावर मात्र आता रहावत नाही. सांगुनच सोडते.

होय ना हो!! कित्ती ते अत्याच्यार स्त्रीवर म्हणते मी, बघा किनी तिची आईच म्हणते कधे एकदा मुलगा होइल हो मला, नवसाला पाव रे देवा!!
हे होतय न होतय तोवर तीच आई म्हणते, घरच काम शिक पहिला, अन्यायच अन्याय...ते बाप प्रकरण आपल बसतय गुंडाळुन कोकराला लहान आहे म्हणुन, केव्ह्ढी कुचंबना..
मग काय मैत्रीणी कुजकट बोलतात, टोमणे हानतात
त्यातन निघाव तर लग्नानंतर सत्कारासाठी सासू नणंद जावा उभ्या.

कित्ती कित्ती तो छळ हो एका बाईचा

आणि सगळ्यात कहर म्हणजे क्षणात बिच्चारी ही बाई दुसर्‍या क्षणी मोहरा फिरला की बिनधास्त स्वतः कुजकी नणंद, लावसट सासू आणी कजाग जाऊ पण होते हो..

काय साण्गाव रे देवा ह्या स्त्रीयांच्या दु:खाच.

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 6:50 am | पॉइंट ब्लँक

इतका समजूतदार प्रतिसाद ह्या विषयावार पाहण्यात नव्हता. नशीब एका स्त्री आयडी ने दिलाय, नाईतर लै दंगा झाला असता!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 7:56 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

कोल्हेकाकू कुटं गेल्या आता? ;-)

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 8:41 am | पॉइंट ब्लँक

शेणचुरी झाल्या म्हणून एंजॉय करायल्या गेल्यात. येत्याल ह्ळू हळू ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 8:49 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही! या हो कोल्ले काकू! http://www.freesmileys.org/smileys/smiley-talk009.gif
मंडळ स्वागताला तयार हाय! http://www.freesmileys.org/smileys/smiley-talk008.gif

अश्विनि कोल्हे's picture

14 Apr 2015 - 10:17 am | अश्विनि कोल्हे

अहो अस्सं काय करता पॉईंट काका? हे शेणचुरी बनवायचं नि एन्जॉय करायचं काम फक्त तुम्हाला नि तुमच्या मिपा मित्रांनाच येतंय बघा.
तुमच्या मित्रांची शेणचुरी कशी करायची याची तालिम घेणार आहे मी आजपासुन.

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 10:48 am | पॉइंट ब्लँक

तुमच्या मित्रांची शेणचुरी कशी करायची याची तालिम घेणार आहे मी आजपासुन.

अश्विनि आजी तालिम घ्यायच्या आधी रंगीत तालिम घेणार का? म्हणजे पुढे येणार्या काळासाठी मानसिक तयारी करता येइल :)

पलाश's picture

14 Apr 2015 - 10:27 am | पलाश

स्पंदना प्रतिसाद आवडला. ही बाजु उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन. :)

सपक रश्श्याला झणझणीत फोडणी दिल्यावर कशी चव येते ,
तस्सं वाटलं .... :))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 9:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मधे एका अबला नारीभगिनीने बसमधे एका म्हातार्‍याला उठवुन केलेला अपमान पाहिला आणि समस्त नारीवर्ग अबला आहे ह्याच्यावरचा विश्वास उडाला. तसचं एका लहान मुलाच्या चुकुन लागलेल्या धक्क्यामुळे त्याच्या कानफटात हाणणारी कॉलेजकन्यका बघुन वुमन एंपॉवरमेंट झालं आहे ह्याची खात्री पटली. असो. दोन्ही कडच्या बाजुंवर एखादी समतोल कविता कोणी पाडेल काय?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 9:59 am | अत्रुप्त आत्मा

सम तोल संम तोल कविता आम्मी पाडु
एका बाजुला चकली दुसय्रा बाजुला लाडू! ;-)
.....
जिल्बुचा ssss ये गं आता! :-D

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 10:36 am | टवाळ कार्टा

१०० कै २०० पन पर्तिसाद पाडू
पन तुम्ही तोंड नका करू कडू

यमके गुर्जींचा गेला कुठे तांब्या-गडू
र ला ट लागले की संमं फिरवतात झाडू

;)

अश्विनि कोल्हे's picture

14 Apr 2015 - 10:49 am | अश्विनि कोल्हे

मि.स्पँरो,
माफ करा तुमचे नाव टंक करतांना चुकली आहे.पण इलाज नाही.माझ्या मोबाइलच्या कळफलकावरुन बरेच शब्द टंक करायला जड जातात.
मुद्दा हा की बसमध्ये एका वृद्धाला स्त्री ने मारतांना तुम्ही बघितलंय व लहान मुलाला कानफाडात लावतांनाही बघितलंय ,पण कधी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या पत्नीलाच मारतांना कधीच नाही पाहीलं का तुम्ही? आणि बघितलंच तर यावर तुमची प्रतिक्रीया काय असेल?
का प्रत्येक पतीला आपल्या पत्नीला बेदम मारण्याचा अधिकार आहे असं वाटतं तुम्हाला?
आज स्त्रीयांचा आडदांडपणा बघुन तुम्हाला त्यांच्याबद्दल घृणा वाटतेय पण अनादी कालापासुन स्त्री सुद्धा पुरूषी बाणा सहनच करत आलीय ना.की स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन रहावं असं वाटतं तुम्हाला?
मान्य की सगळ्याच सगळेच पुरूष वाईट नाहीत पण खरं सांगा की आज किती टक्के लोक स्वतःच्या घरातच पत्नीला, मुलीला, बहीणीला, आईला सन्मान देतात?
काय ही टक्केवारी ५०% च्या वर गेलीय?
मी हेही मान्य करते की आजकाल मुलींनी लग्न करुन मुलांना लुटण्याचा व्यवसाय करून टाकलाय.पण कुठे न कुठे या सर्वांना पुरूषच जबाबदार नाही का?
मी जे बोलले ते माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या घटनांवरूनच बोलले.
मी स्वतःला भाग्यवान पण मानते की माझ्या बाबतीत असे काहीच नाही घडले म्हणुन डोळ्यासमोर घडलेलं विसरून जायचं का?
अतृप्त काका तुमच्या खालच्या पातळीच्या टवाळखोरीला घाबरले नाही मी.पण confuse जरूर आहे की माझ्या पुढच्या कवितांवर देखील का तुम्ही असेच ताशेरे मारलेत तर कदाचित नविन कविता लिहीणं बंद होतं की काय?
"वर कुणीतरी म्हटलंय,कुत्रंही विचारणार नाही माझ्या कवितांना" असली वाक्यं ऐकण्यासाठी नविन सदस्यांना add करते का मिपा.
आणि शेवटी म्हणच आहे ती," कुत्र्यांच्या पेठेतुन हत्ती जायला लागला की कुत्री ही भुंकणारच.म्हणुन हत्तीने चालणं सोडायचं नसतं"
Anyway तुमच्या प्रत्येकाच्या टवाळखोरीला उत्तर देत बसली तर नविन काही कधीच सुचणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2015 - 10:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा आणि लिहित राहा. तुम्ही प्रत्येक प्रतिसादाला उत्तर लिहित बसलात की एका प्रतिसादाला दहा उपप्रतिसाद येतील. प्रत्येक प्रतिसादात तुम्हाला चिडवायला काही तरी मिळेल. तेव्हा, तुम्ही कविता किंवा जो आशय लिहिलाय ना तेव्हा लिहिलं की सोडून द्यायचं. मस्त आभाळ भरुन आलंय मस्त कॉफीचा घोट घेत घेत सर्व प्रतिसाद हसत हसत इंजॉय करायचे. आता तुम्ही प्रतिसाद लिहु नका. कोणाला काय लिहायचं ते लिहु द्या. आणि एकदा रुळला ना की मग बिंधास्त लिहा. बाकी, फलटनही येईल तुमच्या मदतीला.

......असली वाक्यं ऐकण्यासाठी नविन सदस्यांना add करते का मिपा.
मी अनेक नवीन सदस्यांना म्हटलं आहे की एकदा मिपाचे सदस्य झालात की एकदा मिपा समजुन घ्या. हळुहळु प्रतिसाद लिहा. मग त्यातली मजा तुम्हाला मिपावर घेता येईल, एकदम टोकदार झालात की मग जरा रुळायला वेळ लागतो.

