✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम आदमी पक्षातील दुही......

न
निनाद जोशी यांनी
Tue, 03/03/2015 - 14:00  ·  लेख
लेख
आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल. आणि असे घडलेच तर दिल्लीमधील जनतेचा लोकशाही वरील विश्वास उडेल एवढे नक्की......
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23970 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

अतिशय दुर्दैवी

मराठी_माणूस
Tue, 03/03/2015 - 14:25 नवीन
अतिशय दुर्दैवी
  • Log in or register to post comments

दुर्दैवी

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/03/2015 - 14:35 नवीन
असे झाले तर दुर्दैवी म्हणावे लागेल. "बघा ,आम्ही सांगतच होतो" म्हणणार्यांची न.मो. फौज आता पुन्हा जोमाने आंतरजालावर कामाला लागणार असे ह्यांचे म्हणणे.
  • Log in or register to post comments

यादव आणि भुषण पिता पुत्र

प्रसाद१९७१
Tue, 03/03/2015 - 14:37 नवीन
यादव आणि भुषण पिता पुत्र ह्यांना आप मधुन काढले कींवा ते स्वता बाहेर गेले तर काही फरक पडत नाही. लोकांनी मते फक्त केजरीवाल ला दिली आहेत. ह्या दोघांना जर समज असेल तर ते आपले हसे करुन घेणार नाहीत.
  • Log in or register to post comments

राजकारण दिसतं तितकं सोपं नसतं

वेल्लाभट
Tue, 03/03/2015 - 14:47 नवीन
राजकारण दिसतं तितकं सोपं नसतं. केजरीवाल पुन्हा तोंडावर पडला ना; तर अख्खा देश दिल्लीवर हसेल.
  • Log in or register to post comments

हे दुर्दैवी आहे . भाजप आणि

पिंपातला उंदीर
Tue, 03/03/2015 - 15:07 नवीन
हे दुर्दैवी आहे . भाजप आणि कॉंग्रेस या दोन चोरांपेक्षा वेगळे दिसतात म्हणून लोकांनी आप ला मतदान केल होत . त्यांनी पुन्हा भाजप आणि कॉंग्रेस चा कित्ता गिरवला तर अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या हा प्रश्न उभा राहील
  • Log in or register to post comments

लोकांना पक्षात काय चालू आहे

प्रसाद१९७१
Tue, 03/03/2015 - 16:45 नवीन
लोकांना पक्षात काय चालू आहे ह्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. लोकांना काम करणारे सरकार पाहीजे. आप चे आमदार चांगले काम करत असतील तर दिल्लीच्या लोकांना त्यांच्या आपापसातल्या भांड्णांबद्दल काहीही वाटणार नाही.
भाजप आणि कॉंग्रेस या दोन चोरांपेक्षा वेगळे दिसतात म्हणून लोकांनी आप ला मतदान केल होत
केजरीवाल आणि आप सरकार जो पर्यंत चोर आहे असे लोकांना वाटत नाही तो पर्यंत काही फरक पडत नाही. लोक काँग्रेस ला त्या पक्षात भांडणे चालू आहेत म्हणुन वैतागले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे

नांदेडीअन
Tue, 03/03/2015 - 15:10 नवीन
यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पक्षातून नाही हो, पॉलिटिकल अफेअर्स कमिटीमधून. पण तसे झाले तर तेसुद्धा दुर्दैवी असेल एव्हढे मात्र नक्की. या सगळ्या घटनेवर केजरीवाल यांनी केलेले ट्विट फार आवडले मला. I am deeply hurt and pained by what is going on in the party. This is betrayal of trust that Delhi posed in us I refuse to be drawn in this ugly battle. Will concentrate only on Delhi's governance. जनता के भरोसे को किसी भी हालत में टूटने नहीं दूंगा आम्ही केजरीवाल, योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांची ‘भक्ती’ करत नाही. आम्ही आम आदमी पार्टीच्या विचारधारेचे आणि कामांचे समर्थन करतो. योगेंद्र यादव यांनी रविश कुमारला दिलेली मुलाखत पाहिली का ? तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्हाला. https://www.youtube.com/watch?v=0tNRPZFJ9o8
  • Log in or register to post comments

हि मुलखत मि नक्किच बघिन. आणि

निनाद जोशी
Tue, 03/03/2015 - 15:14 नवीन
हि मुलखत मि नक्किच बघिन. आणि पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच नाही तर अश्यांना पक्षातून काढण्याची मागणी केजरीवाल समर्थक करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

सांगणे कठीण आहे.

आनन्दा
Tue, 03/03/2015 - 15:12 नवीन
सांगणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments

बाकी आप मध्ये पक्षांतर्गत

पिंपातला उंदीर
Tue, 03/03/2015 - 15:14 नवीन
बाकी आप मध्ये पक्षांतर्गत लोकपाल आहे. हि स्वागतार्तः गोष्ट आहे . बाकी घराणेशाही आणि एकाधिर शाहीने ग्रासलेल्या आपल्या दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांनी पण याच अनुकरण केल पाहिजे
  • Log in or register to post comments

आप मधील अंतर्गत लोकापालांनी

निनाद जोशी
Tue, 03/03/2015 - 15:17 नवीन
आप मधील अंतर्गत लोकापालांनी केजरीवाल ह्यांच्याकडील अधिकारांवर बोट ठेवले होते आणि सांगितले होते हि एकाधिकार शाही होऊ लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

आप मधील अंतर्गत लोकापालांनी

नांदेडीअन
Tue, 03/03/2015 - 15:36 नवीन
आप मधील अंतर्गत लोकापालांनी केजरीवाल ह्यांच्याकडील अधिकारांवर बोट ठेवले होते आणि सांगितले होते हि एकाधिकार शाही होऊ लागली आहे.
नाही हो. उलट ऍडमिरल रामदास यांनी वेळोवेळी केजरीवाल यांची प्रशंसाच केली आहे. कालसुद्धा ते काय म्हणाले बघा. To discuss and arrive at creative and visionary decisions on redefining the role of the National Convenor of AAP; to examine whether the same person might efficiently combine both the highly demanding jobs of Chief Minister and National Convenor; and also to explore the possibility of coconvenors. Read more at: http://economictimes.indiatimes.com/articleshow/46438173.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी

आप'चे पक्षांतर्गत लोकपाल

निनाद जोशी
Tue, 03/03/2015 - 15:46 नवीन
आप'चे पक्षांतर्गत लोकपाल अॅडमिरल रामदास यांनी केजरीवाल यांच्या कार्यकक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत त्यांनी पीएसी व खुद्द केजरीवाल यांना पत्र लिहिले असून 'आप' अन्य पक्षांहून वेगळा नसल्याचा आरोप केला आहे.
हे महाराष्ट्र टाईम्स मधलं आहे http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Arvind-Kejriwal-AAP-Lokpal/articleshow/46419226.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

प्रशांत भूषण यांची मुलाखत

विकास
Wed, 03/04/2015 - 23:42 नवीन
प्रशांत भूषण यांची मुलाखत पण बघण्या/ऐकण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी

आताच पाहिला हा व्हिडीओ.

अर्धवटराव
गुरुवार, 03/05/2015 - 08:42 नवीन
धीस इज सिरीयस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

वा वा..

आनन्दा
Tue, 03/03/2015 - 18:39 नवीन
वा वा.. हे म्हणजे सासू सुनेने भर बाजारात एकमेकांच्या उखळ्यापाखळ्या काढायच्या, आणि कोणी विचारले तर हे आमचे मतस्वातंत्र्य आहे म्हणायचे अशातला प्रकार झाला असो. शेवटी आपला तो बाब्या. तुम्ही काय नि आम्ही काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

तेच तर . त्यामुळे पक्ष

पिंपातला उंदीर
Tue, 03/03/2015 - 15:23 नवीन
तेच तर . त्यामुळे पक्ष व्यक्तिकेंद्रित (पक्षी भाजप ) किंवा घराणे केंद्रित (पक्षी काँग्रेस ) बनणार नाही . सत्तेचे पाशवी केंद्रीकरण होणार नाही . पण हे दोन्ही पक्षांना परवडणारे नाही
  • Log in or register to post comments

केजु-सरकार व्यवस्थित चालणार.

आकाश कंदील
Tue, 03/03/2015 - 17:02 नवीन
योगेंद्र यादव अतिशय शांत, सभ्य गृहस्त वाटतात, ते पक्षाचे रणनीतीकार आहेत, असे असले तरी दिल्लीच्या लोकांनी केजुकडे पाहून मत दिलेली आहेत. म्हणून जो पर्यंत केजु-सरकार आश्वासनांची पूर्तता करत आहे तो पर्यत केजु-सरकार व्यवस्थित चालणार.
  • Log in or register to post comments

हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे

श्रीगुरुजी
Tue, 03/03/2015 - 22:54 नवीन
हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे. १-२ दिवसातच शमेल व परिस्थिती शांत होईल. तोपर्यंत माध्यमांना ब्रेकिंग न्यूज मिळत राहील.
  • Log in or register to post comments

मला वाटते...

विकास
Wed, 03/04/2015 - 23:42 नवीन
हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे. मला वाटते हे कफ सिरप मधले वादळ आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लेख वर आणन्याची गरज आहे.

संदीप डांगे
Tue, 03/03/2015 - 23:57 नवीन
लेख वर आणन्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments

की फर्क पैन्दा

रमेश आठवले
Wed, 03/04/2015 - 07:56 नवीन
आप मधील काही पदाधिकारी गेले काय किंवा राहिले काय! आप पक्ष आपली दिल्लीच्या जनतेला दिलेली अवास्तविक आश्वासने येत्या पाच वर्षात पूर्ण करू शकणार नाही हे सत्य आहे . हे खापर फुटेल त्या वेळेला भूषण बापलेक आणि योगेंद्र महत्वाच्या पदावर कदाचित नसतील इतकेच.
  • Log in or register to post comments

Friends, I beg apology from

नांदेडीअन
Wed, 03/04/2015 - 12:15 नवीन
Friends, I beg apology from all my Aap colleagues. I respect Prashantji & was angry with him for talking to media.I was doing the same on SM . I have deleted all my tweets.. I feel I too have made a BIG MISTAKE of going public. I stand corrected. I thank the vol who corrected me. - Anjali Damania I shd not have commented about Bhushans in public. We've fought for many public causes together & will hopefully continue to work as a team . Have deleted my tweets. Am accountable to every last volunteer & will forever work to strengthen the party. - Ashish Khetan
  • Log in or register to post comments

नुसते ट्वीट डिलीट करून

निनाद जोशी
Wed, 03/04/2015 - 13:50 नवीन
नुसते ट्वीट डिलीट करून बोललेल्या गोष्टी मागे घेता येतात का ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

झालेली गोष्ट चुकीची होती आणि

नांदेडीअन
Wed, 03/04/2015 - 15:54 नवीन
झालेली गोष्ट चुकीची होती आणि ती व्हायला नको होती हे कबूल करण्याची भावना आहे त्यामागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी

वॉव...

अर्धवटराव
Fri, 03/06/2015 - 02:56 नवीन
भावना आवडली. प्रशांत भूषण साहेबांनापण ति आवडो अशी आशा( शिमगोत्सवानिमीत्त ) करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

ताजी बातमी

सव्यसाची
Wed, 03/04/2015 - 20:55 नवीन
प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे PAC मध्ये असणार नाहीत.
  • Log in or register to post comments

संपला 'आआप'मधील वाद. हे

श्रीगुरुजी
Wed, 03/04/2015 - 23:07 नवीन
संपला 'आआप'मधील वाद. हे चहाच्या पेल्यातील वादळ नसून साधी फुंकर होती.
  • Log in or register to post comments

१४ फेब्रुवारीला झाडू खरेदी

खटासि खट
गुरुवार, 03/05/2015 - 00:00 नवीन
१४ फेब्रुवारीला झाडू खरेदी केला आहे. अजून काय वाय फाय पकडत नाही..
  • Log in or register to post comments

धीर धरी

विकास
गुरुवार, 03/05/2015 - 03:03 नवीन
इथे साहेबांनी सपष्ट सांगितल्या हाय! Free Wi-Fi not before a year: Arvind Kejriwal
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

दिल्लीकरांनी फुकट वायफाय

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/05/2015 - 13:01 नवीन
दिल्लीकरांनी फुकट वायफाय मिळण्याच्या आश्वासनामुळे आआपला मते दिली होती असे वाटत नाही. वीजबिलात ५०% टक्के घट, मोफत पाणी, कंत्राटी कामगारांना कामावरून न काढण्याची हमी आणि बेकायदेशीर झोपडपट्ट्यांना मान्यता या प्रमुख आश्वासनांवर आआपला मते मिळाली असावीत. ही आश्वासने पहिल्या १५ दिवसांतच पूर्ण झाल्यामुळे फुकट वायफाय, १५ लाख सीसीटीव्ही इ. आश्वासने पूर्ण झाली नाहीत तरी दिल्लीकरांना फार फरक पडणार नाही. पंचपक्वानांचे चविष्ट जेवण पोटभर मिळाल्यानंतर बडीशेप मिळाली नाही किंवा दात कोरायची काडी दिली नाही म्हणून कोणी असमाधानी होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मतदारांकडून फॉर्म भरून घेतले

खटासि खट
गुरुवार, 03/05/2015 - 23:44 नवीन
मतदारांकडून फॉर्म भरून घेतले होते का ? आम्हाला बी दावा ना गडे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आडातले पाणी कसे वाढवणार ?

रमेश आठवले
Fri, 03/06/2015 - 02:43 नवीन
दिल्लीतील मतदारावर दौलतजादा करण्याची आश्वासने पुरी करायला लागणारी अधिक धनाची तरतूद आप पार्टी कसे करणार हे उमगत नाही . २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली तरी केंद्रसरकार त्यासाठी बजेट वाढवून देईल असे वाटत नाही. आपच्या आत्तापर्यन्त्च्या धोरणा प्रमाणे ते त्यांच्या अख्तार्यात असलेलेल्या बाबींवर कराचा दर वाढवू शकणार नाही . अशा परीस्थितीत फ्री बी वर पैसे वापरल्यानंतर राज्याच्या येत्या पाच वर्षातील विकासासाठी आर्थिक तोंड मिळवणी कशी करणार ? की विकास होणारच नाही ? अब आयेगा उंट पहाडके नीचे - असे होण्याची शक्यता आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आप च्या विजयामुळे तसा मला

चिनार
गुरुवार, 03/05/2015 - 10:08 नवीन
आप च्या विजयामुळे तसा मला फार आनंद झाला नाही. पण पुढील ५ वर्ष त्याचं कामकाज बघून नंतरच आपलं मतं द्यावं असं ठरवलं आहे. सध्याच्या घडामोडी दुर्दैवी आहेत पण प्रत्येक पक्षाला यातून जावेच लागते. त्यामुळे आप वर टीका करणे योग्य नाही असं वाटतं. प्रदेशाध्याक्षाच्या निवडीवरून सध्या काँग्रेस मध्ये सुद्धा वादंग माजले आहे. पण हे आपण गृहीतच धरले असल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही
  • Log in or register to post comments

आप च्या विजयामुळे तसा मला फार

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 03/05/2015 - 10:41 नवीन
आप च्या विजयामुळे तसा मला फार आनंद झाला नाही. पण पुढील ५ वर्ष त्याचं कामकाज बघून नंतरच आपलं मतं द्यावं असं ठरवलं आहे. १००% सहमत. सध्याच्या घडामोडी दुर्दैवी आहेत पण प्रत्येक पक्षाला यातून जावेच लागते. त्यामुळे आप वर टीका करणे योग्य नाही असं वाटतं. असहमत. केवळ आपवरच नव्हे तर आपमध्ये सध्या जे चालले आहे ते इतर कोणत्याही पक्षात चालले असले तर त्यावर टीका करायलाच पाहिजे. "नागरीक सजग आहेत, आपल्यावर नजर ठेवून आहेत आणि आपल्या कर्माची फळे ते आपल्याला (पुढच्या निवडणूकीत तरी नक्की) देतील" अशी खात्री सर्व राजकीय पक्षांना वाटल्याशिवाय खरी लोकशाही येत नाही. प्रदेशाध्याक्षाच्या निवडीवरून सध्या काँग्रेस मध्ये सुद्धा वादंग माजले आहे. पण हे आपण गृहीतच धरले असल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही. +१. एखाद्या पक्षाकडून सर्व आशा खुंटल्यावर आणि बोलून तरी काय फायदा अशी खात्री झाल्यावरच असे दुर्लक्ष होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये

सव्यसाची
गुरुवार, 03/05/2015 - 14:15 नवीन
राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये काय घडले? http://www.firstpost.com/politics/last-minute-drama-behind-yadav-bhushans-ouster-kejriwal-played-hardball-threatened-to-quit-2136449.html मयंक गांधी यांनी आज एका ब्लॉग वर राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये काय घडले यावर आपले मत मांडले आहे. http://indiatoday.intoday.in/story/aaps-mayank-gandhi-blog-defies-kejriwal-gag-yogendra-yadav/1/422379.html या सगळ्यांमधून मला एक प्रश्न पडला आहे तो असा कि नेमके कोणत्या कारणासाठी या दोघांना PAC मधून बाहेर ठेवण्यात आले? त्याची कारणे पक्षाकडून अजूनपर्यंत आली नाहीत. असे का व्हावे?
  • Log in or register to post comments

हा एक कुठलीही एक विशिष्ट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/06/2015 - 08:08 नवीन
हा एक कुठलीही एक विशिष्ट विचारधारा नसणारा पक्ष फुटावा आणि तो मफलरवाला संधीसाधु तोंडावर आपटावा ही श्री चरणी प्रार्थना...एकदा मुर्ख बनवलय. हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी देउन दिल्लीच्या अर्थकारणाची वाट लावेल.
  • Log in or register to post comments

कुठलीही एक विशिष्ट विचारधारा

खटासि खट
Fri, 03/06/2015 - 08:12 नवीन
कुठलीही एक विशिष्ट विचारधारा नसणारा पक्ष >>> हे तर बलस्थान की ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

विचारधारा किंवा एक धोरण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/06/2015 - 08:38 नवीन
विचारधारा किंवा एक धोरण नसलेली व्यक्ती किंवा पक्ष निर्णयक्षम असु शकत नाही. अर्थात हा माझा विचार आहे. तुम्हाला तसचं वाटावं अशी अपेक्षा नाही. आप हा संधीसाधुंचा पक्ष आहे असं त्याच्या स्थापनेपासुनचं मत आहे. राजकारण्याकडे अपेक्षित असणारा धुर्तपणा मफलरवाल्याकडे नाही. त्याचा उद्देश साफ असेलही पण फक्त चांगला उद्देश ह्या पायावर दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करता येऊ शकत नाही. कमी दरात वीजबील, फुकट पाणी, वायफाय वगैरे सेवांचा ताण शेवटी सरकारी तिजोरीवरचं येणार आहे, त्याची तरतुद काय? त्यातुन दिल्लीमधले नागरिक आणि कराचा भरणा ह्या गोष्टी एका वाक्यात वापरल्या तर "ग्रॅमॅटिकल मिस्टेक" मानतात. केजरीवालची आश्वासनं म्हणजे मला तरी वादळात पत्त्यांचा बंगला बांधायच्या गोष्टी करण्याएवढ्याचं मुर्खपणाच्या वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

With the end of the cold war,

खटासि खट
Fri, 03/06/2015 - 08:45 नवीन
With the end of the cold war, all the 'isms' of the 20th century - Fascism, Nazism, Communism and the evil of apartheid-ism - have failed. Except one. Only democracy has shown itself true the help of all mankind.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जगात मोजकेच इझम्स शिल्लक

खटासि खट
Fri, 03/06/2015 - 08:48 नवीन
जगात मोजकेच इझम्स शिल्लक राहणार आहेत स्ट्रेट, बाय, सम आणि तत्सम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

काय बोललात चिमणराव... १ नंबर

होबासराव
Wed, 03/11/2015 - 21:04 नवीन
तुमचि प्रार्थना मान्य झाली. मफलरवाला संधीसाधु तोंडावर आपटला.. ये भि उन्हि मे से एक है. ह्म जानते थे. हया सगळ्या पोरखेळात दिल्लि चे आणि देशाचे नुकसान झाले असे वाटते कारण आता जनता कुठ्ल्याहि नविन पक्षा ला डावलेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी

विशाल कुलकर्णी
Fri, 03/13/2015 - 13:34 नवीन
हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी देउन दिल्लीच्या अर्थकारणाची वाट लावेल. अगदी अगदी , सगळ्यात महत्वाची आणि मोठी भीती तीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आप मध्ये नेमके चाललंय तरी काय?

सव्यसाची
Wed, 03/11/2015 - 19:12 नवीन
आज सकाळी बातमी आली कि योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षामधून काढून टाकावे अशी मागणी आमदारांनी केली आहे. त्यानंतर दुपारी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्र जारी केले. http://www.firstpost.com/politics/yadav-bhushans-letter-blows-up-in-kejriwals-face-duo-talks-of-undemocratic-ways-in-aap-2148073.html नंतर राजेश गर्ग या माजी आमदाराने केजरीवाल आणि त्यांच्यातील एक संभाषण जाहीर केले. ( याची सत्यासत्यता पडताळून पाहणारी बातमी माझ्या वाचनात आली नाही. ) त्यानुसार ६ काँग्रेस आमदारांनी आपल्याला सपोर्ट केले पाहिजे असे केजरीवाल या तथाकथित स्टिंग मध्ये म्हणत आहेत. http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/arvind-kejriwal-tried-to-poach-6-cong-mlas-last-year-claims-ex-aap-mla/articleshow/46529379.cms ही बातमी ऐकून अंजली दमानिया यांनी पार्टीचा राजीनामा दिला. http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/anjali-damania-quits-aap-says-backed-kejriwal-for-values-not-horse-trading/articleshow/46528087.cms संध्याकाळी आशिष खेतान यांची मुलाखत मी पहिली. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश थोडक्यात असा: (चू. भू. द्या. घ्या) सध्यापुरते असे समजून चालू की हि टेप खरी आहे. परंतु यात horse trading हा शब्द वापरता येणार नाही कारण कुणालाही मंत्री, चेअरमन वगैरे पदाचा लोभ दाखवला नाही. हे फक्त political realignment आहे, जे भारतामध्ये कायमच होत आलाय. मला खरेच माहिती नाही कि हि टेप खरी आहे कि नाही आणि जर खरी असेल तर आप कडून वरचा प्रतिसाद येणार असेल तर मात्र कठीण आहे. कुणाचा विश्वास बसेल कि या पक्षाने महिनाभरापूर्वी राजधानीत ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या.
  • Log in or register to post comments

उपचारासाठी बंगळुरास गेलेले

श्रीगुरुजी
Mon, 03/16/2015 - 14:02 नवीन
उपचारासाठी बंगळुरास गेलेले केजरीवाल आज दिल्लीत परतत आहेत. त्यांच्या उपस्थितीत 'आआप'मध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. राजेश गर्ग आणि शाहीद आझाद यांनी केजरीवालांचे स्टिंग ऑपरेशन केलेले ध्वनिमुद्रीत संभाषण प्रसिद्ध केले आहे. 'आआपचे' दिल्लीतील कायदा मंत्री जिंतेंद्रसिंह तोमर यांची बनावट पदवी प्रमाणपत्रे उघडकीस आली आहेत. भूषण पितापुत्र व योगेंद्र यादव यांची राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी झाली आहे. त्यांनी केजरीवालांना लिहिलेली ई-मेल्स प्रसिद्ध झाली आहेत. राजेश गर्ग यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. अंजली दमानियांनी पक्ष सोडलेला आहे. इतक्या सगळ्या गदारोळात केजरीवाल मौन बाळगून आहेत. या सर्व प्रकारांना त्यांची मूक संमती असणार. परंतु आपल्यावर दोषारोप होऊ नयेत म्हणूनच मुद्दाम त्यांच्या अनुपस्थितीतच हे सर्व घडल्यासारखे वाटते. १९६० च्या दशकात चीनमधील कम्युनिस्ट पक्षात यादवी माजली होती. त्याचवेळी माओ जवळपास २ वर्षे पेकिंग सोडून गेला व दुसर्‍या शहरातून कारभार चालवत होता. दरम्यानच्या काळात माओ समर्थक व विरोधक यांच्यात प्रचंड भांडणे होउन अनेक माओविरोधकांविरूद्ध पक्षातील कार्यकर्त्यांनीच रणकंदन माजवून त्यांना बदडून काढणे, त्यांची जाहीर निर्भत्सना करणे, पक्षातून काढून टाकणे इ. प्रकार करून त्यांना हतबल करून सोडले. हे सर्व प्रकार सुरू असताना माओ पेकिंगमध्ये फिरकलाही नाही आणि तो गप्प बसून राहिला. शेवटी २ वर्षांनंतर बरेचसे विरोधक नेस्तनाबूत झाले आहेत याची खात्री झाल्यावर माओ पेकिंगमध्ये परतला. हे सर्व प्रकार माओच्याच संमतीने सुरू होते व माओ त्यापासून मुद्दाम दूर राहिला होता. केजरीवालांच्या अनुपस्थितीत दिल्लीत जे चालले आहे त्यावरून चीनमधील हा इतिहास आठवला. केजरीवाल बरे होऊन दिल्लीत परतत आहेत, परंतु 'आआप' आजारी पडला आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची

केजरीवालांच्या अनुपस्थितीत

हाडक्या
Mon, 03/16/2015 - 17:11 नवीन
केजरीवालांच्या अनुपस्थितीत दिल्लीत जे चालले आहे त्यावरून चीनमधील हा इतिहास आठवला.
रेफरन्स आवडला.. तसेही माओची कम्युनिस्ट राजवट असो वा लोकशाहीतले राजकारण शेवटी "पटावरचे सगळेच घोडे अडीच चालींचे" असं म्हणावसं वाटतंय. फक्त एकच की पाच एक वर्षांनंतर या घटनांचे मूल्यमापन नीट करता येईल. आत्ता या क्षणी कुठलेही कंक्लूजन घाईचेच ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आप सरकार टिकावे

वेताळ
Wed, 03/11/2015 - 20:35 नवीन
कारण दिल्लीतल्या लोकाना कळाले पाहिजे फुकट गोष्टी किती महाग पडतात.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Wed, 03/11/2015 - 20:56 नवीन
सहमत Private-Arvind-Alone-Party उर्फ PAAP समर्थक. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

लोकसत्ता अग्रलेख...

यश राज
गुरुवार, 03/12/2015 - 09:17 नवीन
आज लोकसत्ता मध्ये आलेला अग्रलेख वाचला. http://www.loksatta.com/sampadkiya-news/chaos-in-aap-1080091/ अगदी उचीत असा लेख आहे. हा पक्ष संधीसाधूंचा पक्ष आहे हे परत एकदा सिद्ध झाले. या बाबतीत बाकीचे 'आप्'टार्ड्स काय प्रतिक्रीया देतात त्याची उत्सुकता आहे...
  • Log in or register to post comments

झी टिव्ही नुसार दुसरे स्टींग ऑपरेशन...

विकास
Fri, 03/13/2015 - 03:55 नवीन
आत्ताच झी टिव्ही जालीय बातम्यांवर (भारतातील Friday, March 13, 2015 - 00:47) वाचनात आल्या प्रमाणे केजरीवालांनी दिल्लीत मुस्लीमांना विधानसभेचे तिकीट देण्याचे नाकारले. मुस्लीमांना आप शिवाय पर्याय नाही, त्यामुळे ते मते देणारच आहेत, असे काहीसे त्यांचे विश्लेषण/राजकारण होते. ९० मिनिटाच्या दुसर्‍या स्टींग ऑपरेशनमधे ते आता उघडकीस आले आहे. गंमत म्हणजे इतरांचे स्टींग ऑपरेशन करण्यास उत्तेजीत करणार्‍या आप पार्टीचे नेते आषुतोष तावातावाने म्हणत होते की स्टींग टेप या शास्त्रिय पद्धतीने सिद्ध केल्या पाहीजेत. असो. चालायचेच. :(
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा