एका लेखाला एवढे प्रतिसाद !!! रेकॉर्ड ब्रेक झालं की
पूणे तिथे काय उणे हे मात्र इथेही दिसून आलं.
कोणी कितीही पुण्याला नावे ठेवली तरी पुणे हे एकमेवाद्वितीय शहर आहे ह्यात वाद्च नाही.
मुंबईपेक्षा पुणे बरं म्हणणारे माझ्या ओळखीतले अनेक अ-पुणेकर पुण्यात स्थायिक झालेले आहेत... ते काय उगाच नाही
बाकी चालू देत्...मजा येतेय वाचायला.
विरंगुळ्यासाठी 'पुण्याचा चेहरा जपणारी' ही काही चित्रे ---
विद्येचे माहेरघर - पुणे विद्यापीठ
शनिवारवाडा
सिंहगड
वैशाली
दगडूशेठ हलवाई ट्र्स्ट गणपती (मंड्प)
मार्झोरिन
दहशतवादी ? तरूणी
वेलदोडेराव,
हा दगडूशेठचा फोटो कुठून आणलात हो? "याचे फोटो काढायचे नाहीत, काढलेत तर फिल्म जप्त करू" अशी धमकी मला मागच्या वर्षी मिळाली होती. तो डिगीटल क्यामेरा होता हे त्या रखवालदाराला कळलं नाही ही गोष्ट वेगळी!
यमी ताई,
प्रत्यक्ष मंदिरात गणपतीचा फोटो काढता येणार नाही...तशी सक्त मनाई आहे. हा फोटो गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळाच्या रथाचा आहे. लक्ष्मी रोड वरील एका उंच बिल्डींग मधुन काढला आहे. अर्थात मी नव्हे...मित्राने शेअर केलाय तो इथे डकवलाय.
छान चर्चा चालू आहे. निरीक्षणे वाचून मजा वाटली पण सर्व काही पटली नाहीत.
१) संदिप ने ह्याचे स्पष्टीकरण दिलेच आहे
२)टू व्हिलर ला पुण्यात गाडी म्हणतात हे निरीक्षण बरोबर आहे. पण ती दोनचाकी गाडीच नाही का? सायकलला मात्र गाडी म्हणतात हे तुमच्याकडूनच ऐकले (अर्थात वाचले). इथे अमेरिका मध्ये तर सायकल ला बाईक हा शब्द वापरतात.
माझ्या मते प्रत्येक शहराची खास एक भाषा असते. ऐकणार्याला त्या भाषेची गंमत वाटणे साहजिक आहे पण ती टर उडवण्याइतपत नक्कीच हास्यास्पद नसते.
३)हे पु़ण्यातच काय पण इतरही छोट्या शहरात मी पाहिले आहे.
४) पुण्यात असताना मी स्वतः पॅटिस आठवड्यातील कोणत्याही दिवशी खायचे.
५)आमची कोठेही शाखा नाही ..ही परिस्थिती आता बदलली आहे. गाडगीळ सराफ , अष्टेकर सराफ , चितळे बंधू , कासट (साडीवाले) ....बरीच नावे सांगता येतील
६)हे निरीक्षण बरोबर आहे ...पण ही परिस्थिती आता (पुण्यात) सर्वत्र नाही.
७) अप्पा बळवंत मध्ये ही दुकाने खूप पूर्वीपासून आहेत. उलट इथे भरपूर दुकाने असल्याने निवडीला अनेक पर्याय सहज उपलब्ध होतात. आणि मॉल सारखे पॉश नसले तरी खरेदीला मजा येते. हल्ली नव्याने झालेली क्रॉसवर्ड सारखी दुकाने ही चांगली चालतात की.
८)प्रदूषणा पासून संरक्षण ...पण मुलीच नाही तर हल्ली मुले पण नाक तोंड झाकले जाईल असा त्रिकोणी आकारात मोठा हातरूमाल बांधतात(हेल्मेट नसेल तर). पुण्यात प्रदूषण वाढलय हे मात्र खरय.
९)हे काही मी कधी अनुभवले नाही..तुम्ही निरीक्षण केलय ..असेलही तसं
१०)हम्म्...हे बरोबर. तुमच्या यादीत अजून एक भर्...अरोरा टॉवर
११) मी स्वतः म्हणत नाही पण क्वचित कधीतरी इतरांच्या तोंडून ऐकलय खरं.
प्रत्येक शहर वासियांची खास एक ओळख असते तशी ती पुण्याची पण आहे. अस्सल पुणेकरांना पुण्याचा जाज्वल्ल्य अभिमान कायम रहाणारच.
ईश्वरी
अस्सल पुणेकरांना पुण्याचा जाज्वल्ल्य अभिमान कायम रहाणारच.
तसेच दुसर्यांना पण त्यांच्या गावाचा असणार हे लक्षात घेतले पाहिजे. आपले चांगले म्हणताना दुसर्याना हिणवु नये(वर काहि प्रतिसादात मागास भाग, गडचिरोलि ई. म्हटले आहे)
अहो, मराठी माणूस, कोणत्या पुणेकराने इथे दुसर्यांना हिणवले आहे? पुणेकर स्वतः होऊन हे असले गुर्हाळ सुरु करत नाहीत, पण इतर शहरचे/ गावचेच करतात अन् एका मर्यादेनंतर पुणेकरांना बोलणे भाग पडतेच!!