स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन रहावं असं वाटतं तुम्हाला ?
काही मिपाकरांना असंच वाटतं. दुर्लक्ष करा. :)

-दिलीप बिरुटे

अश्विनि कोल्हे's picture

14 Apr 2015 - 11:05 am | अश्विनि कोल्हे

धन्यवाद सर.

सस्नेह's picture

14 Apr 2015 - 4:03 pm | सस्नेह

आमचापण तास कधी घेणार ?
धन्यवाद सर ..
स्वारी सर !

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 4:05 pm | पॉइंट ब्लँक

अशी एक कविता लिवून १०० प्रतिसाद मिळवा मग विचार करतील ते. -:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 5:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही आयडीचं वय १८ तास असताना सेंच्युरी मारायची कामगिरी केलेली नाही तस्मात तुम्ही स्कालरशिप ला एलिजिबल णाही.

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2015 - 9:47 pm | प्रसाद गोडबोले

स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन रहावं असं वाटतं तुम्हाला ?
काही मिपाकरांना असंच वाटतं. दुर्लक्ष करा. :)

>>>
=))))

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 11:04 am | टवाळ कार्टा

अतृप्त काका

आम्चे गुर्जी लाजून "काका मत कहो ना"* असे म्हणत आहेत असे चित्र डोळ्यासमोर आले =))

* संदर्भ - हम पांच...प्म्पम्प पांच

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Apr 2015 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार

वा... एकच मारली पण काय मारली? इसको बोलते है करारा जबाब.

ताई तुम्ही इथे रोज रतिब घालायला सुरुवात करा. शेवटी कंटाळुन का होईना हे असले विकृत, घाणेरडे, अहंकारी, पुरुषी मनोवृतीचे निर्लज्ज प्रदर्शन करणारे भडकाउ प्रतिसाद बंद होतील.

सत्य कितीही कटु असले तरी सत्य हे सत्यच असते व त्याचे जगाला दर्शन झालेच पाहीजे.

पैजारबुवा,

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 11:21 am | पॉइंट ब्लँक

विकृत, घाणेरडे, अहंकारी, पुरुषी मनोवृतीचे निर्लज्ज प्रदर्शन

I know all these words but not in that order!

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 5:46 pm | वेल्लाभट

Phhhhhhh

आदूबाळ's picture

14 Apr 2015 - 11:21 am | आदूबाळ

+१

रोज एकतरी पाहिजेच

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 11:25 am | अत्रुप्त आत्मा

@अतृप्त काका तुमच्या खालच्या पातळीच्या टवाळखोरीला घाबरले नाही मी.>> नै हो तै!!! असे काहि माज्या मणी! उग्गीच्च कै..? कै तडी बोल्ता! दुत्त दुत्त! :-/

@पण confuse जरूर आहे की माझ्या पुढच्या कवितांवर देखील का तुम्ही असेच ताशेरे मारलेत तर कदाचित नविन कविता लिहीणं बंद होतं की काय?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 11:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मि.स्पँरो,
माफ करा तुमचे नाव टंक करतांना चुकली आहे.पण इलाज नाही.माझ्या मोबाइलच्या कळफलकावरुन बरेच शब्द टंक करायला जड जातात.
मुद्दा हा की बसमध्ये एका वृद्धाला स्त्री ने मारतांना तुम्ही बघितलंय व लहान मुलाला कानफाडात लावतांनाही बघितलंय ,पण कधी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या पत्नीलाच मारतांना कधीच नाही पाहीलं का तुम्ही? आणि बघितलंच तर यावर तुमची प्रतिक्रीया काय असेल?
का प्रत्येक पतीला आपल्या पत्नीला बेदम मारण्याचा अधिकार आहे असं वाटतं तुम्हाला?
आज स्त्रीयांचा आडदांडपणा बघुन तुम्हाला त्यांच्याबद्दल घृणा वाटतेय पण अनादी कालापासुन स्त्री सुद्धा पुरूषी बाणा सहनच करत आलीय ना.की स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन रहावं असं वाटतं तुम्हाला?
मान्य की सगळ्याच सगळेच पुरूष वाईट नाहीत पण खरं सांगा की आज किती टक्के लोक स्वतःच्या घरातच पत्नीला, मुलीला, बहीणीला, आईला सन्मान देतात?
काय ही टक्केवारी ५०% च्या वर गेलीय?

जन्रलायझेशन जन्रलायझेशन म्हणतात ते हेच बरं. असो. पुढच्या वेळी दोघांच्या बाजु समतोलपणे मांडायचा प्रयत्न केलात तर जास्तं बरं होईल. तुमच्या कवितेमधे(??????????????????) किंवा तत्सम निबंधामधे तुम्ही फक्तं आम्ही अबला वगैरे लिहित बसलात तर तुमच्या कवितांवर अनाहिता सुद्धा तुटुन पडतील. प्रत्येक वेळी घडलेल्या घतनेमधे पुरुषाचीचं चुक असते काय? पुरुष घराबाहेर कुठल्याच ताणतणावांना तोंड देत नाही काय? पुरुष अबल/ हतबल असु शकत नाहीत काय परिस्थितीसमोर? कजाग बायकोचा त्रास पुरुषांना होत नाही का? ही बाजुही येउ दे की पुढं. तुम्हाला कविता लिहायला कोणीही अडवत नाहीये. फक्त अश्या विषयांवर एवढेवेळा फेमिनिस्ट कविता आर्टिकल्स आली आहेत की साहजिक आहे विरुद्ध पार्टी खवळणार आणि प्रतिसाद देणार.

अतृप्त काका तुमच्या खालच्या पातळीच्या टवाळखोरीला घाबरले नाही मी.पण confuse जरूर आहे की माझ्या पुढच्या कवितांवर देखील का तुम्ही असेच ताशेरे मारलेत तर कदाचित नविन कविता लिहीणं बंद होतं की काय?

त्यांनी कुठेही खालच्या पातळीवर जाउन टिका केलेली नाही. आणि ताशेरे म्हणाल तर त्यांनी एकट्यांनी मारलेले नाहीत तर ऑलमोस्ट सगळ्यांनी मारलेले आहेत, अगदी इथल्या स्त्री-आयडींनी सुद्धा. आणि त्यांना तेवढा अधिकार नक्कीचं आहे. कारण त्यांच्याकडे योग्य-अयोग्याचा विचार करायची क्षमता आहे. तस्मात क्षमता वाढवा.

आणि शेवटी म्हणच आहे ती," कुत्र्यांच्या पेठेतुन हत्ती जायला लागला की कुत्री ही भुंकणारच.म्हणुन हत्तीने चालणं सोडायचं नसतं"
Anyway तुमच्या प्रत्येकाच्या टवाळखोरीला उत्तर देत बसली तर नविन काही कधीच सुचणार नाही.

मैंड युअर लँग्वेज. एवढ्या खालच्या पातळीवर जाउन तुम्हाला कोणी काही बोललेलं नाही. जरा बोलताना/ लिहिताना जपुन.

मिपा वरती सुरुवातीला हे सगळ्यांबरोबरचं होतं. त्याची मजा घ्या. आणि जुन्या झालात की तुम्हीही तेचं कराल ह्याची खात्री देतो.

असो. लिहित रहा. हळु हळु प्रगल्भता येतं जाईलचं. लोकांनाही तुमची लेखन शैली अंगीवळणी पडली की चेष्टा बंद करुन तुम्हाला अगदी भरभरुन प्रतिसाद देतील. धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2015 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा

@मिपा वरती सुरुवातीला हे सगळ्यांबरोबरचं होतं. त्याची मजा घ्या. आणि जुन्या झालात की तुम्हीही तेचं कराल ह्याची खात्री देतो.>>> +++१११ मिसळपाव हे संस्थळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासारखंच आहे.. (त्याच्या निर्मितीपासून!) इथे शेरेबाजी/टीका/टींगलटवाळी सुद्धा हो ते च! पण त्याखेरिज तुम्ही तोडिस तोड निर्मिती केलीत्,तर तेव्हढच सकसकौतुक/प्रोत्साहन्/आशिर्वादंही मिळतात. तुमची ही कविता सुमार दर्जाची असल्यामुळे,तुम्हाला हे असले हार/तुरे मिळालेले आहेत. या पुढे काय मिळवायचं ते तुम्ही ठरवा.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 5:45 pm | वेल्लाभट

हे -यागिंग आहे मिपावरचं....

हो की नई कॅ जॅ स्पॅ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 5:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि करतो

कपिलमुनी's picture

14 Apr 2015 - 3:18 pm | कपिलमुनी

ही पण कविता छान आहे

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 3:22 pm | संदीप डांगे

मुनिवर. काय हे...

खटपट्या's picture

15 Apr 2015 - 2:25 am | खटपट्या

आवो ताई, आमच्या सारखे वाचक हायेत ना तुमच्या पाठीशी. लीवा लीवा बिंधास्त...
तुमची ही कविता मला खूप म्हंजे खूप आवडली आहे. मी पण कवीता करतो. पण धाडस होत नाही प्रसीद्ध करण्याचं. घरी सर्वांसमोर वाचली ही कविता. सर्वांना आवडली.
हे मी सर्व मनापासुन लीहीत आहे.

एस's picture

14 Apr 2015 - 1:32 pm | एस

सर्वप्रथम आपल्या लेखनामागची कळकळ पोचली हे नमूद करतो. हे काव्य नाहीच आहे . हे महाकाव्य आहे. तेव्हा तुमच्या कवितेला निबंध म्हणणार्‍यांकडे उदार अंतःकरणाने दुर्लक्ष करा. हा धागा मी पुन्हा पुन्हा वाचून काढला आणि दर वेळेस अधिकच सद्गदित (विग्रह - सत् + गदित) होत गेलो. माझ्या अंतर्मुख मनावर इतका परिणाम झाला की मी माझ्या बायकोची क्षमा मागितली आणि ती नको म्हणत असतानाही तिचा एक दुखरा पाय चेपून दिला. फक्त तो चुकीचा पाय होता हे नंतर तिने मारलेल्या एका फटक्याने आणि ओरडण्याने मला कळाले. परिणामी आता तिचे दोन्ही पाय दुखताहेत आणि सकाळची न्याहरी मलाच बनवावी लागली. एवढे एक सोडता आमच्या मधुर नात्याचे अस्तित्त्व आपल्या कवितेने अजूनच दृढ झाले ह्याबद्दल आपले अनेक आभार. बायकोने एक टोमणा तिच्या नेहमीच्या सवयीने मारलाच, पण तिच्या मुखातून निघणार्‍या अशा अग्निज्वाळांची आताशा सवय झाल्याने माझी सहनशक्ती तिच्यापेक्षाही कैकपटीने वाढली आहे हे मात्र (माञ असावे बहुतेक. चूभूदेघे) नक्की. स्त्री क्रोधाची जननी असते ह्यावर मात्र तिचा जोरदार आक्षेप आहे हे सांगू इच्छितो (आमच्या कार्टीचे नाव क्रोधा नाही.) त्यामुळे ही दुसरी स्त्री कोण ह्या प्रश्नावरून आमच्या घरी अंमळ संशयकल्लोळ झाला आणि माझ्यावरच क्रोधाचा 'जनक' असल्याचाआरोप करण्यात आला. पण जाऊ द्यात. एवढे चालायचेच, नाही का?

असो. तर सांगायचा मुद्दा असा की, मी आपल्या काव्याचा फार मोठा चाहता आहे. ते असेच भरभरून मिपाच्या डेटाबेसमध्ये कोंबले जाणे हे 'स्री' च्या अस्तित्त्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा लिहीत रहा. थांबू नका.

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 3:29 pm | काळा पहाड

बेस बेस

सस्नेह's picture

14 Apr 2015 - 3:42 pm | सस्नेह

बस भी करो पगले स्वॅप्सभौ !
अब हसवाहसवाके मारोगे क्या +))

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 5:17 pm | वेल्लाभट

हे बाकी आहे हं.

कोल्हेताई तुमच्या कवितेमधील भावभावनांशी सुसंगत अशी एक कविता ...

ओझे किती युगांचे
साचले या अंतरी
वंचना सात जन्मांची
साहीली तुजसाठी |

पायधूळ ही तुझी
घेतली मी मस्तकी
जाण तुज नसे जराही
माझीया अस्तित्वाची |

तोडिली मग बंधने
झुगारली सारी नाती
पंखात बळ माझ्या
होतेच घेण्या भरारी |

मनमुक्त मी आकाशी
पायतळी ही धरती
नजरेत तुझ्या होती
तीच आदीम आसक्ती |

मज नकोत ते तराणे
अन् रीतीचे उखाणे
प्रितीची गंधगाणी
ते उसासे, ते रडणे |

न येणे मी परतुनी
तुजसाठी, तुजपाशी
राहशील सदा तु रे
माझीया चरणांपाशी |

... शेवट बरोबर वाटला का ?

स्पंदना's picture

14 Apr 2015 - 5:12 pm | स्पंदना

मनिषा सुरेख कविता.
शेवट कसा असावा;कसा नसावा हे ज्याने त्याने ठरवावे. म्हणजे लिहीणार्‍याने. जर कविता एकाच व्यक्तीला उद्देश्य्न असेल तर त्याला पायतळी घालायला हरकत नाही, पण जर समुदायाला उद्देश्उन असेल तर मात्र हृदयाच्या ठोक्यांना साथ देणारे अनेक असतील, शोधावे आणि ओळखावे लागतील.

मनीषा's picture

15 Apr 2015 - 6:36 am | मनीषा

बरोबर आहे तुझं .
कुणीच कुणाला पायतळी ठेवण्याची आकांक्षा ठेवू नये .

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 5:49 pm | वेल्लाभट

आणि १५० !

पदार्पणातच १५० मारणा-या तुमचं प्रचंड प्रचंड अभिनंदन !

दिडशतका निमीत्त धागाकर्ती कु/सौ. अश्विनी कोल्हे आणी कु/श्री.वेल्लाभट यांचा सत्कार एक एक पुस्पगुच्च देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 7:06 pm | वेल्लाभट

माझा कशाबद्दल? मी एक शुभेच्छुकच आहे ओ

बहीरखेडकर's picture

14 Apr 2015 - 8:48 pm | बहीरखेडकर

स्त्री ही बला नाही,
अबला ही नाही,
मात्र पुरूषांच्या हाती सापडलेला
तबला आहे.

तिमा's picture

14 Apr 2015 - 9:34 pm | तिमा

म्हणून काही दुष्ट पुरुष हातोडीने मारुन त्यांना 'पट्टीत' आणतात.

पॉइंट ब्लँक's picture

14 Apr 2015 - 9:44 pm | पॉइंट ब्लँक

या, तुमचीच कमी होती.

सस्नेह's picture

14 Apr 2015 - 10:36 pm | सस्नेह

डग्गा कुठाय ?

मनीषा's picture

15 Apr 2015 - 6:37 am | मनीषा

वा उस्ताद .. व्वा!!

गौरी लेले's picture

15 Apr 2015 - 9:40 am | गौरी लेले

ठीक

ह्यापेक्षा सासू च्या कवितेत जास्त प्रगल्भता दिसून येत आहे

मयुरा गुप्ते's picture

16 Apr 2015 - 12:40 am | मयुरा गुप्ते

कविता आणि प्रतिसाद वाचुन मंत्रमुग्ध झालेय.

तुफान आहे.. चालु द्या.

--मयुरा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मंत्रसुन्न व्हायचं असेल तर ह्या कवितेचा आणि प्रतिसादांचा सखोल अभ्यास करा.

http://www.misalpav.com/node/30460

आनंदी गोपाळ's picture

19 Apr 2015 - 1:41 pm | आनंदी गोपाळ

त्र व ञ या दोघांतला फरक समजावून घेतलात तर आनंद होईल.
आपण मराठी नामक भाषा देवनागरी लिपी वापरून लिहित आहात. त्+र = त्र.
ञ हा स्वर आहे. व्यंजन / जोडाक्षर नव्हे.