स्रीचे अस्तित्व!

अश्विनि कोल्हे's picture
अश्विनि कोल्हे in जे न देखे रवी...
13 Apr 2015 - 4:22 pm

कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा.
जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला.
या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी?
नाही!
कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे.
एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा
आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते.
कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर
कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते.
आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते.
आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी
जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय.
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही
"आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो.
अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा?
लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी
ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते.
तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो.
प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो.
पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत?
पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं
तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं .
प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते.
शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते.
पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे.
मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते.
तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण
ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे.
म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा.
तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन.
जय महाराष्ट्र!
रचना-सौ.अश्विनी कोल्हे.

मुक्तक

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

13 Apr 2015 - 4:28 pm | वेल्लाभट

कविता वाटलीच नाही.
त्यामुळे आवडली नाही.
आणि विचार फारच एकांगी.

बोझाखाली, कुचलून वगैरे हिंमराठी शब्द का लागतात? मराठी संपन्न आहे.
-हस्वदीर्घही काही ठिकाणी गडबड (कदाचित टाईप करताना चुकलं असावं)

असो. प्रयत्न बरा होता असं म्हणतो.
पु.ले.शु.

काळा पहाड's picture

13 Apr 2015 - 4:55 pm | काळा पहाड

हेच म्हणायचं होतं. मुक्तछंदातली असली तरी कवितेला लय असते. ती यात सापडली नाही. ही तर वाक्य तोडलेली गद्य वाक्यरचना आहे.

पॉइंट ब्लँक's picture

13 Apr 2015 - 5:07 pm | पॉइंट ब्लँक

माफ करा

तुम्ही काय घोडं मारलं म्हणून माफी मागताय?

अश्विनि कोल्हे's picture

13 Apr 2015 - 5:54 pm | अश्विनि कोल्हे
म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. धन्यवाद. मी कोणी मोठी कवियिञी नाहीय.लेखनाच्या बालवाडीत नविनच प्रवेश केलेली विद्यार्थिनी आहे. दुसरे असे की, माझा विचार एकांगी नाहीय. ही सत्यस्थिती आहे.आपल्या आजुबाजुला कदातिच अशी परिस्थिती बघितली नसेल, पण समाजात अजुनही बर्याच ठिकाणी मुलींना, स्रीयांना अशी वागणुक मिळतेय. पुरुषांनी विचार करावा की आपण तर असे वागत नाही ना. एकुणच समाजातील पुरुष जातीची विचारधारा बदलण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न आहे.
अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा

@.लेखनाच्या बालवाडीत नविनच प्रवेश केलेली विद्यार्थिनी आहे.>> द्येको...मै क्या बोल्या था!!!

@दुसरे असे की, माझा विचार एकांगी नाहीय. ही सत्यस्थिती आहे.आपल्या आजुबाजुला कदातिच अशी परिस्थिती बघितली नसेल, पण समाजात अजुनही बर्याच ठिकाणी मुलींना, स्रीयांना अशी वागणुक मिळतेय.>> १०० परतिसादांची खात्री...

प्रदीप साळुंखे's picture

13 Apr 2015 - 10:53 pm | प्रदीप साळुंखे

अश्विनी बाई तुम्ही जरा चाणक्य नीती वाचा,आणि त्यामध्ये स्त्री चे गुणही सांगितले आहेत काय असतात ते वास्तविक .
तेही वाचा

ठीक आहे, पण हे सत्तरच्या दशकातल्या स्त्रीचं वर्णन वाटतंय. आताच्या स्त्रिया "स्त्रियांसाठी" लिहीलेल्या जागेवर कोणी पुरुष बसला असेल तर त्याला उठवतात आणि एकमेकींकडे बघून कुत्सित हसतात. त्यांची एक मैत्रिण उभीच असते. मग "स्त्रियांसाठी" असं लिहीलेलं "नसलेल्या" जागी जिथे पुरुष बसलेले असतात तिथे आपल्याला बसायला मिळेल याची ती वाट बघत असते.

आणि त्यातलीच उभं राहावं लागलेली एखादी मग मिपावर येऊन स्त्रीमुक्तीच्या कविता लिहीते. पुरुष कित्ती वैट्ट असतात आपल्याला बसायला पण जागा देत नाहीत वैगरे वैगरे!!

एस's picture

13 Apr 2015 - 5:13 pm | एस

:-D

संदीप डांगे's picture

13 Apr 2015 - 5:32 pm | संदीप डांगे

च्यायला डोक्यात जातात अशा बायका...

हल्ली तर मी 'स्त्रियांसाठी' असणार्‍या जागा मोकळ्या असतांना इतर जागेवर (या जागांना 'पुरुषांसाठीच्या' म्हणू शकत नाही) बसणार्‍या स्त्रियांना तेवढ्याच हलकटपणे उठवून लावून जागा मिळवतो. बाकी एखादी 'स्त्रियांसाठी'ची जागा मोकळी असतांना त्यावर पुरुष (वय कोणतेही) बसल्यावर तो जणू काही आपल्या मांडीवरच बसला आहे या आविर्भावात त्याचा पाणउतारा का करतात? त्याला सौम्य भाषेत सांगू शकत नाही का? मुंबईत सुरुवातीपासूनच हा भयंकर प्रकार पाहिल्याने जागा रिकामी असेल तरी मी बसत नसायचो.

इस बात पे एक किस्सा: एक सहप्रवासीसोबत घडलेला त्याने स्वतः सांगितलेला अनुभव. तो मार्केटींग निमित्त मुंबईभर भटकंती करत असतो. दिसायला सामान्य सावळा वर्ण, टीपीकल मिशी वैगेरे ठेवणारा, एका विशिष्ट मागास वर्गातला वाटावं असं व्यक्तिमत्व. त्याचे एवढे वर्णन सांगण्याचे कारण लोकांचा पुर्वग्रह कसा असतो ते कळावे म्हणून.

एकदा बस मधे भयंकर गर्दी असता त्याला सीट मिळाली. पुढच्या कुठल्यातरी थांब्यावर एक पस्तीशीतली स्त्री चढली, सोबत कदाचित ५-६ वर्षाचे मूल असेल. आपल्या नायकाने सोबत मुल बघून प्रतिक्षिप्त क्रियेने तीला स्वत:चे आसन दिले आणि गर्दीमुळे तो तिच्याच बाजूला उभा राहीला. ५-१० मिनिटे गेली आणि ती त्याच्यावर भयंकर चिडली. उठून तिने याच्या सण्ण्कन थोबाडीत मारली. ह्याला काय समजेना काय झालं. ती म्हणाली, "@#$#%&$, जगह दिया तो क्या चान्स मारेगा क्या?" ती काय म्हणते आहे नक्की ते याच्या मेंदूपर्यंत पोचण्याआधी अक्ख्या बसला कळलं. झालं ना पब्लिक नेहमीप्रमाणे सुरु. त्याने तिचा प्रतिकार करण्याचा, तिचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला पण 'पुरुष अस्सेच असतात' या सर्वमान्य पुर्वग्रहापुढे त्याचे काहीच चालले नाही. गर्दीमुळे त्याचा तीला धक्का लागत होता आणि ती भलताच समज करून बसली.

तर बंधुंनो, "हीच अशी असेल" म्हणून स्त्रियांना दोष देणारे वेळेनुसार "ह्यानेच काहितरी केले असेल" इतपत बदलू शकतात. त्यामुळे सांभाळून र्‍हावा. जमाना खराब हैं|

अवांतरः घरी झालेल्या भांडणाचा राग कविता लिहून काढतात कधी कधी.

अश्विनि कोल्हे's picture

13 Apr 2015 - 6:06 pm | अश्विनि कोल्हे

कुठल्या जगात जगत आहात आपण?
आजही एखाद्या स्री अर्भकाला रस्त्यावर फेकुन दिलं जातंय.
तुमच्या विचारांवर खुप हसावंसं वाटलं. केवळ बसमध्ये जागा बळकावणार्या मुली तुम्हाला दिसल्या,पण त्याच बस मध्ये एखादी एकटी मुलगी बघुन तिच्यावर अत्याचार केला जातो हे नाही दिसलं तुम्हाला?
मी कोणी बसमधील जागा न मिळालेली मुलगी नाहीय,जी सर्व पुरुषांना वाईट म्हणतेय.
पुरुषांनी स्वतःची मानसिक विचारधारा बदलण्याची गरज आहे.

पुरुषांनी स्वतःची मानसिक विचारधारा बदलण्याची गरज आहे.

ती फक्त पुरषांनीच बदलणे गरजेचे आहे म्हटलात तेव्हाच कळलं आपली वैचारिक पोच काय आहे!! =))))

संदीप डांगे's picture

13 Apr 2015 - 6:19 pm | संदीप डांगे

पुरुष अर्भकाला फेकण्याच्या घटना माहित नाहीत तुम्हाला?

बरेचदा बर्‍याच बसेसमधे एकटी मुलगी असते, त्या प्रत्येक मुलीवर बलात्कार नाही होत हो.

मिपावरच कुणीतरी म्हटलंय, की कोट्यावधी वर्षे होऊनही पुरुषांची विचारधारा बदलण्याची इच्छा असणारी स्त्रीयांची विचारधारा कधी बदलणार?

याच जगात घडणार्‍या ह्या घटनाही बघा: http://ekhusbandkimaut.blogspot.in/

नेहमी एकाच बाजूचे अतिरंजीत चित्र दाखवून वातावरण गढूळ का करावे?

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2015 - 7:48 pm | टवाळ कार्टा

मिपावरच कुणीतरी म्हटलंय, की कोट्यावधी वर्षे होऊनही पुरुषांची विचारधारा बदलण्याची इच्छा असणारी स्त्रीयांची विचारधारा कधी बदलणार?

मीच तो...मीच तो

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 3:30 am | संदीप डांगे

हो हो.

तुम्हीच ट का भौ. द वन यँड वोन्ली.

काल-परवाच कुठेतरी वाचलं तुमचं विधान आणि डोक्यात फिट्ट होऊन गेलं बगा...

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 10:16 am | टवाळ कार्टा

toob

वेल्लाभट's picture

13 Apr 2015 - 9:17 pm | वेल्लाभट

चायला जाम दिवस झाले यावर लिहायचंय.
कित्येकदा विचार करायला बसलो आणि नुसता राग राग झाला. लिखाण झालंच नाही.
तू पुन्हा ठिणगी पाडलीस आज. आज बशीतही एक अशी केस बघितली.

सो आता एक तिकाट जिलबी पाडायलाच हवी.

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 3:33 am | संदीप डांगे

वेल्लाशेठ,

येउद्या. या मुळमुळीत शेवयांवर तिकाट उतारा पायजेल राव...

ज्योति अळवणी's picture

19 Apr 2015 - 2:03 pm | ज्योति अळवणी

आजही आपल्या समाजात स्त्री लग्नानंतर पतिच्या घरी जाते. जावयाचा मान आयुष्यभर राखला जातो... कधीतरी सणा-समारंभाला बोलावून. आज जरी पति-पत्नी स्वतंत्र राहात असले तरी पतिच्या पालकांची जवाबदारी अध्यारुत आहे आणि पत्नीच्या पालकांसाठी जावयाने काही केले तर त्याची कौतुकास्पद मोठी चर्चा आहे.

आजची स्त्री स्वतंत्र आहे. ती तिचे विचार परखड़पणे मांडू शकते. तिचे अधिकार हक्काने घेते... पण मग खाजगीत ती 'भांडकुदळ, तापट....' इत्यादि असल्याची चर्चा होतेच.

मुद्दा एवढाच की काळा बरोबर वागण्यात बदल आहे; विचारात नाही.

आदूबाळ's picture

13 Apr 2015 - 5:16 pm | आदूबाळ

हे "स्री" म्हणजे काय असतं?

चिनार's picture

13 Apr 2015 - 5:16 pm | चिनार

कविता आहे की निबंध ?
दोन्हीला १५ पैकी ३ मार्क ..
या कवितेला चाल लावून दाखवा ...त्याचा लकडी पुलावर जाहीर मुका घ्यायला मी तयार आहे .

आता थोडं कवितेच्या आशयाविषयी
१. नक्की कुठल्या काळातली स्त्री आहे ही ?
२, स्त्र्रीयांवर अन्याय आजही होतात हे मान्य ! पण ते या स्वरूपाचे असतात यावर आक्षेप !

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

त्यांना कवियट्री-व्हायचं असेल.. ! म्हणून तयार होऊ पहाणार्‍या बल्लवा प्रमाणे त्या पिझ्झा आधी थालपीठ लाऊन बघत आहेत! हो णा हो कवियट्री टाई!

लागली वाट एका उद्योन्मुख लेखीकेची =))

बॅटमॅन's picture

13 Apr 2015 - 6:17 pm | बॅटमॅन

अच्चं जालं तल

मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते

मागच्या आठवड्यात खोटे लग्न करून सगळा माल गोळा करून अनेक पुरुषांना गंडा घातलेल्या 'स्त्री ' ची बातमी पहिली नाही का ? कुठल्या जगात आहात ?

कहर's picture

13 Apr 2015 - 6:21 pm | कहर

स्री ही शक्ती आहे.
मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते.
तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण
ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे.

तरी पुरुषांनी तिचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करायचे ?

बात कुछ हजम नाही हुई

बॅटमॅन's picture

13 Apr 2015 - 6:25 pm | बॅटमॅन

सर्वांत भारी असूनही स्वतःचे अस्तित्व अबाधित राखता येत नाही म्हणजे खरेच कहर आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif

अश्विनि कोल्हे's picture

13 Apr 2015 - 6:34 pm | अश्विनि कोल्हे

माझ्या लेखनातील आशय कुणी समजुन घेतला नाही.
सर्व पुरुष लेखकांना माञ अहंकार रुपी ठसका बसला.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

जेपी's picture

13 Apr 2015 - 6:38 pm | जेपी

ठ्ठो

संदीप डांगे's picture

13 Apr 2015 - 6:49 pm | संदीप डांगे

जेपीभौ....
जरा सत्काराच्या तयारीला लागा. कार्यकर्त्यांना पळवा.
'भव्य महीलांचा सत्कार' सोरी 'महिलांचा भव्य सत्कार' करायला लागंल.
पन्नाशी आता हुईल अर्ध्या तासात, मग टायम नाय गावंल बगा.
कशानं सत्कार करायचा तो आयटेमबी ठरवा बुवा सर्वांचं मत घीऊन...

आम्हाला माफ करा. आम्हाला अहंकाराचा ठसका लागलाय... डोळे पांढरे झालेत... काय जीव कुचूलून गेलाय जणू.

सत्कार फोडणीची पळी देऊन करा हो.

नाखु's picture

14 Apr 2015 - 9:24 am | नाखु

फोडणीची पळी नुसती द्यायची का फोडणीसकट हा यक्षप्रश्न आणि सोबत घासणी आणि साबू द्यावा लागेल तो वेगळाच (वर हे साहीत्य दिलंच आहे तर जर घासून ही द्या मागणी होऊ शकते)

स्त्री-पुरुष दोघेही समान स्वातंत्र्यप्रिय असावेत पण स्व तंत्र (स्वैराचारी) नसावेत अशी प्रतीगामी मते असलेला भोट नाखू

पळी द्या,फोडण्या घालण्यात तै एकसपर्ट दिसत आहेत.
घासणी आणि साबू!!किती ते इस्त्रीवरील अन्यायाचे प्रतिक!! असं लिहिता मग भाव्ना कुचल्ली जाते. प्रतिगामी कुठचे!!

आदूबाळ's picture

13 Apr 2015 - 6:51 pm | आदूबाळ

माझ्या लेखनातील आशय कुणी समजुन घेतला नाही.

अहो आशयच लिहायचा ना डायरेक.

आदूबाळ, तुम्हाला पण लागला का ठसका ? ऑं ??

सर्व पुरुष लेखकांना माञ अहंकार रुपी ठसका बसला.

भारीच बै विनोदी तुम्ही!! =))))

खटपट्या's picture

13 Apr 2015 - 11:02 pm | खटपट्या

मला समजलाय आशय. मी तुमच्या पाठीशी आहे. या अशाच कविथा मरगळलेल्या मराठी साहीत्यविश्वाला वळण लावतील.
लीवा बिंधास्त.

प्रदीप साळुंखे's picture

13 Apr 2015 - 11:07 pm | प्रदीप साळुंखे

वळण वाकडे असते बरे!

नाखु's picture

14 Apr 2015 - 9:25 am | नाखु

मानीटर बदलावा लागेल
मी चुकून दळण वाचले

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 10:37 am | टवाळ कार्टा

भीउ नकू असे लिहायचे रैले कै?

खटपट्या's picture

14 Apr 2015 - 10:40 am | खटपट्या

आता काय बोलणार ?

मोहनराव's picture

15 Apr 2015 - 4:41 pm | मोहनराव

अगागा!!

बास एवढीच बॅटिंग झाली? मी पाॅपकाॅर्न आणायला गेलेली.माझ्या भाव्ना कुचल्ल्या गेल्या कमी प्रतिसाद वाचुन.

हाडक्या's picture

13 Apr 2015 - 6:49 pm | हाडक्या

अहो तै, टाळी एका हाताने वाजत नै. आता काकूंच्या मदतीस कोणी आले तर टाळ्या वाजायला लागतील हो, नै तर नुसताच एका हातानेच वारा घातल्यासारखं व्हईल. ;)

कोल्हेताई,सुरु ठेवा तुमच्या प्रतिसादाच्या फोडण्या!लागु दे ठसके,उडु दे बार!!

पिलीयन रायडर's picture

13 Apr 2015 - 6:57 pm | पिलीयन रायडर

एकतर्फी लिहीलयहो तै फारच.. नाही म्हणजे आहेत खरंच खुप प्रॉब्लेम्स.. पण तुम्हाला वाटतय तेवढंही जग वाईट नाहीये..

असंच जाता जाता..
सौ. अश्विनी कोल्हे हे सासरचं नाव की माहेरच? (असंच विचारलय.. जज वगैरे काहीही करणार नाहीये..)

प्रतिसाद वाचुन हसुन मरतय ..
जगल तर हाफशेंच्युरी निमीत्त कार्यकर्त्याकडुन सत्कार करण्यात ईल

.
कार्यकर्ते -टवाळ कार्टा ,चिमणराव

काय रे ए ब्याटया आत्मुस न सुड ईथेच तुम्ही कवितेला नाव ठेवून सिद्ध केल आहे की पुरुष ही औरत को छळ्ता है काही नविन करायला गेल की नाव ठेवता है,सिद्ध झाल,:प। तै तुम्ही लिहा ही फाट्यवर मारा सगळ्या पुरुषाना बाला गोपालना :प

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा

आली आली .. जिल्बुचा आली ! आता खली मज्जा एनाल! :-D

पॉइंट ब्लँक's picture

13 Apr 2015 - 7:07 pm | पॉइंट ब्लँक

हा धागा पाहून "अबला नारी, दुनियापे भारी " चा प्रत्यय आला.

पियु, तुझा प्रतिसाद वाचुन घाबल्ले सगळे पुरुष्स =))
क्या प्रतिसाद लीखके छळ्या है बालगोपाल्सको!!

तुम्हाला डणकून पाठिंबा. आज 'स्री'चा जो छळ चाल्ला आहे त्याविरोद्धात आवाज उठवलाच्च पाहिजे. इथल्या टवाळांकडे लक्ष देऊ नका अशे मी तुम्हाला याठिकाणी 'आव्हान' करतो.

संदीप डांगे's picture

13 Apr 2015 - 7:41 pm | संदीप डांगे

यसवायजी, ते 'हाव्वान' हाय बरंका... :-)

यसवायजी's picture

13 Apr 2015 - 8:53 pm | यसवायजी

गलती झाली. हाव्वानच! ;)

अो, अच्च बोल्ले शग्गे पुश, कोल्हु ते ला,

आपण वाSSSSS कलु ह, उन्हातच बांधु घल शग्गया पुशांच

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा

आला आला पांडुब्बा आला
उलाला उलाला उलाला! :-D

तरीच म्हटलं तुमचा उपप्रतिसाद कसा नाही. =))))

पियुशा's picture

13 Apr 2015 - 7:28 pm | पियुशा

ष्पा .....
टू आलाश ...टुच रे टूच खला वाचक बाकी सगले टवालखोल:प

अश्विनि कोल्हे's picture

13 Apr 2015 - 7:16 pm | अश्विनि कोल्हे

पहील्याच दिवशी पहील्याच कवितेवर इतके आक्षेप पाहुन खचली नाहीय मी.
मजा आली माञ.
मी लिहीणारच. मिसळपाव वर पण टाकणार.कितीही आक्षेप आले तरी.
मिञांनो वाट पहा माझ्या नविन कवितेची.

लिवा लिवा. आम्हाला असेच धागे आवडतात. मज्जा. :))))

मी लिहीणारच. मिसळपाव वर पण टाकणार.

ते ठीकै, आधी मराठी सुधारा, खचली नाहीय? कसलं हो हे मराठी?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 7:21 pm | अत्रुप्त आत्मा

वारलो रे वारलो! :-D

वाञट मेले. माझी खाञी आहे की कुञं विचारणार नाही तुम्हाला. तुमच्या गाञी गाञी स्री भिनेल तोच सुदिन.

तुमच्या गाञी गाञी स्री भिनेल तोच सुदिन.

मुनीवर, उ:शाप द्या..प्लीज !! ;)

कपिलमुनी's picture

14 Apr 2015 - 10:44 am | कपिलमुनी

भिनेल ऐवजी

तुमच्या गाञी गाञी स्री भिडेल

असा चालेल का

तिमा's picture

13 Apr 2015 - 8:06 pm | तिमा

जरुर लिहा हो कोल्हेताई, पण तेवढ्या त्या 'ञ' या अक्षरापासून वाचवा हो आम्हाला.
माञ मधे 'त्र' च्या ऐवजी 'ञ' पाहून बाराखडी बसली हो आमची! (t+r = त्र.)
बाकी चालून द्या.

चिनार's picture

14 Apr 2015 - 9:09 am | चिनार

ये बात !!!
आमचा पोपकोर्न चा धंदा जोरात चालणार की हो आता !
समस्त मिपा बांधव आणि भगिनींनो , भागीदारी करायची असल्यास व्यनी करा.
IPO चं काढावा म्हणतो एखादा !

कहर's picture

14 Apr 2015 - 9:09 am | कहर

आता मात्र कहर झाला ….

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 9:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पॉपकॉर्नच्या धंद्यात एका विशिष्ट कंपुची मोनोपॉली आहे म्हणतात. खरं खोटं कंपुदेवास ठाउक ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 9:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नक्की लिहा. अच्रत मेल्यांच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही लिहिलं नाहीत तर आम्हालाही प्रतिसादामधे काही लिहायची पेर्णा मिळणार नाही मग.

जेपी's picture

13 Apr 2015 - 7:24 pm | जेपी

मेलो =)))

अश्विनि कोल्हे's picture

13 Apr 2015 - 7:31 pm | अश्विनि कोल्हे

माझं मराठी शुद्धच आहे.ज्याने त्याने आपली मराठी पहावी किती शुद्ध आहे ती.

पॉइंट ब्लँक's picture

13 Apr 2015 - 7:38 pm | पॉइंट ब्लँक

असो! एक शंका, तुमचं खरं नाव दिपिका पादुकोन आहे का हो?
बाकी खरं उत्तर द्यायचं का नाही हा "युवर चॉईस" !

काकू तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो. मराठीत बायका खचली, जेवली, आली असं म्हणतात ते नेहमी तृतीयपुरुषी असतं. स्वत:बद्दल बोलताना नेहमी खचले, जेवले, आले असं म्हटलं जातं. खरडफळ्यावर एक 'उडवल्या जाईल' झालं आहे तेवढं पुरे!

संदीप डांगे's picture

13 Apr 2015 - 7:47 pm | संदीप डांगे

@सूडभौ, ताई आमच्या इदर्भातल्या हायेत भौतेक.

@कोल्हेताईस, तुमी आपल्या मात्रुभाशेत लिहा कायतरी... ते अजुन जास्त चांगलं असेल...

काळा पहाड's picture

13 Apr 2015 - 11:19 pm | काळा पहाड

तुम्हाला तृतीयस्त्री म्हणायचंय का? नसेल तरीही म्हणा. नाहीतर कोल्हेबाई मोर्चा आणतात बघा तुमच्या घरावर.

व्याकरणातलं पण बदलायचं असेल तर त्यांची इच्छा!!

अर्धवटराव's picture

14 Apr 2015 - 12:05 am | अर्धवटराव

मराठीत बायका खचली, जेवली, आली असं म्हणतात ते नेहमी तृतीयपुरुषी असतं. स्वत:बद्दल बोलताना नेहमी खचले, जेवले, आले असं म्हटलं जातं.

विदर्भात खचली, जेवली, आलि, असच ऐकलय. तिथे जर खचले, जेवले वगैरे म्हटलं तर "काय भैताड बाई आए बे" वगैरे टोमणे ऐकावे लागतात.

जेपी's picture

13 Apr 2015 - 7:35 pm | जेपी

टिपीकल कंपुबाजाचा धागा झाला आहे.

या निमित्ताने येथे स्वतःला खरड करायचा अधिकार मिळालाच पायजे अशी मागणी श्री जेपीभौ तरूण मंडळातर्फे करण्यात येत आहे.

सस्नेह's picture

13 Apr 2015 - 9:19 pm | सस्नेह

मघाशी मेला होतास ना ? आता कसा आलास मेल्या ?

जयराज's picture

13 Apr 2015 - 9:37 pm | जयराज

हिहिहि....

टवाळ कार्टा's picture

13 Apr 2015 - 7:45 pm | टवाळ कार्टा

थांबा मी आलोच...१०० च्या तयारीला लागा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा

=)) टकाटक
ठेविली कढई ,झारा केला वर
ठेविली कढई ,झारा केला वर
.
.
.
टक्या आता तांब्या तू गच्च धर! :-D

ठेविली कढई ,झारा केला वर
ठेविली कढई ,झारा केला वर
.
.
.
टक्या आता तांब्या तू गच्च धर! :-D

गुरुने शिष्याच्या नावे घेतलेला पहिलावहिला आंतरजालीय उखाणा!! =))))

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

सुडुक कुजकं हडुक! -_- (ˇˍˇ) (︶︿︶)

पियुशा's picture

13 Apr 2015 - 8:55 pm | पियुशा

@ आत्मुस कक्का मिपावर स्मैल्या नाहीत तर तुम्हाला फारच सुन सुन वाटत् असेल नै? सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या टैप :प

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2015 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा

जिल्बुचा आली फिरून
स्मायल्या-निघाल्या भरुन! ;-)