इथेही हा धागा पुणेकराने सुरु केलेला नाही हे लक्षात घ्या म्हणजे झाले ... डॉ. साहेब मूळचे पुण्याचे नाहीत
आरे मराठी माणसा जरा वाच !!
विषय काय होता?
तो कुठे नेला ,
कुणी नेला...
आपल हे चांगल आहे .....
काहीही झाल की पुणे आहेच ....
असो ...
परत एक्द सगळा टॉपीक वाचा म्हणजे कल्पना येइन .....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
आता मला आयडी बदलून 'काडी मास्तर' असा केला पाहिजे! कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेत बसल्यासारखे वाटले. मजा आली.
मु॑बई आणि पुणे ह्यात उच्च-नीच ठरविणे म्हणजे लता श्रेष्ठ की आशा कि॑वा रफी थोर की किशोर असे विचारण्यासारखे होईल.
दोन्ही शहरात काही गोष्टी चा॑गल्या आहेत आणि काही वाईट! पण मुळात माझा उद्देश दोन्हीत तुलना करण्याचा नसून पुण्यातल्या वैशिष्ठ्यपूर्ण व ग॑मतीदार गोष्टी लिहिणे हा होता. साक्षात भाईकाका॑नीदेखील ह्या दोन्ही थोर शहरातल्या गमती-जमती लिहिल्या आहेतच. त्या सुप्रसिद्ध लेखात नसलेल्या व आत्ता अनुभवास येणार्या मजेशीर अनुभवा॑चे स॑कलन असा मूळ उद्देश आहे.
भाईकाका॑नीदेखील ह्या दोन्ही थोर शहरातल्या गमती-जमती लिहिल्या आहेतच.
भाई काका हे मुळचे पुणेकर नव्हते. ते पार्ल्याचे म्हणजे मुम्बैकर होते.
पुणेकर स्वतः होऊन हे असले गुर्हाळ सुरु करत नाहीत, पण इतर शहरचे/ गावचेच करतात
हेच खरे
:::::::पार्लेकर विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
ही चर्चा (वाद?) पुणेरी पुणेकरांच्या सवयी/ वैशिष्टे यांबद्दल होती ना :?
मग यात अ-पुणेकरांनी लुडबुड का करावी?
अन् करायची असलीच तरी लुडबुड करणार्या जवळपास सर्व प्रवेशिका मुंबईतुनच का याव्यात?
याचा अर्थ बाकी महाराष्ट्राने पुण्याचे श्रेष्ठत्व मान्य केले वाट्टं ;)
असो, मुंबईच्या छत्रछायेत असणार्या ठाणे,कल्याण अन् डोंबिवलीत खडीवाले वैद्यांचा पाचक काढ्याचा खप वाढल्याच्या बातम्या येत आहेत!
अभिनंदन पुणेकरहो!
(पुणेकर) टिंग्या!
मी पुण्याचा नाही पण पुण्यात जवळ जवळ २ वर्षे होतो. मला पुणे शहर अतिशय आवडलं... पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक. मला पुण्याविषयी काहिच तक्रार नाही. थोडीफार तक्रार आहे ती पुण्याच्या लोकांबद्दल. आणि सगळ्याच लोकांबद्दल नाहि बोलत मी. इथल्या बर्याच लोकांचा बाहेरुन आलेल्या लेकांकडे बघण्याचा दृष्टीकोण नाही आवडला मला. आपण आणि आपली मराठी बाहेरुन आलेल्या लोकांपेक्षा कशी श्रेष्ठ हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास का असतो हे मला न समजलेले कोडे आहे. आणि पुण्याबाहेरुन आलेले लोक पुणे खराब करताहेत हे म्हणणे कितपत योग्य? ज्या लोकांना यवतमाळ हा जिल्हा कि तालुका हे माहित नाही, चंद्रपुर मधे आदिवासी राहतात हि ज्यांची समजूत, अमरावती म्हणजे आंध्रप्रदेशाच्या सीमेवर का असं विचारणे आणि मुख्य म्हणजे पुण्या बाहेरचे (मुंम्बई सोडून) सगळे मागास आहेत असे समजणे हि सगळी पुण्याच्या लोकांची "कुपमंडूक" असण्याची लक्षणे आहेत असे समजावे का? जर आपण ज्या राज्यात राहतो त्याबदलच (पश्चिम महाराष्ट्र सोडून) आपल्याला माहिती नसेल तर मग फक्तं जन्माने पुणेरी असलेल्यांना एवढा जाज्वल्य अभिमान का असावा? हा अभिमान संपूर्ण राज्याबद्दल असायला नको का? तुम्ही मारे बारा देशाचं पाणी प्यायला असाल हो, पण आपल्याच राज्यातल्या लोकांना दोन्-दोन दिवस (नळाच्या) पाण्याची वाट पहायला लागते त्याचं काय? कि आपल्या शहरात तर पाण्याची कमतरता नाही, विज-वितरण अगदि सुरळीत आहे (बाकी ठिकाणी १२ -१६तास लोड शेडींग) हे बघुन आपला अभिमान अजून वृद्धिंगत होतो? मला लेखकाने नमुद केलेल्या मुद्यांबद्दल काहिच तक्रार नाहिये, ठिकाणाप्रमाणे व्यक्तींच्या प्रकृती बदलत जातातच, पण हि जी चर्चा चाललेली आहे ती भलतीकडेच म्हणजे आपण किती श्रेष्ठ हे दाखवण्याकडे घसरलीय.
आणि राहता राहिला पुणे श्रेष्ठ असल्याचा प्रश्न तर ते कुणीही मान्य करेल, फक्त तुमच्या पुणेरी लोकांचा इतर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय तो बदला!
(विदर्भातला) अनामिक.
अवांतर - पुणेरी नसल्याने लिहिताना व्याकरणाच्या चुका झाल्यात त्याकडे दुर्लक्ष करा.
मला पुणे शहर अतिशय आवडलं... पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक.
थ्यांक्स .. तुमच्या सारखी *** या मुंबैकरांची असती तर वादच नव्हता :)
इथल्या बर्याच लोकांचा बाहेरुन आलेल्या लेकांकडे बघण्याचा दृष्टीकोण नाही आवडला मला.
बरं बरं. माझे इतके ओ.एम.एस.मित्र आहेत(महारष्ट्रीयन्स सोडाच) माझं तर सगळ्यांशीच चांगल वर्तन आहे. हा .. आता पुण्यात राहुन कोणी पुण्याला नाव ठेवायला लागला, तर मात्र त्याच्या शाब्दिक मुस्काटात बसनार हे नक्की.
आपण आणि आपली मराठी बाहेरुन आलेल्या लोकांपेक्षा कशी श्रेष्ठ हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास का असतो
अर्रे वा ! पुण्यात २ वर्षे राहुन भाषा सुधारली की हो तुमची. :)
पुण्याबाहेरुन आलेले लोक पुणे खराब करताहेत हे म्हणणे कितपत योग्य?
पूण्यातच राहून खाऊन पिउन, पूण्यालाच नावं ठेवणं किती योग्य आहे ?
हा अभिमान संपूर्ण राज्याबद्दल असायला नको का?
आता नवा वाद नका काढु, पोळून घ्याल. आमच्या मराठी अभिमानावर प्रश्नचिन्ह ?
तुम्ही मारे बारा देशाचं पाणी प्यायला असाल हो, पण आपल्याच राज्यातल्या लोकांना दोन्-दोन दिवस (नळाच्या) पाण्याची वाट पहायला लागते त्याचं काय?
त्याची आम्हाला मनापासून कळकळ वाटते, पण निसर्गाच्या इच्छेपुढे काय करणार आम्ही पुणेकर ? आणि काहो ? आम्ही पण २ किलोमिटर जाऊन डोक्यावर रहाटाचं क्षारयुक्त पाणी पिलो आहे, आणि जिद्दीने प्रगती केली. आता काय प्रगती करू नये असं म्हणत असाल तर मात्र सॉरी बाबा.. काळ आणि पुणेकर कोणासाठी थांबत नाही.
तुमच्या पुणेरी लोकांचा इतर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय तो बदला!
पूण्यात राहून किंवा न राहून , पुण्यातलं उनं काढण्याचा दृष्टीकोण बदला हो
जळणार्या लाकडांना जरा थंडाई घ्या... इथे कोणी पुणेकराने हा वाद सुरू केला नाही.. जरा पुर्ण प्रतिसादांचा अभ्यास करून बोला हो ! कोणी पुणे का श्रेष्ठ असा सवाल केला म्हणून उत्तरादाखल दाखले दिले आहेत. आता एक रेष मोठी कशी दाखवाल असं विचारलं तर तिच्या शेजारी छोटी रेष मारावीच लागते.
असो , पुण्यात माझ्याच क्लास मधे २००+ मुले पुण्या बाहेरची होती, सगळेच्या सगळेच पुण्याच कौतुक करता थकत नाहीत. त्यांचं इथेच (आमच्या पुण्यात) व्हायचं पक्क होतं... पहा महिमा आमच्या पुण्याचा...
रहाटाचं क्षारयुक्त ते पेप्सिकोचं मिनरल पाणी पिलेला राष्ट्राभिमानी पुणेकर
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातातत्त्त
बरं बरं. माझे इतके ओ.एम.एस.मित्र आहेत(महारष्ट्रीयन्स सोडाच) माझं तर सगळ्यांशीच चांगल वर्तन आहे. हा .. आता पुण्यात राहुन कोणी पुण्याला नाव ठेवायला लागला, तर मात्र त्याच्या शाब्दिक मुस्काटात बसनार हे नक्की.
तुमच्यासारखे वर्तन करण्याची बुद्धी देव सगळ्यांना देओ! (देवा कितीवेळा सांगायला लावतोयेस कि मी पुण्याला नावे ठेवतच नाहिये, नपेक्षा मला हे शहर फार आवडतं!) म्हणजे मग माझी किंवा इतरांची काहिच तक्रार राहणार नाही.
अर्रे वा ! पुण्यात २ वर्षे राहुन भाषा सुधारली की हो तुमची.
हा हा हा.....म्हणतात ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला....... :)
पूण्यातच राहून खाऊन पिउन, पूण्यालाच नावं ठेवणं किती योग्य आहे ?
अजीबात योग्य नाही. पण भाजीत मीठ कमी असलं तर सांगता कि नाही आईला? आणि तुम्हीच म्हणताय तुमचे मित्र पुण्याच कौतुक करता थकत नाहीत. जसं वागाल तसाच प्रतिसाद मिळेल. आम्हालापण पुण्याबद्दल तक्रार नाहिच. मला जी तक्रार होती/आहे ती मी सांगीतली आणि त्यावर फक्त शाब्दिक मुस्काटातच बसतेय.
आमच्या मराठी अभिमानावर प्रश्नचिन्ह ?
नाही, मराठी अभिमानावर शंका घेतलेली नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या किती लोकांना लातूर, परभणी, नांदेड, पुसद, यवतमाळ, वाशिम, चंद्रपुर, गडचिरोली, अकोला, अमरावती भागांबद्दल माहिती आहे?
काळ आणि पुणेकर कोणासाठी थांबत नाही
मला वाट्टं कि "काळ आणि मुंबई कोणासाठी थांबत नाही" असं बोललं जातं. तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला वापरलं हरकत नाही.
पूण्यात राहून किंवा न राहून , पुण्यातलं उनं काढण्याचा दृष्टीकोण बदला हो
मी पहिलेच म्हंटलय "पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक" आणि पुणेकर पण मान्य करतातच नं हे. म्हणजे इथे जसे चांगले आहे तसेच वाईटही आहेच. अन तसं असूनही मला पुणं आवडतच!
तुम्हाला उगाचच मझी जळजळ होतेय असं वाट्टंय. मला इनो किंवा थंडाईची गरज नाहिये, पण तुम्हीच (तुमच्या पैकी कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे) खिंड लढवून थकला असाल तर ग्लुकॉन डी घ्या :) !!
पुण्यावर मनापासून प्रेम करणारा
अनामिक.
अनामिक, कुणीही पुणेकर किंवा टु बी स्पेसिफिक मी तरी कधीच अपुणेकरांना नावं 'उगीच' ठेवत नाही. माझ्या सर्व कॉलेज मैत्रीणी नॉन पुणेकर होत्या. त्यांच्याशी माझं अजुनही मस्त जमतं.. का जमतं, कारण त्या इथे आल्या, शिकायला.. शिकल्या.. आता नोकरी करतात, पुणे त्यांना मनापासून आवडतं.. पुणेकर नसून पुण्यावर त्यांच माझ्याइतकंच प्रेम आहे. असं जर असेल तर मी का नावं ठेवावीत त्यांना.. पण तेच माझ्या दुसर्या मैत्रीणीचे वडील, त्यांच्या लग्नापासून इथे राहतात पुण्यात (पंजाबी आहेत..) आणि तेव्हापासून आज पर्यंत २५ वर्षं पुण्याला शिव्याच घालतात.. मराठी शिकले नाहीत. मला का त्यांचा राग येऊ नये? तुम्ही जिथे राहता, जी तुमची कर्मभूमी आहे तिचा तुम्ही आदर केलाच पाहीजे,प्रेम अगदी नाही म्हणत मी, पण पुण्यातच राहून पुण्यालाच शिव्या घालण्याचे काय प्रयोजन? मला अश्या लोकांचा राग येतो .. सरसकट अपुणेकर नव्हे. आणि बहुतांश पुणेकर असाच विचार करत असावेत. काही असतात नग,जे सर्वच ठीकाणी असतात. उडदामाजी काळे गोरे.
आणि हो हे भाषेचे मात्र खरे आहे. आय ऍड्मिट , मला कुणी स.पे.स्टाईल मराठी बोलत नसलं तर ऑड वाटतं.. मी फटकळपणे सुधारायला नही जात. पण जमेल तेव्हा मी म्हणते ते उच्चार सांगते. तसं बोलायचं की नाही हा समोरच्याचा प्रश्न असतो,मी त्याचा आदर नेहेमीच करते. सगळेच कदाचित तसे करत नसतील.. मान्य.. पण हे बदलेल असंही वाटत नाही.. मात्र पहीला मुद्दा मला नाही पटला...
बाकी चर्चेबद्द्ल मी काही बोलतच नाही. काही लोकांना पुण्याबद्दल उगीच जळजळ असते हे मात्र अगदी खरं.. दिसलीच या चर्चेत.. असो.. प्रत्येकाची मतं असतात.पण उगीचच अती खुसपट काढणे आणि पुण्यात राहून पुण्याला शिव्या देत असलात, तर तुम्ही तुमच्या आवडणार्या गावात जा ना.. अवश्य जा!! :)
भाग्यश्री,
मी पण पुण्याला नावे ठेवतच नाहिये, मला स्वत:ला पुणे हे मनापासून आवडते आणि मी ते पहिलेच स्पष्ट केलयं. माझेसुद्धा पुणेरी मित्र आहेतच. आणि मी सगळ्या पुणेरी लोकांबद्दल नाहि बोलत आहे. पण बर्याच पुणेकरांचा दृष्टीकोण मला नाही आवडला. आता ते माझं वय्यक्तिक मत असू शकतं. पण जे वाटलं ते लिहिलं. याच चर्चेमधे उपहासाने गडचिरोलीला मागास म्हणून संबोधलय. मी तरी तिथे कधी गेलो नाहिये, पण ते काहि अगदिच मागसलेलं नाहिये. आणि घरातही अडगळीची खोली असतेच कि. त्यामुळेच तर बाकिच्या खोल्या साफ आणि सुंदर राहतात. आता पुणे होतं /आहे प्रगत आणि त्याला किंवा बाकि शहरांना अजून प्रगत बनवताना सो कॉल्ड मागास भागांकडे दुर्लक्ष होतं. म्हणून त्यांना कमी का लेखावं? तू स्वतः कुणाला कमी लेखत नसशील, पण असेही नग आहेत कि जे फक्त पुणेरी मित्रच पसंत करतात, अगदि अमेरिकेत आल्यावर सुद्धा! परत ते माझं वय्यक्तिक मत असू शकतं. पण वाटलं म्हणून लिहिलं. राग नसावा.
आणि जे तुला अशुद्ध वाटतं ति त्या त्या भागातली बोली भाषा असू शकते. उच्चारा बद्दल बोलत नाहिये मी. शिवाजीतला जी जहाजातल्या ज प्रमाणे उच्चारला तर मला पण आवडणार नाही. पण "तो मधेच बोलला" च्या ऐवजी "तो मधातच बोलला" हे म्हणजे बोली भाषेचा परिणाम.
(पुण्यावर मनापासून प्रेम करणारा) अनामिक.
अनामिक मी तो प्रतिसाद पर्सनली तुम्हाला नाही लिहीला.. जनरलाईज्ड होतं स्टेटमेंट.. आणि हो, पुणं भारी म्हणून बाकीचं मागास मी कधीच म्हणणार नाही.. पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत.. असो.. मी लिहीण्याच्या नादात जे मनात येईल ते लिहीलं.. तुम्हाल उद्देशून नव्हते..
आणि हो, बोलीभाषेबद्द्ल मी पूर्ण सहमत. मला ऑड वाटतं, कारण मी ती भाषा कधीच ऐकलेली नसते. म्हणून मला खटकतं, याचा अर्थ तो उच्चार्,तो शब्द चूक आहे असेही नाही..
खादाड बोका - तू नागपुरचा का?
आणि हो या म्हणाव सगंळ्यांना एकवेळ नागपुरला वेळ कढून... मस्तं तट्टे-गिट्टे लाउ, संत्रे खाऊ... काय म्हणता अ-नागपुरकर?
(नागपुरवर मनापासुन प्रेम करनारा) अनामिक.
अनामिका,
अति जळ्जळ चांगली नाही बरं का? इनो घ्याच आता. :)
चर्चा पुणेकरांच्या पुणेरी पणाबद्द्ल चालू आहे (की होती ? ;) ) आणि त्यात पुण्याला उठसूट नावे ठेवू नये हे पुणेकरांचे म्हणणे आहे. ह्यात आता विषयांतर नको. तुमच्या नागपूरला कोणीही नावे ठेवलेली नाहीत. आणि पुणे छान की नागपूर छान असाही वाद इथे चालू नाही. तुम्हाला नागपूर ची वैशिष्ट्ये सांगायची असतील तर दुसरा धागा सुरू करा ना.
मि. पक्या,
मला जळ्जळ होतच नाहिये .... आणि मी पुण्याला नावेपण ठेवली नाहित. मला जे अनुभव आले, जे वाटलं ते लिहिलय. आणि मी नागपुर कसं छान हे सांगायचा प्रयत्नहि करत नाहिये. खादाड बोक्याच्या प्रतिक्रियेवर पुलंचं एक वाक्य आठवलं म्हाणून सहज लिहिलं. त्यात वाईट हेतू नव्हताच. कदाचित हे आपल्या ध्यानात आलेले दिसत नाही.
इनोची गरज नसलेला - अनामिक.
सगंळ्यांना एकवेळ नागपुरला वेळ कढून... मस्तं तट्टे-गिट्टे लाउ, संत्रे खाऊ... काय म्हणता अ-नागपुरकर?
नक्कीच .. पुण्याचा खवय्या सगळी कडचे आस्वाद घेतो (पण तिथलंच खाऊन तिथल्या त्या बाबीला नावे कधीच ठेवत नाही...
"सगळीकडे ऊणे....हेच काय आपले पुणे"?
आयला या बोक्याच्या घश्यात कोणीतरी इनो ओता हो ...काय खाल्लय काय माहीत.
दंतकथा: पूण्यात खाऊन पैसे न देता पळून जाऊन त्या खाऊलाच नावें ठेवल्यावर फार जळजळ होते म्हणे..
सात समुद्र पार केलेला पूणेरी बेडूक
टारझन
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
नक्कीच .. पुण्याचा खवय्या सगळी कडचे आस्वाद घेतो (पण तिथलंच खाऊन तिथल्या त्या बाबीला नावे कधीच ठेवत नाही...
पुण्याचेच का सगळेच खवय्ये सगळीकडचा आस्वाद घेतात. त्यात नवल ते काय. आणि मी तरी पुण्याला नावे ठेवलेली नाहित. माझी पसंती मी पहिल्याच प्रतिसादात दिलेली आहे. माझा प्रश्न वेगळाच होता. आणि त्यावर प्रतिसाद देण्याऐवजी मलाच जळ्जळ होतेय हा निष्कर्ष काढल्या गेला. (भाग्यश्रीने प्रतिसाद दिला त्या बद्दल तिचे आभार)
अहो अनामिक ब्वॉ .. तुमचं मराठी वाचन पण सुधारावं लागेल का आता ? मी ते बोक्याला म्हंटलेलं आहे.
वाद हा चालु झाला कारण आम्ही पुणेकरांनी आमच्या पुण्याचं कौतुक केलं आणि वरच्या दंतकथेतल्या कथानायकांना ते सहन झालं नाही म्हणून
आणि तुमच्या प्रश्नांना मी पान-३ वर उत्तर दिले आहे.
कळावे लोभ नसावा
या नागपूरकर, तुमचीच कमी होती.. भाईकाकांना मानलं.. लेख लिहायला फक्त पुणेकर ,मुंबईकर आणि नागपूरकर घेतले.. इथेही तेव्हढ्याच 'करांना' इंटरेस्ट दिसतोय..! :D
येस्...बरोबर बोललीस भाग्यश्री. पुणं इत़कं असहय होत असेल तर कशाला रहाता पुण्यात? (पुण्यात राहून पुण्याला उठ्सूट नावे ठेवणार्यांना म्हणतोय)
इथ एक गोष्ट मात्र लक्षात आली...पुण्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आहेत आणि ज्या वाईट आहेत त्या आहेत हे पुणेकर मान्य करतच आहेत. पण
आमचं पुणं छान ,पुणे महान, पुण्याचा जाज्वल्य अभिमान असं पुणेकरांनी म्हणता क्षणी ह्या अ-पुणेकरांच्या कपाळाला आठ्या चढतात. स्वतःच्या शहराबद्द्ल अभिमान असणं ही काय चुकीची गोष्ट आहे काय? माझं आत्या कडे नगर ला (अहमदनगर) बरेचदा जाणं व्हायचं . त्यावेळी तिथले लोक (नगर पुण्यापेक्षा छोटं आणि पुण्याएवढं प्रगत नसलं तरी) आमचं नगरच तुमच्या पुण्यापेक्षा कसं चांगलं हे मला ऐकवायचे.
'स्वतःचा तो देशाभिमान आणि दुसर्याचा तो देशद्रोह ' ह्या उक्तीप्रमाणे काही अ-पुणेकर पुण्याला नावे ठेवत आहेत.
ज्या वाईट आहेत त्या आहेत हे पुणेकर मान्य करतच आहेत !!!!!!!!! :O
कुठे दिसले नाही कबूल केल्याचे.. गिरे तो भी हमारी टांग उपर असेच दिसले मला. आणि मला वाटते ह्याच गोष्टीवरून सगळे पुण्याला नावे ठेवतायत.
बाकी मला पण पुणे आवडले नाही बॉ अजिबात. २च दिवसात इतका वैतागलो मी पुण्याला की मी क्लास ला ३ आठवडे अप डाऊन केले.
१० रिक्षावाल्यांना विचारले की एखादा मेहेरबानी केल्यासारखा घेउन जाणार. आणि रोज त्याच अंतरासाठी कधी रु. १८ तर कधी रू. ४०. आणि सुट्टे पैसे नसायचेच बहुतेक वेळा त्यांच्याकडे. मग आपल्यावरच गुरकावणार. जाऊ देत.
मुंबईकर स्वतःच गर्दी वर आणि इतर वाईट गोष्टींवर बोलतो. फालतू च्या गोष्टींचा जाज्वल्य अभिमान बाळगण्यापेक्षा त्या सुधारता कशा येतील ते बघावे असे मला वाटते.
पुण्याला की मी क्लास ला ३ आठवडे अप डाऊन केले.
पहा .. पहा ... पुण्यात क्लास साठी अपडाऊन करण्याचे एवढे कष्ट का घेतले रे बाबा? पुणं आवडलं नाही तर जायचं ना दुसरी कडे ...(विद्येचे माहेरघर का ते कळालं का आता ?)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
जितके नाव ऐकले होते तितका काही चांगला नव्ह्ता क्लास पण १५००० रू भरले होते ना.. बाकी जे चांगले आहे ते आहेच रे बाबा. मी कुठे म्हणालो की सगळ्याच गोष्टी वाईट आहेत. आणि हो १ क्लास चांगला म्हणून लगेच विद्येचे माहेरघर.. हे बाकी छान!!!!!!!!!!!!!!!
वाईट गोष्टी आहेत त्यांचा जाज्वल्य अभिमान बाळगण्याच्या वृत्ती वरून सगळी चर्चा सुरू आहे.
टारु, तुला काय कलमाडीने पुणे प्रचार समीती प्रमुख बनवले आहे का?
अरे इतकी पुण्याची स्तुती करतोस आणि स्वतः तिकडे अफ्रिकेत टारझन बनुन का राहतोस मग?
तुझाच,
बैलोबा
जबरा...शतक पार करून वर अर्धशतक ही पार केलं की प्रतिसादांनी.
अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले.
पुणे तिथे काय उणे ?
>> गिरे तो भी टांग उप्पर. ....
जोशीबुवा, टांग उप्पर करायला आधी पडायला हव ना. इथे पडलयं कोण? पुणेकर तर नक्कीच नाही.
>>आम्ही मुंबईकर इथल्या भैयांबद्दलही असेच भरभरून बोलतो .
छान छान ..मुंबईकरांची ही सवय म्हणावी काय.. सतत इतरांची उणीदुणी काढण्याची ?
नागपुरकर मंडळि...इथे प्रतिक्रिया देण्या आगोदर अजून एकदा विचार करा.
मुंबईकर हे पुणेकरांकडून सपशेल मात खाउन पळून गेलेले पाहिलेच असेल,
तशीच गत तुमचीहि करून घेउ नका. हा मोलाचा सल्ला. :)
बा़की आपण सुज्ञ आहात. ;)
अभिज्ञ.
वाईट किंवा चुकिची प्रतिक्रिया दिलेलीच नाही मी. त्यमुळे मात खाण्याचा किवा कसल्याच प्रकारची गत होण्याचा प्रश्नच येत नाही!
माझा ह्या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद वाचाच.(पृष्ठ क्रमांक १)
आपण जे काहि लिहिताय त्याची कारणे मी आधिच दिलेली आहेत अन ती आपल्याला तंतोतंत लागु पडतात. ;)
अभिज्ञ.
ऐवढे प्रतिसाद होते कि तुमची वाचलेली प्रतिक्रिया डोक्यातून गेली!
विशेषत: मुंबईकर,ठाणेकर,विदर्भ,खानदेश,कोंकण, मराठवाडा ह्यातील जनतेला ह्या शहाराविषयी एक प्रकारची वेगळि
असुया असून देखील मनात खोलवर कुठेतरी ह्या शहराविषयी जिव्हाळा कायम आहे.
मी असुया या शब्दाबद्दल सहमत नाही. हो, जिव्हाळा म्हणाल तर भक्कम आहे!
अहो,आपल्या शहराविषयी,गावाविषयी प्रत्येकालाच अभिमान असतोच,परंतु भले बाकिच्या शहरांबद्दल असो वा नसो ,
मराठी जनतेला पुणे शहराविषयी "मत" हे असतेच ,हे कोडे मला काहि उलगडलेले नाहि.
अगदि बरोबर, १००% पटले.
(नारायण पेठेत, लक्ष्मी रस्त्यावर २ वर्षे वास्तव्य केलेला) अनामिक.
>> कुठे दिसले नाही कबूल केल्याचे.. गिरे तो भी हमारी टांग उपर असेच दिसले मला. आणि मला वाटते ह्याच गोष्टीवरून सगळे पुण्याला नावे ठेवतायत.
लंबूटांगजी वरील वाक्य म्हणण्या आधी खालील वाक्ये पहा --
>>पुणे-३० मधे .. "पाणी घेणार का ? " असला प्रश्न विचारायची देखील पद्धत आहे. ... इति टारझन
>>असो लेख आणी प्रतीसाद वाचुन मजा आली....
महाराष्ट्र शासनाच्या रस्ते वाहतुक नियामक मंडळाने देखील पुणेकरांची स्वभाव रचना लक्षात घेउन पुण्यातील वाहनांना
एम एच १२ असा कोड दिला असावा. पुणेकरांसारखीच पुण्यातील वाहने देखील हा "बाराचा" शिक्का घेउन मिरवताना पाहुन अंमळ मौज वाटते. हे अगदी चपखल बसते पुण्यातील चालकाना.... इति अनिल हटेला
>>पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. - इति घाटावरचे भट
>> मी एक सदाशिवपेठी पुणेकर असून सुद्धा मला हि निरक्षण वाचून मजा आली....इति एक
>> पुण्यात प्रदूषण वाढलय हे मात्र खरय, -- इति ईश्वरी
>>पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत...इति भाग्यश्री
अ-पुणेकर पुण्याला उठसूट नावे ठेवत्तात हेच यावरून दिसून येते.
>>पुणे-३० मधे .. "पाणी घेणार का ? " असला प्रश्न विचारायची देखील पद्धत आहे. ... इति टारझन हे मला कोणत्याही अंगाने कबूल केल्यासारखे वाटत नाही. मजा आली म्हणणे म्हणजे चूका मान्य करणे असा अर्थ विद्येच्या माहेरघरातील पुणेकरच काढू जाणे.
पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत...इति भाग्यश्री>>पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. - इति घाटावरचे भट
ह्या दोघांचा अपवाद. असो. कोणतेच शहर आदर्श नसते. बहुतांश पुणेकर गिरे तो भी हमारी टांग उपर म्हणतात असे म्हणायला पाहिजे होते. चू.भू.द्या घ्या
>>मजा आली म्हणणे म्हणजे चूका मान्य करणे असा अर्थ विद्येच्या माहेरघरातील पुणेकरच काढू जाणे.
चुका? कमाल आहे तुझी ,लंबूटांग ! इथे चुका मान्य कराव्यात अशा कुठल्या चुका पुणेकरांनी केल्या आहेत? आपल्या शहराविषयी अभिमान बाळगणे ही जर चूक असेल तर ते तुलाही लागू होतेच की.
आणि एखाद्या गोष्टीची मजा येते म्हणजेच ती गोष्ट पटलेली असते. नाहीतर मजा कशी येणार?
स्वगत : आता या अ-पुणेकरांनी बोलायला मुद्दे नाहीयेत म्हणुन शब्दांचा किस पाडायला आणि विषयांतर करायला सुरवात केलीये .
अरे बाबा आता शब्दांचा कीस तुच पाडतो आहेस. मी चुकून चूका लिहीले.. भावना समज ;) ..बॉस ची नजर चुकवून पटापट टंकताना जे शब्द सुचले ते वापरले (स्वगतः आता अ-पुणेकर हापिसात टाईमपास करतात असे ऐकायला तयार रहा लंब्या) ...अभिमान बाळगणे यात काहीच चूक नाही आहे ..पण ज्या काही गोष्टी वाईट आहेत त्या खेळकर पणे मान्य कराव्यात एवढीच अपेक्षा..जसे मुंबई ला प्रचंड गर्दी आहे. चालणे मुश्किल होते. पावसाळ्यात पाणी तुंबते. आणि बरेच काही. ह्या गोष्टी मुंबईकर मान्य करतोच.
आम्हा नागपुरकरांना पुणेकरां सारख्या पा... फुशारक्या माराव्या लागत नाहीत.
१. जगप्रसिद्ध संत्र्याचे शहर :-नागपुर
२. भारताचे सर्वात "हिरवे" शहर :-नागपुर
३. भारतातील सर्वात सुंदर रस्ते :-नागपुर
४. बौद्ध बांधवांची "दिक्षाभुमी":-नागपुर
५. भारताचा मध्यबिंदु " झिरो माईल" :-नागपुर
६. जगप्रसिद्ध "हल्दिराम" ची सुरवातः-नागपुर
७. भारतातील सर्वात मोठा "कार्गो प्रकल्प मिहान":-नागपुर
८. जगप्रसिद्ध "R S S" चे मुख्यालय :-नागपुर
९. महाराष्ट्राची उपराजधानी :-नागपुर
१०. "विधानसभेचे हिवाळी अधिवेशन":-नागपुर
लिस्ट ईतकी मोठी आहे की मी पुर्ण लिहीन, तर पुणेकर :O तुम्ही वाचता वाचता म्हातारे व्हाल. =)) =)) =))
नागपुरकर दिवसा स्वप्ने पाहात नाही त....
भारताचे सर्वात "हिरवे" शहर :-नागपुर
भारतातील सर्वात जास्त हिरवट म्हातारे भेटतात ती जागा पर्वती : पुणे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
>> हिरवट....
अहो पण विजूभाऊ,
खालील तात्यांचे आवाहन आणि दाढे साहेबांची नम्र विनंती वाचली नाहीत का?
आता त्यांच्या विनंतीला मान देऊन पुण्याच्या विषयावरील प्रतिसाद देणे थांबवा अन्यथा ते उडवले जातील ...बघा बॉ
>>लिस्ट ईतकी मोठी आहे की मी पुर्ण लिहीन...........
=D> छान छान
बोक्या,
नागपूर ची वैशिष्ठ्ये सांगायची आहेत ना तुला...तर मग दुसरा धागा सुरू कर ना...
तुमचं नागपूर किती छान ह्या विषयी चर्चा चालू नाहीये इथे. विषयांतर कशाला करतोस?
अशी पुण्याचीही लिस्ट तयार होईल . पण तो विषय च नाहीये इथे
प्रतिक्रिया
एका लेखाला
दगडूशेठचा फोटो
यमी
छान चर्चा
दुराग्रह
अहो, मराठी
आरे मराठी
पानिपतचे चौथे युद्ध!
भाई काका
अरेच्चा!
मी
अनामिक भौ
बरं बरं.
पुन्हा धावतं गाढव
अनामिक,
भाग्यश्री,
अनामिक मी
ऐकदा नागपुर पहा...
खादाड बोका
अनामिका,चर
मि.
जरुर मियां
नक्कीच ..
धावतं गाढव
माफ करा
या
येस्...बरोब
हेहे
ज्या वाईट
लंबुदादा
जितके नाव
टारु, तुला
अगदी मस्त !
जबरा...शतक
हिट्ट प्रतिसाद!
अ-पुणेकरां
वेलदोडा भाउ
>> गिरे तो
नागपुरकर...
वाईट किंवा
वाईट किंवा
ऐवढे
>> कुठे
>>पुणे-३०
चुका???
अरे बाबा
लोकाग्रहास्तव...
हिरवट
>>
>>लिस्ट