✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Sun, 08/17/2008 - 12:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55507 वाचन

💬 प्रतिसाद (229)

प्रतिक्रिया

आणखी एक..

प्राजु
Mon, 08/18/2008 - 06:04 नवीन
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात या पॅटिस नामक पदार्थाला फक्त (आणि फक्त) पुण्यातच पॅटिस म्हणतात इतर शहरातून याला व्हेज पफ्फ असे म्हणतात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हे पॅटीस

देवदत्त
Mon, 08/18/2008 - 23:12 नवीन
हे पॅटीस म्हणजे मुंबईतील किंवा इतर ठिकाण येथील रगडा पॅटीस मधले पॅटीस की आणखी वेगळे काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

नाही.

रेवती
Mon, 08/18/2008 - 23:42 नवीन
देवदत्त, दोन्ही वेगवेगळे आहेत, पुण्यातील पॅटीस म्हणजे बेकरीमध्ये मिळणारी खारी नावाचा जो पापुद्रे सुटलेला प्रकार असतो त्याच्या आत जर बटाट्याचे सारण भरलेले असेल तर जे काय होते ते (असे वाटते) रगडा पॅटीस मधिल पॅटीस हा उकडलेल्या बटाट्यामध्ये मसाले घालून केलेला असतो. मी पुणेकर असूनही फारतर दोन किंवा तीनवेळा पॅटीस खाल्ला आहे तोही रविवारी नाही (म्हणजे मी पुणेकर नाही की काय?). रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

आठवले

देवदत्त
Tue, 08/19/2008 - 22:49 नवीन
हं आठवले. मी पुण्याच्या ऑफिसच्या कँटीनमध्ये पाहिले होते. पण ते बहुधा वेज पफ्फच म्हणत होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

व्हेज पफ्...

प्रभाकर पेठकर
Wed, 08/20/2008 - 21:58 नवीन
'व्हेज पफ्' हेच खरे नांव आहे. 'पॅटीस' हे मुळ 'पॅटीज्' चा अपभ्रंश आहे. 'पॅटी' (एकवचन) म्हणजे 'पॅट' करून (थोपटून) बनविलेली 'टीक्की' त्याचे 'पॅटीज्' हे अनेकवचन. बटाट्याच्या आवरणात 'सारण' भरून त्याचे तोंड बंद करून थोपटून ('पॅट' करून) चपटा गोलाकार आकार दिला जातो (जसा 'रगडा-पॅटीज्' मधील 'पॅटी'ला दिला जातो.) तो 'पॅटी', ज्याला दिल्ली कडे 'टीक्की' असे म्हणतात. पण 'टीक्की' मधे सारण असावेच असा आग्रह नसतो. पुण्यातील 'पॅटीस' हे 'पॅटीज्' अजिबात नाही. ते 'व्हेज पफ्' च असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

कुणी

अनिल हटेला
Mon, 08/18/2008 - 07:57 नवीन
कुणी कितीही नाव ठेवली तरी , एक गोष्ट लक्षात घ्या ,माननीय मिपा करहो... पुणे तीथे काय उणे !!!! असो लेख आणी प्रतीसाद वाचुन मजा आली.... महाराष्ट्र शासनाच्या रस्ते वाहतुक नियामक मंडळाने देखील पुणेकरांची स्वभाव रचना लक्षात घेउन पुण्यातील वाहनांना एम एच १२ असा कोड दिला असावा. पुणेकरांसारखीच पुण्यातील वाहने देखील हा "बाराचा" शिक्का घेउन मिरवताना पाहुन अंमळ मौज वाटते. हे अगदी चपखल बसते पुण्यातील चालकाना.... एक जोक !!!! एकदा अमेरीकेत एक विमान वाईट हवामाना मुळे डोंगर द-यात भरकटते ... आणी वैमानीक कौशल्य पणाला लाउन प्रत्येक डोंगर द-यातुन आडवे तिडवे कट मारून सुखरूप विमान तळावर घेउन येतो..... त्याचा सत्कार केला जातो ,आणी हे कौशल्य कुठे आत्मसात केलस अस विचारल जात... तो सहज म्हणतो," आधी ड्रायव्हर होतो पी एम टी त !!!" आपलाच पक्का पुणेरी (उपनगरीय १२+२ = MH 14 वाला) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

स्वयंघोषित मोठेपणा

मराठी_माणूस
Mon, 08/18/2008 - 10:34 नवीन
विद्येचे माहेघर , सांस्कृतिक राजधानि , चोखंदळ रसिक ईत्यादि. अरे पण हे कोणि ठरवले ? स्वतः च ठरवयाचे , स्वतः च आवर्जुन वारंवार वापरायचे (लिहिताना, बोलताना) आणि असे दाखवायचे कि हे सगळ्याना मान्य आहे .
  • Log in or register to post comments

विद्येचे

विसोबा खेचर
Mon, 08/18/2008 - 11:29 नवीन
विद्येचे माहेघर , सांस्कृतिक राजधानि , चोखंदळ रसिक ईत्यादि. अरे पण हे कोणि ठरवले ? हा हा हा! हे बाकी अगदी खरं! :) आपला, (मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हा हा हा!

अनंत
Mon, 08/18/2008 - 13:26 नवीन
(अरे पण हे कोणि ठरवले ?) हा हा हा! १००% खरं आहे बरं का!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

ठरवायचे काय ..

मनीषा
Mon, 08/18/2008 - 13:37 नवीन
...कशाला ?आणि कोणी ? वस्तुस्थिती आहे.. बदलत नाही ती कधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

इनो की दवा लो .. जल-जल बंद करो ...

टारझन
Mon, 08/18/2008 - 14:35 नवीन
काय पण हे ? आहो कोणी एकाने नाही दिली ही पदवी .. उद्या म्हणाल टिळक स्वता:लाच लोकमान्य म्हणून घेत होते ... आणि उगाच नाय मोठे साहित्यिक पुण्यात राहिले .. आणि काय हो ? कोणी जालना,यवतमाळ, गडचिरोली ला बरं नाही म्हटलं विद्येचे माहेरघर ? तुम्ही घेता का आवर्जुन विदर्भ,मराठवाडा नाय तर आंबेडकर युनिव्हर्सिटीत ऍडमिशन ? का येतं पब्लिक ईकडून तिकडून पुण्यात ? असो .. माणूस आणि सहमत लोकांना (तात्यांना पण :) ) इनो घेण्याचा फुकटचा सल्ला ! जलो ... और जलो .. हमका बहुत मजा आता है ! हे सांगायची वेळ आली शेवटी .. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हे म्हणजे ,

मराठी_माणूस
Mon, 08/18/2008 - 15:13 नवीन
हे म्हणजे , ब्रिटिशानि "sun never sets........" म्हणायचे आणि साळसुद पणे असे सांगयचे कि हे असे सगळे जग म्हणते (अवांतरः ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज नाशिकचे, वि.स. खांडेकर सांगलि,शिरोडे,कोल्हापुर ह्या ठिकणि होते. हि यादि खुप मोठि होउ शकेल, मुद्दा एव्हढाच कि उत्तुंग व्यक्तिमत्व अन्यत्र पण होति , आहेत आणि असतिल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

असो .. माणूस

विसोबा खेचर
Mon, 08/18/2008 - 15:20 नवीन
असो .. माणूस आणि सहमत लोकांना (तात्यांना पण ) इनो घेण्याचा फुकटचा सल्ला ! आम्हाला कुणी सल्ला द्यायची गरज नाही. गरज वाटलीच तर तो आम्ही मागू! आपला, (दुनियेला फाट्यावर मारणारा मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>>>अरे पण हे

यशोधरा
Mon, 08/18/2008 - 13:33 नवीन
>>>अरे पण हे कोणि ठरवले ? ठरवायचे काय त्यात? जे आहे ते आहेच!! :)
  • Log in or register to post comments

सहमत !! सत्य

अनिल हटेला
Mon, 08/18/2008 - 13:52 नवीन
सहमत !! सत्य आहे ते !! आणी ठरवणारे आपण कुणीही नाही !! फार आधीपासुन हे सर्व मान्य आहे ... आता कुणी नाही जरी मान्य केल , काही फरक पडत नाही........... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

आता कुणी

विसोबा खेचर
Mon, 08/18/2008 - 14:00 नवीन
आता कुणी नाही जरी मान्य केल , काही फरक पडत नाही........... अरे वा! हे 'सागायची' वेळ आली का? छान छान! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

आरे पुण्या

अनिल हटेला
Mon, 08/18/2008 - 15:31 नवीन
आरे पुण्या बद्दल इतकी असुया का बुवा लोकाना ? काय समजत नाही..... असो ..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

आरे पुण्या

विसोबा खेचर
Mon, 08/18/2008 - 15:35 नवीन
आरे पुण्या बद्दल इतकी असुया का बुवा लोकाना ? असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? :) प्रचंड विनोदी प्रकार वाटला हा! :) असो, आपला, (दलालस्ट्रीटवरचा मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

असुया ?

मराठी_माणूस
Mon, 08/18/2008 - 15:39 नवीन
असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? जबरदस्त, ह. ह. पु. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

पूर्वेचं ऑक्सफर्ड! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/18/2008 - 15:41 नवीन
असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? तात्यांनू, लई भारी बोल्लात पहा. =)) मला एक समजत नाही लोकमान्य टिळक पुण्यात राहिले (कोकणात जन्माला आले) यात आजच्या पुणेकरांचं काय कर्त्तृत्व? आणि पुण्यात (एन.एच.४ वर कुठेतरी, चिंचवडच्या जवळ) लिहिलं आहे, पुणं हे "पूर्वेचं ऑक्सफर्ड" आहे. आता कोणी कोणाचा पराभव केला? ऑक्सफर्डनी पुण्याचा का "पुणेय्रां"नी पुण्याचा? आणि यावर माझे यच्चयावत मराठी, अमराठी, पुणेकर, "परप्रांतीय" मराठी, परदेशी सहकारी पोट धरून पुण्याच्या वर्णनावर हसतात. (या विश्वातल्या, कन्या सुपरक्लस्टरमधल्या, आकाशगंगेतल्या, सूर्यमालेतल्या, पृथ्वीवरच्या, आशिया खंडातल्या, भारत देशातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या, पुणे शहरातल्या, बाणेर गावातल्या, एका छोट्या घरात रहाणारी, नगण्य) यमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

(या

अनिल हटेला
Mon, 08/18/2008 - 15:53 नवीन
(या विश्वातल्या, कन्या सुपरक्लस्टरमधल्या, आकाशगंगेतल्या, सूर्यमालेतल्या, पृथ्वीवरच्या, आशिया खंडातल्या, भारत देशातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या, पुणे शहरातल्या, बाणेर गावातल्या, एका छोट्या घरात रहाणारी, नगण्य) गूड १ !!! दिसतये ते !! जी गोष्ट चांगली ,ती चांगली... जिथे चुकतये ते चुकतये हे मान्य कधी करणार आम्ही , कुणास ठाउक !! बाकी मी सुद्धा जन्माने फक्त पुण्याचा !! आणी कर्तूत्त्वा म्हणाल तर सध्या काहीच नाही ... म्हनुण मी सुद्धा तुमच्या सोबत उभाराहुन पुण्याच्या नावानी खडे फोडु शकतो.... ते जमत नाही आपल्याला .... जे आहे जस आहे तस आहे ... आणी हो हे जे तुमच लिखाण आहे ते जरा त्रयस्थ दृष्टीने वाचा मग समजेन मी अस वाक्य का बोललो "असुये विषयी" पण तीतका मोठे पणा आपल्यात नाहिये .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

पण तीतका

विसोबा खेचर
Mon, 08/18/2008 - 15:56 नवीन
पण तीतका मोठे पणा आपल्यात नाहिये .... अगदी खरं! जो काही मोठेपणा आहे तो पुणेकरांतच आहे! अगदी मान्य! ;) आपला, (तोंड दाबून हसणारा मुंबईकर!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

अगदी खरं!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/18/2008 - 16:35 नवीन
अगदी खरं! जो काही मोठेपणा आहे तो पुणेकरांतच आहे! अगदी मान्य! तात्या, ही सिक्सरच आहे ... एक नंबर! मानलं तुम्हाला! =)) काय आहे, अनिल हटेला, मी तर नगण्यच आहे, मोठेपणा दाखवणार कुठून! ;-) पुण्यातल्या विक्षिप्त सवयींचंही कसा काय लोक समर्थन करतात कोण जाणे? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

यमी आजी

अनिल हटेला
Mon, 08/18/2008 - 16:46 नवीन
यमी आजी !! कदाचीत खरही असेन तुमच !!! मोठेपणा विषयी न बोललेल च बर !! ठीक हे !! पुणे हेही इतर शहरा सारखे साधे सुधे आणी नगण्य शहर आहे !!! ओ के ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

आन्याचे

टारझन
Mon, 08/18/2008 - 17:23 नवीन
आन्याचे सर्व मुद्दे क्लास .. आमचं पुणं बेष्ट ... सगळ्या जगात ... मी बर्‍याच ठिकाणी राहीलोय . तात्याच्या मुंबईत सुद्धा ! पण नको वाटली मुंबई... हल्ली मुंबईतले लोक्स तळेगाव, लोणावळा आणि पुण्यात घर शोधतात म्हणे ... पुण्याने सगळ्यांकोच भुरळ पाडी हय .. पण मान्य करने को तात्या एवं यमी आज्जी क्यो तयार नही हय ? तात्या आणि यमी कडे सबळ मुद्दे नाहीत .. ते नुसतेच अपोज करत आहेत ... असो ... आन्या अप्पन तेरे साथ है रे -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

टारू बाळ

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/18/2008 - 17:53 नवीन
मी कधीही ठाणं किंवा मुंबई, किंवा कोणतंही शहर श्रेष्ठ आहे असं म्हटलं नाही आहे. कोणतंही शहर आयडियल होऊच शकत नाही. पण जेव्हा नावं ठेवायची वेळ येते तेव्हा मुंबईकरपण मुंबईतल्या गर्दिला नावं ठेवतो आणि लंडनचा माणूस खराब हवेबद्दल बोलतो. मी पुण्यात आहे कारण तेव्हा radio quiet zone पुण्याजवळ (नशीबाने) सापडला आणि radio astronomers ना पुणे विद्यापीठामधे जागा दिली गेली. पण याचा अर्थ पुणेरी लोक जर "पुणंच सर्वश्रेष्ठ शहर आहे" असा काढत असतील, बाहेरच्या लोकांनी दाखवलेल्या विसंगतींच चांगल्याच आहेत असं म्हणात असतील तर ते माझ्या दृष्टीनी हास्यास्पद आहे! पुण्यातली लोकं तर पेठांच्या बाहेर पुणं आहे हे पण मान्य करत नाहीत, तर लोणावळा आणि तळेगाव तर फारच लांब आहेत ... फक्त पुणे जिल्ह्यात आहेत, तालुकापण बदलतो! बाणेरला रहाते म्हटल्यावर "किती लांब" एवढंच पुणेरी लोक म्हणणार, पण त्यामुळे मला जरातरी मोकळे रस्ते, कमी प्रदूषण आणि मुख्य म्हणजे प्रवासाला लागणारा कमी वेळ या गोष्टी त्यांच्या (पुणेरी, पेठांमधल्या) डोक्यात येत नाहीत. आता लोकं "पुणेरी" गोष्टींबद्दलच बोलतात कारण, एकतर पुणेरी लोक स्वतःच रस्त्याला पडलेल्या सहा फूट खड्ड्याबद्दलही अभिमान व्यक्त करतात आणि दुसरं म्हणजे, पुणं हे एक जुनं, बय्रापैकी मराठी लोकांच्या वस्तीचं शहर आहे आणि बय्रापैकी विकसितही आहे. मुंबईमधे "भारतीय" (फक्त मराठी नाही) प्रतिबिंब दिसतं आणि नाशिक, (किंवा सातारा उदाहरणार्थ) एवढं जुनं, विकसित किंवा (दु:)अभिमानी लोकांचं शहर नाही. (तुझी वैश्विक) यमी आज्जी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

जाज्वल्यपणा तो हाच काय?

सुनील
Mon, 08/18/2008 - 19:51 नवीन
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात. हाच काय तो जाज्वल्य की काय म्हणतात तो अभिमान? बाकी वर यमी यांनी दिलेल्या सविस्तर प्रतिसादाशी १००% सहमत. (मुंबईकर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

१०१% सहमत तात्या आणि यमी.

प्रगती
Mon, 08/18/2008 - 20:38 नवीन
"असूया? आणि पुण्याबद्दल?? ही ही ही! अरे देवा, असूयेला तरी काही चॉईस असावा की नाही? " तात्या काय सिक्सर मारलात :D
  • Log in or register to post comments

कुठेशी????

अभिज्ञ
Mon, 08/18/2008 - 21:04 नवीन
काय मुंबई ,ठाणे वगैरे दंगा चाललाय रे? हे "मुंबई,ठाणे " वगैरे भाग पुण्यात कुठेशीक येतात? इथल्या पुणेकरांपैकी कोणाला माहिती आहे का? ;) (पानिपतची लढाई नक्की कुठे झाली ते माहित असणारा) अभिज्ञ. अवांतर- टार्‍या व अनिल हटेला , मस्तच किल्ला लढवलात.अभिनंदन. (सर्वच जण ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

काही मुद्दे

घाटावरचे भट
Tue, 08/19/2008 - 01:18 नवीन
१) माझ्या मते 'पुणे तेथे काय उणे' असं म्हणण्याची पद्धत पेशवाईपासून चालू आहे. कारण पुणे हे त्यावेळी मराठी साम्राज्याचं केंद्र होतं. एक समृद्ध शहर होतं. २) पुणेकरांप्रमाणेच स्वतःची वेगवेगेळी स्वभाववैशिष्ट्ये असलेले इतरही 'कर' आहेत (संदर्भः पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर बाय अवर ओन भाईकाका). त्यात फक्त पुण्याच्याच लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. ३) मुंबई देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि एक बहुभाषिक शहर आहे. त्यात मराठी लोकांना आज पूर्वीचं महत्वाचं स्थान राहिलेलं नाही. त्यामानाने पुण्यात अजून परिस्थिती बरी आहे. पुणे निदान महाराष्ट्रातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं शहर आहे हे तरी मान्य कराल की नाही? ४) 'विद्येचे माहेरघर' वगैरे गोष्टीसुद्धा स्वातंत्र्याआधीपासून चालत आलेल्या आहेत. कारण विद्यार्जनासाठी लागणार्‍या महत्वाच्या संस्था पुण्यात होत्या आणि येत गेल्या (अगदी आयुकापासून वेदपाठशालेपर्यंत). ५) पुण्यातले खत्रूड दुकानदार, लेड्बॅक वातावरण याचं एकमेव कारण म्हणजे पुण्याची आर्थिक प्रगती तितक्या वेगाने झाली नाही. पण ही उदाहरणं आजकाल कमी होतायंत. (आणि खत्रूड दुकानदारांबद्दलच म्हणायचं तर त्यातला बराचसा दोष कर्वें, लेलें, अभ्यंकर, चितळें वगैरे कोकणस्थी आडनावं लावणार्‍यांकडेच जातो....भले मग ही मंडळी स्वतःला दलाल स्ट्रीटवरची नाहीतर वॉल स्ट्रीटवरची म्हणू देत... ह. घ्या :) ) ६) पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कौतुक करायलाच हवं. केवळ नावं ठेवण्यासाठी नावं ठेवायची ह्याला काही अर्थ नाही. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

पुणेकर पेन्शनरानविषयी आणखी थोडेसे!

मुशाफिर
Mon, 08/18/2008 - 21:52 नवीन
माझी चुलत आत्या पुण्यात राष्ट्रिय रासायनिक प्रयोगशाळेत (म्हणजे मराठीत N.C.L. हो ! :)) कार्यरत होती. ती ने सान्गितलेला हा किस्सा. तीची आणि डॉ. मोहन आगाशे ह्यान्चि चान्गली ओळख आहे. पुण्यात असताना माझी आत्या जागेच्या शोधात होती. आणि याविषयी सहज बोलताना डॉ. तीला म्हणाले, "तू एक काम कर. त्या 'इतिश्री' सोसायटीत जागा बघ. तिथे बरेच पेन्शनर राहातात. ते तुझ्यावर आणि तुझ्या घरावर बारिक लक्ष ठेवतील. म्हणजे, त्यानाही दिवसभर काम मिळेल आणि तुझ्या घराचीहि देखरेख होईल. ती ही एकदम फुकटात!" :)
  • Log in or register to post comments

म्हणजे

यशोधरा
Mon, 08/18/2008 - 21:57 नवीन
म्हणजे पहा, पुण्यातले लोक कसे शेजारधर्माला जागतात ते!! :) नायतर तुमची मुंबै!! शेजारच्याचा खून झाला तरी कळत नै तुम्हाला!
  • Log in or register to post comments

अरे तात्काळ प्रतिसाद सुद्धा!! :)

मुशाफिर
Mon, 08/18/2008 - 22:23 नवीन
पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे, "पुणेकर व्ह्यायच असेल तर पुण्याविषयी जाज्व्यल्य अभिमान असायला हवा". तो हाच वाटत! ;) पण मला तर वाटल की , डॉ. आगाशे हे पुणेकरच आहेत. ;) मग त्याना ही गोष्ट का कळू नये? आता डॉ. आगशे यान्चा जाहीर निषेध वगैरे करतायत की काय समस्त पुणेकर ???? :) (मुळचा मुम्बैकर) मुशाफिर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जबरा टोला ग यशो

टारझन
Mon, 08/18/2008 - 22:35 नवीन
एक नंबर बोललीस .. अजुन एक ... मुंबैकरांकडे काही मुद्देच नाहीत, सगळी बेसलेस विधाने आहेत. आपण कधीही मुंबैच्या कोणत्याही गोष्टीला आक्षेप घेतलेला नाहीये.. पण कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात. तात्या व त्यांची मुंबैकर गँग उगाच संख्याबळाच्या जोरावर बेसलेस मुद्दे उचलून धरत आहेत. जो मुंबैकर आणि पुणेकर नाही अशांना विचारले तर कमीत कमी ५१% मत पुण्याला पडेल असा अस्मादिकांना विश्वास आहे. तात्या काहीही बोलले की बाकी स्पेक्टेटर्स नुसते बिनज्योत बुद्धु आणि शिक्सर शुमन प्रमाणे हसत आणि षटकार मारत आहेत. अरे ठोस मुद्दे मांडा ना राव. यमीचे मत तर बादच झालेले आहे. कारण तीला तर स्वर्गात सुद्धा काहीतरी त्रुटी आढळतील. पुण्याचे हे महात्म्य साक्षात भाईकाकांनी मान्य केले आहे त्यामुळे तुम्ही आम्ही त्यावर गोदङी फाडुन उपयोग नाही. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

निरीक्षण उत्तम आहे..

एक
Mon, 08/18/2008 - 22:34 नवीन
मी एक सदाशिवपेठी पुणेकर असून सुद्धा मला हि निरक्षण वाचून मजा आली.. पण साहेब इथल्या काही माकडांच्या हातात कोलित मिळालं ना... ;) जाऊ दे..पुणेकरांना माकडांची सवय आहे.. मारा शाब्दिक कोलांट्या उड्या आम्हाला मजाच येते आहे. -पक्का जाज्ज्वल्य अभिमान असलेला पुणेकर.
  • Log in or register to post comments

पटलं नाही ब्वॉ...

संदीप चित्रे
Mon, 08/18/2008 - 22:35 नवीन
डॉक्टरसाहेब ... तुमची निरीक्षणशक्ती चांगली आहे पण काही गोष्टी पटल्या नाहीत ब्वॉ आणि काही गोष्टी अज्ञानातून आल्या आहेत असे वाटले. एक अस्सल पुणेकर म्हणून काही निरीक्षणांवर मत व्यक्त करतोय -- >> १) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात मी लहान होतो तेव्हा एक 'डॉलर' नावाचे चॉकोलेट मिळायचे. गोल बंदा रूपया असतो त्या आकाराचे आणि सोनेरी कव्हर असायचे. अजूनही मिळत असेल बहुतेक. एक रूपयाचे नाणं आणि एक रूपयाची नोट ह्यातल्या फरकासाठी बोली भाषेत त्या चॉकोलेटवाल्या डॉलरचा संदर्भ वापरणं रूढ झालं ! >> २) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात. झोपडीलाही 'चंद्रमौळी' वगैरे शब्द आहेतच की ! पेशवाईचं गाव म्हटल्यावर एवढं तर होणारच :) >> ५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात. ही पाटी तर मुंबईतून पुण्यात आली .. माझ्या आठवणीप्रमाणे 'कला निकेतन' की अशाच कुठल्या तरी प्रसिद्ध दुकानाची जाहिरात होती ! >> ७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत! जुनं पुणं (पक्षी: गाव) छोटं असल्याने ठराविक भागात ठराविक वस्तू मिळतात / मिळायच्या उदा. तांबट आळी, बोहरी आळी इ. >> ८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्‍याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग?? अहो पण 'कोणासाठी' चेहरा छान ठेवतात ते आपल्याला काय माहिती ? 'ज्यांच्यासाठी' इतका चेहरा छान ठेवतात, त्यांना दिसत असेलच ना :) >> ११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात. खरंतर हा प्रकार मी मुंबईत पाहिलाय... अगदी मुंबईकर मराठी लोकांना मी हे म्हणताना ऐकलंय की मुंबई शब्दात 'बाँबे'ची शान नाही यार ! अगदी ठाण्याचा माणूस जर चर्चगेट भागात गेला असेल तर म्हणतो, "जरा बाँबेला गेलो होतो' :) (तसंच मुंबईचे लोक 'पुणे' म्हणण्याऐवजी 'पूणा' म्हणतानाही पाहिले आहेत !! )
  • Log in or register to post comments

>>आता डॉ.

यशोधरा
Mon, 08/18/2008 - 22:41 नवीन
>>आता डॉ. आगशे यान्चा जाहीर निषेध वगैरे करतायत की काय समस्त पुणेकर ???? नाय ब्वॉ!! उलट पहा बरं, त्यांनी पण कसं स्नेहीधर्माला जागून तुमच्या आत्त्याच्या लक्षात आणून दिलं की तिचा फायदा कशात आहे, त्याबाद्दल कौतुकच आहे त्यांचं :) पुण्यातली माणसंच अशी, माणूसकी जपणारी... :) अवांतरः ठराविक भागात ठराविक गोष्टी मिळणं चांगलच की!! तुमच टाईम मॅनेजमेंट का काय ते होऊन जातय आपोआप!! जे हवय ते घ्यायला सगळीकडे सैरावैरा नको धावायला!! :)
  • Log in or register to post comments

पुणेकर तुम्हि!! बोलण्यात ऐकणार काय आम्हाला? - इति अन्तू बर्वा.

मुशाफिर
Mon, 08/18/2008 - 23:17 नवीन
पु. ल. नि म्हटलय तेच पुन्हा म्हणतो ! :).... बाकि काहि म्हणा पण मुम्बई वर कितीही टिका केलीत तरी आम्हि तुम्हाला अनुमोदनच देवू. "मुम्बईचा अभिमान असायला हवा हि अट नाहि. उलट कोणि जर मुम्बईला एक भिकार म्हणत असेल तर आपण म्हणाव सात भिकार!" - तुम्हाला कोण व्हायचय? :) (जन्माने मुम्बईकर असणारा) मुशाफिर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

"मुम्बईचा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/19/2008 - 10:13 नवीन
"मुम्बईचा अभिमान असायला हवा हि अट नाहि. उलट कोणि जर मुम्बईला एक भिकार म्हणत असेल तर आपण म्हणाव सात भिकार!" - तुम्हाला कोण व्हायचय? एगजॅक्टली! आपल्या शहरातलं वाईट दाखवलं तरी यांना राग येतो! दुसय्राच्या डोळ्यातलं .....! यमी ली! (from the middle of nowhere)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

मुंबईकर....

अभिज्ञ
Mon, 08/18/2008 - 22:51 नवीन
बिचारे "कल्याण, डोंबिवली,ठाणे " कर जर स्वतःला मुंबईकर समजून घेत असतात,पण सच्चा मुंबईकर त्यांन "मुंबईकर" मानत नाहित त्याबद्दल काय? अभिज्ञ. अवांतर : आमचा आक्षेप हा "पुणे व पुणेकरांना" विनाकारण टार्गेट करून लिहिण्यावर आहे. बा़कि चालु द्यात.
  • Log in or register to post comments

अजून एक किस्सा......!

मुशाफिर
Mon, 08/18/2008 - 22:55 नवीन
"आणि खत्रूड दुकानदारांबद्दलच म्हणायचं तर त्यातला बराचसा दोष कर्वें, लेलें, अभ्यंकर, चितळें वगैरे कोकणस्थी आडनावं लावणार्‍यांकडेच जातो....ह. घ्या )" ह्यावरुन आठवलेला अजून एक किस्सा. आमचे एक नातेवाईक कोल्हापूरला असतात त्यान्च्या शेजारी राहात असलेल्या काकानी सान्गितलेला. हे शेजारी एकदा पुण्यात असताना चितळेंच्या दुकानात बाकरवडी आणायला गेले. त्या दिवशी "बाकरवडी सम्पली आहे उद्या या!" असे सान्गून त्याना परत पाठवल. त्याना २५ कि. बाकरवडी हवी असल्याने तुम्हि आगावू मागणी नोन्दवून घ्या, अशी त्यानी विनन्ती केली. तेव्हा त्याना "इथे सकाळी बाकरवडीसाठी मोठी रान्ग लागते , उद्या त्यावेळी या आणि मिळेल तेव्हढि घेवून जा!" हे उत्तर मिळाले. दुसर्या दिवशी रान्गेत उभे राहून जेव्हा ते मागणी नोन्दवू लागले तेव्हा "अहो आता बाकरवडी सम्पत आली आहे. तुम्हाला एव्हढि दिली तर इतरना मिळणार नाहि, एव्हढी कशाला हवी आहे बाकरवडी तुम्हाला एकावेळी?" अस विचारल. तेव्हा ते काका शान्तपणे म्हणाले "त्याच काय आहे? मी कोल्हपूरला असतो आणि महिन्यात एकदाच पुण्याला येतो. आमचा कुत्रा Tommy तुमच्या बाकरवड्यानशिवाय काही खात नाही हो! तेव्हा, त्याला चितळेंकडे बाकरवड्या कमी होत्या हे कस समजावणार?" त्याना २५ किलो बाकरवड्या मिळाल्या! :) (पुण्याचही पाणी चाखलेला!) मुशाफिर.
  • Log in or register to post comments

कन्यारास

टारझन
Tue, 08/19/2008 - 00:09 नवीन
अर्रे वा ! कुत्रा चितळ्यांची बाकरवडी खातो का ? वा वा वा !!! मग माणसे पेडिग्री खात असतील =)) =)) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

खात असतील ब्वा! :) ते तुम्हाला कोल्हापूरकरच सान्गू शकतील.....

मुशाफिर
Tue, 08/19/2008 - 00:21 नवीन
मुम्बैकराना विचारून काय उपयोग? :) (जगात कुठेही राहिला तरी मनाने मुम्बैकरच असलेला!) मुशाफिर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

चांगलं

भाग्यश्री
Mon, 08/18/2008 - 22:57 नवीन
चांगलं चालूय.. संदीप तुझे सगळे मुद्दे पटले.. बाकी पुण्याला उगीचच नावं ठेवणार्‍या लोकांना काय सांगायचे आता? जाऊदे, माझं पुणे इतकं मस्त आहे की अशा कॉमेंट्सनी पुण्याच्या चांगल्या गोष्टींना काहीच फरक पडत नाही.. उग्गीच विचार करून माझ्या डोक्याला ताप ! त्यापेक्षा पुण्याचा पाऊस्,सिंहगड..पुण्यात राहणारे थोर कलावंत (उदा भीमसेनजी..) त्यांनी सुरू केलेला सवाईगंधर्व, आमची युनिव्हर्सिटी,आमचे शाळा कॉलेजेस याचा विचार करते मी..... अरे हज्जार गोष्टी आहेत आमच्याकडे ज्या बाकी कोठेही नाहीएत.. एखाद्या गोष्टीचे मोठेपण तिला न देण्याचा करंटेपणा मी नाही करणार.. जे चांगलं आहे ते आहेच.. मग दुनियेला ते पटो वा न पटो !! दुनिया गेली (पुण्याच्या) खड्ड्यात !! :) B) बैलोबा चायनिजकर, आणि टारझन किल्ला छान लढवलात.. असाच पुणेरी बाणेदारपणा दाखवत चला!! :D
  • Log in or register to post comments

अरे हज्जार

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/19/2008 - 10:19 नवीन
अरे हज्जार गोष्टी आहेत आमच्याकडे ज्या बाकी कोठेही नाहीएत.. उदा: खड्ड्यांतले रस्ते, खत्रूड दुकानदार, सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव, सौजन्याचाही अभावच, पाऊस न पडणे, भुईकोट किल्ले, शेअर बाजार, उपयुक्त लोकल ट्रेन्स, यु.आय.सी.टी... इत्यादी! पण भीमसेनजींचं पुण्यातलं वास्तव्य आणि त्यांचा सवाई गंधर्व महोत्सव या दोन गोष्टींमधे या पुणेकर लोकांचं काय योगदान हे कोणी पुणेकर मला सांगाल का? किंवा पुण्याच्या भल्यासाठी तुमचं काय योगदान हे तरी, म्हणजे का भांडताय ते तरी समजेल मला! दुनिया गेली (पुण्याच्या) खड्ड्यात !! बरोबर आहे, कारण अलम दुनियेत खड्ड्यांमधले रस्ते फक्त पुण्यातच आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

>>बाकि काहि

यशोधरा
Mon, 08/18/2008 - 23:23 नवीन
>>बाकि काहि म्हणा पण मुम्बई वर कितीही टिका केलीत तरी आम्हि तुम्हाला अनुमोदनच देवू. नाय ब्वॉ!! आम्हां पुणेकरांना नाय्येत असल्या सवयी टीका करायच्या उठसूठ!! तुम्हां मुंबैकरांना आहेत वाट्ट??? :D
  • Log in or register to post comments

अहो पण आम्हि कुठे टिका करतोय?

मुशाफिर
Mon, 08/18/2008 - 23:33 नवीन
ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत. आम्ही फक्त पुण्यनगरीचे आणि तिथल्या नगरजनान्चे काही किस्से सान्गतोय इतकच! ;) (साळसूद) मुशाफिर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

>>ह्या

यशोधरा
Mon, 08/18/2008 - 23:38 नवीन
>>ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत. असं, स्वतःवरच हसायला तेवढं मोठं मन, मनाचा दिलदारपणा आणि अतिशय तरल विनोदबुद्धी लागते!! आता पुणेकरांपाशीच ती आहेच! म्हणून तर पुणे तिथे काय उणे!! :)
  • Log in or register to post comments

एकदम मान्य!

मुशाफिर
Mon, 08/18/2008 - 23:48 नवीन
>>असं, स्वतःवरच हसायला तेवढं मोठं मन, मनाचा दिलदारपणा आणि अतिशय तरल विनोदबुद्धी लागते!! आता पुणेकरांपाशीच ती आहेच! अशी विनोदबुद्धी मुम्बैकरान्कडे नाहि म्हणून तर मुम्बैकरान्च्या विक्षिप्तपणाचे किस्सेहि नाहीत! :) ह्.घ्या. अल्प (विनोद) बुद्धि असलेला मुम्बईकर मुशाफिर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

>>

अभिज्ञ
Mon, 08/18/2008 - 23:57 नवीन
>>ह्या लेखातली निरिक्षणे एका पुणेकरानेच लिहिली आहेत. गैरसमज आहे. डॉ.दाढे हे स्वतः डोंबिवलीकर आहेत, अन फक्त गेले दहा वर्षच पुण्यात आहेत. खरा पुणेकर असल्या फालतु स्वनिरिक्षणात (ह्.घ्या.) वेळ घालवत नसतो. पुण्यात काय उणे आहे ह्याचे निरिक्षण करण्याचे काम अपुणेकर मंडळिंवर सोपवून तो आपल्या कामात व्यस्त असतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा